जळगाव, प्रतिनिधी । ढगफुटीमुळे 30 व 31 ऑगस्ट 2021 रोजी विविध नदी-नाल्यांना पूर येऊन चाळीसगावसह तालुक्यातील जवळपास 20 ते 25 गावांना त्याचा जोरदार फटका बसला. यात अनेकांच्या घरांसह विविध व्यावसायिक दालनांत पुराचे पाणी शिरल्याने अतोनात नुकसान झाले. त्यामुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होऊन त्यांच्यावर रस्त्यावर येण्याची वेळ आली. या आपत्तीग्रस्त कुटुंबांकरिता सामाजिक दातृत्व निभावत आपले कर्तव्य समजून जळगाव शिवसेनेने शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, तसेच संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींना हाक दिली. या हाकेला स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देत विविध संसारोपयोगी वस्तू सस्नेह देण्यासाठी अनेकजण सरसावले. यामध्ये एका कुटुंबाला साधारणपणे 15 दिवस पुरेल एवढ्या संसारोपयोगी वस्तूंचे किट बॉक्स 510 कुटुंबांसाठी तयार करण्यात येऊन ते रविवार,…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । भवरलाल जैन यांच्या पत्नी ‘कांताई’ यांचा आज स्मृती दिन तसेच शेती-मातीत राबणा-या शेतकऱ्यांचा सखा बैल यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा. यानिमित्त शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारे भवरलाल जैन यांचे प्रेरणादायी विचार जाता-येता डोळ्यांसमोर असावे, यासाठी भूमिपूत्राने घराच्या दर्शनी भागावर भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंच्या विचारांचे फलक अनावरण केले. धरणगाव तालुक्यातील सतखेडा येथील जी.नाना.पाटील गोशाळेचे अध्यक्ष प्रभाकर पाटील हे त्या भूमिपूत्राचे नाव आहे. फलक अनावरणप्रसंगी जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे सहकारी अनिल जोशी, अखिल भारतीय महिला बचत गटाच्या अध्यक्षा कृषीभुषण सौ.सुनंदा पाटील, सचिव छाया पाटील, सतखेडा ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच कृषिभुषण शरद पाटील, आदर्श शेतकरी गंगाधर पाटील,…
जामनेर प्रतिनिधी | तालुक्यातील गावांना रात्री चक्रीवादळासह मुसळधार पावसाने झोडपले असून यामुळे मोठी हानी झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच चाळीसगाव तालुक्याला अतिवृष्टीचा फटका बसला होता. याच्या पाठोपाठ आता काल रात्री जामनेर तालुक्याला अतिवृष्टीने झोडपले आहे. तालुक्यातील अनेक गावात अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे भागदरा तोंडापूर ओझर या गावांमध्ये पावसाचे पाणी घुसले असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे शासन स्तरावर तात्काळ पाहणी करावी अशी मागणी होत आहे. ओझर गावांमध्ये सोमवार रोजी रात्रीच्या सुमारास चक्रीवादळ अतिवृष्टी झाली यामध्ये सुमारे ९० टक्के गावातील नागरिकांचे घरावरील पत्रे उडाले. घराची पडझड झाली. त्याचबरोबर संसार उपयोगी साहित्य यांचे मोठे नुकसान झाला आहे. भागदरा या…
जळगाव, प्रतिनिधी । सिंगल वुमन फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना नारीरत्न पुरस्कार २०२० – २०२१ देऊन त्यांचा गौरव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे – खेवलकर यांच्या हस्ते मेहरुणमधील श्रीराम माध्यमिक विद्यालय येथे झाला. व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, अशोक लाडवंजारी, सुदाम पाटील, विकास पवार , अशोक पाटील, पिनाझ फनीबंदा आदी उपस्थित होते. फाउंडेशनच्या अध्यक्ष मीनाक्षी चव्हाण यांनी संस्थेच्या विविध सामाजिक कार्याची माहिती दिली. या उपक्रम कार्यक्रमाचे कौतुक मान्यवरांनी केले. रोहिणी खडसे खेवलकर, अश्र्विनी देशमुख, सुषमा चौधरी, वंदना मधुकर पाटील यांना नारीरत्न पुरस्कार 2020 ते 21 चे वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन वाय. एस. महाजन यांनी केले.
जळगाव, प्रतिनिधी । वाघूर धरणाची पाणी पातळी आज दुपारी तीन वाजता 232.350 मीटर आहे. वाघुर धरणाचे पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे. रात्रीपर्यंत वाघूर धरणातून पाण्याचा विसर्ग होऊ शकतो, त्यामुळे वाघुर धरणाखालील नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क राहून सावधानता बाळगावी, असा इशारा कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी दिला आहे. नदीपात्रामध्ये गुरेढोरे सोडू नये अथवा प्रवेश करू नये असेही कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी कळविले आहे.
जळगाव, प्रतिनिधी । येथील कोंबडी बाजार परिसरातील पंकज ऑटो शोरूममध्ये रात्री ११ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरटयाने लिफ्टच्या गाळ्यातून शोरूममध्ये प्रवेश करीत लॅपटॉप, मोबाईलसह किरकोळ रक्कम चोरून नेल्याची घटना आज दि. ७ रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु आहे. सविस्तर माहिती अशी आहे की, शहरातील कोंबडीबाजार परीसरातील पंकज ऑटो शोरूममध्ये रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने प्रवेश करीत शोरूममधील लॅपटॉप, मोबाईलसह किरकोळ रक्कम चोरी केल्याचे सकाळच्या सुमारास उघडकीस आले. तसेच तिजोरी देखिल तोडल्याचे निदर्शनास आले, मात्र यातून किरकोळ रक्कम चोरी गेल्याचे देखील निदर्शनास आले आहे. घटनेची माहिती कळताच शहर पोलीस स्थानकात सदर घटनेची…
चाळीसगाव, प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील पुन्हा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.सध्या तरी पाऊस कमी झाला आहे. मात्र नदीतील पाण्याची पातळी वाढली असून सावधानता म्हणून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असल्याची माहिती चाळीसगाव तहसीलदार अमोल मोरे यांनी दिली आहे. चाळीसगाव तालुक्यातील धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच धरणे ओव्हर फ्लो झाल्याचे पाहायला मिळत आहेत. चितेगाव आणि उंबर ओहळ धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी ओसंडून वाहत आहे. तितुर व डोंगरी या दोन्ही नद्यांना पाणी पातळी वाढत आहे. वाढत्या पाणी पातळी मुळे सावधानता म्हणून नदी काठावरील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासना तर्फे करण्यात येत आहे.
यावल, तालुका प्रतिनिधी । ‘यावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली’ असे वृत्त सायंदैनिक ‘साईमत’ मध्ये आणि ऑनलाईन प्रसिद्ध झाल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात नगरपालिका कार्यक्षेत्रांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.कारण जळगाव जिल्ह्यात अनेक नगरपालिका कार्यक्षेत्रातील घनकचरा संकलन करून वाहतूक करण्याचे कोट्यवधी रुपयाचे ठेके एकाच मक्तेदाराने घेतले असल्याचे भ्रमणध्वनीवरून अनेकांनी सांगितले. तसेच हे घनकचरा संकलन करून वाहतुकीचे ठेके त्या मक्तेदाराने स्थानिक काही नगरसेवकांना हाताशी धरून चक्क घनकचरा वाहतूक मजूर बनवून त्यांना टक्केवारीची मजुरी देण्याचे निश्चित केले असल्याचे बोलले जात असल्याने जिल्हाधिकारी जळगाव यांनी जळगाव जिल्ह्यातील नगरपालिकामधील घनकचरा संकलन व वाहतूक करणार्या ठेकेदारांचे कामाची प्रत्यक्ष पाहणी केल्यास जिल्ह्यातील अनेक नगरपालिकाचा घनकचर्यातील घोळ…
फैजपूर ता.यावल, प्रतिनिधी । यावल-रावेर तालुक्यात गुटखा माफियांचे भक्कम जाळे पसरले असून याकडे जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभाग ‘अर्थ’पूर्ण डोळेझाक करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.शासनाची बंदी असताना मागेल त्याठिकाणी गल्लीबोळात गुटखा मिळत असल्याने गुटखाबंदीचा शासनाचा आदेश कुचकामी ठरला आहे.ही अन्न व औषध प्रशासनाची जबाबदारी असतानासुद्धा सरकार पक्षातर्फे फिर्यादी होऊन पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला आहे. काल ६ सप्टेंबर रोजी यावल-रावेर रस्त्यावरील जे. टी. महाजन इंजिनीरिंग कॉलेजसमोर फैजपूर पोलिसांनी तब्बल १५ लाख ७० हजार ८०० रुपये किंमतीचा गुटखा तसेच ३ लाख ५० हजार रुपये किमतीचे वाहन असा एकूण १९ लाख २० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. फैजपूर पोलीस स्टेशनला…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । विवाहाची नोंदणी करण्यासाठी यापूर्वी वधू-वर दोघांनाही विवाह नोंदणी कार्यालयात उपस्थित राहावे लागत होते मात्र आता केरळ न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार वधू-वर उपस्थित नसतानाही लग्नाची नोंदणी करता येणार आहे. विशेष विवाह अधिनियमानुसार एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने असे निर्देश दिले आहेत. दोन्ही पक्षांची ओळख पटवण्यासाठी आता तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ शकतो, असेही न्यायालयाने सुचवले आहे. न्यायमूर्ती महम्मद मुश्ताक आणि कौसर एडप्पागठ यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. पक्षकारांची ओळख पटवण्यासाठी फेशिअल रेकग्निशन आणि तत्सम अन्य तंत्रज्ञानाचा वापर कऱण्यासाठी केंद्र सरकारने आदेश द्यावेत असं न्यायालयाने म्हटलं आहेय बायोमेट्रिक तंत्रज्ञानाचा वापर कऱण्यासंबंधीही न्यायालयाने सुचवले आहे. खंडपीठाने एकल पीठाचे न्यायाधीश पीबी सुरेश…