जळगाव, विशेष प्रतिनिधी । शहरात चोर्या, घरफोड्या ,चेन ओढून पळणे, मोबाईल हिसकावून पळणे आदी घटनांचा नित्यक्रम सुरूच असतांना गुन्हेगारी ,तलवार घेऊन दहशत माजविणे,गावठी पिस्तुल-रिव्हॉल्वर बाळगणे आदी घटना नित्यनेमाने घडत आहेत. त्यातच हद्दपारीची कारवाई करण्यात आलेले गुन्हेगार खुलेआम शहरात वावरत असल्याचेही सातत्याने समोर येत आहे.तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न वेशीला टांगला गेला काय?त्याचबरोबर आपल्या विविध पोलीस ठाण्यातील डीबी स्कॉडचे तसेच एलसीबीचे कार्यक्षम पोलीस करतात काय?असे प्रश्न उपस्थित होणे अगदी साहजिक आहे.आणि हे सारे घडत असल्याने आपले शहर गुन्हेगारी आणि गुन्हेगार मंडळींसाठी पोषक आहे अशी चर्चा रंगत आहे. अलीकडे पोलिसांकडून नागरिकांना सूचित व सावध करण्यात आले आहे. ते असे की,आपले किमती मोबाईल…
Author: saimat team
मुंबई, प्रतिनिधी । बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात, पुढचे २ ते ३ दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये त्याचा प्रभाव जास्त असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुन्हा पाणी भरण्याची भीती व्यक्त होत आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दापोलीलाही पावसानं झोडपले आहे. केळसकरनाका येथे रात्री मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते. दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात, पुढील दोन ते…
जळगाव, प्रतिनिधी । हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रावरील भागात पाऊस सुरु असून धरणातील आवक सतत वाढत असल्याने सायंकाळपर्यंत धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडावे लागणार आहे. असे कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी कळविले आहे. त्यामुळे तापी नदी काठावरील गावातील नागरीकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रावरील भागात पाऊस सुरु असून पूर्णा नदीलाही पूर येत आहे. त्यामुळे पाणी पातळी सतत वाढल्याने धरणातील आवक ही वाढत आहे. सध्या धरणाचे 4 दरवाजे पूर्ण तर 2 दरवाजे 2 मीटरने उघडण्यात आले असून यातून 27 हजार 828 क्युसेक तर कालव्यातून 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरु आहे.…
जळगाव प्रतिनिधी । कचरा टाकण्यासाठी बाहेर आलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील दोन तोड्याची मंगलपोत अज्ञात चोरट्याने धूमस्टाईलने लंपास केल्याची घटना ६ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील चैतन्य नगरातील भूपाळी अपार्टमेंट येथे राहणाऱ्या प्रमिला बालकीसन सोमानी (वय-७२) आपल्या परिवारासह राहतात. सोमवारी ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास घरातील पपईचे सालटे कचरा कुंडीत टाकण्यासाठी प्रमिला सोमानी ह्या अपार्टमेंच्या खाली आल्या. पपईचे सालटे टाकल्यानंतर त्या पुन्हा घराकडे जात असतांना मागून अज्ञात दोन जण दुचाकीवरून येवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लंपास केली. महिलेने आरडाओरड केली परंतू तोपर्यंत दोघे दुचाकीवरून पसार झाले होते. याप्रकरणी…
*राष्ट्रवादीच्या आजी – माजी आमदारांची बैठक बुधवारी ;शरद पवार घेणार मतदारसंघाचा आढावा – नवाब मलिक* मुंबई – प्रतिनिधी २०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढून विजयी झालेले व पराभूत झालेल्या उमेदवारांची महत्वपूर्ण बैठक बुधवार दिनांक ८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. ही बैठक आदरणीय शरद पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित होती मात्र पवारसाहेबांच्या तब्येतीमुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता ही बैठक आदरणीय शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे. या बैठकीत विजयी व पराभूत झालेल्या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार…
मुंबई – प्रतिनिधी लेखक व ज्येष्ठ कवी जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि तालिबानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन देशभरातील राजकीय वातावरण गरम आहे. यावरुन भाजपा आमदार नितेश राणे यांनी जावेद अख्तर यांना इशारा दिला आहे. जाहीरपणे चर्चा करा किंवा माफी मागा, असे आव्हान राणे यांनी दिले असून त्यासाठी अख्तर यांना आठवड्याचा कालावधी दिला आहे. अख्तर यांनी आरएसएस, विहिंप आणि बजरंग दलाला समर्थन करणारे देखील तालिबानी विचारसरणीचे असल्याचे वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद सध्या देशभर उमटत आहेत. यावर नितेश राणे यांनी जावेद अख्तर यांना जाहीर पत्र लिहित ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहे. ट्विटमध्ये राणे म्हणतात, ‘मी तुम्हाला एका आठवड्याचा अल्टिमेटम…
जनतेचे आरोग्य महत्वाचे, उत्सव नंतरही साजरे करू कोरोना संसर्गातील वाढ परिस्थिती बिघडवू शकते मुंबई : प्रतिनिधी कोरोना संसर्गत थोडीशी वाढ दिसत असून मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता, मी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करतो की, त्यांनी गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा ,मोर्चे त्वरित स्थगित करावेत. इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करू शकता, मात्र आता आपल्याला मुळात तिसरी लाट येऊच द्यायची नाही, जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या, असे कळकळीचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परत एकदा केले आहे. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सरकारला या संकटाशी सामना करण्यासाठी संपूर्ण तयारीत राहण्याच्या स्पष्ट सूचना आहेतच, पण सत्ताधारी, विरोधी अशा सर्वच पक्षांना मी आवाहन करीत…
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत विविध निर्णयांना मान्यता कांदळवनाचे जतन करा, कांदळवन वृक्ष लागवड करा-मुख्यमंत्री मुंबई : कांदळवन क्षेत्रातील अतिक्रमणांवर आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा स्थापन करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळाच्या चौथ्या बैठकीत घेण्यात आला. यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या अहवालानुसार मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात १०६ संवेदनशील ठिकाणी एकूण २७९ सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील. यासाठीची ३५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प तीन टप्प्यात राबविण्याचे निश्चित करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात भिवंडी, दुसऱ्या टप्प्यात पश्चिम व मध्य मुंबई व तिसऱ्या टप्प्यात नवी मुंबई…
मुंबई- प्रतिनिधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी खार, मुंबई येथील रामकृष्ण आश्रम व मठाला भेट दिली. मठाच्या वतीने मंत्रोचारात राज्यपालांचे स्वागत करण्यात आले. राज्यपाल स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाले. रामकृष्ण मिशनच्या कार्याचे कौतुक करताना राज्यपालांनी मिशनद्वारे चालविल्या जाणाऱ्या हॉस्पिटलला अत्याधुनिक यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी तसेच मिशनच्या शैक्षणिक संस्थांच्या अडचणी सोडविण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले. राज्यपालांनी त्यानंतर शारदा माता मंदिराला भेट दिली व उपस्थित साधुंशी संवाद साधला. यावेळी राज्यपालांनी सत्संग भजन ऐकले व नामजपात सहभाग घेतला. रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी सत्यदेवानंद यांनी राज्यपालांचे स्वागत करताना आश्रमातर्फे चालविल्या जाणाऱ्या सेवाकार्याची तसेच इस्पितळाची माहिती दिली. मठाचे सहायक सचिव स्वामी अपरोक्षानंद, व्यवस्थापक स्वामी…
पश्चिम द्रुतगती महामार्गावरील विकास आणि सौंदर्यीकरणाच्या कामाचा शुभारंभ मुंबई- प्रतिनिधी मुंबईच्या विकासाबरोबरच सौंदर्यीकरणात भर घालून सुरक्षित, स्वच्छ आणि हरित मुंबईसाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. या अंतर्गत पश्चिम द्रुतगती महामार्गावर नागरिकांसाठी सुविधा आणि सौंदर्यीकरणाच्या कामाचा पर्यावरण मंत्री तथा उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज कलानगर जंक्शन येथे शुभारंभ झाला. एमएमआरडीए चे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यावेळी उपस्थित होते. ही कामे आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावीत, अशी अपेक्षा श्री ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी श्री ठाकरे म्हणाले, मुंबईत अधिक प्रमाणावर सुरक्षित आणि सुंदर अर्बन स्पेसेस तयार करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत आहोत. वांद्रे येथील कलानगर जंक्शन ते विमानतळ या…