मुंबईः राज्यातील प्रमुख शहरांत जरी करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असली तरी राज्यातील १८ जिल्हे अजूनही रेड झोनमध्ये असून या जिल्ह्यात करोनाचा रुग्णांची संख्यांही अधिक आहे. या जिल्ह्यांसाठी आरोग्य विभागानं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज म्युकरमायकोसिस या आजारासंदर्भात एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील उपस्थित होते. त्याच दरम्यान होम आयसोलेशनबाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘रेड झोनमध्ये असलेल्या ज्या १८ जिल्ह्यांत पॉझिटिव्हीटी रेट जास्त आहे त्या जिल्ह्यांना दोन सूचना देण्यात आल्या आहेत. एक म्हणजे होम आयसोलेशन बंद करा आणि कोविड केअर सेंटर वाढवा, व दुसरी कोविड केअर सेंटर वाढवून सगळ्या रुग्णांना कोविड सेंटरमध्ये…
Author: saimat team
जळगाव : प्रतिनिधी तौक्ते चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरून पुढे गुजरातला गेले आहे. जेवढे नुकसान तिकडे झाले, त्यापेक्षाही अधिक महाराष्ट्रात झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातची पाहणी करून त्यांना तातडीने मदतही जाहीर केली आहे. मग महाराष्ट्राला मदत का जाहीर केली नाही असा टीकात्मक प्रश्न माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला आहे. हा महाराष्ट्रावर अन्याय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातप्रमाणे महाराष्ट्राला मदत करणे अपेक्षित आहे. राज्यातील जनतेचे वादळाने नुकसान झाले तर राज्य सरकारने मदत केली पाहिजे, त्या दृष्टीने राज्य सरकार हालचाली करीत असून त्यांची मदत जाहीर होणार आहे; परंतु केंद्र सरकारकडून दुजाभाव होता कामा नये.…
जळगाव : प्रतिनिधी येथील शिवसेना महानगरतर्फे रिक्षाचालक बांधवांसाठी पांडे डेअरी चौकात मदत कक्ष स्थापन करण्यात आला असून केंद्राचे उद्घाटनमहापौर जयश्री महाजन, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देशमुख, माजी महापौर नितिन लढ्ढा, शिवसैनिक विराज कावडीया यांच्या हस्ते करण्यात आले. हे मदत केंद्र २५ मेपासून ५ जून पर्यत सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. यावेळी माजी महापौर विष्णू भंगाळे, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, नगरसेवक प्रशांत नाईक, नितिन बरडे, अनंत जोशी, गणेश सोनवणे, मनोज चौधरी, शिवसेना महिला महानगर प्रमुख शोभा चौधरी, शिवसैनिक विराज कावडीया, जितेंद्र छाजेड, प्रकाश कावडीया उपस्थित होते. राज्य शासनाने पंधरा दिवसांसाठी लागू केलेल्या कडक निर्बंधांमुळे दुर्बल घटकांना…
पहूर ता. जामनेर : वार्ताहर राज्यभर तसेच जळगाव जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्ण संख्येत वाढ होत असून यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. आता ग्रामीण भागातही कोरोनारुग्ण या आजाराने त्रस्त झाले आहेत. पहूरमधील एक तरुण मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात उपचार घेत आहे. या आजाराचा वाढता धोका लक्षात घेता येथील ग्रामीण रुग्णालयात शनिवारी जिल्ह्यातील पहिले म्युकरमायकोसिस रोगनिदान शिबिर जीएम फाउंडेशन व आर्या फाउंडेशनने आयोजित केले होते. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे होते. पहूर ग्रामीण रुग्णालयात घेतलेल्या या शिबिरात जवळपास ५० रुग्णांची तपासणी नेत्र रोगतज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी केली. या वेळी त्यांनी उपस्थित रुग्णांना मार्गदर्शन करुन काळजी घेण्याचे आवाहन…
अमळनेर : प्रतिनिधी कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे मुळे असलेल्या लोक डाऊन मुळे सेक्सवर्कर महिलांचा व्यवसाय पूर्णपणे बंद असून आधार संस्थेच्या माध्यमातून अनेक वेळा महिलांना मदत करण्यात येते. यावेळीही रोटरी क्लब सदस्यांनी पुढाकार घेऊन वस्तीतील गरजू महिलांना मदत करण्यात आली . यावेळी अंमळनेर रोटरी क्लबचे प्रेसिडेंट अभिजित भांडारकर, विनोद पाटील, महेश देशमुख, विवेक देशमुख, रोहित शिंघवी, प्रतीक जैन, ऋषभ पारख, योगेश येवले, ताहा बुकवाला, आधार संस्थेच्या अध्यक्षा डॉ. भारती पाटील, कार्यकारी संचालक रेणू प्रसाद , अश्विनी भदाणे, मनिषा पाटील, यास्मिन शेख, नंदिनी चौधरी, संजय कापडे, कलीम खान, जीवन मोरे, राहुल पाटील आदी उपस्थित होते.
यावल ः प्रतिनिधी येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी देवयानी महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पालिकेच्या सभागृहात पिठासीन अधिकारी तथा तहसीलदार यांनी निवडीसाठी ऑनलाइन विशेष सभा घेतली. विहित मुदतीत एकच नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्याने महाजन यांची बिनविरोध निवड जाहीर झाली. तत्कालीन उपनगराध्यक्षा पौर्णिमा फालक यांनी काही दिवासांपुर्वी राजीनामा दिला होता. रिक्त असलेल्या जागेवर सोमवारी नूतन उपनगराध्यक्षांची निवड करण्यात आली. नगरपालिकेच्या सभागृहात सकाळी उपनगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात आले. या मुदतीत सत्ताधारी गटातील देवयानी गिरीश महाजन यांनी अर्ज दाखल केला. त्यांना सूचक गटनेता अतुल पाटील होते तर अनुमोदक अभिमन्यु चौधरी होते. पीठासीन अधिकारी तहसीलदार महेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन विशेष सभा घेऊन निवडणूक…
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील कामशेत बोगद्यात इनोव्हा कारचा टायर फुटल्यामुळं झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतामध्ये जीएसटी डेप्युटी कमिशनर अभिजित घवले यांचा समावेश आहे. (GST Deputy Commissioner Killed in Accident at Mumbai Pune Expressway) हा अपघात मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास झाला. घवले हे त्यांच्या आई-वडिलांना भेटायला चालले होते. या दुर्घटनेमुळे त्यांची आई-वडिलांची भेट अधुरीच राहिली. अभिजीत घवले (जीएसटी डेप्युटी कमिशनर) यांच्यासह शंकर गोडा यतनाल यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत घवले यांच्या आई-वडिलांचा लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे कार्यक्रमासाठी अभिजित घवले हे त्यांची पत्नी, साडू व चालक हे इनोव्हा कारने लातूरला गावी चालले…
जळगाव ः प्रतिनिधी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सर्व वार्डात व परिसरात सोमवारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच निर्जंतुकीकरण देखील करण्यात आले. राज्य शासनाने करोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी कडक निर्बंध लावले आहेत. यामुळे जिल्हाभरामध्ये कोरोना महामारी आता कमी झाली आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात देखील सोमवारी २४ मार्च रोजी सुमारे १८० खाटा ह्या रिक्त झाले आहेत. त्यामुळे सर्व वॉर्डमध्ये साफसफाई करण्यात आली. तसेच परिसर निर्जंतुकीकरण देखील करण्यात आला. एस.एम.एस संस्थेचे सफाई व कंत्राटी कामगार, चतुर्थश्रेणी कर्मचारी आणि सफाई कामगार यांनी यात सहभाग घेतला. निर्जंतुकीकरण आणि साफसफाई करीत असताना एसएमएस कंत्राटी कर्मचार्यांचे निरीक्षक अजय जाधव, चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांचे…
जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष हाजी अब्दुल गफ्फार मलिक (वय ७२) यांचे काल रात्री १०.३० वाजता आर्किड हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी त्याच्या शनी पेठ मधील निवास्थानातून निघेल. त्यांच्या पश्चात तीन मुले, सहा मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. हाजी अब्दुल गफ्फार मलिक यांनी तत्कालीन जळगाव नगरपालिका आणि नंतर जळगाव महापालिकेत नगरसेवकपदासह विविध समितींचे अध्यक्षस्थान भूषविले. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेले मलिक यांनी दादांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली तरी स्वत: पक्ष सोडला नाही. यानंतर त्यांना पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले. जळगाव ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष, इकरा एज्युकेशन सोसायटीचे सचिव अशी पदे…
मुंबई : राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारकडून देण्यात आलेल्या १२ नावांची यादी अखेर सापडली आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे . राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यावर निशाणा साधला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “फाईल मिळाली ही आनंदाची गोष्ट आहे. फाईलवर राज्यपाल सही करतील तेव्हा संपूर्ण राजभवनाला आम्ही पेढे वाटू. फाईल मिळाली म्हणजे ती भुताने पळवली नाही आणि भुतं असली तर त्यांच्या आसपास असावीत. उच्च न्यायालयाने फाईलवर अद्याप निर्णय का होत नाही, असा प्रश्न विचारला आहे, ती फाईल बोफोर्स, राफेलची आहे का? भ्रष्टाचाराची आहे…