मुक्ताईनगरात नळाच्या पाण्यातून आले मृत कबुतरांचे अवशेष!

0
1

साईमत लाईव्ह मुक्ताईनगर प्रतिनिधी

शहरातील प्रभाग क्रमांक-१३ मध्ये आज सकाळी नळाच्या पाण्यातून चक्क कबुतराचे मांस आणि अवशेष आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भातील वृत्त असे की, मुक्ताईनगर शहरातील अशुध्द पाणी पुरवठा हा नेहमीच नागरिकांच्या संतापाचा विषय होत असतो. शहरात सातत्याने गढूळ पाणी येत असल्याची ओरड होत असतांनाही यावर उपाययोजना केल्या जात नाहीत. यातच आज प्रभाग क्रमांक १३ मध्ये जोर प्रकार घडलाय त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज शहरातल्या प्रभाग क्रमांक १३ मध्ये सकाळी पाणी आले. यात एका कुटुंबाने टाकीत पाणी साठविले असतांना त्यांना आश्चर्याचा जोरदार धक्का बसला. कारण, पाण्यात कबुतराची पिसे, पाय आणि मांसाचे तुकडे आल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना कॉल केला असता त्यांनी प्रतिसाद दिला व घटनास्थळी पाहणी केली. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आता करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here