भुसावळ, प्रतिनिधी | शहरातील एका भागात असणारा कुंटणखान्यावर बाजार पेठ पोलिसांनी १४ रोजी रात्रीच्या सुमारास धाड टाकली. या धाडीत महिला व ग्राहकांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ शहरातील नाहाटा कॉलेज चौफुली परिसरात असणार्या वैतागवाडी भागात देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. या अनुषंगाने त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या एका पथकाने रात्री उशीरा या भागात छापा टाकला. यात एक ग्राहक आढळून आला. संबंधीत कुंटनखाना चालवणारी महिला आणि त्या ग्राहकाला अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, या छाप्यात पोलिसांनी देहविक्रीच्या व्यवसायात…
Author: saimat team
जळगाव प्रतिनिधी । येथील डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयात आज अभियंता दिवस साजरा करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कविता पवार या स्वयंसेविकेने कार्यक्रमास उपस्थित प्राचार्य, उप प्राचार्य, सर्व अभियंता व प्राध्यापक वर्गाचे स्वागत केले. त्यांनतर प्राचार्य डॉ. पी. आर. सपकाळे यांच्या हस्ते भारतरत्न सर विश्वेश्वरय्या याच्या प्रतिमेची पुजा करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यांनतर ओंकार चव्हाण व कृतीका हरणे या स्वयंसेवकांनी भाषणे दिली. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. कुशल ढाके,डॉ. सागर चव्हाण, प्रा. परीस यादव, प्रा. शीतल पाटील, प्रा. सर्वेश कुमार यांनी सर विश्वेश्वरय्या यांचा जन्म, शिक्षण व त्यांच्या जीवनातील विवीध अनुभव त्यांच्या कार्याबद्दल कथन करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनतर प्राचार्य डॉ. पी.…
मुंबई, वृत्तसंस्था । नवरात्र, रामलीला अशा हिंदू सणांमध्ये घातपात करणाच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. यात महाराष्ट्रातून जान मोहम्मद शेखला धारावीतून स्पेशल सेलने अटक केली. मुंबईत आणि राज्यात अशी कट कारस्थान सुरु असताना महाराष्ट्र राज्याच दहशातवाद विरोधी पथक (एटीएस) झोपलय का? असा सवाल भाजप नेते आमदार ॲड आशिष शेलार यांनी केला आहे. पोलिसांवर असलेल्या राजकीय दबावामुळे त्यांच अशा गोष्टींकडे दुर्लक्ष होतय असा आरोप ही त्यांनी यावेळी केला. आज मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना ॲड. शेलार म्हणाले, नॅान कॅाग्निजेबल ॲाफेन्समधे केंद्रीय मंत्र्यांना अटक करणारे राज्याचे पोलिस, पत्रकारांना हात नाही पाय लावू अशी भाषा करणारे पोलिस, विद्यमान आमदाराला लुक आउट…
मुंबई, वृत्तसंस्था । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ९ सप्टेंबर २०२१ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला होता तेव्हा त्यांनी पैठण येथील संतपीठाचे शैक्षणिक व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे सोपविण्याची सुचना केली होती त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागाने यासंबंधीचा शासननिर्णय निर्गमित केला आहे. या निर्णयामुळे संतपीठाच्या कामाला आता वेग मिळाला आहे. पैठण येथील संतपीठामध्ये भारतीय परंपरा, संस्कृती, संत संप्रदाय, संत साहित्य, किर्तन, प्रवचन, तत्वज्ञान आदी बाबींशी संबंधित प्रमाणपत्र,पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवण्यासाठी संतपीठाचे शैक्षणिक व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाकडे ५ वर्षांसाठी किंवा पुढील आदेश होईलपर्यंत जे लवकर होईल त्या काळासाठी सोपवण्याचा निर्णय काही अटींच्या अधीन राहून घेण्यात आला आहे.…
मुंबई, प्रतिनिधी । महाराष्ट्रातील साखर उद्योग हा प्रमुख उद्योग असून राज्यातील साखर कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या स्थलांतरीत ऊस तोडणी कामगारांना सामाजिक सुरक्षितता योजनांचे लाभ देण्यासाठी राज्य शासनाच्या सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. तसेच राज्यातील स्थलांतरीत ऊस तोडणी कामगारांच्या जिल्हानिहाय संख्येचे प्रमाण लक्षात घेऊन त्यांच्या पाल्यांसाठी वसतिगृहांची उभारणी करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. त्याचप्रमाणे राज्यातील स्थलांतरीत ऊस तोडणी कामगार, मुकादम आणि वाहतुक कामगारांची नोंदणी करुन त्यांना ओळखपत्र देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या मागणी प्रमाणे ऊस तोडणी कामगारांच्या प्रश्नांसाठी तसेच कै. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ तातडीने कार्यान्वित करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली…
मुंबई, प्रतिनिधी । मुंबईतील साकी नाका परिसरातील घटने बरोबरच राज्यातील अन्य भागातही महिलेंवर अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. अशात शक्ती कायद्याची अंमलबजावणी करणे हे महत्वाचे असल्याचे मत मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी मंत्रालयात काल राज्य गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. राज्यात पोलिसांचा धाक कोणालाही राहिला नाही.17 वर्षाचा मुलगा गँगरेपमध्ये आरोपी होतो आणि तरीही त्याचा जामीन होतो अशात पोलिसांचा किंवा कायद्याचा धाक राहणार तरी कसा त्यासाठी शक्ती कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी गृहमंत्री यांनी शक्ती कायदा हा येत्या हिवाळी अधिवेशनात संमत करू तसेच महिलांच्या बाबतीत सरकार गंभीर असून या…
मुंबई : प्रतिनिधी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तान संघटित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. काल पकडण्यात आलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी धारावातील असल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या दहशतवाद्यांचा मुंबईची लोकल उडवण्याचा प्लॅन असल्याचे उघड झाल्याने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आता अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी आज तातडीने पोलिसांची बैठक बोलावली आहे. दिलीप वळसे-पाटील यांनी या बैठकीबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, “दिल्लीत सहा अतिरेक्यांना अटक करण्यात आली. देशाच्या स्तरावरील ही घटना आहे. त्यामुळे या प्रकरणाची माहिती घेण्याच्या संदर्भात बैठक बोलावली आहे. या बैठकीतील कायदेशीर माहिती घेतल्यानंतरच त्यावर अधिक भाष्य करता येईल. तसेच, या बैठकीला पोलिसांच्या सर्व…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. आज दिल्लीमध्ये जिथे पेट्रोलचे दर 101.19 रुपये प्रति लीटरवर स्थिर राहिले. त्याचवेळी डिझेलचा दर 88.62 रुपये प्रति लिटर राहिला. सरकारी तेल कंपन्या दरांचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम सुधारित करतात आणि दररोज संध्याकाळी 6 पासून पेट्रोल दर आणि डिझेलचे दर जारी करतात. महानगरांमधील आजचे नवीनतम दर जाणून घ्या आता दिल्लीत 1 लीटर पेट्रोलची किंमत 101.19 रुपये आहे. त्याचबरोबर 1 लीटर डिझेल 88.62 रुपये प्रति लिटर आहे. आता कोलकातामध्ये 1 लीटर पेट्रोलची किंमत 101.62 रुपये आहे. त्याच…
वरणगाव प्रतिनिधी । मुक्ताईनगर येथील शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वरणगाव शिवसेनेने संसर्गजन्य रोगाचे निर्मुलन करण्यासाठी ५० हजार लोकसंख्या असलेल्या या वरणगावात फवारणी सप्ताह कार्यक्रम हाती घेतला आहे. वरणगाव शहरामध्ये डेंगू ,मलेरिया, टायफड ,या आजाराने थैमान घातले आहे, यासाठीच या आजारांपासून नागरिकांचा बचाव व्हावा ,यासाठी वरणगाव शिवसेनेच्यावतीने पूर्ण सप्ताभर प्रत्येक वार्डा मध्ये व गल्लीबोळ यामध्ये फिरून फवारणी करण्यात येणार आहे ,अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी दिली आहे.
मुक्ताईनगर प्रतिनिधी । शिवसेना शहर संघटक वसंत भलभले संचालक शिव भोजन केंद्र मुक्ताईनगर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब जनतेला मोतीचूर लाडूचे वाटप करण्यात आले. यावेळी शेकडो लोकांनी व परिवारांनी याचा लाभ घेतला. प्रसंगी वसंता भलभले व विशाल भलभले हे उपस्थित होते. दरम्यान, आज तालुक्यात आमदार चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस हा अतिशय उत्साहात साजरा करण्यात येत असून यानिमित्त विविध जनहितार्थ उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर कालपासूनच शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. राज्यातील प्रमुख नेत्यांसह जिल्ह्यातील मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व आज भल्या पहाटेपासूनच मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आल्याचे दिसून…