रतलाम, वृत्तसंस्था । केंद्र सरकार लवकरच एक कायदा तयार करणार आहे, त्यानुसार बाइक आणि स्कूटरसहित इतर दुचाकी वाहने फक्त इथेनॉलवर चालतील. त्यामुळे महाग इंधनाच्या समस्येपासून सुटका होईल. केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी सांगितले की,‘मी लवकरच कायदा बनवणार आहे. त्यानंतर स्कूटर, बाइक, ऑटोरिक्षा आदी पेट्रोलवर चालणार नाहीत. ही वाहने ११० रुपयांच्या पेट्रोलच्या ऐवजी ६५ रुपये लिटरच्या १०० टक्के इथेनॉलवर चालतील. त्यामुळे पैसेही वाचतील आणि प्रदूषणही कमी होईल.’ गडकरींनी राजस्थानच्या दौसात ही घोषणा केली. ते दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वेच्या दोन दिवसांच्या निरीक्षण दौऱ्यावर आहेत. त्यांनी गुरुवारी हरियाणाच्या सोहना, दौसा आणि मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्या वेळी ते म्हणाले,‘एक्स्प्रेस-वेच्या बांधकामात…
Author: saimat team
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । गुगलच्या माध्यमातून या आठवडय़ापासून हिंदुस्थानातील 13 हजारांहून अधिक ठिकाणी नागरिकांना कोरोना लसीच्या उपलब्धतेविषयी आणि लसीकरणाच्या अपॉइंटमेंट्सविषयी माहिती उपलब्ध होणार आहे. ही माहिती कोविन अॅप्सच्या रीअल-टाइम डेटाच्या मदतीने मिळणार असून यात प्रत्येक लसीकरण केंद्रामधील अपॉइंटमेंट्सची उपलब्धता, दिल्या जाणाऱ्या लसी आणि कोणत्या डोससाठी लसीकरण सुरू आहे, लसीकरणाचे शुल्क आणि अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी कोविन वेबसाइटची लिंक गोष्टींचा समावेश असेल. गुगल सर्चच्या डायरेक्टर हेमा बुडाराजू म्हणाल्या, ‘साथीच्या काळात स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी लोकांना अधिकाधिक माहितीची गरज भासू लागली आहे. त्यांना अचूक माहिती मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.’
डेहराडून, वृत्तसंस्था । कोरोना साथीमुळे चारधाम यात्रेवर घातलेली बंदी उत्तराखंड उच्च न्यायालयाने गुरुवारी उठविली आहे. त्याबरोबरच प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याची अटही न्यायालयाने घातली आहे. यंदा चारधाम यात्रेमध्ये दरदिवशी केदारनाथ येथे ८००, बद्रीनाथ येथे १२००, गंगोत्री येथे ६०० व यमुनोत्री येथे ४०० भाविकांनाच जाता येणार आहे. न्यायालयाने बंदी उठविल्यामुळे आता लवकरच चारधाम यात्रा सुरू केली जाईल, असे उत्तराखंडचे पर्यटन मंत्री सतपाल महाराज यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी उत्तराखंड सरकारने पुरेशी पूर्वतयारी केली नसल्याचे मत व्यक्त करीत उत्तराखंड उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. चामोली, रुद्रप्रयाग, उत्तरकाशी जिल्ह्यातील रहिवाशांसाठी १ जुलैपासून चारधाम यात्रा सुरू करण्याच्या उत्तराखंड सरकारच्या निर्णयाला…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । अफगाणिस्तानवर तालिबाने कब्जा केल्यानंतर बिघडलेल्या परिस्थितीदरम्यान भारतातील सर्व गुप्तचर संस्था आणि सर्व राज्यांच्या दहशतवादविरोधी पथकाच्या (ATS) प्रमुखांची आंतर-समन्वय बैठक शुक्रवारी राजधानी दिल्लीत बोलावण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी 10 वाजता बैठक सुरू होईल. एटीएस प्रमुख, एसओजी आणि 11 राज्यांच्या गुप्तचर संस्थांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीचे उद्दिष्ट एटीएससोबत गुप्तचर संस्थांचे अधिक चांगले समन्वय आणि येत्या काळात लवकरात लवकर गुप्तचर माहिती शेअर करणे असेल, असे सांगण्यात येते. एटीएस व्यतिरिक्त रॉ, आयबी, एनआयएचे अधिकारी आणि फील्ड ऑपरेशनशी संबंधित अधिकारी या बैठकीत सहभागी होतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीवर या बैठकीत चर्चा…
मुंबई, वृत्तसंस्था । मुंबईत पहाटेच्या सुमारास बांधकाम सुरू असलेल्या एका पुलाचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत १३ जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या सर्व जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. पहाटे ४.३० च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालं. अद्याप या दुर्घटनेत कुणीही मृत्यूमुखी पडलेलं नाही. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये बीकेसी मेन रोड आणि सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड यांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाचं बांधकाम सुरू आहे. पहाटे अचानक त्याचा काही भाग कोसळल्यामुळे काही मजूर जखमी झाले आहेत. Mumbai: A portion of under-construction flyover connecting BKC main…
जळगाव प्रतिनिधी | अभियंता दिनाचे औचित्य साधून आज सार्वजनीक बांधकाम खात्याच्या जळगाव विभागात सर मोक्षगुंडम विश्वसरैया यांना अभिवादन करण्यात आले. सर मोक्षगुंडम विश्वसरैया यांच्या जयंतीला अर्थात १५ सप्टेंबर रोजी दरवर्षी अभियंता दिन साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधून आज सार्वजनीक बांधकाम जळगाव विभागात अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी उपस्थिती मान्यवरांच्या हस्ते श्री. विश्वसरैया यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. याप्रसंगी कार्यकारी अभियंता जी.एच. राजपूत, उप कार्यकारी अभियंता एस. बी. पाटील, सहायक अभियंता श्रेणी- अ सुभाष राऊत, शाख अभियंता जितेंद्र महाजन, अभिषेक सूर्यवंशी, भूषण घुगे, भूपेंद्र रायसिंगे, राजहंस मॅडम, योगेश अहिरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. …
पैठण : पैठण तालुक्यातील शेतशिवारात पंचवीस वर्षाच्या तरुणाची हत्या झाल्याची घटना 11 सप्टेबर रोजी घडली होती. त्या हत्येचा उलगडा झाला असून पोलिसांनी दोघा आरोपींना शिताफीने ताब्यात घेत अटक केली आहे. दोघा आरोपींनी हत्येची कबुली दिली असून या खूनाचा उलगडा झाला आहे. ढोरकीन शिवारातील किरण पेरकर यांच्या शेतात मयत संदीप सूर्यभान साळवे (25), आंबेडकरनगर, गारखेडा परिसर, औरंगाबाद हा तरुण गेल्या चार महिन्यांपासून शेतमजूर म्हणून कामाला होता. तो शेतात काम करत असतांना रात्रीच्या वेळी अकरा वाजेच्या सुमारास आरोपी संजय मचांराम चव्हाण व मुकेश ऊर्फ बाळू मंचाराम चव्हाण हे दोघे भाऊ (टाकळी, पैठण शिवार) कोंबड्या व बक-या चोरण्यासाठी त्या शेतात आले. …
यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथील नेहरू विद्यालयाच्या शिक्षिका रझिया इतबार तडवी यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जळगाव येथे श्री स्वामी समर्थ ग्रुप व मौलाना आझाद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत पुरस्कार वितरण सोहळ्यात रझीया इतबार तडवी यांना २०२१ चे आदर्श सन्मानपत्र प्रदान करण्यात येवुन त्यांचा गौरव करण्यात आला. श्री स्वामी समर्थ गृप व मौलाना आझाद फाऊंडेशन जळगाव यांच्या वतीने रविवार दि.१२ रोजी रतनलाल सी.बाफना गो सेवा अनुसंधान केंन्द्र(गो शाळा)कुसुंबा,जळगाव येथे जिल्हा परिषदच्या अध्यक्ष ना. रंजनाताई प्रल्हाद पाटील, डॉ. पुनम पाटील , जिल्हा कृषी अधिकारी मुक्ता कोकाटे , जिल्हा क्रिडा अधिकारी रेखा देविदास पाटील , आयोजक…
चाळीसगाव प्रतिनिधी । विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या दाखल्याबरोबर पुरावा जोडूनही दाखला मिळण्यास विलंब होत असल्याने सदर दाखला तातडीने दिला जावा अशी मागणी अध्यक्ष दिनकर राठोड यांनी उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांना निवेदनाद्वारे केली आहे. स्वातंत्र्योत्तर काळानंतर विजाभजा व बंजारा जमातीचे दाखला काढण्यासाठी सन: १९६१ चा पुरावा जोडण्यात येत आहेत. मात्र सदर दाखला काढण्यासाठी त्याबरोबर सन: १९६१ चा पुरावा जोडूनही वेळेवर न मिळत असल्याने विद्यार्थ्यांसह अनेकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. हि गंभीर स्वरूपाची बाब लक्षात येताच विजाभजा आघाडीचे तालुकाध्यक्ष दिनकर राठोड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. सदर निवेदनात देशाला…
जळगाव प्रतिनिधी । कोविडमुळे दोन्ही पालक गमावल्याने अनाथ झालेल्या जिल्ह्यातील बालकांना तसेच एकल/विधवा महिलांना शासनाच्या मिशन वात्सल्य योजनेतंर्गतचे लाभ तातडीने देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दिले. कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांची काळजी व संरक्षणासाठी गठीत कृती दलाची बैठक आज जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस बॅकेचे जिल्हा समन्वयक अरुण प्रकाश, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त य. कों. बेंडकुळे, महिला व आर्थिक विकास महामंडळाचे उल्हास पाटील, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष वैजयंती तळेले, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक श्री. ठाकूर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग…