जळगाव, प्रतिनिधी । ४० वर्षीय शेतमजूराने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत झालेल्या शेतमजुरांचे नाव प्रेमराज ठाकूर राठोड (वय ४०) हे आहे. तालुक्यातील वसंतवाडी येथे प्रेमराज राठोड हे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास होते. शेतमजुरी करून कुटुंबाचा ते उदरनिर्वाह करायचे. पत्नी बाहेरगावी गेली होती. त्यामुळे ते व त्यांचे मुले हे घरी होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी दोन्ही मुले कामाला निघून गेले. त्यातच घरात कुणी नसताना प्रेमराज राठोड यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. काही लहान मुले राठोड यांच्या घराबाहेर लपाछपी खेळीत होते. एक चिमुकला हा राठोड यांच्या घराकडे लपण्यासाठी…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । रोटरीच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य, मदत गरजूंपर्यंत पोहचवा. गरजूंना मिळालेल्या सुविधेमुळे त्यांच्या चेहऱ््यावरील समाधान आणि दुसऱ््यांसाठी काही तरी चांगले काम केल्याचा आनंद वेगळाच असतो. या सामाजिक कार्याच्या सुखा, समाधानाचे धनी व्हा, असे आवाहन रोटरी क्लब जळगाव ईलाइटच्या ऑफिशियली क्लब व्हिजिटप्रसंगी प्रांतपाल रमेश मेहर (नाशिक) यांनी केले. हा समारंभ मायादेवीनगरातील रोटरी सभागृहात झाला. व्यासपीठावर मेहर यांच्यासह सहाय्यक प्रांतपालक विष्णू भंगाळे, क्लबचे अध्यक्ष नितीन इंगळे, सचिव संदीप असोदेकर उपस्थित होते. प्रांतपाल मेहर यांनी जळगाव दौऱ््याप्रसंगी रोटरी क्लब जळगाव ईलाइटला भेट दिली. त्यांनी या क्लबच्या कार्याचा आढावा घेतला. मेहर यांनी क्लबच्या उत्कृष्ट कार्याबद्दल पदाधिकारी यांचा गौरव केला. तर नूतन सदस्य व…
जळगाव, प्रतिनिधी । शहरातील बालनाट्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे जुने जाणते रंगकर्मी संजय निकुंभ यांच्या समता नगर परिसरातील धामणगाव वाडा भागातील पार्टीशन वजा पत्रीघरावर अतिवृष्टीदरम्यान अंगणातील झाड कोसळून घर जमीनदोस्त झाले. या दुर्घटनेत संजय निकुंभ हे त्यांच्या कुटुंबियांसह थोडक्यात बचावले आहे. झाड कोसळण्याच्या काही क्षण आधी संजय निकुंभ तांदूळ धुण्यासाठी म्हणून घराबाहेर आले होते. घराच्या आतील खोलीवर मागील बाजूस राहणाऱ्या श्री.तडवी यांच्या अंगणातील झाड वादळी पावसाने कोसळले. झाड कोसळल्याने संजय निकुंभ यांच्या घराचा सरा तुटून पत्रे व दगडगोटे घरावर पडून त्यांच्या संपूर्ण घराचे अतोनात नुकसान झाले आहे. पुढील खोलीत बसलेले संजय निकुंभ यांचे वडील थोडक्यात बचावले आहे. झाड कोसळल्यानंतर निकुंभ…
जामनेर, प्रतिनिधी । तालुक्यातील पहूर येथील एकाच गाव मध्ये राहणाऱ्या व एकाच कुटुंबातील तीन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी पहूर पोलिस स्थानकात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील पहूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात राहणारे दोन भाऊ कुटुंबियांसह १६ वर्षाची आणि दोन १५ वर्षाच्या अशा तीन मुलींसह राहतात. ९ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ११.३० वाजेच्या सुमारास घरातच्या वाड्यातून तीनही अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली. याप्रकरणी पालकांनी नातेवाईकांकडे शोधाशोध केली परंतू मुली कुठेच आढळून आल्या नाहीत. रात्री १० वाजता पालकांच्या फिर्यादीवरून पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात…
जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे 22 किलोमीटरवरील वाघूर धरण यंदा वरुणराजाच्या कृपादृष्टीमुळे मंगळवार, दि. 7 सप्टेंबर 2021 रोजी 100 टक्के पूर्ण भरले. त्या अनुषंगाने हिंदू संस्कृतीची जपणूक करीत कृतज्ञता म्हणून आज गुरुवार, दि. 9 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन, उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील, शिवसैनिक श्री.गजानन मालपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत धरणस्थळी मेहरुणमधील रहिवासी श्री.युवराज तांबे व सौ.वंदना तांबे या दाम्पत्याला जलपूजनाचा मान देण्यात आला. त्यानंतर तांबे दाम्पत्याने सपत्नीक साडीचोळी, श्रीफळ, पुष्पहार अर्पण करून जलपूजन केले. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता व केमिस्ट श्री.श्यामकांत भांडारकर, विद्युत अभियंता श्री.विलास पाटील यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी तांबे दाम्पत्यासह महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन…
जळगाव, प्रतिनिधी । राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील शुक्रवार 10 सप्टेंबर 2021 पासून जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा दौरा असा : शुक्रवार 10 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 8 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथून ओझर बु. व ओझर खु. ता. जामनेरकडे प्रयाण, सकाळी 9 वाजता ओझर बु. व ओझर खु. ता. जामनेर येथे आगमन व पूरग्रस्तांच्या भेटी, सकाळी 9.20 वाजता ओझर बु. व ओझर खु. ता. जामनेर येथून हिंगणे न.क. ता. जामनेरकडे प्रयाण, सकाळी 9.30 वाजता हिंगणे न.क. ता. जामनेर येथे आगमन व पूरग्रस्तांच्या भेटी, सकाळी 9.50 वाजता हिंगणे न.क. ता.…
जळगाव, प्रतिनिधी । रोटरी क्लब जळगाव ईलाइटतर्फे आयोजित मोफत २० दिवसीय बेसिक ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचा समारोप स्वातंत्र्य चौकाजवळील इंडिया प्लाझामध्ये झाला. या शिबिराचा लाभ ४० प्रशिक्षणार्थिंनी घेतला. त्यांना प्रांतपाल रमेश मेहर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर सहाय्यक प्रांतपाल विष्णू भंगाळे, प्रशिक्षिका लीना झोपे, क्लबचे अध्यक्ष नितीन इंगळे, सचिव संदीप असोदेकर, व्होकेशनल कमिटी चेअरमन मनीषा पाटील उपस्थित होते. या प्रशिक्षणामुळे आत्मनिर्भर होऊन स्वयंरोजगाराची प्रेरणा मिळाली. या प्रशिक्षणात बेसिक ब्युटी पार्लरचे ज्ञान मिळाले. यात अॅडव्हाॅन्स कोर्सची भर टाकून स्वमालकीचे ब्युटी पार्लर सुरू करता येईल. त्यामुळे स्वयंरोजगार उभारुन महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत होईल, असे मत प्रशिक्षणार्थी हर्षदा पाटील, नम्रता…
जळगाव, प्रतिनिधी । शहरापासून थोड्याच अंतरावर असलेले आसोदा येथील एका दुचाकीस्वाराला काठीसह विळ्याने वार केल्याची घटना ७ रोजीच्या सुमारास घडली. याप्रकरणी मारेकऱ्यांवर तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आसोदा येथे दुचाकीस्वाराला काठीसह विळ्याने वार केल्याची घटना घडली. याप्रकरणी मारहाण करणार्या तरुणासह त्याच्या कुटुंबातील चार जणांविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. आसोदा येथील कोळीवाडा येथे दिनेश जगन्नाथ साळुंखे (वय ३६) हा कुटुंबासह राहतो. ७ सप्टेंबर रोजी दिनेश हा बाजारपट्ट्यातून दुचाकीने घरी जात असतांना, रोहित मधुकर सपकाळे हा त्याच्या दुचाकीवर बसला. यावेळी दिनेशने रोहितकडे बघितले, त्याचा राग आल्याने रोहितने वाद घातला. हा वाद मिटल्यानंतर रोहित घरात असतांना, दिनेश याच्यासह…
मुंबई, वृत्तसंस्था । गाजलेल्या महाराष्ट्र सदन आर्थिक घोटाळा प्रकरणात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा देत मुंबई सत्र न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. याप्रकरणी आपल्याविरोधात लावण्यात आलेले आरोप हे निराधार असून ते रद्द करण्याची मागणी भुजबळांनी मुंबई सत्र न्यायालयाकडे केली होती. मुंबई सत्र न्यायालयाने काल याबाबत निर्णय दिला.दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या निर्णयानंतर हायकोर्टात धाव घेणार असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात आरोपींविरोधात कुठलेही सबळ पुरावे एसीबीकडे उपलब्ध नाहीत, असे कोर्टाने निर्णय देताना म्हटले आहे. महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणातून छगन भुजबळ यांच्यासह समीर भुजबळ, तन्वीर शेख, इम्रान शेख, गीता जोशी, संजय जोशी या सहा जणांची निर्दोष…
मुंबई, प्रतिनिधी । आपल्या मतांची विभागणी न होवू देता आपण जागा वाटपामध्ये यशस्वी झालो तर जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका महाविकास आघाडीकडे यायला निश्चितपणे मदत होईल असे वैयक्तिक मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना मांडले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वतंत्र पणे लढवणार असल्याचे स्टेटमेंट प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी केले आहे. कुणी काय स्टेटमेंट द्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न व अधिकार आहे पण उद्याच्या निवडणूकांना सामोरे जात असताना प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय व भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे तिघांनी एकत्रित येऊन निवडणूक लढवायची की दोघांनी की, स्वतंत्र लढवायची हा तिथल्या जिल्हयाला अधिकार द्यावा असेही वैयक्तिक मत अजित पवार यांनी व्यक्त केले.…