साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी
जळगावचा सहाय्यक सहकार अधिकारी शशीकांत साळव याला आज दहा हजार रूपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने सापळा रवून अटक केली.
तक्रारदाराविरोधात अवैध सावकारीचा गुन्हा दाखल होवू न देण्यासाठी व संबंधित कागदपत्रांच्या प्रती देऊन नाशिकच्या अपिलात मदत करण्यासाठी दहा हजारांची लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या सहकार निबंधक कार्यालयातील सहाय्यक सहकार अधिकारी शशीकांत साळवे याला आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास कार्यालयातच एसीबीने अटक केली. या कारवाईने सहकार वर्तुळातील लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली आहे.
जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक संजोग बच्छाव, दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, राकेश दुसाने आदींच्या पथकाने हा लाचखाराला पकडण्याचा सापळा यशस्वी केला.