Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील नेरी नाका वैकुंठधामाजवळील नाल्याच्या बाजूस असलेल्या कॉम्प्लेक्स समोरील मुख्य रस्त्यालगत मनपा बांधकाम व आरोग्य विभागाने मोठे खोदकाम करून ठेवल्यामुळे कॉम्प्लेक्स मधील व्यावसायिकांची मोठी पंचाईत झाली असून ग्राहकांना व दुकानदारांना ही बाब अडचणीची ठरत आहे. याकडे मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ह्या खंड्यामध्ये पाईप कधी टाकून मिळणार असा प्रश्न निर्माण झाला. स्मशाभूमिनजीकच्या मुख्य रस्त्यावर गेल्या चार ते पाच दिवसापूर्वी मनपाच्या आरोग्य व बांधकाम विभागाने 70 ते 80 फुट लांब व खोलवर खड्डा खोदून ठेवला आहे. या परिसरात ड्रनेजमध्ये ब्लॉक आढळून आल्याने हे खोदकाम करण्यात आले मात्र नंतर ह्या खड्डयात पाईप टाकणे आवश्‍यक असतांना त्याकडे मात्र आता दुर्लक्ष…

Read More

मुंबई, प्रतिनिधी । राज्यात गेले दोन ते तीन दिवस चांगला पाऊस कोसळत आहे. काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. आता पुढील १ ते २ दिवस पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस शक्य आहे तसेच पुढील ५ दिवस राज्यात पाऊस कायम राहणार आहे. पावसाने पुन्हा रुद्रावतार धारण करत मंगळवारी राज्यातील अनेक भागांना तडाखा दिला. मुंबईसह ठाण्यात सायंकाळनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी पाहायला मिळाली तर कोकणात काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली. मराठवाडा आणि विदर्भातही नद्यांना पूर आल्याने चार दिवसांत १२ जणांचा बळी गेला तर यवतमाळमध्ये दोघे वाहून…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव डाक विभागातर्फे सेवानिवृत्त झालेल्या डाक कर्मचाऱ्यांच्या पेन्शनविषयी तक्रारी समजून घेण्यासाठी डाक अधिक्षक, जळगाव विभाग, जळगाव यांचे कार्यालयात 21 सप्टेंबर, 2021 रोजी दुपारी 4.00 वाजता पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. जळगाव डाक विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन विषयीच्या ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारींची या पेन्शन अदालतमध्ये दखल घेतली जाईल. यामध्ये टपाल विभागातून निवृत झालेल्या अथवा सेवेत असतांना मृत्यू झालेल्या निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारींचा विचार करण्यात येईल. पेन्शन अदालतमध्ये वैयक्तिक, कायदेशीर प्रकरणे जसे-वारस इ. तसेच नीती आधारित सूचना/तक्रारी यांचा विचार केला जाणार नाही, याची सर्वानी नोंद घ्यावी, असे आवाहन डॉ.…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवारी ८ सप्टेंबर रोजी दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याबाबतचे कामकाज झाले. २०० लाभार्थ्यांनी उपस्थिती देऊन प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही पूर्ण केली. आता पुढील ९ बुधवारची कुपन संपली असून दि. १ डिसेंबरचे कुपन कार्यालयीन वेळेत वितरित करण्यात येत आहे. ज्या दिव्यांग बांधवानी ८ सप्टेंबरचे कुपन घेतले होते अशा २०० दिव्यांगांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी सकाळी ९ ते १ वाजेदरम्यान करण्यात आली. तपासणी मुख्य गेट नं. २ कडील अधिष्ठाता कार्यालयासमोरील दिव्यांग मंडळाच्या कार्यालयात तसेच ओपीडी कक्षात झाली. नेहमी दिसणारी गर्दी हि मर्यादित झाली. दर बुधवारी होणारी गर्दी आणि गैरसोय पाहता दिव्यांग मंडळाने सुरु केलेल्या आगाऊ बुकिंग…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित फायदेशीर किंमत (लाभकारी मूल्य) साठी भारतीय किसान संघाने आज दि.८ सप्टेंबरला देशव्यापी आंदोलन छेडले त्याला पाठिंबा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करून थेट पंतप्रधान व केंद्रीय कृषी मंत्र्यांना मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना सादर करण्यात आले. सद्यस्थितीत शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची योग्य किंमत न मिळाल्यामुळे गरीब शेतकरी आणखी गरीब आणि कर्जबाजारी होत चालला आहे, शेतकऱ्यांच्या मुलांची भविष्य अंधकारमय आणि स्वत:चे जीवन नरकमय झाले आहे. सरकार आपल्या परीने शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करते परंतु क्षणिक सांत्वना मुळे शेतकऱ्यांची परिस्थिति सुधारणे अशक्य आहे. उत्पादनखर्च आणि त्यावर ठराविक लाभ देणे सरकारने सुरू करावे एवढीच त्रस्त शेतकऱ्यांची…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 23 सप्टेंबर, 2021 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) जारी करण्यात आले असून तसे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी निर्गमित केले आहे. या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास संबंधित स्थानिक पोलीस स्टेशन कार्यालयाची पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही. मात्र जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांचेकडील दि. 13 ऑगस्ट, 2021 मधील अटी लागू राहतील, असे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी आदेशात म्हटले आहे.

Read More

वॉशिग्टंन, वृत्तसंस्था । अफगाणिस्तानात अमेरिकेच्या माघारीआधीच सत्ता काबीज केलेल्या तालिबानने अखेर सरकारची स्थापना केली आहे. आधी जाहीर केलेल्या मुदतीपेक्षा दोन दिवसांच्या विलंबाने हे हंगामी सरकार स्थापन झाले असून त्याचे नेतृत्व मुल्ला हसन अखुंद करणार आहेत. या सरकारमध्ये मुल्ला बरादर हे उपप्रमुख असतील. तालिबानचे सरकार हे इराणच्या धर्तीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. अफगाणिस्तानमध्ये सर्व महत्त्वाचे निर्णय करणारे सर्वोच्च नेते म्हणून रेहबारी शुराच्या प्रमुखपदी अखुंद यांची निवड झाली आहे. नवे सरकार हंगामी असल्याचे तालिबानच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. चीन आणि पाकिस्तानसोबत तालिबानची वाढती जवळीक ही भारतासाठी धोकादायक ठरु शकते असा अंदाज व्यक्त केला जात असतानाच आता अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी तालिबान चीन…

Read More

काबूल : वृत्तसंस्था । तालिबानने मंगळवारी पंजशीर खोर्‍यावर विजय मिळवल्याचा दावा केल्यानंतर काही तासांतच अफगाणिस्तानमध्ये नवे सरकार स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार स्थापन झाले आहे. आधी जाहीर केलेल्या मुदतीपेक्षा दोन दिवसांच्या विलंबाने हे हंगामी सरकार स्थापन झाले असून त्याचे नेतृत्व मुल्ला हसन अखुंद करणार आहेत. या सरकारमध्ये मुल्ला बरादर हे उपप्रमुख असतील. तालिबानने मोस्ट वॉन्टेड दहशतवादी असलेल्या सिराजुद्दीन हक्कानीला आता अफगाणिस्तानचे नवे गृहमंत्री बनवले आहे. हक्कानीवर अमेरिकेने बक्षीस जाहीर केले आहे. सिराजुद्दीन हक्कानी पाकिस्तानच्या उत्तर वजीरिस्तान येथील आहे. हक्कानी नेटवर्क ही दहशतवादी संघटना चालवणारा सराजुद्दीन हक्कानी उत्तर वजीरिस्तानच्या मीराम शाह भागात राहतो असे म्हटले जाते.…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील प्रेम नगरातील शिक्षकाला मारहाण करून त्यांच्याजवळील मोबाईल अज्ञातांनी हिसकावून दुचाकीने फरार झाल्याची घटना ६ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील विवेकानंद नगरात पायी जाणाऱ्या शिक्षकाला मारहाण करून त्यांच्या हातातून १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात तीन जणांनी जबरी हिसकावून दुचाकीने फरार झाले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत सुर्यभान झाल्टे (वय-३३) रा. प्रेम नगर जळगाव हे शिक्षक आहेत. ६ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता ते हरीविठ्ठल नगरमधील विवेकांनद नगरातील विवेकानंद बगीचा येथून शाळेचे सहकारी एम.एस. सुरवाडे यांच्याकडे शाळेच्या कामकाजासाठी…

Read More

पुणे, वृत्तसंस्था । शेतकऱ्यांच्या अर्थकारणामध्ये रब्बी पिकांचे महत्त्व आहे. त्याअनुषंगाने चालू वर्षासाठी 60 लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी लागणारी बियाणे व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात आले असल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. रब्बी हंगाम 2021 राज्यस्तरीय नियोजन व आढावा बैठक कृषी आयुक्तालय, पुणे येथे घेण्यात आली, त्यावेळी कृषीमंत्री श्री.भुसे बोलत होते. यावेळी फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, कृषी आयुक्त धीरज कुमार, सचिव एकनाथ डवले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव बोटे, कृषी विभागाचे संचालक व मंत्रालयीन अधिकारी, सहसंचालक व कृषी विद्यापीठांचे संशोधन संचालक, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, नागपूर व…

Read More