मलकापूर प्रतिनिधी :तालुक्यामध्ये पंतप्रधान घरकुल योजनेत ११६९३ लाभार्थ्यांची नावे प्रपत्र नमुना ड यादीनुसार मंजूर झाली असून २५३३ लाभार्थ्यांची नावे वगळण्यात आली. या सर्वांना पुन्हा यादीमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे आणि घरकुलासाठी मिळणारी रक्कम रू. १३८००० ऐवजी रू.३००००० नव्याने मंजूर करण्याबाबतचे निवेदन आज १७ फेब्रुवारी २०२२ रोजी संतोषभाऊ रायपुरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मलकापूर कडून गटविकास अधिकारी, मलकापूर यांना देण्यात आले. ग्रामीण भागात वाहतुकीला अडचण असल्याने आणि आजची महागाई पाहता मिळणारी रक्कम तुटपुंजी आहे करीता आमच्या मागण्यांना तात्काळ लक्ष देऊन पूर्ण करण्यात याव्या अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भविष्यात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करेल. यावेळी निवेदन देताना डॉ. अशोकराव सुरडकर, बाळूभाऊ…
Author: saimat team
मलकापूर प्रतिनिधी: संत रोहिदास महाराज यांनी समानतेचा संदेश देत सन्मानाने जगण्याचा संदेश दिला तसेच संत रोहिदास महाराज यांची समाजसुधारक म्हणून ख्याती आहे त्यांनी गरीब कुटुंबात जन्म घेऊन देखील प्रत्येक समाजाने सन्मानाने जगले पाहिजे असे महान विचार त्यांचे होते असे प्रतिपादन अशांतभाई वानखेडे समतेचे निळे वादळ संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक यांनी संत रोहिदास महाराज जयंती च्या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष स्थानावरून बोलताना व्यक्त केले. यावेळी रोहिदास नगर येथे संत रोहिदास महाराज जयंतीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज ,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमांना त्रिवार अभिवादन करून मेणबत्ती, अगरबत्ती प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यावेळी…
मलकापूर प्रतिनिधी शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करा प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांनी केले. यावेळी मलकापूर शहर पोलीस स्टेशन च्या प्रांगणात 19 फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या शिवजयंती उत्सव निमित्ताने शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी विचार मंचावर मलकापूर शहर पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत , एम आय डी सी पोलीस निरीक्षक आनंद महाजन , मलकापूर ग्रामीण पोलिस निरीक्षक मिर्झा, तहसीलदार राजेश सुरडकर, यांची उपस्थिती होती. तर शहर पोलिस स्टेशनच्या या बैठकीला आई तुळजा भवानी फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवराज जाधव , समतेचे निळे वादळ संस्थापक अध्यक्ष भाईअशांत वानखेडे ,…
जळगांव प्रतिनिधी -मल्ल विदयेत तरबेज असणारे आदयक्रांती गुरु वस्ताद लहुजी साळवे यांच्या युद्ध कौशल्याबद्दल पुरेशी माहिती समाजासमोर येवू शकली नाही याबद्दल खंत व्यक्त करून संविधान जागर समितीचे संयोजक भारत ससाणे यांनी वस्ताद लहुजी साळवे यांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यात युद्ध कला कौशल्य केंद्र निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे विचार मांडले. वस्ताद लहुजी साळवे यांच्या स्मृति दिनानिमित्त जनसेवा विचारधारा फाऊंडेशन गोलाणी मार्केट येथे अभिवादन सभेचे आयोजन केले होते. यावेळी विचार व्यक्त करतांना भारत ससाणे यांनी वस्ताद लहुजी साळवे यांच्या अजोड पराक्रमाची माहिती दिली. लढाऊ घराण्याचा वारसा असणारे लहुजी साळवे हे दांडपट्टा फिरविणे,घोड्यावर स्वारी,भालाफेक, बंदूक चालविणे,तोफगोळे फेकणे, गमिनी काव्याने शत्रुला…
चाळीसगाव(प्रतिनिधी)-येथील ७०० वर्षांची परंपरा असलेल्या चाळीसगाव हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक हजरत पिर मुसा कादरी उर्फ बामोशी बाबा यांची तलवार शरीफ मिरवणूक अवघ्या साडे अकरा मिनिटात तलवार तलवार भवन ते दर्गा शरीफ येथे कडक पोलीस बंदोबस्त मध्ये आली लाखोंच्या संख्येने अलोट भाविकांची गर्दी यावेळी झाली तीन दिवस हा उत्सव असतो पहिल्या दिवशी गुसल असतो दुसऱ्या दिवशी संदल असतो तिसऱ्या दिवशी तलवार मिरवणूक असते विशेष मुस्लिम यांच्या घरातून संदल यात्रा निघते हिंदू भालचंद्र देशमुख यांच्या घरातून तलवार शरीफ मिरवणूक निघते हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक म्हणून या बाबांची ओळख आहे चाळीसगाव चे आमदार मंगेश चव्हाण यांनी सहभागी झाली झाले होते माजी आमदार राजीव…
अक्षय डोंगरे यांचे सादरीकरण : शिवदर्शन सप्ताहात गुंफले द्वितीय पुष्प भुसावळ – ‘मारूनी डफावर थाप शाहीर गाती पोवाडा’ असे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून तर त्यांच्या चरित्रातील विविध प्रसंगाचे वर्णन आपल्या खास शैलीत काव्यरचनेद्वारे सादरीकरण करून युवा शिवशाहीर अक्षय डोंगरे (नगर) यांनी पोवाड्यातून शिवरायांची महती गायन केली. वीररसाबरोबरच करूण आणि शांतरसाचा समावेश करत आपल्या खड्या आवाजात गायलेल्या पोवाड्याने त्यांनी श्रोत्यांच्या अंगावर शहारे आणले. भुसावळ येथील छत्रपती शिवाजी महाराज बहुद्देशीय संस्थेतर्फे आयोजित शिवजयंतीनिमित्त शिवदर्शन सप्ताहात दुसरे पुष्प युवा शिवशाहीर अक्षय डोंगरे यांनी गुंफले. शिवदर्शन सप्ताहाची संकल्पना डॉ. जगदीश पाटील यांची आहे. दुसऱ्या दिवशी ‘शाहिरी पोवाडा’ या विषयावर आधारित अक्षय डोंगरे…
चोपडा – एकात्मिक आदिवासी विकास खात्यातून दरवर्षी कृषी, वीज मंडळ, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम अशा विविध ठिकाणी विकासात्मक धोरण अवलंबाकरीता मोठ्या प्रमाणात निधी वळवला जात असतो, मात्र पुढे त्या निधीचे काय होते ? तो योग्य त्या ठिकाणी योग्य त्या प्रमाणात वापरला जातो अथवा नाही, त्याचा पाठपुरावा होत नाही किंवा त्या – त्या विभागाचे अधिकारी त्यांचा आढावा इकडे सादर करीत नाहीत, यापुढे संबंधित खात्याने निधी वापराचा आढावा आदिवासी विकास प्रकल्प समितीच्या बैठकीत जातीने हजर राहून द्यावा, अन्यथा हा निधी देणे बंद करा, तसा ठराव आजच करा अशी सुचना आदिवासी प्रकल्प समितीचे अध्यक्ष डॉ.चंद्रकांत बारेला यांनी यावल येथील प्रकल्प समितीच्या आयोजित बैठकीत प्रकल्प…
जामनेर (प्रतिनिधी):- उद्या दि.१९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असून छत्रपतींची जयंती राज्यात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्याचाच एक भाग म्हणून शहरातून दरवर्षी प्रमाणे मोटार सायकल भगवा रॅलीचे आयोजन शिवप्रेमीं तर्फे करण्यात येते. मात्र कोरोना नियमांमुळे प्रशासनाने भगवा रॅली दरम्यान कोरोना नियमांचे उल्हंगण होऊन शांततेचा भंग होईल म्हणून काही शिवप्रेमींवर गुन्हे दाखल करून हद्द पारीची नोटीस बजावली आहे. शिवप्रेमीं च्या भगव्या रॅलीला परवानगी मिळावी व शिवप्रेमींवर दाखल केलेले गुन्हे व हद्दपारीची नोटीस मागे घ्यावे यासाठी युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने जामनेर तहसीलदार व पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे…
यावल : प्रतिनिधी (सुरेश पाटील) दि.१७ फेब्रुवारी२०२२गुरुवार रोजी यावल तालुक्यातील ड़ों.कठोरा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर मधे न्यू सम्राट अशोक क्रिकेट क्लब तर्फे आयोजित खुल्या प्लास्टिक बॉल स्पर्धेचे उद्धाटन करण्यात आले. या उद्धघाटक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हा सरचिटणीस हर्षलभाऊ पाटील होते.तर उद्धाटन जिल्हा परिषद सदस्य सौ.सविताताई भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी झाले.विजेत्या संघाला प्रथम बक्षीस११हजार रुपये असून द्वितीय बक्षीस ५ हजार १ रुपये आहे.न्यू सम्राट अशोक क्रिकेट क्लब तर्फे आयोजित खुल्या प्लास्टिक बॉल स्पर्धेचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ कुंदन दादा फेगडे उपसभापती योगेश दादा भंगाळे,उदय बाउस्कार,सलीम तडवी सर,सरपंच नवाज तडवी, अजय भालेराव आदी मान्यवर व…
मुंबई : प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील क्रिटी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने बाॅलिवुडमध्ये शोककळा पसरली आहे. बाॅलिवुडचा पहिला राॅक स्टार म्हणून बप्पीदा ओळखले जायचे. ‘डिस्को किंग’ म्हणूनही ते प्रसिद्ध होते. त्यांना सोन्याचे दागिने घालायची आवड होती. गळ्यात जाड सोन्याच्या चेन्स, बोटांमध्ये सोन्यांच्या अंगठ्या घालणं त्यांना आवडत होते. अंगावरील दागिन्यांमुळेही त्यांचा खास लूक नेहमी चर्चेचा विषय ठरायचा. बप्पीदा यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९५२ रोजी पश्चिम बंगालमध्ये जलपाईगुडीमध्ये झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. नुकतेच ६ फेब्रुवारी २०२२ रोजी…