Author: saimat team

यावल ः तालुका प्रतिनिधी अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर यावल येथील मंडळ अधिकारी आणि अंजाळे येथील तलाठी यांनी पकडले,ट्रॅक्टर पकडल्यानंतर तिसर्‍या दिवशी सर्कल याने यावल पो.स्टे.ला हे ट्रॅक्टर वाळूसह जमा केले त्यानंतर अवैध वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर मालक चालकाकडून यावल तहसीलदाराने सव्वा लाख रुपये दंड आकारणी न करता वाळू तस्करी प्रकरण रफादफा करून लाखो रुपयाचा शासनाचा महसूल बुडविला.हे प्रकरण आणि एका शासकीय अधिकार्‍याचा मनमानीयुक्त बेकायदा अधिकार माहिती अधिकारामुळे प्रथमदर्शनी उघडकीस आला असून जिल्हाधिकारी जळगाव,प्रांताधिकारी फैजपूर या प्रकरणाची चौकशी करणार आहे किंवा नाही,असा प्रश्न माहिती अधिकार कार्यकर्ता आणि पत्रकार सुरेश जगन्नाथ पाटील यांनी उपस्थित केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी महानगरपा लिकेच्या माध्यमातून जळगाव शहरातील विकास कामांसाठी निधी कमी पडूू देणार नाही. लवकरच जळगावला भेट देणार असल्याचे सांगत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रलंबित कामांची यादी घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा मुंबईला बोलावले असल्याची माहिती महापालिकेच्या पदाधिकार्‍यांनी दिली. जळगाव महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर महापौर जयश्रीताई महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी काल मुंबईला जाऊन प्रथमच नगरविकास व सार्वजनिक बांंधकाममंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या वेळी नगरविकास मंंत्री शिंदे यांनी त्यांना जळगावच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही दिली. तसेच आपण जळगावच्या विकासासंदर्भातील सर्व प्रलंबित विषयांची यादी घेऊन पुढील आठवड्यात पुन्हा या. सविस्तर चर्चा करून शासनस्तरावर भरीव मदत करू असे आश्‍वासन दिले.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी ३१ मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.तंंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यापासून लोकांंना रोखण्याचा हा दिवस या निमित्ताने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थामुळे होणार्‍या जीवघेण्या परिणामांची माहिती देत बुधगाव येथे राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष उर्वेश साळुंखेंने जनजागृती केली. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे लोक आपल्या आजूबाजूला सर्वत्र दिसून येतात. घर, कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारी व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारी व धुम्रपान करणारी मंडळींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. तंबाखू सेवन व्याप्ती आणि परिणाम तंबाखू सेवनाने भारतात साधारणत: १० लाख लोक मृत्यू पावत असल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्रात साधारणत: ३६ टक्के पुरुष…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी भाजपात राहिलात तर तुमच्या प्रभागात कामे होणार नाहीत, अशी धमकी नगरसेवकांना दिली जाते आहे. सत्तेच्या बळावर पैशांचेही आमिष दाखवले जाते आहे. मात्र, कोणतेही सत्ताधारी निधी खर्चाच्या बाबतीत अशा पक्षीय दुजाभाव करू शकत नाहीत, असा दावा भाजपचे नगरसेवक आणि माजी महापौर भारती सोनवणे यांचे पती कैलासअप्पा सोनवणे यांनी केला आहे. भाजपचे तीन नगरसेवक शनिवारी शिवसेनेला जाऊन मिळाले. आणखी काही नगरसेवक भाजप सोडून जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यात कैलास सोनवणे यांच्या नावाचाही उल्लेख काही जणांकडून केला जातो आहे. त्या अनुशंगाने त्यांना विचारले तेव्हा त्यांनी ही शक्यता फेटाळून लावली. गेल्या दोन महिन्यात पालकमंत्र्यांशी आपली भेटही झालेली नाही आणि फोनवरही…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रीय पातळीवर सध्या गाजत असलेला ‘द ग्रेट इंंडियन किचन’ हा सिनेमा कथानक, दिग्दर्शकीय कौशल्य व भारतीय स्त्रियांच्या जगण्याची होणारी कोंडी दाखणारा आहे. हिंसा ही दृश्य स्वरूपात अनेकदा ठळकपणे दिसते पण या चित्रपटात घरातील न दिसणारी हिंसा दिग्दर्शकाने प्रभावीपणे दाखवली आहे. घरातली छुपी हिंसा रसिकाला अस्वस्थ केल्याशिवाय राहत नाही, असे मत ज्येष्ठ सिनेअभिनेत्री वीणा जामकर यांनी परिवर्तन फिल्म क्लब आयोजित ‘चर्चा तर होणारच’ या चर्चेप्रसंगी मनोगतातून सांगितले. घराघरातील वास्तव मांडले टिपिकल पद्धतीने न मांडता दिग्दर्शकाने प्रत्येक फ्रेममध्ये गांभीर्याने घरात नातेसंबंधातील कळत नकळत होणारी हिंसा हा सवयीचा कसा भाग बनते, स्त्रीला स्वतःची आवडनिवड असते हे पुरुषप्रधान संस्कृतीत का स्वीकारले…

Read More

जळगाव : प्रतिनिधी गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जग कोरोनाच्य महामारीच्या संकटामुळे हैराण आहे. त्याचा परिणाम उद्योग, व्यवसाय, रोजगार यावर मोठ्या प्रमाणावर झाल्याने सर्वच स्तरातील जनतेचे दैनंदिन जीवनमान मुश्कीलीचे होवून बसले आहे. भारत हा कृषिप्रधान देश असल्यानं देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर अधीक अवलंबून आहे. शेतकरी देशाचा कणा आहे, असे आपण म्हणतो. आज हाच कणा मोडून पडला आहे. शेतकरी , मजूर मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. पावसाळा काही दिवसांवर येवून ठेपला असताना शेतीची मशागत, बी बियाणे, खते घेण्यासाठी जवळ एक दमडी देखील नाही. सध्याच्या परिस्थितीत कुणी सावकार उभा करीत नाही. अशा परिस्थितीत शेतकर्‍या पुढं एकच पर्याय असतो तो म्हणजे मोठ्या हौशेन पत्नी, सून…

Read More

जामनेर : पंढरीनाथ पाटील एरव्ही इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल जून महिन्यात जाहीर होऊन त्यानंतर अनुक्रमे अकरावी आणि बारावीनंतरच्या प्रवेश प्रक्रियांची सुरुवात होते.विशेषत: बारावीच्या निकालानंतर अभियांत्रिकी,वैद्यकीय,वैद्यकशास्त्र,एल .एल.बी व आर्किटेक्चर सारख्या अभ्यासक्रमांची सीईटी होते. जेईई व नीट या सारख्या केंद्रीय पातळीवरील परीक्षा होतात.मात्र यंदा कोरोणाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षाच रद्द करण्यात आल्याने तर बारावीच्या परीक्षा ही पुढे ढकलण्यात येणार असल्याने पुढील वर्षातील शैक्षणिक कॅलेंडर कोलमडून पडण्याची भीती विद्यार्थ्यांसह पालकांच्या मनात निर्माण होत आहे. यंदा मार्च महिन्यापर्यंत चाललेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला ही पुढील वर्षी असाच फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या चालू शैक्षणिक वर्षातील अभ्यासावर होण्याची भीती पालकांना…

Read More

यावल : प्रतिनीधी आश्रय फाऊंडेशन यावल रावेर च्या वतीने डॉ.अतुल गुणवंतराव सरोदे यांची कोविड-१९च्या राष्ट्रीय स्तरावरील कोविड-१९ऑन अप्रोप्रिएट बिहेवीअर या समितीवर निवड झाल्याबद्दल त्यांचे यावल रावेर तालुका स्तरीय असलेल्या आश्रय फाउंडेशनच्या वतीने डॉ. अतुल सरोदे यांच्या सावदा येथील निवासस्थानी सन्मान करण्यात आला. खउचठ व नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सच्या वतीने गठीत करण्यात आलेल्या व देशभरातील ख्यातनाम डॉक्टर आणि वैज्ञानिक यांचा समावेश असलेल्या या समितीत डॉ.अतुल सरोदे यांचा ही समावेश आहे ही आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानस्पदबाब आहे,या उत्तुंग भरारी बद्दल यावल रावेर तालुका स्तरीय आश्रय फाऊंडेशनतर्फे डॉ.अतुल गुणवंतराव सरोदे यांना सन्मानपत्र व पुष्प गुच्छ देऊन त्यांच्या राहत्या घरी त्यांचा सन्मान करण्यात आला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या वतीने १८,१६,१४,१२ व १० वर्षांखालील मुला-मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धा या वर्षी ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे खेळाडूंना घरबसल्या राज्य, राष्टीय जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे. कोविड१९ च्या प्रादुर्भावामुळे गतवर्षी सर्व वयोगटातील व खुल्या निवड बुद्धिबळ स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. यावर्षीच्या सर्व स्पर्धा नेहमी सारख्या होतील असे वाटत होते परंतु मार्चपासून पुन्हा करोनाचा प्रादूर्भाव वाढल्यामुळे व परिस्थिति पुर्वपदावर येण्याची शक्यता कमी वाटल्यामुळे जागतिक बुद्धिबळ संघटनेने या विविध वयोगटातील जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा जुलैमध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे निश्चित केले. त्यानुषंगाने अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेनेही या सर्व…

Read More

रावेर : प्रतिनिधी रावेर, मुक्ताईनगर तालुक्यातील केळी बागांचे वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. निकषात बदल केल्याने गेल्या वर्षापेक्षा या वर्षी केळी फळ पीक विम्याची मिळणारी मदत सरकारने कमी केली आहे.त्यामुळे या दोन वर्षात विम्याच्या रक्कमेत २६ हजार रुपयांची हेक्टरी तफावत आहे. ही रक्कम शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना द्यावी अशी मागणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केली आहे. या संदर्भात मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री, कृषी मंत्री , मदत व पुनर्वसन मंत्री यांची भेट घेऊन मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुक्ताईनगर आणि रावेर या दोन्ही तालुक्यातील केळी बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. केळी फळ पीक विम्याच्या निकषात यावर्षी बदल केल्याने…

Read More