Author: saimat team

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । अफगाणिस्तानवर तालिबाने कब्जा केल्यानंतर बिघडलेल्या परिस्थितीदरम्यान भारतातील सर्व गुप्तचर संस्था आणि सर्व राज्यांच्या दहशतवादविरोधी पथकाच्या (ATS) प्रमुखांची आंतर-समन्वय बैठक शुक्रवारी राजधानी दिल्लीत बोलावण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी 10 वाजता बैठक सुरू होईल. एटीएस प्रमुख, एसओजी आणि 11 राज्यांच्या गुप्तचर संस्थांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीचे उद्दिष्ट एटीएससोबत गुप्तचर संस्थांचे अधिक चांगले समन्वय आणि येत्या काळात लवकरात लवकर गुप्तचर माहिती शेअर करणे असेल, असे सांगण्यात येते. एटीएस व्यतिरिक्त रॉ, आयबी, एनआयएचे अधिकारी आणि फील्ड ऑपरेशनशी संबंधित अधिकारी या बैठकीत सहभागी होतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीवर या बैठकीत चर्चा…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । मुंबईत पहाटेच्या सुमारास बांधकाम सुरू असलेल्या एका पुलाचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत १३ जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या सर्व जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. पहाटे ४.३० च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालं. अद्याप या दुर्घटनेत कुणीही मृत्यूमुखी पडलेलं नाही. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये बीकेसी मेन रोड आणि सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड यांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाचं बांधकाम सुरू आहे. पहाटे अचानक त्याचा काही भाग कोसळल्यामुळे काही मजूर जखमी झाले आहेत. Mumbai: A portion of under-construction flyover connecting BKC main…

Read More

जळगाव प्रतिनिधी | अभियंता दिनाचे औचित्य साधून आज सार्वजनीक बांधकाम खात्याच्या जळगाव विभागात सर मोक्षगुंडम विश्‍वसरैया यांना अभिवादन करण्यात आले. सर मोक्षगुंडम विश्‍वसरैया यांच्या जयंतीला अर्थात १५ सप्टेंबर रोजी दरवर्षी अभियंता दिन साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधून आज सार्वजनीक बांधकाम जळगाव विभागात अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी उपस्थिती मान्यवरांच्या हस्ते श्री. विश्‍वसरैया यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. याप्रसंगी कार्यकारी अभियंता जी.एच. राजपूत, उप कार्यकारी अभियंता एस. बी. पाटील, सहायक अभियंता श्रेणी- अ सुभाष राऊत, शाख अभियंता जितेंद्र महाजन, अभिषेक सूर्यवंशी, भूषण घुगे, भूपेंद्र रायसिंगे, राजहंस मॅडम, योगेश अहिरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. …

Read More

पैठण : पैठण तालुक्यातील शेतशिवारात पंचवीस वर्षाच्या तरुणाची हत्या झाल्याची घटना 11 सप्टेबर रोजी घडली होती. त्या हत्येचा उलगडा झाला असून पोलिसांनी दोघा आरोपींना शिताफीने ताब्यात घेत अटक केली आहे. दोघा आरोपींनी हत्येची कबुली दिली असून या खूनाचा उलगडा झाला आहे. ढोरकीन शिवारातील किरण पेरकर यांच्या शेतात मयत संदीप सूर्यभान साळवे (25), आंबेडकरनगर, गारखेडा परिसर, औरंगाबाद हा तरुण गेल्या चार महिन्यांपासून शेतमजूर म्हणून कामाला होता. तो शेतात काम करत असतांना रात्रीच्या वेळी अकरा वाजेच्या सुमारास आरोपी संजय मचांराम चव्हाण व मुकेश ऊर्फ बाळू मंचाराम चव्हाण हे दोघे भाऊ (टाकळी, पैठण शिवार) कोंबड्या व बक-या चोरण्यासाठी त्या शेतात आले. …

Read More

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथील नेहरू विद्यालयाच्या शिक्षिका रझिया इतबार तडवी यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जळगाव येथे श्री स्वामी समर्थ ग्रुप व मौलाना आझाद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत पुरस्कार वितरण सोहळ्यात रझीया इतबार तडवी यांना २०२१ चे आदर्श सन्मानपत्र प्रदान करण्यात येवुन त्यांचा गौरव करण्यात आला. श्री स्वामी समर्थ गृप व मौलाना आझाद फाऊंडेशन जळगाव यांच्या वतीने रविवार दि.१२ रोजी रतनलाल सी.बाफना गो सेवा अनुसंधान केंन्द्र(गो शाळा)कुसुंबा,जळगाव येथे जिल्हा परिषदच्या अध्यक्ष ना. रंजनाताई प्रल्हाद पाटील, डॉ. पुनम पाटील , जिल्हा कृषी अधिकारी मुक्ता कोकाटे , जिल्हा क्रिडा अधिकारी रेखा देविदास पाटील , आयोजक…

Read More

चाळीसगाव प्रतिनिधी । विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या दाखल्याबरोबर पुरावा जोडूनही दाखला मिळण्यास विलंब होत असल्याने सदर दाखला तातडीने दिला जावा अशी मागणी अध्यक्ष दिनकर राठोड यांनी उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांना निवेदनाद्वारे केली आहे. स्वातंत्र्योत्तर काळानंतर विजाभजा व बंजारा जमातीचे दाखला काढण्यासाठी सन: १९६१ चा पुरावा जोडण्यात येत आहेत. मात्र सदर दाखला काढण्यासाठी त्याबरोबर सन: १९६१ चा पुरावा जोडूनही वेळेवर न मिळत असल्याने विद्यार्थ्यांसह अनेकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. हि गंभीर स्वरूपाची बाब लक्षात येताच विजाभजा आघाडीचे तालुकाध्यक्ष दिनकर राठोड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. सदर निवेदनात देशाला…

Read More

जळगाव प्रतिनिधी । कोविडमुळे दोन्ही पालक गमावल्याने अनाथ झालेल्या जिल्ह्यातील बालकांना तसेच एकल/विधवा महिलांना शासनाच्या मिशन वात्सल्य योजनेतंर्गतचे लाभ तातडीने देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दिले. कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांची काळजी व संरक्षणासाठी गठीत कृती दलाची बैठक आज जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस बॅकेचे जिल्हा समन्वयक अरुण प्रकाश, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त य. कों. बेंडकुळे, महिला व आर्थिक विकास महामंडळाचे उल्हास पाटील, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष वैजयंती तळेले, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक श्री. ठाकूर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी‍ विजयसिंग…

Read More

जळगाव : गावठी पिस्टल बाळगणा-या दोघा तरुणांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. सागर देवीदास सोनवणे व भास्कर अशोक नन्नवरे (दोघे रा बांभोरी ता. धरणगांव जिल्हा जळगाव) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. सागर सोनवणे व भास्कर नन्नवरे हे दोघे तरुण गावठी पिस्टल बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांनी आपल्या सहकारी कर्मचा-यांना रवाना केले होते. गुन्हे शोध पथकातील कर्मचा-यांनी दोघा तरुणांचा शोध घेत त्यांना गावठी पिस्टलसह आव्हाने गावातून शिताफीने ताब्यात घेत अटक केली. सागर देवीदास सोनवणे याची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जातून 25 हजार रुपये किमतीचा सिल्वर रंगाचा…

Read More

यावल प्रतिनिधी । जनतेचे काम वेळेवर न करणाऱ्या यावल तहसीलदार यांची तात्काळ बदली करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय आघाडीचे शहराध्यक्ष कामराज घारू यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल शहरातील तहसीलदार हे जनतेचे वेळेवर काम करत नाही आणि काही पक्षाचे नेते व कार्यकर्ते एक एक दोन दोन तास केबिनमध्ये बसून राहतात. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते दरवाजाच्या बाहेर तहसीलदार यांची दोन तास वाट बघत असतात. तसेच तालुक्यातील व शहरातील जनतेला आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना कामाचे आश्वासन देतात परंतू प्रत्यक्ष मात्र काम होत नाही. यावल तालुक्यातील पेट्रोल पंप मालकाकडे…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील मास्टर कॉलनी येथील एका तरुणाला काही एक कारण नसतांना डोक्यात दगड मारुन जखमी केल्याची घटना घडली. आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मास्टर कॉलनी परिसरात मोहम्मद जावेद शेख सादीक (वय २१) हा तरुण राहतो. मजुरी करुन तो उदरनिर्वाह भागवितो. मंगळवारी तो त्याच्या घरासमोर उभा असतांना काही एक कारण नसतांना जावेद, सादीक मुलतानी व आदिल मुलतानी तिघे रा. मास्टर कॉलनी यांनी मोहम्मद जावेद शेख यास शिवीगाळ करत दमदाटी केली. तिघांपैकी जावेद याने मोहम्मद जावेद शेख यास डोक्यात दगड मारुन दुखापत केली. अशा मोहम्मद जावेद शेख सादीक याच्या तक्रारीवरुन एमआयडीसी…

Read More