जळगाव ः प्रतिनिधी शिवसेना जळगाव महानगर तर्फे शिवसैनिक विराज कावडीया यांच्या नेतृत्वात पांडे चौक येथे रिक्षा चालक बांधवांसाठी मदत कक्ष सुरू करण्यात आले. रविवार पर्यंत ११८३ परवानाधारक रिक्षा चालक बांधवांनी शिवसेना कक्षामार्फत ऑनलाईन अर्ज भरले आहे. २५ ते ५ जून पर्यंत शहरातील परमीटधारक रिक्षाचालक बांधवांना ऑनलाईन अर्ज या ठिकाणी भरून देण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील ७ लाख १५ हजार परमिटधारक रिक्षा चालकांना लॉकडाऊच्या पार्श्वभूमीवर अर्थसहाय्य म्हणून १ हजार ५०० रूपये घोषीत करण्यात आले आहे. सदर रक्कम परमिटधारक रिक्षाचालकांच्या बँक खात्यात जमा होणार असून यासाठी त्यांना ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. यासाठी आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, लायसन्स, बॅच, रिक्षा परवाना…
Author: saimat team
फैजपूर ता.यावल : प्रतिनिधी येथील महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी पुढाकार घेऊन धाडी नदीपात्रामध्ये पाणी अडवण्यासाठी खड्डा खोलीकरण कामाचा नुकताच शुभारंभ केला. मागील दोन वर्षांमध्ये झाडी नदीपात्रात केलेल्या खड्ड्यामुळे परिसरातील शेतकर्यांना याचा फायदा झाला हा खड्डा तीन वेळा पूर्ण भरून पाण्याचा जमिनीतील निचरा झाला. परिसराचे प्रांत कैलास कडलक तसेच या विभागाचे सर्कल जे.डी. बंगाळे यांच्या पूर्वपरवानगीने यावर्षी सुद्धा महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी पुढाकार घेऊन पाणी शुद्धीकरण केंद्राच्या पाठीमागे तसेच स्मशाभूमी मागे धाडी नदीपात्रात खड्डा खोदण्यास शुभारंभ केला. परिसरातील शेतकर्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन ना नफा ना तोटा या तत्त्वाने धाडी नदीपात्रातील माती आपल्या शेतात किंवा भराव टाकण्यास घेऊन जावी. यासाठी…
चाळीसगाव : प्रतिनिधी ‘जो मे बोलता हु वो मै करता हु’ असे फिल्मी डायलॉग फक्त सिनेमांमध्ये हिरोच्या तोंडून ऐकायला भारी वाटतात मात्र प्रत्यक्षात तसा अनुभव मात्र प्रेक्षकांना येत नाही. त्यात राजकारणी लोकांच्याबाबत तर बोलायलाच नको. मात्र याला अपवाद ठरेल असा अनुभव चाळीसगाव वासियांना वेळोवेळी येत असतो. आ. मंगेश चव्हाण यांनी शेतकर्यांनी सकाळी मागणी करताच दुपारी निधीचे पत्र देत संध्याकाळीच कामाचे भूमिपूजन करत पुन्हा एकदा आपल्या धडाकेबात स्टाईलचा प्रत्यय चाळीसगाव वासियांना करून दिला आहे. झालं काय तर चाळीसगाव शहरालगत पावर हाऊस व ओझर शिवारात बहुतांश शेती ही चाळीसगाव शहरात पूर्वापार राहणार्या चौधरी समाजाची आहे. या शेतांमध्ये जाण्यासाठी असणारा मुख्य रस्ता हा…
नाशिक – प्रतिनिधी शहरात करोना रुग्णांची संख्या घटत असताना, मृत्युदर मात्र वाढत असल्याचे धक्कादायक कारण समोर आले आहे. एप्रिल व मे महिन्यात खासगी रुग्णालयांनी आपल्याकडील रुग्णांच्या मृत्यूची नोंद आयसीएमआर पोर्टलवर वेळेत न करता रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर सुरू केल्याने दररोज मृतांचा आकडा वाढत आहे. विशेष म्हणजे एप्रिलमध्ये शहरात ३९४, तर मे महिन्यात आतापर्यंत ३६५ मृत्यूंची नोंद झाली असून, हा आकडा आणखी वाढणार आहे. दुसरीकडे नाशिकमधील स्मशानभूमीतील आकडा मात्र दीड हजारावर असल्यामुळे आकड्यांची लपवाछपवी होत असल्याचे दिसून येत आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेने नाशकात हाहाकार माजवला. मार्च महिन्यात करोनाचे तब्बल ३० हजार रुग्ण वाढले होते. एप्रिलमध्ये तर दिवसाला तीन ते चार हजार रुग्णांची भर पडत…
शहीद मेजर विभूती ढौंढियाल यांच्या पत्नी निकिता ढौंढियाल (Nikita Dhandhiyal) सैन्यदलात भरती झाल्या. विभूती शहीद झाल्यानंतर निकिता यांनी जिद्दीने सैन्यदलात जाण्याचा निर्णय घेतला होता. सैन्यदलातील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आज त्यांची लेफ्टनंटपदावर (Lieutenant) नियुक्ती करण्यात आली आहे. देहरादूनमधील मेजर विभूती ढौंढियाला २०१९ मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले होते. पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निकिता यांनी सैन्यदलात भरती होण्याची इच्छा व्यक्त केली होती.इलाहाबादमधून वूमेन एँट्री स्कीमअंतर्गत परीक्षा दिली. त्या उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकाडमीतूनत त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आज त्यांची सैन्यदलात निवड करण्यात आली. https://twitter.com/ANI/status/1398546132100259846?s=20 मेजर विभूती शंकर ढौंढियाल यांना मरणोत्तर शौर्यचक्र प्रदान करण्यात आले आहे. आज त्यांना सर्वोत्कृष्ट श्रद्धांजली…
मुंबई : प्रतिनिधी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबाचे राहणीमान व जीवनमान उंचावण्यासाठी मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत ‘मोहफुल – आदिवासी उपजीविकेचे एक साधन’ हा प्रकल्प राबविण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वन धन केंद्रामार्फत शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ हा प्रकल्प राबविणार आहे. आदिवासी कुटुंबाचे सशक्तीकरण व्हावे आणि ते आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत यासाठी हा प्रकल्प राबविण्यासाठी आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांनी पाठपुरावा केला होता. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक मोहफुलांचे उत्पादन होते. मोहफुल हे या भागातील आदिवासी कुटुंबाचे उपजीविकेचे हे एक साधन आहे. राज्य शासनाने नुकतेच मोहफुलांवरील निर्बंध हटविले आहेत. मोह फुलाचे आदिवासी बांधवांच्या जीवनातील महत्त्व ओळखून आदिवासी विकासमंत्री…
मुंबई – प्रतिनिधी पावसाळ्यात काही रोग व साथी उद्भवतात, त्यांची काही लक्षणे आणि कोविडची लक्षणे एकसारखी असतात त्यामुळे डॉक्टर्सनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांमधील कोविडची लक्षणे वेळीच ओळखावीत तसेच गृह विलगीकरणातील रुग्णांवर व्यवस्थित उपचार होत आहेत किंवा नाही ते बारकाईने पाहावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या. मुख्यमंत्री श्री. ठाकरे आज महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल) आयोजित केलेल्या कोरोना संदर्भातील दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन करताना बोलत होते. कोविडच्या लढाईत आता डॉक्टर्सदेखील मोठ्या प्रमाणावर मैदानात उतरले आहेत त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रथम त्यांचे आभारही मानले. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनीही आपले विचार मांडले. प्रास्ताविक महाराष्ट्र वैद्यक परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार…
मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारने चंद्रपूरची दारूबंदी (liquor-ban-lifting) उठवली आहे. त्यावरून राज्य सरकारवर टीका होत असतानाच आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर टीकास्त्र सोडले. यासोबतच वाघ यांनी पाटील यांचा जुना व्हिडीओ पोस्ट केला आहे. यवतमाळमधील दारूबंदीचं काय झालं? क्या हुआ तेरा वादा…जयंतरावजी ! असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी पाटील यांना केला आहे. वाघ यांनी ट्विट करून जयंत पाटील यांना त्यांच्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. सोबत त्यांनी विधानसभेतील जयंत पाटलांच्या भाषणाचा व्हिडीओही पोस्ट केला आहे. https://twitter.com/ChitraKWagh/status/1398530609585090562?s=20 क्या हुवा तेरा वादा… जयंतरावजी! सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटला यवतमाळमध्ये दारूबंदी करणार…..इस आश्वासन का,…
सतत आमच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या भावनेतून शहर शिवसेनेतील राठोड समर्थक गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातूनच आता आगामी महापौरपदाच्या उमेदवारीसाठी शिवसेनेतील रिता शैलेश भाकरे व रोहिणी संजय शेंडगे (Rohini Shagane) या दोन नावांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. परवा, गुरुवारी शहरातील शिवसेनेचे काही पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मुंबईत गेले होते. या गटाचा महापौरपदासाठी राष्ट्रवादीशी आघाडी करण्याचा विचार असल्याने राठोड समर्थक गटाने आक्षेप नोंदवला आहे. त्या विरोधात आता निष्ठावान गट इच्छुक उमेदवार रिता भाकरे यांना समर्थन देण्यासाठी पुढे सरसावला आहे. उमेदवारी आणि सेनेच्या जास्तीत जास्त नगरसेवकांचा आपल्याला पाठिंबा मिळावा यासाठी रिता भाकरे यांनी काल, शुक्रवारी रात्री स्नेहभोजनासहित बैठक…
मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाने वादळग्रस्तांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा आम्ही आंदोलन करू, असा इशारा भाजपचे खासदार नारायण राणे यांनी दिला आहे. मालवणमध्ये तौक्ते चक्रीवादळामुळं मोठं नुकसान झालं असताना येथील आमदार, खासदार काय करतात? मदत फक्त भाजप करत आहे, असेही ते म्हणाले .तौक्ते चक्रीवादळामुळं सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. फळबागा, शेतींनाही वादळाचा फटका बसला आहे. तर, अनेक गावं अजूनही अंधारात आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचा पाहणी दौरा सध्या सिंधुदुर्ग भागात सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही वादळग्रस्त भागांचा दौरा केला होता. त्यानंतर भाजप खासदार नारायण राणे यांनीही शुक्रवारी दुपारी देवबाग येथील…