जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतात पाणी साचले असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी हरताळा सरपंच दिपक कोळी, उपसरपंच नामदेवराव भड, बोदवड उपनगराध्यक्ष दिनेश माळी, गटनेते कैलास चौधरी, नगरसेवक दिपक झांबड, गोपाळ गंगतिरे, रवींद्र खेवलकर, प्रदिप बडगुजर, भरत पाटील, मुकेश क-हाळे, भगतसिंग पाटील, शंकर चिखलकर, हमीदपठाण, महेश शेळके उपस्थित होते. जळगाव जिल्हयात गेल्या महिन्या भरापासून मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली आहे. त्यामुळे पिके पिवळी पडली असून त्यांची मुळे सडत आहेत. उडीद मुग ,सोयाबीनला कोंब…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशनची जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य यांना भेडसावणाऱ्या अडचणीबाबत चर्चा करण्यात येथून असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र संस्थापक अध्यक्ष डॉ. कैलास गोरे पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. श्री छत्रपती शाहू महाराज सभागृहात आयोजित जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशनच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा ना. रंजनाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, प्रदेश कार्याध्यक्ष तथा जि.प. रत्नागिरी उपाध्यक्ष उदय बने, राज्य संघटक संजू वाडे, राज्य उपाध्यक्ष जय मंगल जाधव, उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्ष तथा जि. प. सदस्य डॉ. नीलम पाटील, असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील महानगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या नऊ रस्त्यांवरील अतिक्रमण काढून सदरचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यासाठी तातडीने ना हरकत प्रमाणपत्र द्यावे. जेणेकरुन पुढील कार्यवाही करणे होईल असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिले. जळगाव शहर महानगरपालिकेला प्रदान केलेल्या 61 कोटी रुपयांच्या कामांची सद्यस्थिती आणि उर्वरित कामांच्या नियोजनाबरोबरच शहरवासियांना चांगल्या सुविधा देण्याबाबत येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस महापौर जयश्रीताई महाजन, महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, उपमहापौर कुलभूषण पाटील, अधिक्षक अभियंता रुपा गाजरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे चंद्रकांत सिन्हा, वीज वितरण…
अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील चौबारी येथे किराणा दुकान फोडून दुकानातील रोकडसह किराणा सामान असा एकुण ६० हजार रुपये किमतीचे रोकड आणि किराणा माल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, संजय भागचंद जैन (वय-४०) रा. चौबारी ता. अमळनेर यांचे संजय प्रोव्हीजन नावाचे किराणा दुकान आहे. १५ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता जैन यांनी किराणा दुकान बंद करून घरी गेले. त्यानंतर मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी किराणा दुकान फोडून दुकानातील ३५ हजार रुपयांची रोकड आणि किराणा सामान असा एकूण ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे १६ सप्टेंबर रोजी सकाळी…
यावल प्रतिनिधी । कोळन्हावी शिवारातून वाळूच्या साठ्यातून अज्ञात चोरट्यांनी वाळू चोरून नेल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी गावातील पोलीस पाटील यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील कोळन्हावी शिवारात २७ ऑगस्ट २०२१ सकाळी ६ ते १५ सप्टेंबर २०२१ सकाळी १० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी वाळूच्या साठ्यातून वेळोवेळी वाळूची चोरी केल्याची उघडकीला आले आहे. याप्रकरणी पोलीस पाटील कैलास सोळंके यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अजिज शेख हे करीत आहे.
जळगाव प्रतिनिधी । टाटा फायनान्स लिमिटेड कंपनीत नोकरी देण्यासह कंपनीकडुन कर्ज देण्याचे आमिष दाखवत पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील तरूणासह इतरांची ५ लाख २३ हजार ८१० रुपयांत फसवणुक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरुवार १६ सप्टेंबर रोजी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पिंपळगाव हरेश्वर येथे गोविंदपुरा येथे जीवन कैलास बोढरे वय २७ हा तरुण राहतो. त्याचे सलूनचे दुकान असून त्यावर उदरनिर्वाह भागवतो. १५ ते १६ सप्टेंबर दरम्यान जीवन यास वेगवेगळ्या नावाने अज्ञात इसमांनी संपर्क साधला. टाटा फायनान्स लिमीटेड या कंपनीतून बोलत असून बनावट कागदपत्रांच्या आधारे जीवन याचा संबंधितांनी विश्वास संपादन केला. त्यानंतर जीवन यास कंपनीत नोकरी…
नागपूर । माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सकाळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. देशमुख यांच्या नागपूर, मुंबई, तसंच त्यांच्या मालकीच्या कॉलेजवर आयकर विभागाने छापे ठाकले. नागपुरातील निवासस्थान, नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील निवासस्थान, मुंबईतील ज्ञानेश्वरी निवासस्थान, NIT कॉलेजवर आयकर विभागाने छापा टाकून झाडाझडती केली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना…
जळगाव प्रतिनिधी | शहरातून तब्बल आठ महिलांच्या सोनसाखळ्या चोरणार्यांच्या मुसक्या जिल्हापेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने आवळल्याची माहिती आज जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन दोन सोनसाखळी चोरांना अटक केल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, जिल्हापेठ पोलिस स्थानकाच्या हद्दीत एका महिलेस पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिची सोनसाखळी लांबविल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याचा तपास जिल्हापेठ पोलिसांनी केला असता त्यांना नाशिकमधील दोन चोरट्यांनी हे कृत्य केल्याची माहिती मिळाली. या अनुषंगाने जिल्हापेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने याची कसून चौकशी करून संदीप सोनवणे आणि सतीश चौधरी या दोघा चोरट्यांना शिताफीने अटक…
चाळीसगाव प्रतिनिधी । कॉलेजचे काम आटोपून स्कुटीने चाळीसगावकडे येत असताना मालेगाव कडून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने चालक जागीच ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असे की, कॉलेजचे काम आटोपून तिघे जण स्कुटीने चाळीसगावकडे येत असताना अचानक मालेगाव कडून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात स्कुटी (क्र. एम. एच. ०५ ईई ४०९८ ) वरील चालक अविनाश विष्णू मोरे (वय-२०) रा. गोविंद नगर कल्याण जि. ठाणे याचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेले मयुर यशवंत मांडवे रा. कल्याण जि. ठाणे व केतन कैलास चव्हाण रा. खडकी ब्रु. ता. चाळीसगाव…
मुंबई : प्रतिनिधी वांद्रे कुर्ला संकुल ते जेव्हीएलआरला जोडणाऱ्या पुलाचा गर्डर कोसळून झालेल्या दुर्घटनेची त्रयस्थ मूल्यमापन संस्था आणि MMRDAचे अधिकारी मिळून चौकशी करतील, अशी घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली. या घटनेत जखमी झालेल्या कामगारांच्या उपचाराचा खर्च एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. ही बातमी पण वाचा : बांधकाम सुरू असलेल्या पुलाचा भाग कोसळला; १३ जण जखमी आज पहाटे ४च्या सुमारास वांद्रे कुर्ला संकुल आणि जेव्हीएलआर यांना जोडणारा निर्माणाधिन पुलाचा गर्डर अचानक एका बाजूला कलंडल्याने त्यात १४ कामगार जखमी झाले. सुदैवाने या दुघटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दुर्घटनास्थळाला आज…