स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर पुण्यतिथी उत्साहात साजरी

0
4

साईमत लाईव्ह अमळनेर प्रतिनिधी

दिनांक 13 ऑगस्ट 2022 शनिवार रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी निमित्त छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह अमळनेर येथे दिमाखदार जाहीर व्याख्यान व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण सोहळा दिमाखदारपणे श्रीमती अमिता जैन नगराध्यक्ष नगरपरिषद महेश्वर मध्य प्रदेश यांच्या अध्यक्ष खाली संपन्न झाला.यावेळी विचार मंचावर प्रमुख वक्ते प्राध्यापक अर्जुन जाधव उस्मानाबाद ,नागरी हित समितीचे अध्यक्ष प्राध्यापक अशोक पवार,साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे ,लोक संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष प्रतिभा शिंदे , महेश्वरचे सामाजिक कार्यकर्ते हेमंत जैन,राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अण्णासाहेब बन्सीलाल भागवत. पुरस्कारथी लोक संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे, बहुउद्देशीय आधार केंद्राच्या अध्यक्ष डॉ भारती पाटील ,सामाजिक क्षेत्रात सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर सुषमा जोशी, शिक्षण विस्ताराधिकारी पंचायत समिती शिरपूर डॉ.नीता सोनवणे, समाजभूषण ज्ञानेश्वर कंखरे विराजमान होते. प्राध्यापक अशोक पवार ,संदीप जी घोरपडे सर ,हेमंत जैन यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई पुरस्काराचे वितरण शाल ,घोंगडी ,पगडी ,काठी श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देण्यात आले. यावेळी प्राध्यापक अर्जुन जाधव यांनी पुण्यश्लोक अहिल्यामाई जीवनपट आपल्या ओघवत्या शैलीतून उभा केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा महेश्वर नगरीच्या नगराध्यक्ष श्रीमती अमिता जैन यांनी अहिल्यादेवी म्हणजे एक प्रेरणा स्तोत्र आहे. कर्तव्य आणि कर्तबगारीच्या एक ठेवा आहे त्यांच्या कार्याचा वारसा घेऊन आम्ही चाललोय भावी पिढीला हा वारसा लाभो. पुन्हा पुन्हा घरात घराघरात पुण्यश्लोक अहिल्यामाई ,जिजाऊ माता ,सावित्रीबाई फुले जन्माला यावेत या भावना त्यांनी व्यक्त केल्या. अहिल्यादेवींची रांगोळीतून साकारलेली प्रतिमा आणि मानस पाटील याने महेश्वर ची हुबेहूब तयार केलेली प्रतिकृती उपस्थितींचा आकर्षणाचा विषय होता.सुमरान या धनगरी बाणाच्या गीताला भंडार उधळत भरभरून दाद दिली नि सोहळ्याची उंची आकाशाएवढी झाली. कार्यक्रमाची प्रस्तावना अण्णासाहेब बन्सीलाल भागवत यांनी केली, सूत्रसंचालन एस सी तेले सर व कविता मनोरे मॅडम यांनी केले ,आभार प्रदर्शन डी ए धनगर सर यांनी मानले आणि एका अनोख्या समारंभ सोहळ्याची सांगता झाली.यावेळी युवा मल्हार सेनेचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब खेमनार, टीचर असोसिएशनचे अध्यक्ष शुभांगी ताई पाटील, राजे मल्हार होळकर प्रतिष्ठान ,अमळनेर धनगर समाज, मौर्यकांती संघ ,युवा मल्हार सेना ,अमळनेर यांनी मौर्य क्रांती जिल्हाध्यक्ष रमेश देव शिरसाठ युवा, मल्हार सेना उत्तर महाराष्ट्र प्रमुख देवा भाऊ लांडगे ,हिरामण कंखरे साहेब , न.पा.शिक्षण मंडळ अध्यक्ष नितीन निळे ,कवी रमेश पवार ,भाजप मा.शहराध्यक्ष हरचंद लांडगे, मा.उपसरपंच समाधानभाऊ धनगर, मौर्य क्रांती संघाचे ता.अध्यक्ष गोपीचंद शिरसाठ,प्रविन धनगर,मच्छिंद्र लांडगे ,प्रभाकर लांडगे,प्रा. दिनेश भलकार ,आनंदा हडपसर, शशिकांत आढावे ,प्रवीण धनगर ,सुधाकर पवार ,चेतन देवरे, रावसाहेब न्हाळदे, प्रा. मनोज रत्ना पारखी, प्रा. जगदीश भागवत ,प्रा विजय शिरसाठ,निरंजन पेंढारकर सर ,गोपाल हडपे सर ,उमेश मनोरे सर,निखील बोरसे,गुलाबराव भागवत,जयप्रकाश लांडगे ,,विजय धनगर साहेब,आप्पा बागले,तुषार इदे,प्रदिप कंखरे, संजय धनगर ,राजू धनगर ,उपसरपंच आलेश धनगर, दादाभाई धनगर ,दिनेश बागुल ,उपसरपंच अंकुश भागवत ,सरपंच दिलीप ठाकरे धानोरा, भावलाल पाटील ,सुधा आबा,बाळू नाना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here