भुसावळ प्रतिनिधी- कटकारस्थान करून शत्रूला नामोहरण करणे. शत्रू बेसावध असताना शत्रुसेनेला खिंडार पाडून पहिली तुकडी माघारी आल्यावर दुसऱ्या तुकडीला हल्ला करायला लावणे. अशा प्रकारच्या गनिमी युद्धनितीसह शिवरायांनी युद्धनितीच्या विविध तत्त्वांचा वापर युद्धात केला. शिवरायांनी स्वतःचे युद्धतंत्र विकसित करून स्वराज्य गाठले, असे प्रतिपादन शिवचरित्रकार चंदन पवार (जळगाव) यांनी केले. भुसावळ येथील छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे शिवजयंतीनिमित्त आयोजित शिवदर्शन सप्ताहात चतुर्थ पुष्प ‘शिवरायांची युद्धनिती’ या विषयावर श्री. पवार यांनी गुंफले. शिवदर्शन सप्ताहाची संकल्पना डॉ. जगदीश पाटील यांची आहे. प्रारंभी शिवचरित्रकार चंदन पवार यांचा परिचय निशा पाटील यांनी करून दिला. श्री. पवार म्हणाले की, इतिहासात डोकावून पाहिले असता युद्धनितीचे वेगवेगळे प्रकार आढळून…
Author: saimat team
शिवव्याख्याते रामेश्वर भदाणे : शिवदर्शन सप्ताहात गुंफले तृतीय पुष्प भुसावळ प्रतिनिधी – स्वराज्य घडविण्यासाठी आपल्या संसाराची राखरांगोळी करून सुखाचा त्याग करत खंबीर होऊन कर्तृत्व घडविणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जी शिकवण व संस्कार दिले, त्याचे दर्शन छत्रपती शिवरायांच्या चरित्रातून आपल्याला वेळोवेळी घडते. चंद्रकोरच्या रूपाने आपल्या आईला आयुष्यभर कपाळावर मिरवणारे छत्रपती शिवाजी महाराज जगभरात अद्वितीय आहेत, असे प्रतिपादन शिवव्याख्याते रामेश्वर भदाणे (जळगाव) यांनी केले. भुसावळ येथील छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे शिवजयंतीनिमित्त आयोजित शिवदर्शन सप्ताहात ‘राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ समजून घेताना’ या विषयावर श्री. भदाणे बोलत होते. शिवदर्शन सप्ताहाची संकल्पना डॉ. जगदीश पाटील यांची आहे. शिवव्याख्याते रामेश्वर भदाणे यांचा…
धुळे प्रतिनिधी फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमीत्त दि.१७ फेब्रुवारी रोजी रात्री व्याख्याते शिवश्री रामेश्वर तुकाराम भदाणे यांचे आम्हाला शिवराय समजले का ? या विषयांवर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते तथा माजी जिल्हा परिेषद अध्यक्ष बाळासाहेब मनोहर भदाणे उपस्थित होते. धुळे तालुक्यातील नगांव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमीत्त छ.शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचावा यासाठी व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन नगांव येथील नवजीवन व्यायामशाळेच्या तरुण मंडळातर्फे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे व्याख्याते मुळचे नगांव येथील व सद्यास्थित अमळेनर जि.जळगांव येथील शिवश्री रामेश्वर तुकाराम भदाणे यांनी सद्या युगाला शिवराय नेमके समजले का? या विषयावर व्याख्यान केले. पुढे…
प्रतिनिधी l धानोरा चर्मकार सामाजाने प्रत्यक्ष शैक्षणिक चळवळीत समाजकारण करावे,सद्यस्थितीत वेळ व काळ हा अनुकूल असल्याने त्याचा फायदा हा घेतला पाहीजे,शैक्षणिक प्रगतीचा आलेख सतत उंचावत ठेवला पाहीजे,उच्च शिक्षणाची कास अंगीकारली पाहीजे,सोबतच व्यावसायिक शिक्षणातुन व्यवसाय थाटला पाहीजे,आपल्याला मिळालेला सवलतीचा फायदा घेऊन स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले पाहीजे.यामुळे आपला कौंटूबिक तसेच समाजाचा अधिकच विकास होईल असे प्रतिपादन डॉ बी आर आंबेडकर मोफत अभ्यासिका चे संचालक प्रशांत सोनवणे यांनी आयोजित कार्यक्रमात केले.तसेच सर्व प्रकारच्या पोलिस भरती,सैनिक भरतीसाठी मार्गदर्शन मी स्वतः देईल असेही सांगितले. येथिल चर्मकार वाड्यात संत रोहीदास यांची जयंतीउत्सव साजरा करण्यात आला.यावेळी संत रोहीदास यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.यावेळी सुरेश…
पाचोरा प्रतिनिधी शहर मराठा महासंघ नूतन कार्यकारिणी जाहीर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पाचोरा शहर कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली असून प्रवीण विश्वनाथ पाटील यांची शहराध्यक्षपदी तर कुणाल कृष्णराव पाटील यांची शहर सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष शिवाजी भास्करराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 17 फेब्रुवारी रोजी महासंघाची पाचोरा शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली. शासकीय विश्रामगृह पाचोरा येथे शिवाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत अ. भा. मराठा महासंघ पाचोरा शहराध्यक्षपदी प्रवीण पाटील तर सरचिटणीस पदी कुणाल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रसंगी तालुका उपाध्यक्ष प्रा. साहेबराव डी. थोरात, सुनील देशमुख, तालुका सरचिटणीस राहुल…
मलकापूर प्रतिनिधी :तालुक्यामध्ये पंतप्रधान घरकुल योजनेत ११६९३ लाभार्थ्यांची नावे प्रपत्र नमुना ड यादीनुसार मंजूर झाली असून २५३३ लाभार्थ्यांची नावे वगळण्यात आली. या सर्वांना पुन्हा यादीमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे आणि घरकुलासाठी मिळणारी रक्कम रू. १३८००० ऐवजी रू.३००००० नव्याने मंजूर करण्याबाबतचे निवेदन आज १७ फेब्रुवारी २०२२ रोजी संतोषभाऊ रायपुरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मलकापूर कडून गटविकास अधिकारी, मलकापूर यांना देण्यात आले. ग्रामीण भागात वाहतुकीला अडचण असल्याने आणि आजची महागाई पाहता मिळणारी रक्कम तुटपुंजी आहे करीता आमच्या मागण्यांना तात्काळ लक्ष देऊन पूर्ण करण्यात याव्या अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भविष्यात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करेल. यावेळी निवेदन देताना डॉ. अशोकराव सुरडकर, बाळूभाऊ…
मलकापूर प्रतिनिधी: संत रोहिदास महाराज यांनी समानतेचा संदेश देत सन्मानाने जगण्याचा संदेश दिला तसेच संत रोहिदास महाराज यांची समाजसुधारक म्हणून ख्याती आहे त्यांनी गरीब कुटुंबात जन्म घेऊन देखील प्रत्येक समाजाने सन्मानाने जगले पाहिजे असे महान विचार त्यांचे होते असे प्रतिपादन अशांतभाई वानखेडे समतेचे निळे वादळ संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक यांनी संत रोहिदास महाराज जयंती च्या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष स्थानावरून बोलताना व्यक्त केले. यावेळी रोहिदास नगर येथे संत रोहिदास महाराज जयंतीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज ,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमांना त्रिवार अभिवादन करून मेणबत्ती, अगरबत्ती प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यावेळी…
मलकापूर प्रतिनिधी शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करा प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांनी केले. यावेळी मलकापूर शहर पोलीस स्टेशन च्या प्रांगणात 19 फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या शिवजयंती उत्सव निमित्ताने शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी विचार मंचावर मलकापूर शहर पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत , एम आय डी सी पोलीस निरीक्षक आनंद महाजन , मलकापूर ग्रामीण पोलिस निरीक्षक मिर्झा, तहसीलदार राजेश सुरडकर, यांची उपस्थिती होती. तर शहर पोलिस स्टेशनच्या या बैठकीला आई तुळजा भवानी फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवराज जाधव , समतेचे निळे वादळ संस्थापक अध्यक्ष भाईअशांत वानखेडे ,…
जळगांव प्रतिनिधी -मल्ल विदयेत तरबेज असणारे आदयक्रांती गुरु वस्ताद लहुजी साळवे यांच्या युद्ध कौशल्याबद्दल पुरेशी माहिती समाजासमोर येवू शकली नाही याबद्दल खंत व्यक्त करून संविधान जागर समितीचे संयोजक भारत ससाणे यांनी वस्ताद लहुजी साळवे यांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यात युद्ध कला कौशल्य केंद्र निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे विचार मांडले. वस्ताद लहुजी साळवे यांच्या स्मृति दिनानिमित्त जनसेवा विचारधारा फाऊंडेशन गोलाणी मार्केट येथे अभिवादन सभेचे आयोजन केले होते. यावेळी विचार व्यक्त करतांना भारत ससाणे यांनी वस्ताद लहुजी साळवे यांच्या अजोड पराक्रमाची माहिती दिली. लढाऊ घराण्याचा वारसा असणारे लहुजी साळवे हे दांडपट्टा फिरविणे,घोड्यावर स्वारी,भालाफेक, बंदूक चालविणे,तोफगोळे फेकणे, गमिनी काव्याने शत्रुला…
चाळीसगाव(प्रतिनिधी)-येथील ७०० वर्षांची परंपरा असलेल्या चाळीसगाव हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक हजरत पिर मुसा कादरी उर्फ बामोशी बाबा यांची तलवार शरीफ मिरवणूक अवघ्या साडे अकरा मिनिटात तलवार तलवार भवन ते दर्गा शरीफ येथे कडक पोलीस बंदोबस्त मध्ये आली लाखोंच्या संख्येने अलोट भाविकांची गर्दी यावेळी झाली तीन दिवस हा उत्सव असतो पहिल्या दिवशी गुसल असतो दुसऱ्या दिवशी संदल असतो तिसऱ्या दिवशी तलवार मिरवणूक असते विशेष मुस्लिम यांच्या घरातून संदल यात्रा निघते हिंदू भालचंद्र देशमुख यांच्या घरातून तलवार शरीफ मिरवणूक निघते हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक म्हणून या बाबांची ओळख आहे चाळीसगाव चे आमदार मंगेश चव्हाण यांनी सहभागी झाली झाले होते माजी आमदार राजीव…