Author: saimat team

चाळीसगाव, प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड (लालबर्डी) येथे दिं. ९ रोजी जि.प. उच्च प्राथमिक शाळेला गरजू विद्यार्थ्यांना सेवा सहयोग फाऊंडेशन पुणे या संस्थेचे गुणवंतजी सोनवणे यांच्या संकल्पनेतून ४३ स्कुल किटचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावाचे सरपंच श्री. प्रदीपराव भोसले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविकात सेवा सहयोग ग्रामोद्य प्रकल्पाचे समन्वयक सोमनाथ माळी यांनी संस्थेच्या माध्यमातून तालुक्यात सुरू असलेल्या जलसंधारण,सामाजिक,शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या मदतीबाबत तसेच ग्रामोद्य प्रकल्पाअतर्गत गरजू महीलासाठी सुरू असलेल्या शिवणकाम तसेच युवकांसाठी सुरू असलेल्या गँरेजप्रशिक्षण व रोजगार निर्मिती बाबत माहिती दिली तसेच विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रमुख मान्यवर म्हणून सेवा सहयोगचे राहुल राठोड, सौ.बागुल मॅडम,श्री तुफान खोत सर उपस्थित…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । आज बुधवार , दिनांक 9 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजता वाघ नगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगांव जिल्हा (महानगर) तर्फे जिल्हा महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली महानगर संघटक सहसचिव संजय जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्यता नोंदणी अभियान व कोरोना लसीकरण शिबीर राबविले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील होते तर कार्यक्रमाचे उदघाटन महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. रविंद्र पाटील यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित केले व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात १०० नागरिकांची सदस्यता नोंदणी करण्यात आली व 50 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. तसेच वाघ नगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व भारतीय…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । विविध साहित्यांची चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला ८ रोजी मंगळवारी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव एमआयडीसी परिसरातील श्रीराम पॉलिमर्स या कंपनीत १३ हजार ६०० रुपये किंमतीच्या विविध साहित्यांची चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला पोलीसांनी मंगळवारी ८ फेब्रुवारी रोजी अटक केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निकीता राजेंद्र महाजन (वय-१९) रा. मेहरूण जळगाव यांची एमआयडीसीच्या व्ही सेक्टर मधील श्रीराम पॉलीमर्स नावाची चटई तयार करण्याकामी लागणाऱ्या दाण्याची कंपनी आहे. १७ जानेवारी रोजी निकीता आणि त्यांची आई सल्भा महाजन यांनी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास कंपनीतील काम बंद करून घरी…

Read More

जम्मू, वृत्तसंस्था । भारतीय रेल्वे जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच पूल बांधत आहे. चिनाब पूल म्हणून ओळखला जाणारा हा पूल यावर्षी डिसेंबरपर्यंत रेल्वे वाहतुकीसाठी सुरु होणार आहे. हा पूल पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा सुमारे 35 मीटर उंच असून त्याची लांबी सुमारे 1.3 किलोमीटर इतकी आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून या पुलाचा फोटो शेअर केला आहे. त्यांनी या फोटोसह कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ढगांमध्ये दिसणारा जगातील सर्वात उंच कमान असलेला चिनाब पूल.’ अतिशय सुंदर दिसणारे हे चित्र एखाद्या पेंटिंगपेक्षा कमी नाही. हा पूल एवढा उंच आहे की, त्याच्या काही फूटखाली ढगही दिसत असल्याचे चित्रात दिसतेय. चिनाब नदीपात्रापासून सुमारे 359…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । प्रभाग क्र. 12 मधील विकास कामांचे फलक फाडणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्यात यावी, ह्याबाबतचे निवेदन युवा सेना जळगाव महानगरतर्फे अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांना देण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रभर विकास कामे झपाट्याने करीत आहे. जळगाव शहरात सुद्धा राज्यसरकारचे नगरविकास मंत्री मा.ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबरावजी पाटील साहेब यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून जळगाव शहरातील विविध प्रभागात विकास कामे सुरू आहेत. सदर विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी या अनुषंगाने प्रभाग क्र. 12 मधील शिवसेनेचे नगरसेवक तथा गटनेते अनंत जोशी व ज्येष्ठ नगरसेवक नितीनजी…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाने किराणा दुकान सुपर मार्केट व मॉलमधून “वाइन” विक्रीचा निर्णय घेतला आहे तो निर्णय महाराष्ट्र सरकारने तातडीने रद्द करावा अशी मागणी करणारे निवेदन समाजसेवक अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास जळगाव जिल्हा यांच्यातर्फे जिल्हाधिकारी जळगाव यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना दि.8 फेब्रुवारी2022 रोजी देण्यात आले. सदरचे निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी सूर्यवंशी यांना दिले आहे या निवेदनामध्ये नवीन युवा पिढी,सामान्य जनता व्यसनाधीन होण्याचे वाढते प्रमाण झाल्या शिवाय राहणार नाही त्यामुळे हा निर्णय अतिशय चुकीचा आहे त्यामुळे राज्य शासनाने रद्द करावा अन्यथा भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास जळगाव जिल्ह्याच्या वतीने तालुका आणि जिल्हा स्तरावर विविध प्रकारचे…

Read More

भडगाव, प्रतिनिधी । कजगाव तालुका भडगाव जळगाव चांदवड महामार्गावरील अपूर्ण काम अपघाताला आमंत्रण देत आहे, भोरटेक गावजवळ , वळणावर थांबलेल्या कामा मुळे बरेच अपघात होत असतात , जळगाव चांदवड महामार्गाचे बरेच काम पूर्ण झाले आहेत, मात्र वळणावरील सारे कामे अपूर्ण असून बंद पडली आहेत. या खराब रस्त्यावर वळणावर अनेक अपघात झाले आहेत व बरेच मोटरसायकल स्वराना मोठी दुखापत झाली आहे , मात्र दोन ते तीन वर्षा पासून ही कामे रखडली आहे , अजून पूर्ण झाले नाही, रस्त्याच्या वळणावर खडी वर आल्याने बरेच अपघात होत असतात, जेथे काम थांबले आहे तेथे साधी डॉग जूगी ही होत नाही हे मात्र दुर्दैव, भोरटेक…

Read More

जळगाव, , प्रतिनिधी । ज्येष्ठ गायिका व भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांना रायसोनी महाविध्यालयातर्फे सोमवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. बिजनेस मॅनेजमेंट विभागाच्यावतीने श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयातील म्युझिक क्लबच्या वतीने दिवसभर लता मंगेशकर यांची गाणी सुरू ठेवून महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांच्यासह विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल म्हणाले कि, ‘‘प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींसाठी त्यांनी गाणं गायले. स्वातंत्र्यदिन असो की, सकाळी उठल्यावर देवाची आरती, मंदिरात गेल्यावर कानावर पडणारे सुर असो त्यांनी त्याला शब्दबद्ध करत गायले. तसेच…

Read More

जामनेर, प्रतिनिधी । पहूर जवळ असलेल्या पिंपळगाव बुद्रुक या परिसरात चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, शेतातून मोटार पंप,केबल वायर,व पाईप, यांचे चोरीचे प्रमाण वाढत असून गावठी दारूचे प्रमाणही वाढत आहे गेल्या काही दिवसापूर्वी पहूर पोलिस स्टेशनला पो.नि . अरुण धनवडे साहेब असताना अवैध धंदे गावठी दारू सट्टा पत्ता आणि चोरीचे प्रमाण बंद झाले होते, अरुण धनवडे साहेब यांची राजकीय पुढाऱ्यांच्या हातून त्यांची बदली झाल्याचे समजते, धनवडे साहेब पहूर येथून बदली होतास अवैध धंदे, सट्टा, पत्ता, आणि चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, अवैध धंद्या वरती आणि गावठी दारू सट्टा पत्ता यांचे प्रमाण वाढले असून ते बंद होईल का, यांच्याकडे सर्व…

Read More