पाचोरा, प्रतिनिधी । दिल्ली येथील साबिया सैफीची क्रूर हत्येतील आरोपींना तात्काळ अटक करुन कठोर कारवाई अशी मागणी मुस्लिम समाज बहुउद्देशीय मंडळातर्फे पोलिस प्रशासनास निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाचा आशय असा की, साबिया शमीम सैफी रा.संगम विहार, दिल्ली ही मुलगी दिल्ली सिव्हील डिफेन्स विभागातील डी. एम. दिल्ली (दक्षिण) कार्यालय येथे नोकरीस होती. अतिशय विभत्स अवस्थेत क्रुरपणे हत्या केलेला तिचा मृतदेह सुरजकुंड, दिल्ली येथे आढळून आला आहे. या घटनेतील मुख्य आरोपीला अटक झालेली आहे. परंतू सोशल मिडीयावर व न्युजमध्ये प्रसारण झालेल्या माहितीवरुन या क्रुर हत्येमागे मोठे षडयंत्र असल्याचे दिसुन येते. मयत मुलगी ही फक्त २१ वर्षांची होती व ती नुकतेच चार महिन्यांपुर्वी…
Author: saimat team
अमळनेर – प्रतिनिधी । आज ऋषीपंचमी निमित्ताने जिल्हाभरातील महिलांनी तालुक्यातील तापी पांझरा आणि गुप्त गंगा या त्रिवेणी संगमावर असलेल्या श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. तालुक्यातील तापी पांझरा तसेच गुप्त गंगा या पवित्र त्रिवेणी संगमावर असलेले श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिर हे संपूर्ण खान्देशात भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून परिचित आहे. श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी या तिर्थस्थळावर असंख्य भाविकांची मांदियाळी असते. दरम्यान,तालुक्यातील तापी पांझरा तसेच गुप्त गंगा या पवित्र त्रिवेणी संगमावर असलेले श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिरात आज ऋषीपंचमी निमित्ताने जिल्हाभरातून महिला भाविकांनी याठिकाणी त्रिवेणी संगम असल्याने पवित्र स्नान करून दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी मंदिर गाभाऱ्यात असलेल्या स्वयंभू…
जळगाव प्रतिनिधी । पर्यावरणातील बदल आणि ढगफुटीसारख्या नैसर्गीक आपत्तीमुळे शेतातील पिकांचे होणारे नुकसान दुर्दैवी बाब आहे. शेतक-र्यांना त्यांच्या पीक विम्याचा मोबदला तातडीने मिळावा यासाठी कृषी व महसुल विभागाने सहकार्य करण्याच्या सुचना कृषी मंत्री दादा भुसे यांनी आज दिल्यात. मंत्री श्री. भुसे यांनी आज जामनेर तालुक्यातील ओझर, हिंगणे व सामरोद शिवारातील पिकांच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर शेतक-र्यांशी संवाद साधला. जामनेर तालुक्यातील काही गावात चार दिवसापूर्वी झालेल्या चक्री वादळामुळे शेतीचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. ओझर येथे घरावरील पत्रा उडून बैलावर पडल्याने बैल गंभीर जखमी झाला होता. मंत्री श्री. भुसे व आमदार किशोर पाटील यांनी आज बैल मालक श्री. रमेश माळी…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल एकवीरा येथून एकाची 25 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज सतीश पाटील (वय 23) रा. अहुजा नगर हे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. 7 सप्टेंबर रोजी रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांची 25 हजार रुपये किमतीची (एमएच 19 डीई 2359) क्रमांकाची दुचाकी घरासमोर लावली होती. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी राज पाटील यांच्या फिर्यादीनुसार जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल…
मुंबई प्रतिनिधी | येथील साकीनाका भागात अत्याचार झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्याने समाजमन सुन्न झाले असतांना आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा खटला जलदगती कोर्टात चालवून दोषीला कठोर दंड देण्याची मागणी केली आहे. साकीनाका येथे अत्याचार झालेल्या महिलेचा आज सकाळी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून आता सरकारवर टीका करण्यात येत आहे. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्य सरकारला धारेवर धरले आहे. बलात्कार प्रकरण माणुसकीला आणि मुंबईच्या आजवरच्या लौकिकाला काळीमा फासणारं प्रकरण आहे. अशी प्रकरणं वारंवार होत राहिली तर असुरक्षिततेची भावना निर्माण होते. त्यामुळे नराधमांवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला दाखल करुन फाशीच झाली पाहिजे, असं मत राज्याच्या विधानसभेचे…
मुंबई: प्रतिनिधी राज्यात कालच्या तुलनेत आज करोना (coronavirus) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली आहे. तसेच बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाल्याचे दिसत आहे. या बरोबरच आज झालेल्या मृत्यूंच्या संख्येत कालच्या तुलनेत घट झाली आहे. तर, कालच्या तुलनेत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या देखील कमी झाल्याने राज्याला आज दिलासा मिळाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात ३ हजार ०५६ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ४ हजार १५४ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण ३ हजार ०५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ४ हजार ५२४ इतकी होती. तर, आज ३५ रुग्णांचा मृत्यू झाला. काल…
मुंबई: प्रतिनिधी साकीनाका बलात्कार घटनेचा निषेध करत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करतानाच महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करत आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. यावर प्रतिक्रिया देत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे. साकीनाक्याची घटना दु्र्दैवी असून विरोधकांनी याचे राजकारण करणे थांबवले पाहिजे असे सांगतानाच या घटनेवर राजकारण करणे म्हणजे मृताच्या टाळूवरील लोणी खाण्यासारखेच आहे,असा टोला राऊत यांनी लगावला आहे. (shiv sena mp sanjay raut criticizes opposition over reactions on sakinaka rape case) साकीनाक्यातील ही घटना अत्यंत दुर्देवी आणि धक्कादायक अशी घटना आहे. मुंबई महिलांसाठी कायम सुरक्षित असल्याची भावना कायम…
नागपूर : पशुवैद्यकीय चिकित्सालयीन संकुलामुळे प्राण्यांच्या आरोग्य विषयक शस्त्रक्रिया व औषधोपचाराची सुविधा मिळणार आहे. त्याचबरोबर नागपूरसह छत्तीसगड, मध्य प्रदेशातील पशुधनाला याचा फायदा मिळेल, असे प्रतिपादन दुग्ध व्यवसाय विकास, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी आज येथे केले. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत 6 कोटी 91 लाख रुपये निधी खर्चून पशु वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात बांधण्यात आलेल्या पशु वैद्यकीय चिकित्सालयीन संकुलाचे लोकार्पण केंद्रीय रास्ते विकास व महामार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी अध्यक्षीय भाषणात श्री. केदार बोलत होते. खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार अभिजीत वंजारी, मापसूचे कुलगुरु डॉ. ए. एम. पातुरकर, पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे ए. पी. सोमकुवर, कार्यकारी परिषदेचे डॉ. सुधीर दिवे,…
जळगाव, प्रतिनिधी । हॉकी महाराष्ट्राच्या वतीने बालेवाडी पुणे येथे १४ सप्टेंबर रोजी १९ वर्षाच्या आतील मुलांची राज्य संघासाठी तर महिलांची १७ सप्टेंबर रोजी निवड चाचणी आयोजित केली असल्याने त्यासाठी जळगाव जिल्ह्यातील उत्कृष्ट ८ मुलांची तर महिलांमध्ये सहा मुलींची निवड हॉकी जळगावचे सचिव फारुक शेख यांनी शनिवारी घोषित केली. निवड समिती सदस्य म्हणून राज्य प्रशिक्षक अरविंद खांडेकर , एनआयएस प्रशिक्षक लियाकतअली सय्यद, इकराचे क्रीडाशिक्षक मुजफ्फर शेख, निवड करून अंतिम यादी हॉकी जळगाव यांना सुपूर्द केली. मुलांचा संघ हा १३ सप्टेंबरला जळगावहून रवाना होत असून प्रशिक्षक म्हणून सय्यद लियाकत अली व व्यवस्थापक म्हणून सत्यनारायण पवार हे काम बघणार आहेत. महिलांचा संघ…
यावल प्रतिनिधी । येथील गणपती नगरातील एका आदिवासी तरुणाचा डेंग्यूच्या आजारामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, यावल शहरातील विस्तारित क्षेत्रातील वसाहतील गणपती नगर मध्ये राहणारा उच्चशिक्षित आदीवासी तरूण सादीक गनी तडवी (वय२३ वर्ष) या तरूणास दिनांक ९ सप्टेंबर हिवताप व वांत्या झाल्याने त्यास उपाचारादाखल केले असता निदानात त्यास डेंग्यु झाल्याची पुष्टी मिळाली व दिनांक ११ सप्टेंबर रोजी भुसावळ येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुदैवी मृत्यु झाल्याची घटनासमोर आली. या डेंग्युमुळे मरण पावलेल्या तरूणावर आज सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात अत्यंसंस्कार (दफनविधी) करण्यात आली. यावल तालुक्यातील ग्रामीण…