पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नगरदेवळा येथून जवळच असलेल्या अखतवाडे येथे जिल्हा परिषदच्या माध्यमातून उर्दू शाळेसाठी १६ लाख २५ हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून आज या बांधकामाचे उद्घाटन शिवसेना जिल्हापरिषद गटनेते रावसाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आखतवाडे येथे जिल्हा परिषद उर्दु शाळेची इमारत जीर्ण झाली होती. त्यासंदर्भात ग्रामस्थांनी वारंवार ती शाळा नवीन बांधण्यात यावी यासाठी रावसाहेब पाटील यांच्याकडे मागणी लावून धरली होती. त्यामुळे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हापरिषद सदस्य रावसाहेब पाटील यांनी त्यासंबंधी पाठपुरावा करून त्या शाळेसाठी १६लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून आणला असून जुनी उर्दूशाळा निर्लखीत करून नवीन शाळेचे बांधकाम उदघाटन आज रोजी त्यांच्या हस्ते पार…
Author: saimat team
पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील शिंदाड येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी संदिप बोरसे तर उपाध्यक्ष पदी विनोद तडवी यांची निवड करण्यात आली आहे. आज दि. १४ रोजी ११ .३० वाजता शाळेत अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम पार पडला ह्या वेळी बोट वरती करून उपस्तीत १० पैकी ८ सदस्यांनी संदीप शांताराम बोरसे यांचे नावाला पसंती दिली तर उपाध्यक्ष पदासाठी विनोद कचरू तडवी यांचे नावाला पसंती दिली ११ पैकी १० सदस्य निवडीला उपस्तीत होते यावेळी नवनिर्वाचित सदस्य पूनम प्रदीप श्रावणे, कोकिळा धनंजय पाटील, कविता तांबे, सोनल श्रीकांत पाटील, रहेमान मशीद तडवी, सुलताना तडवी, तुषार भगवान सांबरे, दिलशान तडवी उपस्तीत होते. मुख्याध्यापक…
पारोळा प्रतिनिधी । गणपती उत्सवानिमित्ताने एकता गणेश मंडळ व इच्छापूर्ती गणेश मंडळाच्या सहकार्याने शेवगे बु॥ गावात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 25 दात्यांनी रक्तदान केले.त्यावेळी उत्तर महाराष्ट्र प्रहार जनशक्ती पक्ष संपर्क प्रमुख अनिल भाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा अध्यक्ष अविनाश पाटील यांच्या सुचणेनुसार रक्तदान केलेल्या सर्व व्यक्तींना प्रहार संघटनेचे तालुका युवक अध्यक्ष व पारोळा शहर अध्यक्ष विजय चौधरी. उर्फ पल्टी भाऊ.. सामाजिक कार्यकर्ते आकाश सोनवणे यांच्यातर्फे पाण्याचे थर्मोस वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच भिकूबाई पाटील,ग्रा प सदस्य भूषण पाटील,अनिल पाटील,हरिचंद्र पाटील ग्राम पंचायत शिपाई प्रमोद कोळी,अनिल काशिनाथ पाटील, योगेश कोळी दिनेश पाटील, निलेश पाटील समाधान पाटील महेंद्र…
जळगाव प्रतिनिधी । चाळीसगाव येथे पूरग्रस्तांसाठी जळगाव टायगर ग्रुपतर्फे एक हात मदतीचा या संकल्पनेतून संसारोपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले आहे. दरम्यान, शहरातील तितुर व डोंगरी नदीला पूर आल्यामुळे अनेक कुटुंबांचे संसार उघडल्यावर आले आहेत. या कुटुंबांना तातडीची मदत म्हणून टायगर ग्रुप कडून नेहमी एक हात मदतीच्या मदतीच्या माध्यमातून धावून येणाऱ्या टायगर ग्रुप संघटना खानदेश विभाग यांच्याकडून मदत माध्यमातून दानशूर व्यक्तींना आव्हान करण्यात आले होते. त्यातून तात्काळ ही मदत पुरामुळे बाडीत कुटुंबातील व्यक्तींना येथील घरोघरी साहित्य वाटप करण्यात आले 400 किट व किराणा साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष जालिंदर जाधव व टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी जाधव,…
चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील ओढरे येथे गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे मुख्य रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्याने ये-जा करण्याचा मार्ग बंद झाला असून तात्काळ रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्लोबल बंजारा अस्तित्व संस्थेतर्फे तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. चाळीसगाव तालुक्यात ३० ऑगस्ट रोजी अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे अनेक जनावरे वाहून गेली. तर मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली. त्याचबरोबर शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. मात्र ओढरे गावालगत असलेल्या प्रकल्पातून पाणी विसर्ग होऊन पाण्याबरोबर मुख्य रस्ताच वाहून गेल्याचा गंभीर प्रकार उघडकीला आले आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांचा दळणवळणाचा मार्गच बंद झाल्यामुळे त्यांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान या समस्येला…
वरणगाव । साकीनाका येथील महिलेवर सामुहिक अत्याचार करून तीस गंभीर दुखापत केल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात महिला सुरक्षित नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पावर हे झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप भाजपा महील आघाडीने राज्य सरकारविरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. मुंबई येथील साकीनाका येथील ३० वर्षीय महिलेवर नराधमांनीं बलात्कार करून गुप्तांगामध्ये रॉड घुसविला, त्यामुळे ती महिला बेशद्ध पडून उपचारादरम्यान मृत्यू झाला. हे राज्य कायद्याचे नाही दिवसा ढवळ्या महिलांवर अत्याचार होत आहे. महिला सुरक्षित नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे झोपेचे सोंग घेत आहे, कायदा सुव्यवस्था संपूर्णपणे ढासळली असून याला महाविकास आघाडी जबाबदार आहे, या महिलेच्या…
जळगाव प्रतिनिधी । जळगाव येथील राज्य परिवहन महामंडळाने २०१९ मध्ये भरती करण्यात आली होती. यात चालक आणि वाहक उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याबाबत यापुर्वी वेळोवेळी आंदोलन आणि निवेदन देण्यात आले होते. परंतू अद्यापपर्यंत वाहक आणि चालकांना नियुक्तीपत्र देण्यात आलेले नाही. येत्या आठ दिवसांत नियुक्तीपत्र मिळावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा पात्र उमेदवारांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे करत आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव राज्य परिवहन मंडळाच्या सन-२०१९ मध्ये वाहन चालक व वाहक यांची भरती राबवण्यात आली होती. परंतु पात्र झालेल्या चालक आणि वाहक या उमेदवारांना अद्यापपर्यंत नियुक्तीपत्र दिले नाही. याबाबत उमेदवारांनी वेळोवेळी आंदोलन व निवेदन दिले होते. चालक व वाहक अंतिम…
मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोना संकटाच्या (Corona crises) पार्श्वभूमीवर अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे . ठाकरे सरकारकडून (Thackeray Govt) बेरोजगारांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये ऑगस्ट-२०२१ मध्ये १७ हजार ३७२ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली. यात मुंबई विभागात सर्वाधिक ६ हजार १९०, नाशिक विभागात २ हजार १६८, पुणे विभागात ४ हजार ६२९, औरंगाबाद विभागात ३ हजार ७३८, अमरावती विभागात ४४९ तर नागपूर विभागात १९८ इतके जण नोकरीला लागले आहेत. कौशल्य…
चाळीसगाव प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७१ वा वाढदिवस जाहिरात बाजीने साजरा न करता सामाजिक उपक्रमांद्वारे करण्यात येणार असून जिल्ह्यात ई- श्रमिक अभियानाला सुरुवात करण्यात आली, अशी माहिती खासदार उन्मेष पाटील यांनी पत्रपरिषदेत दिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७१ वा वाढदिवस येत्या १७ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. या पाश्र्वभूमीवर खासदार उन्मेष पाटील यांनी मंगळवार रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन केले. या पत्रपरिषदेत त्यांनी पंतप्रधान यांचा वाढदिवस हे जाहिरात बाजीने न साजरा करता सामाजिक उपक्रमांद्वारे करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर वाढदिवसाचे औचित्य साधून खासदार पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात ई- श्रमिक लेबर कार्ड नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे.…
मुंबई : प्रतिनिधी कानात हेडफोन घालून रस्त्यावर बेधुंद चालणारे आपण अनेक हेडफोन घालून मुंबईत कार चालवणाऱ्या व्यक्तीला चांगलाच फटका बसला आहे. ही घटना थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत घडली आहे. उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यामध्ये अचानक एक अज्ञात कार शिरल्याची नधक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास मुंबईत हा प्रकार घडला. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये अचानक एक कार शिरली आणि खळबळ उडाली. बरं ही काही साधीसुधी कार नव्हती तर थेट आलिशान मर्सडिज होती. या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही एक मर्सडिज कार होती. या प्रकरणी संबंधित मर्सडीज कार चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला…