Author: saimat team

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । स्टाफ सिलेक्शन कमिशननं कंबाइंड ग्रॅज्युएशन लेवल म्हणजेच सीजीएल 2020 च्या टीयर 1 च्या परीक्षांच्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. एसएससीनं बुधवारी एक नोटिफिकेशन जारी करुन सीजीएल आणि सीएचएसएल परीक्षाचा निकाल 11 डिसेंबर रोजी जाहीर होणार असल्याची घोषणा केली आहे. सीजीएल परीक्षा 2020 टियर 1 चं आयोजन 13 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट दरम्यान करण्यात आलं आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून कंबाईंड ग्रॅज्युएशन लेवल सीजीएल 2020 च्या टीयर 1 परीक्षेची उत्तरतालिका जाहीर केली आहे. आयोगाकडून लवकरच अंतिम उत्तर तालिका जाहीर केली जाणार आहे. 11 डिसेंबरला टीयर 1 च्या निकालामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना टीयर 2 ची परीक्षा द्यावी, लागणार आहे.…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील वावडदा येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्यावतीने पोषण आहार अभियानाचा कार्यक्रम राबविण्यात आले आहे. वावडदा ता.जि.जळगाव येथे दि.८ रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना मार्फत पोषण आहार अभियान कार्यक्रम राबविण्यात आले या वेळी सरपंच राजेंद्र वाडेकर. पर्यवेक्षिका अर्चना धामोरे यांनी महीला व बालकाना आरोग्य विषयी व एसटी बस बसस्थानक वरती दुकानदार लसीकरणाबाबत जनजागृतीसह मार्गदर्शन केले. यावेळी अंगणवाडी कोड क्र १०२४.१०२५. अगणवाडी सेविका प्रतिभा शिंपी, मीना पवार मदनीस किर्ती गवळे उपस्थित होते.

Read More

जळगाव:- प्रतिनिधी    covid 19 पासून बचावासाठी प्रशासनातर्फे लसींचा पाठपुरावा वेळोवेळी केला जात असून जळगाव शहरात दिनांक 8 सप्टेंबर रोजी तब्बल चोवीस हजार लसींचा विक्रम करण्यात आला आहे. महापौर यांच्या पाठपुराव्याने शहरातील नऊ केंद्रांवर लसीकरण उपलब्ध झाले असून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लसीकरण करण्याचे आवाहन महापौरांतर्फे करण्यात आले आहे. जळगाव शहरात 6062 लसी उपलब्ध झाल्या असून दिनांक 8 रोजी 24 हजार लसींचा विक्रम करण्यात आला आहे. शहरातील नऊ लसीकरण केंद्रांवर नागरिकांनी लसी घेतल्या आहे. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राम लावलानी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीमने 9 लसीकरण केंद्रांवर सेवा बजावली. शहरातील काशीबाई उखाजी केंद्रावर सर्वाधिक 1640 लसीकरण झाले असून त्या खालोखाल शाहूनगर रुग्णालयात तब्बल…

Read More

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतीरादित्य शिंदे उपस्थितीत राहणार – -उद्योगमंत्री सुभाष देसाई मुंबई – प्रतिनिधी कोकणच्या पायाभूत सुविधांमध्ये भर टाकणारे आणि विकासाला चालना देणारे सिंधुदुर्गचे चिपी विमानतळ लवकरच खुले होणार आहे. दि. 9 ऑक्टोबर 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या विमानतळाचे उद्घाटन होईल, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज मंत्रालयात आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली. श्री. देसाई यांनी सांगितले, उद्योग विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (एम आय डी सी) हा प्रकल्प हाती घेऊन आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण करून या विमानतळाचे काम पूर्ण…

Read More

जळगाव:- या पदाचा अतिरिक्त कार्यभार 2020 पासून श्री प्रशांत मोरे यांच्या कडे होता,आता जलसंपदा विभागाने 08 Sep 2021 रोजी सदर जागी श्री य.का.भदाणे यांची नियुक्ती केली आहे,बदली चे आदेश आज संध्याकाळी उशिराने महामंडळ कार्यालयास प्राप्त झाले. जिल्ह्यातील अनेक निर्माणाधीन प्रकल्पांना गती मिळण्यासाठी ह्या ठिकाणी पूर्णवेळ नियमीत अधिकाऱ्याच्या नेमणुकीची नितांत गरज होती शासनाने आज आदेश काढून श्री भदाणे यांना नियुक्त केले आहे.

Read More

मुंबई : प्रतिनिधी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी काल पत्रकार परिषद घेत ९ ऑक्टोबरला चिपी विमानतळाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती दिली. तसेच उद्घाटनाला मुख्यमंत्री असायला हवे असे काही नाही, संबंधित खात्याचे केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार असल्याचे म्हणत, त्यांनी शिवसेनेला (Shiv Sena) डिवचले. यावरून शिवसेनेचे नेतेही आक्रमक झाले असून याबाबतचा निर्णय राणे घेऊ शकत नाहीत, असे म्हटले आहे. दरम्यान, राणेंच्या या विधानाशी भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनीही फारकत घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा सन्मान राखला पाहिजे. त्यांनी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला आलं पाहिजे. सोबतच चिपी विमानतळाशी विनायक राऊत (Vinayak Raut) आणि शिवसेनेचा काय संबंध?…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांची धुळे येथे बदली झाली आहे. बदलीचे आदेश प्राप्त झाले असून जळगावचाही अतिरिक्त कार्यभार राहणार आहे. तसेच नंदुरबार जिल्हा माहिती अधिकारी किरण मोघे यांची पुणे येथे बदली झाली आहे. जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी धुळे येथे यापूर्वीही काम पाहिले आहे.

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील नेरी नाका वैकुंठधामाजवळील नाल्याच्या बाजूस असलेल्या कॉम्प्लेक्स समोरील मुख्य रस्त्यालगत मनपा बांधकाम व आरोग्य विभागाने मोठे खोदकाम करून ठेवल्यामुळे कॉम्प्लेक्स मधील व्यावसायिकांची मोठी पंचाईत झाली असून ग्राहकांना व दुकानदारांना ही बाब अडचणीची ठरत आहे. याकडे मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ह्या खंड्यामध्ये पाईप कधी टाकून मिळणार असा प्रश्न निर्माण झाला. स्मशाभूमिनजीकच्या मुख्य रस्त्यावर गेल्या चार ते पाच दिवसापूर्वी मनपाच्या आरोग्य व बांधकाम विभागाने 70 ते 80 फुट लांब व खोलवर खड्डा खोदून ठेवला आहे. या परिसरात ड्रनेजमध्ये ब्लॉक आढळून आल्याने हे खोदकाम करण्यात आले मात्र नंतर ह्या खड्डयात पाईप टाकणे आवश्‍यक असतांना त्याकडे मात्र आता दुर्लक्ष…

Read More

मुंबई, प्रतिनिधी । राज्यात गेले दोन ते तीन दिवस चांगला पाऊस कोसळत आहे. काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. आता पुढील १ ते २ दिवस पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस शक्य आहे तसेच पुढील ५ दिवस राज्यात पाऊस कायम राहणार आहे. पावसाने पुन्हा रुद्रावतार धारण करत मंगळवारी राज्यातील अनेक भागांना तडाखा दिला. मुंबईसह ठाण्यात सायंकाळनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी पाहायला मिळाली तर कोकणात काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली. मराठवाडा आणि विदर्भातही नद्यांना पूर आल्याने चार दिवसांत १२ जणांचा बळी गेला तर यवतमाळमध्ये दोघे वाहून…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव डाक विभागातर्फे सेवानिवृत्त झालेल्या डाक कर्मचाऱ्यांच्या पेन्शनविषयी तक्रारी समजून घेण्यासाठी डाक अधिक्षक, जळगाव विभाग, जळगाव यांचे कार्यालयात 21 सप्टेंबर, 2021 रोजी दुपारी 4.00 वाजता पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. जळगाव डाक विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन विषयीच्या ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारींची या पेन्शन अदालतमध्ये दखल घेतली जाईल. यामध्ये टपाल विभागातून निवृत झालेल्या अथवा सेवेत असतांना मृत्यू झालेल्या निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारींचा विचार करण्यात येईल. पेन्शन अदालतमध्ये वैयक्तिक, कायदेशीर प्रकरणे जसे-वारस इ. तसेच नीती आधारित सूचना/तक्रारी यांचा विचार केला जाणार नाही, याची सर्वानी नोंद घ्यावी, असे आवाहन डॉ.…

Read More