साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी : जळगाव शहरातील जुने बस स्थानकाच्या मागील भागात झालेल्या खूनातील फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज मध्यरात्री व भल्या पहाटेच्या दरम्यान शिताफीने अटक केली आहे. नरेंद्र उर्फ भुऱ्या उर्फ भद्रा पंडीत सोनवणे असे अटक करण्यात आलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे. आकाश उर्फ धडकन सुरेश सपकाळे याचा 20 डिसेंबरच्या सायंकाळी खून झाला होता. गुन्हा घडल्यापासून नरेंद्र उर्फ भु-या सोनवणे हा फरार होता. फरार नरेंद्र उर्फ भु-या हा पोलिसांच्या कारवाईच्या भितीने मोबाईल वापरत नव्हता. आपले लोकेशन कुणाला समजू नये यासाठी तो प्रयत्नशिल होता. तरी देखील आपले कौशल्य अर्थात कसब वापरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला शिताफीने ताब्यात…
Author: saimat team
साईमत लाईव्ह धरणगाव प्रतिनिधी तालुक्यातील निमखेडा येथे ईलेक्ट्रीक तारावरचा टाकलेला आकडा काढण्याच्या वादातून एका परिवाराला मारहाण केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक असे की, दि. २० डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भारती दगडू पाटील यांच्यासोबत दीपक धैर्यसिंग राठोड, दिनेश नवल राठोड, नवल नामदेव पाटील, दिनेश ढेरेसिंग राठोड, अरुण किसन पाटील, पुरुषोत्तम गंगाधर पाटील (सर्व रा. निमखेडा ता. धरणगाव)ईलेक्ट्रीक तारावरचा टाकलेला आकडा काढण्यावरून वाद झाला. यातील सर्व संशयितांनी भारती पाटील यांच्यासह पती व मुलाला घरात घुसून मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल असून पुढील पो.हे.कॉ. राजेंद्र कोळी हे करीत आहेत.
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी जळगावचा सहाय्यक सहकार अधिकारी शशीकांत साळव याला आज दहा हजार रूपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने सापळा रवून अटक केली. तक्रारदाराविरोधात अवैध सावकारीचा गुन्हा दाखल होवू न देण्यासाठी व संबंधित कागदपत्रांच्या प्रती देऊन नाशिकच्या अपिलात मदत करण्यासाठी दहा हजारांची लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या सहकार निबंधक कार्यालयातील सहाय्यक सहकार अधिकारी शशीकांत साळवे याला आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास कार्यालयातच एसीबीने अटक केली. या कारवाईने सहकार वर्तुळातील लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली आहे. जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक संजोग बच्छाव, दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, राकेश दुसाने आदींच्या पथकाने हा लाचखाराला पकडण्याचा सापळा यशस्वी केला.
साईमत लाईव्ह मुक्ताईनगर प्रतिनिधी शहरातील प्रभाग क्रमांक-१३ मध्ये आज सकाळी नळाच्या पाण्यातून चक्क कबुतराचे मांस आणि अवशेष आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भातील वृत्त असे की, मुक्ताईनगर शहरातील अशुध्द पाणी पुरवठा हा नेहमीच नागरिकांच्या संतापाचा विषय होत असतो. शहरात सातत्याने गढूळ पाणी येत असल्याची ओरड होत असतांनाही यावर उपाययोजना केल्या जात नाहीत. यातच आज प्रभाग क्रमांक १३ मध्ये जोर प्रकार घडलाय त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज शहरातल्या प्रभाग क्रमांक १३ मध्ये सकाळी पाणी आले. यात एका कुटुंबाने टाकीत पाणी साठविले असतांना त्यांना आश्चर्याचा जोरदार धक्का बसला. कारण, पाण्यात कबुतराची पिसे, पाय आणि मांसाचे तुकडे आल्याने परिसरातील नागरिकांनी…
साईमत लाईव्ह अमळनेर प्रतिनिधी दिनांक 13 ऑगस्ट 2022 शनिवार रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी निमित्त छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह अमळनेर येथे दिमाखदार जाहीर व्याख्यान व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण सोहळा दिमाखदारपणे श्रीमती अमिता जैन नगराध्यक्ष नगरपरिषद महेश्वर मध्य प्रदेश यांच्या अध्यक्ष खाली संपन्न झाला.यावेळी विचार मंचावर प्रमुख वक्ते प्राध्यापक अर्जुन जाधव उस्मानाबाद ,नागरी हित समितीचे अध्यक्ष प्राध्यापक अशोक पवार,साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे ,लोक संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष प्रतिभा शिंदे , महेश्वरचे सामाजिक कार्यकर्ते हेमंत जैन,राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अण्णासाहेब बन्सीलाल भागवत. पुरस्कारथी लोक संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे, बहुउद्देशीय आधार केंद्राच्या अध्यक्ष डॉ भारती पाटील…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी: पत्राचाळ प्रकरणात आता ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना समन्स पाठवलं आहे. चार दिवसांपूर्वी ईडीने याच प्रकणात संजय राऊतांना अटक केली होती. ईडीच्या वकिलांनी गुरुवारी न्यायालयात वर्षा राऊत यांचा आर्थिक गैरव्यवहारात सहभाग असल्यासंदर्भात भाष्य केले होते. संजय राऊत हे यापूर्वी झालेल्या चौकशीवेळी सर्व माहिती देण्यास टाळाटाळ करत होते. मात्र, ईडीने त्यांच्या घरावर धाड टाकली तेव्हा काही कागदपत्रे सापडली होती. त्यावरून असे दिसते की, संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यातून काही व्यक्तींना मोठी रक्कम पाठवली गेली आहे. त्यांच्या खात्यातून मोठ्याप्रमाणावर आर्थिक व्यवहार झाले आहेत. पत्राचाळ प्रकरणात प्रवीण राऊत यांना HDIL ग्रुपकडून…
साईमत लाईव्ह चाळीसगांव प्रतिनिधी ब्राम्हणशेवगे येथील निसर्गटेकडी परिसरात मागिल वर्षापासून सामाजिक वनिकरण विभागाच्या माध्यमातून पर्यावरणप्रेमी सोमनाथ माळी यांचे पुढाकाराने लोकसहभागातून वृक्षारोपण करण्यात आले आहे. मागिल वर्षी तेरा हेक्टर व चालू वर्षी दहा हेक्टर पडीक व ओसाड टेकड्या असलेल्या क्षेत्रालगत जवळपास पंचवीस हजार झाडांचे रोपण करण्यात आले आहे. हे क्षेत्र मागिल वर्षापासून चराईसाठी बंद केल्यामुळे झाडे, झुडपे,गवत मोठ्या प्रमाणात वाढीस येत आहे. मागिल वर्षी या ठिकाणी सेवा सहयोग फाऊंडेशन,पूणे व वेंडर लाईन कंपनी मार्फत गुणवंतदादा सोनवणे यांचे संकल्पनेतून एक गाव एक तलाव ही निर्माण करण्यात आला आहे. तसेच येथील झाडांना उन्हाळ्यात पाणी देता यावे यासाठी चार बोअरवेल्स ही करण्यात आले आहेत.…
साईमत लाईव्ह चाळीसगांव प्रतिनिधी महाराष्ट्र भूषण,तीर्थरूप डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त चाळीसगाव शहरातील शाळा क्रमांक 11 मधील शहीद हेमंत जोशी क्रीडांगणाच्या मैदानावर रविवार दिनांक 24 रोजी डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने वृक्ष लागवड व संवर्धन मोहीम राबविण्यात आली. एकाच दिवशी या मैदानावर शेकडो श्री सदस्यांच्या उपस्थितीत 130 वृक्ष लागवड करण्यात आले. प्रतिष्ठानच्या वतीने शहरात 200 हून अधिक झाडे लावण्यात येणार आहेत. या सर्व झाडांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी देखील प्रतिष्ठानने घेतली आहे. या कामासाठी नगरपालिका प्रशासनाचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, मुख्यालिपीक सचिन निकुंभ, संजय गोयर यांच्यासह संपूर्ण पालिका प्रशासनाचे योगदान व सहकार्य लाभले. वृक्ष लागवड मोहिमेसाठी सकाळी 11वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी डॉ. अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पात्रात टीव्हीच्या माध्यमातून घराघरांत पोहोचले. त्यांनी साकारलेले शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज प्रेक्षकांच्या मनावर ठसले आहे. डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांचा ‘शिवप्रताप गरुडझेप’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आग्र्यातील लाल किल्ल्यावर या सिनेमाचे चित्रीकरण झाले असून लाल किल्ल्यावर शूट होणारा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. ही बातमी पण वाचा : कैटरिना कैफ आणि विक्की कौशल या जोडीला जीवे मारण्याची धमकी! छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याची गाथा या चित्रपटाद्वारे डॉ. कोल्हे हे सांगणार आहेत. ‘शिवप्रताप गरूडझेप’ या सिनेमात शिवाजी महाराजांची आग्य्राहून सुटका हा प्रसंग मध्यवर्ती आहे. शिवाजी…