तेलंगणा, वृत्तसंस्था । तेलंगणातील सैदाबाद भागात ९ सप्टेंबर रोजी ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील फरार आरोपीचा मृतदेह घानपूर भागात रेल्वे रुळावर आढळला आहे. मृताच्या शरीरावर गोंदवलेल्या चिन्हांच्या आधारे या मृताची ओळख पटवण्यात आली आहे. विशेष म्हणजे फरार आरोपीला अटक करून त्याचं एन्काऊंटर करण्यात येईल, आरोपीला सोडण्याचा प्रश्नच येत नाही, असं तेलंगणाचे कामगार मंत्री मल्ला रेड्डी बुधवारी म्हणाले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आरोपीचा मृतदेह सापडला आहे. आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न करताना ट्रेनसमोर उडी मारल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तेलंगणच्या पोलीस प्रमुखांनी आरोपीच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला आहे. काय आहे प्रकरण? ही घटना हैदराबादच्या सैदाबादमध्ये गुरुवारी,…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्ड सिटीतर्फे एमआयडीसीतील महावीर नीरज इंडस्ट्रीज येथे बुधवारी रक्तदान शिबिर घेण्यात अाले. यात सुमारे १०० दात्यांनी रक्तदान केले. शिबिरात महावीर पॅकेजिंगच्या कामगारांसह रोटरी गोल्डसिटीचे सदस्यांनी रक्तदान केले. शिबिराचे उद््घाटन उद्योजक श्रीराम पाटील व रोटरीचे माजी उपप्रांतपाल डॉ. राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. राजेश पाटील यांनी रक्तदान शिबिराचे महत्त्व समजावून सांगितले. श्रीराम पाटील यांनी कामगार हा औद्योगिक क्षेत्रातील सहयोगी असल्याचे म्हटले. शिबिरासाठी अध्यक्ष उमंग मेहता, सचिव डॉ. नीरज अग्रवाल, प्रकल्प प्रमुख सुमीत छाजेड, सुमीत छाजेड, डॉ. सूर्यकिरण वाघण्णा, राकेश सोनी, सौरभ पटनी, प्रखर मेहता, राहुल कोठारी, डॉ. अर्चना कोतकर यांनी सहकार्य केले.
फैजपूर : प्रतिनिधी येथील पोलिसांनी बुधवारी नाका-बंदी दरम्यान एका वाहनासह चार गोवंश जातीचे गुरे अवैधरित्या वाहून नेत असताना ताब्यात घेतली मात्र पोलिसांना पाहून वाहन चालक फरार झाला आहे. वाहन चालकाचे नाव रईस खान हमीद खान रा. न्हावी असे असून त्याच्या ताब्यातून एक लाखाचा टाटा कंपनीचा छोटा हत्ती वाहन तसेच अठरा हजाराची चार गुरे असा तब्बल एक लाख अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे. बुधवारी पोलिसांची नाकाबंदी असताना येथील छत्री चौकात फौजदार मोहन लोखंडे, सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे, पोलीस नाईक किरण चाटे, बाळू भोई, हे तपासणी करीत असताना एक टाटा कंपनीचा छोटा हत्ती…
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून जिजामाता उद्यान (Jijamata Udyan Zoo)मधील पेंग्विनवर होणाऱ्या खर्चाबाबत वाद सुरू आहे. विरोधीपक्ष मुंबईमनपावर टीका करत आहेत. भाजपाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना पत्र लिहले – ‘कुठल्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी ही कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होते आहे?’ असा टोमणा मारला.(Nitesh Rane scolds the mayor) मुंबईकरांची दिशाभूल राणेंनी लिहिले आहे की ‘आपण मुंबईच्या प्रथम नागरिक आहात. ही सन्मानाची बाब असली पाहिजे. पण आपण घेतलेल्या प्रेस कॅान्फरन्समध्ये ज्या पद्धतीने आपण मुंबईकरांची दिशाभूल केलीये, हे अत्यंत निंदनीय आहे. असो, आम्हीही समजू शकतो की ‘पेंग्वीन’च्या दबावामुळे आपण खोट्याला खर सिद्ध करण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला,…
पुणे : लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर (Surekha Punekar) या उद्या (१७ सप्टेंबरला) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशावरुन भाजपाचे नेते, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी तीन दिवसांपूर्वी एका जाहीर सभेत सुरेखा पुणेकर यांचे नाव न घेता म्हणाले होते – ‘राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष रंगलेल्या गालांचे मुके घेणारा पक्ष आहे. या पक्षाला गरीबांकडे पाहण्यासाठी वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष आहे.” यावरून राष्ट्रवादी आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगला होता. सुरेखा पुणतांबेकर यांनी यावरून दरेकरांना टोमणा मारला “घाण तोंडाचे दरेकर भाजपामध्ये कसे?” सुरेखा पुणेकर म्हणाल्यात, “मला दरेकराबाबत खूप वाईट वाटते. मोठे नेते आहेत पण त्यांना महिलांचा…
चाळीसगाव, प्रतिनिधी । औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्र-52 (जुना 211) या महामार्गावर औट्रम घाटातील साखळी क्र. 376+000 ते 390+000 मधील रस्ता 31 ऑगस्ट, 2021 रोजी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे घाटातील मार्ग खचला होता. तसेच घाटात जागोजागी दरड कोसळल्या होत्या. त्यामुळे सदरील ठिकाणी एका बाजुस दरी व दुसऱ्या बाजुस डोंगर असल्यामुळे वाहन दरीत कोसळण्याची किंवा अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने सदरील रस्ता तात्पुरता बंद करण्यात आलेला होता व वाहतुक वळविण्यात आलेली होती. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती व पाहणी करुन सद्य:स्थितीत औरंगाबाद ते धुळे वाहतुक करणाऱ्या दुचाकी व हलक्या/छोट्या वाहनांसाठी 15 सप्टेंबर, 2021 पासुन रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. सद्या घाटात रस्ता दुरुस्तीचे…
जळगाव, प्रतिनिधी । शहरातील गणेश कॉलनी परिसरातील विजेंद्र हॉस्पिटल येथून १८ जुलै २०२० रोजी मोटारसायकल लंपास केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी त्याला जेरबंद केले आहे. जिवन गोकुळ शिंदे या मोटार सायकल चोरट्यास जिल्हापेठ पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. जळगाव शहरातील विजेंद्र हॉस्पीटल येथून 18 जुलै 2020 रोजी मोटार सायकल चोरी केल्याचे त्याने कबुल केले आहे. हरिष गिरधर भोळे रा. आसोदा – जळगाव यांची मोटारसायकल जुलै 2021 मधे शहरातील विजेंद्र हॉस्पीटल येथून चोरी झाली होती. त्याबाबत जिल्हापेठ पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा केल्यापासून आरोपी जिवन शिंदे फरार होता. एक वर्षानंतर तो पोलिसांच्या…
भुसावळ, प्रतिनिधी | शहरातील एका भागात असणारा कुंटणखान्यावर बाजार पेठ पोलिसांनी १४ रोजी रात्रीच्या सुमारास धाड टाकली. या धाडीत महिला व ग्राहकांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ शहरातील नाहाटा कॉलेज चौफुली परिसरात असणार्या वैतागवाडी भागात देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. या अनुषंगाने त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या एका पथकाने रात्री उशीरा या भागात छापा टाकला. यात एक ग्राहक आढळून आला. संबंधीत कुंटनखाना चालवणारी महिला आणि त्या ग्राहकाला अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, या छाप्यात पोलिसांनी देहविक्रीच्या व्यवसायात…
जळगाव प्रतिनिधी । येथील डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयात आज अभियंता दिवस साजरा करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कविता पवार या स्वयंसेविकेने कार्यक्रमास उपस्थित प्राचार्य, उप प्राचार्य, सर्व अभियंता व प्राध्यापक वर्गाचे स्वागत केले. त्यांनतर प्राचार्य डॉ. पी. आर. सपकाळे यांच्या हस्ते भारतरत्न सर विश्वेश्वरय्या याच्या प्रतिमेची पुजा करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यांनतर ओंकार चव्हाण व कृतीका हरणे या स्वयंसेवकांनी भाषणे दिली. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. कुशल ढाके,डॉ. सागर चव्हाण, प्रा. परीस यादव, प्रा. शीतल पाटील, प्रा. सर्वेश कुमार यांनी सर विश्वेश्वरय्या यांचा जन्म, शिक्षण व त्यांच्या जीवनातील विवीध अनुभव त्यांच्या कार्याबद्दल कथन करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनतर प्राचार्य डॉ. पी.…
मुंबई, वृत्तसंस्था । नवरात्र, रामलीला अशा हिंदू सणांमध्ये घातपात करणाच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. यात महाराष्ट्रातून जान मोहम्मद शेखला धारावीतून स्पेशल सेलने अटक केली. मुंबईत आणि राज्यात अशी कट कारस्थान सुरु असताना महाराष्ट्र राज्याच दहशातवाद विरोधी पथक (एटीएस) झोपलय का? असा सवाल भाजप नेते आमदार ॲड आशिष शेलार यांनी केला आहे. पोलिसांवर असलेल्या राजकीय दबावामुळे त्यांच अशा गोष्टींकडे दुर्लक्ष होतय असा आरोप ही त्यांनी यावेळी केला. आज मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना ॲड. शेलार म्हणाले, नॅान कॅाग्निजेबल ॲाफेन्समधे केंद्रीय मंत्र्यांना अटक करणारे राज्याचे पोलिस, पत्रकारांना हात नाही पाय लावू अशी भाषा करणारे पोलिस, विद्यमान आमदाराला लुक आउट…