Author: saimat team

मुंबई : प्रतिनिधी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत पाणी पुरवठ्याच्या विविध नवीन योजना राबविण्यात येत आहेत. मात्र असे असले तरी जुन्या योजना प्रभावीपणे सुरु ठेवण्यात याव्यात. न्हावा-शेवा योजना टप्पा 2 जलदगतीने राबविण्यात यावी अशा सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या. रायगड जिल्ह्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत प्रस्तावित व प्रगतीपथावरील योजना तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून होत असलेल्या पाणी पुरवठा केंद्रासंदर्भात आढावा बैठक पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. चालू असलेल्या पाणी पुरवठा केंद्राकडून जास्तीत जास्त लोकांना पाणीपुरवठा होईल असे नियोजन…

Read More

यास्मिन शेख  मुंबई  कृष्ण जन्म उत्सव देशभरात वेग वेगळ्या पद्धतीने साजरा होत असला तरी  मुंबईतील दहीहंडी उत्सवा बद्दल चे आकर्षण किंवा उत्सुकता ही नेहमीच सर्वांना असते . मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोना ने थैमान घातले आणि सर्वच सण उत्सव थांबले . राज्यात कोरोनाच्या पहिल्या ,दुसऱ्या लाटेत लाखो लोकांनी आपला जीव गमावला . आणि तिसरी लाट ही राज्याच्या दारावर उभी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच मागील आठवड्यात केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने राज्याला रात्रीची संचारबंदी लावण्याच्या सूचना केल्या आहेत तर सण उत्सवाचे दिवस असल्याने बाजार पेठेत होणाऱ्या गर्दी बद्दल चिंता व्यक्त केली आहे . अश्यातच दहीं हंडी चे निम्मितं घेत राज्यात राजकारण…

Read More

चाळीसगाव ः प्रतिनिधी चाळीसगांव तालुक्यातील सात महसूल मंडळांपैकी पाच मंडळात सोमवारी मध्यरात्रीनंतर अतिवृष्टी झाल्यामुळे दोन नद्यांना आलेल्या पुरात तालुक्यातील ३३ गावांसह शहरातही पाणी शिरले आहे. औट्रम घाटात दरडी कोसळल्यामुळे चाळीसगावहून औरंगाबादला जाणारा रस्ता बंद झाला आहे. पुराच्या पाण्यात ६५ वर्षीय महिला वाहून गेली असून दरडीबरोबर दरीत कोसळलेल्या ट्रकच्या चालकाचाही मृत्यू झाला आहे. आणखी एक प्रौढ व्यक्ती वाहून गेल्याचे ग्रामस्थांनी पाहिले असून वृद्धेसह त्याचाही शोध लागलेला नाही. साडेसहाशेपेक्षा अधिक जनावरे या पुरात मृत्यूमुखी पडली असून सहाशेहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. शेजारच्या भडगाव आणि पाचोरा तालुक्यातही या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. दरम्यान, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या मदतीने बचाव कार्य वेगाने सुरू…

Read More

ठाणे : राज्य सरकार हे कोणत्याही सणाविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे. कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही, त्याला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत त्याचे पालन करावेच लागेल,असे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले की, केंद्रानेदेखील या सणांच्या दरम्यान संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करून राज्य सरकारला काळजी घ्यायला सांगितले आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गोकुळाष्टमीचा सण साधेपणाने साजरा करत ‘आरोग्य उत्सव’ साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले होते. त्यास प्रतिसाद देत ‘संस्कृती प्रतिष्ठान’च्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन न करता ‘आरोग्य उत्सव’ आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून प्रताप सरनाईक…

Read More

पिंपरीः  नशेचे इंजेक्शन देऊन अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून तरुणीला खोलीमध्ये डांबून ठेवून अत्याचार सुरू होता. दरम्यान, पीडित तरुणीने आरोपीच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर हिंजवडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी याप्रकरणी समीर भालेराव याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी समीर भालेराव आणि फिर्यादी तरुणी एकमेकांना ओळखतात. समीर रॅपर गायक असून, त्याने अनेक मुलींना मॉडेलिंगचे काम मिळवून दिले होते. फिर्यादी ब्यूटीशियनचे काम करत असून, त्यांनाही मॉडेलिंगची आवड असल्याने दोघांची ओळख झाली. समीरने पीडितेसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली. मात्र, तरुणीने त्याला नकार दिला. त्यामुळे समीर दुखावला गेला होता. त्याने गेल्या…

Read More

मुंबई – यास्मिन शेख राज्यातील महिलांच्या प्रश्नावर कार्यक्षम मानल्या जाणाऱ्या महिला आयोगाचे अध्यक्ष पद गेल्या तीन वर्षांपासून रिक्त आहे . या पदावर नियुक्तीवरून आघाडीत बिघाडी होत असल्याची चर्चा आहे . महिलांना विषयी प्रशांवर सरकार काम करत असले तरी महिला आयोगाची स्थापन एक संविधानिक न्यायची मंडळ म्हणून करण्यात आली आहे  . मात्र गेल्या तीन वर्षांपासून राज्याला महिला आयोग अध्यक्ष मिळालेला नाही. आणि त्यामागील कारण म्हणजे आघाडीतील बिघाडी असल्याचे बोलले जात आहे . राज्यात तीन पक्षाचे महविकास अगदी सरकार आहे .त्यामुळे प्रत्येक पक्षाला हे पद पाहिजे हा विषय असतोच त्यातच महिला आयोग हे वोट बँक म्हणून वापरले जातRइ पद आहे .…

Read More

मुंबई: घरोघरी लसीकरणाची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारसह राज्य सरकार व मुंबई महापालिकेलाही खडे बोल सुनावले. घरोघरी लसीकरण मोहीम राबवण्यात काय अडचण आहे, असा सवाल करतानाच, ‘महाराष्ट्रातील त्या ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली होती? राज्य सरकारनं की मुंबई महापालिकेनं? याची माहिती द्या,’ असे तोंडी निर्देश न्यायालयानं आज दिले. (Bombay High Court on Door To Door Vaccination) अॅड. धृती कपाडिया व अॅड. कृणाल तिवारी या दोन वकिलांनी घरोघरी लसीकरणाची मागणी करणारी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर, मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्त व न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढं सुनावणी सुरू आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीतर सध्याच्या परिस्थितीत घरोघरी लसीकरण व्यवहार्य…

Read More

मुंबई: राज्यात शेतकऱ्यांकडील गाई-म्हशींमध्ये कृत्रिम रेतन कार्यक्रमासाठी लिंग विनिश्चित वीर्यमात्रा (Sex Sorted Semen) वापर करून उच्च अनुवंशिकतेच्या कालवडी तथा पारड्यांची निर्मिती करण्यात येणार असून यामध्ये राज्यात आता ९० टक्के उच्च वंशावळीच्या मादी वासरांची निर्मिती होणार आहे. ही वीर्यमात्रा फक्त ८१ रुपयांना उपलब्ध करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला असल्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. लिंग विनिश्चित वीर्यमात्रांचे उत्पादन व पुरवठा कार्यक्रमाचे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकासमंत्री सुनील केदार यांच्या  हस्ते मंत्रालयात उद्घाटन झाले. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची उपस्थिती होती. पशुसंवर्धन विभागाचे…

Read More

मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह महाराष्ट्रात मोसमी (Mumbai Monsoon) पाऊस सुरू झाला असून पहिल्याच पावसात मुंबई तुंबल्याचं चित्र आहे. मुंबईतील परिस्थितीवरून विरोधकांनी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला व मुंबईकरांची गैरसोय होणार नाही यासाठी तातडीनं पावलं उचलण्याचे आदेश प्रशासनाला दिले. https://twitter.com/ANI/status/1402477169394159618?s=20 हवामान विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यांत काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील तीन दिवस मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. आजच्या पहिल्याच मोठ्या पावसानं मुंबईची दाणादाण उडाली आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबलं आहे. तर, मध्य व हार्बर रेल्वेची वाहतूक…

Read More