Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली येथे ह्रदय पिळुन टाकणारी घटना घडली आहे. विवाहित मुलासह आईने विहीरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. तालुक्यातील अंतुर्ली येथे काल रात्रीच्या सुमारास २४ वर्षीय विवाहित युवकासह त्याच्या आईने विहीरीत उडी मारून आत्महत्या केली . आत्महत्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही . मयत युवकाचे नाव नितीन पंढरीनाथ पाटील असुन त्याच्या आईचे नाव प्रतिभा पंढरीनाथ पाटील ( वय ४५ ) आहे. या दोघा माय लेकाने आत्महत्या का केली याचे कारण समजु शकले नाही. विहीरीतुन पट्टीचे पोहणार्यांनी आधी आईचे प्रेत काढले तर मुलाचे प्रेत नंतर सापडले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दोघांचे प्रेत शवविच्छेदन साठी पाचोरा…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । मुस्लिमांना धार्मिक आधारावर नव्हे तर अल्पसंख्याक समुदाय म्हणून राजकीय प्रतिनिधित्व दिले पाहिजे असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले काल परिक्रमा मार्ग गोपाळखार येथील श्री राधाप्रसाद धाम येथे आयोजित संगीत शिरोमणी स्वामी हरिदास आविर्भाव महोत्सवात सहभागी झाले होते. कार्यक्रमात आठवलेंनी पत्रकारांशी बोलताना एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवीसी यांच्या विधानाचे समर्थन केले आहे. राजकीय पक्षांनी मुस्लिमांना प्रतिनिधित्व देण्याचा विचार केला पाहिजे, पण तो धर्मावर नसून अल्पसंख्याक समुदाय असण्यावर असावा असे आठवले यांनी म्हटले आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अटींसह उत्तर प्रदेशात उमेदवार उभे करण्याची…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । मालेगाव मित्र या साप्ताहिक पेपरमध्ये सोनार समाजाबद्दल बदनामीकारक लिखाण केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले आहे. ३ रोजी ‘मालेगाव मित्र’ या साप्ताहिक पेपरचे संपादक रामदास पगारे, मोबाईल: ८८८८३३९४६६ व उपसंपादक राजाराम पाटील,मोबाईल: ७७५५९७५१३२  यांनी रजि. नं. एम. ए. एच. बि. आय. एल./ ०३०२/२०२१  या साप्ताहिकात आमच्या सुवर्णकार समाजाचा बदनामीकारक मजकूर लिहिलेला आहे. यामुळे सामाजिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. सर्व सुवर्णकार समाजाच्या भावनांना ठेच पोहोचून सर्वांच्या आईवरून घाणेरड्या शब्दात उल्लेख करण्यात आलेला आहे. या लिखाणामुळे समाजात प्रक्षोभक पडसाद उमटत आहेत. तसेच सुवर्णकार व सराफ व्यावसायिकांच्या व्यवसायाबद्दल अत्यंत चुकीचे शब्दांकन केलेले आहे यामुळे समाजाच्या व्यवसायाबद्दल गैरसमज पसरू शकतो. अशा विक्षिप्त प्रवृत्तीवर त्वरित आळा बसावा…

Read More

काबूल : वृत्तसंस्था । तालिबानने अफगाणिस्तानात आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. पण बंदूकीच्या जोरावर वर्चस्व दाखविण्याची त्यांची जुनी सवय अद्यापही गेलेली नाही. तालिबानी दहशतवाद्यांनी आता काबूल स्थित नॉर्वेचा दुतावास काबीज केला आहे. शस्त्रांसह तालिबानी दूतावासात घुसले आणि सर्वकाही ताब्यात घेतले. तालिबानचे सर्वोच्च नेते हिबतुल्ला अखुंदजादा यांनी सरकार स्थापनेची घोषणा केल्यानंतर सांगितले की, परदेशी राजकारणी आणि दूतावासांनी घाबरण्याची गरज नाही. त्यांना अफगाणिस्तानमध्ये सुरक्षित वातावरण प्रदान केले जाईल. तालिबानच्या या कृत्याबद्दल इराणमधील नॉर्वेचे राजदूत सिग्वाल्ड हॉज यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. त्यांनी तालिबानचे काही फोटो देखील शेअर केले आहे. ते ट्विट करत म्हणाले, तालिबानने आता काबूलमधील नॉर्वे दूतावासाचा ताबा घेतला आहे.…

Read More

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मागील ऑगस्ट महिन्यात ११९ व्यक्तीवर सर्पदंश झाला म्हणून उपचार करण्यात आले आहे. सर्पदंश होऊ नये यासाठी शेतात फिरताना, घराजवळ काम करताना काळजी घ्यावी, सर्पदंश झाल्यावर उपचारासाठी तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात यावे, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित यांनी केले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ऑगस्ट महिन्यात एकूण ६२ पुरुष व ५७ महिला अशा ११९ जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यात २ पुरुष रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पावसाळ्यात शेतात काम करताना साप निघण्याचे प्रमाण मोठे आहे. तसेच घरांच्या जवळ असलेले कडेकपारीत देखील साप दडून बसलेले असतात. अशा वेळी…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील बालरोग व चिकित्साशास्त्र विभागात कोरोना महामारीमुळे बंद असलेला पोषण पुनर्वसन विभाग हा अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा सुरु करण्यात आला. याठिकाणी कुपोषित बालकांवर उपचार करणे, त्यांची काळजी घेणे यासह डॉक्टरांकडून देखरेख ठेवली जाते. जिल्हयातील कुपोषित बालकांचे आहार आणि औषोधपचाराने पुनर्वसन करण्यात येत आहेत. रुग्णालयात बाल रोग व चिकित्सा विभागात ५ खाटांचा हा विभाग असून जिल्हृयातील कुपोषित बालकांसाठीचे हे केंद्र आहे. कोरोना महामारीच्या काळात हे केंद्र बंद होते. हे केंद्र आता सुरु करण्यात आले आहे. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित, मुख्य अधिसेविका प्रणिता गायकवाड उपस्थित होते. याप्रसंगी…

Read More

एरंडोल: प्रतिनिधी  येथे २०२१ या वर्षात ४५ विजचोरी करणार्या ग्राहक आढळुन आले असता त्यांचेकडून ५लाख ८३हजार ३४५ रूपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. अशी माहीती पञकार शैलेश चौधरी यांनी विचारलेल्या माहीतीच्या अधिकारातून एरंडोल विज उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता महाजन यांनी दिली आहे. शैलेश चौधरी यांनी विजप्रशासनाकडे माहीतीच्या अधिकारात सन २०२०ते१९जुलै २०२१ दरम्यान च्या शहरातील एकूण विजचोर्या,सन २०ते२१ मधील विजचोरी मोहीमेचा कालावधी कुठुन कुठपर्यंत होता/आहे,औद्योगिक प्रतीष्ठानांना असलेले दर ई. बाबत माहीती मागीतली असता विजचोरी प्रकरणातील ग्राहकांची विगतवारी दिली नाही या मागे नेमके गौडबंगाल काय? तसेच जिल्हा भरारी पथकाकडून सुचना आल्यावरच स्थानिक विज प्रशासन विजचोरी ची मोहीम राबवते.अशी तोंडी माहीती उपअभियंता महाजन…

Read More

मलकापूर : प्रतिनिधी – शहरातील सुभाषचंद्र बोस नगर मधील राहणाऱ्या रावणचवरे कुटूंबात झालेल्या वादातून  मुलीने चुलत भावासोबत मिळून बापाचा पोटात चाकू खुपसून खुन केल्याची हृद्यद्रावक घटना काल रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. याघटनेमुळे परीसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान झालेल्या घटनेमागे अनैतिक संबंधांचा संशय व्यक्त करण्यात येत असून याबाबत परीसरात उलट सुलट चर्चा सुरू आहे. अधिक असे की, शहरातील सुभाषचंद्र बोस नगर मधील गुलाब यादव रावणचवरे आपल्या कुटूंबीयांसोबत रहिवासाला आहे. त्याच्या सोबत घरात त्याची एक विवाहीत मुलगी देखील एका वर्षापासुन कौटूंबीक वादामुळे माहेरीच राहत आहे. याबरोबर गुलाब यांचा पुतण्या प्रकाश रावणचवरे हा देखील त्यांच्याकडेच वास्तव्यास होता. काल रात्री मुलगी  लक्ष्मी…

Read More

राजकीय स्वार्थासाठी पक्षांतरे करीत विधान परिषदेच्या उपसभापतीपदावर बसलेल्या नीलम गोऱ्हे आता खुर्ची टिकविण्यासाठी ठाकरे कुटुंबाची मर्जी राखण्याची धडपड करत असून महिलांवरील अत्याचाराबाबत मात्र त्यांनी तोंडास कुलुप घातले आहे. स्त्री हक्काचा आधार घेत राजकीय बस्तान बसविणाऱ्या नीलम गोऱ्हे राज्यात महिलांवर तालिबानी अत्याचार होत असताना आता कोठे आहेत, असा सवाल भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष श्रीमती स्मिता वाघ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेस मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे पोटदुखी होऊन ठाकरे सरकारने त्यांना केलेल्या अटकेनंतर नीलम गोऱ्हे यांची जीभ घसरली, आणि त्यांनी राजकीय शेरेबाजी केली. आपली खुर्ची शाबूत राखण्यासाठी ठाकरे कुटुंबाची खुशामत करणे गरजेचे असल्याने तसे करताना…

Read More

मुंबई  –  प्रतिनिधी  तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमवीरसिंग यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांची दिशाभूल करुन हीरेन हत्या प्रकरणाला वेगळी दिशा देण्याचे काम केले. जेव्हा NIA केव्हाही अटक करु शकते अशी भीती निर्माण झाल्यावर परमवीरसिंग यांनी भाजपसोबत  ‘डील’ केल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. NIA च्या चार्जशीटमध्ये स्पष्टपणे नमूद असल्याचे लक्षात आल्यानंतर परमवीरसिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्याचे काम केले. त्या ‘डील’ मुळे NIA ने परमवीरसिंग यांना आरोपी केलेले नाही असाही आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मात्र आता भाजप NIA ला अधिकार आहेत कुणाला आरोपी करायचं आणि कुणाला…

Read More