जळगाव प्रतिनिधी । शहरातील गणपती विसर्जनाच्या दिवशी एका मंडळाकडे ६ फुटाची गणेश मूर्ती आढळल्याने मंडळांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. शहरातील मेहरूण तलावावर रविवार १९ सप्टेंबर रोजी जळगाव शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणेशाच्या विसर्जनाची प्रशासनातर्फे व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी अधिकार्यांसह कर्मचारी असा पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. विसर्जन सुरू असतांना मेहरूण तलावावर रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनीतील जय समाधा गणेश मित्रमंडळाची गणेशमूर्ती विसर्जनासाठी आली. यावेळी बंदोबस्तावरील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना मंडळाची गणेशमूर्ती ही सहा फूट उंचीची असल्याचे लक्षात आले. शासनाने केवळ चार फूटापर्यंतच्या गणेश मूर्तींची स्थापना करण्यास यंदा परवानगी दिली होती. त्यानुसार शासन…
Author: saimat team
यावल, प्रतिनिधी । उद्या बुधवार दि.22रोजी यावल नगरपरिषदेची स्थायी समितीची सभा दुपारी12;30वाजता यावल नगरपरिषद अध्यक्षा तथा स्थायी समितीच्या सभापती सौ.नोशाद तडवी यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. सभेत निलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर संगनमताने निर्णय होणार असल्याने याकडे संपूर्ण यावल शहराचे लक्ष वेधून आहे. स्थायी समितीचा अंजेठा प्रत्यक्ष बघितला असता एकूण14 महत्वाच्या विषयावर सभेत चर्चा होणार आहे विषय क्र.3बघितला असता महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम1965चे कलम79(6) पोट कलाम एक अन्वये शेख सईद शेख अहमद निलंबित कनिष्ठ अभियंता यांचे अपील अर्जावर विचार विनिमय करणे बाबतचा विषय घेण्यात आला आहे. गेल्या महिन्यापूर्वी यावल नगरपालिका मुख्याधिकारी बबन…
जळगाव प्रतिनिधी । श्री गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर एका दाम्पत्याने बंदोबस्तावरील पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना १९ रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात त्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहरूण तलाव परिसरात जळगाव पाचोरा रस्त्यावर गणपती विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर रस्ता बंद करून बॅरिकेड्स लावण्यात आले होते. या ठिकाणाहून जाण्यास मज्जाव केला असता दाम्पत्याने बंदोबस्तावरील पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी वाघनगर येथील दाम्पत्याविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गणपती विसर्जनाच्या पाश्र्वभूमीवर रविवारी जळगाव पाचोरा रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात आली होती. लेक रेसिडेन्सीजवळ विसर्जनासाठी जाणार्या नागरिकांनाही प्रवेश नाकारण्यात येऊन या ठिकाणी बॅरिकेट्स उभे करून रस्ता बंद करण्यात आला…
रशिया, वृत्तसंस्था । रशियातील पर्म स्टेट विद्यापीठात एका अज्ञात बंदूकधाऱ्याने हल्ला केल्याचं वृत्त आहे. या हल्ल्यात 8 जण ठार तर 14 जण जखमी झाले आहेत. हा हल्ला झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी इमारतीच्या खिडक्यांमधून उड्या मारल्या. पर्म स्टेट विद्यापीठ हे रशियातील प्रसिद्ध विद्यापीठ आहे. सोमवारी एका बंदूकधाऱ्याने या विद्यापीठावर हल्ला केला. हल्लेखोराने विद्यार्थ्यांच्या दिशेने गोळीबार करायला सुरुवात केली. या हल्ल्याची माहिती मिळताच काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या इमारतीतून उड्या मारल्या. या हल्ल्यात आठ जण ठार तर 14 जण जखमी झाले आहेत. सुदैवाने विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोरावर गोळ्या झाडून त्याला ठार केलं. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.
जळगाव, प्रतिनिधी । सेवा समर्पण अभिमान अंतर्गत मा.पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी यांच्या जीवन चित्रावर आधारित प्रदर्शनांचे उदघाटन आ सुरेश भोळे (राजु मामा) यांच्या हस्ते व महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता भाजपा कार्यालय वसंतस्मृति येथे करण्यात आले.या प्रदर्शनात मा.नरेंद्रजी मोदीजी यांच्या जीवनावर आधरित बालपण,संघ राजकीय कार्यकर्ता ते पंतप्रधान पर्यंतच्या जीवन चरित्राचे प्रदर्शन लावण्यात आलेले आहे. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.ना. रंजनाताई पाटील,मनपा सभापती राजेंद्र घुगे पाटील,गटनेता भगत बालाणी, प्रदेश महिला उपाध्यक्षा उज्वला बेंडाळे, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, नितीन इंगळे राजू सोनवणे, तालुका अध्यक्ष गोपाळ भंगाळे, अरुण सपकाळे, मिलींद चौधरी, नगरसेवक राजू मराठे,…
जळगाव, प्रतिनिधी । देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त सेवा समर्पण अभियाना अंतर्गत भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर तर्फे राबविण्यात आले. काल मेहरुन तलाव गणेश घाट येथे श्री गणपती बाप्पा यांच्या विसर्जनानंतर निर्माल्य व प्लास्टिक ची झालेली घाण व अस्वच्छता, आज सोमवार दि २० सप्टेंबर रोजी सकाळी ७:०० वाजत, मेहरुन तलाव गणेश घाट येथे साफसफाई करत स्वच्छता अभियान राबविण्यात आला स्वच्छता अभियान भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष तथा शहराचे आमदार श्री सुरेश दामु भोळे(राजू मामा) व जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष श्री दीपक सूर्यवंशी प्रमुख उपस्थितत संपन्न झाले. तरी यावेळी स्वच्छता अभियान प्रमुख तथा स्थायी समिती…
जामनेर, प्रतिनिधी । येथील राजमाता जिजाऊ चौकात आ.गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली तसेच भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा समर्पण अभियान अंतर्गत नवभारत महोत्सवाच्या माध्यमातून ‘नमो रथा’चे उद्घाटन आ.गिरीश महाजन यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, लोक कल्याणकारी राज्य आणण्याकरीता लोककल्याणकारी योजना या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनहित संकल्पनेतून यशस्वी होताना दिसत आहे. म्हणून नमो रथाच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत हा रथ पोहोचून सामान्य जनतेला योजनांची माहितीही मिळणार आहे. यावेळी रावेर लोकसभा मतदार संघाच्या खा.श्रीमती रक्षाताई खडसे नमो रथाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होत्या. यावेळी संतोष सराफ यांनी गायलेल्या पोवाड्याच्या माध्यमातून पंतप्रधानांच्या…
मलकापूर, प्रतिनिधी । गणपती विसर्जन करण्यासाठी नदीवर गेलेल्या 18 वर्षीय युवकाचा पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मलकापूर येथून जवळ असलेल्या निंबादेवी येथे घडली. याबाबत माहिती अशी की, अक्षय संदीप वानखेडे (रा. शिरसोळी ता.नांदुरा) या युवकाचा पाय घसरून नदीत पडल्याने पाण्यात बुडाल्याची घटना नांदुरा तालुक्यातील निंबोळा या गावाजवळ घडली असून रात्री उशिरापर्यंत युवकाचे शव मिळून आला नव्हता. निंबोळा देवी संस्थांंच्या मागे विश्वगंगा नदी पात्रात गणपती विसर्जनासाठी दुपारपासून गणपती विसर्जनाचे कार्य सुरू होते. यामध्ये अक्षय वानखेडे हा युवक विसर्जन पाहण्यासाठी गेलेला असताना ही घटना घडली.
जळगाव प्रतिनिधी । २२ वर्षीय विवाहितेचा दांडिया खेळत असतांना धक्का लागल्याच्या कारणावरून शिवीगाळ व मारहाण करून विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील २२ वर्षीय विवाहिता आपल्या कुटुंबीयांसह राहते. 17 सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शहरातील रामनगर येथील रहिवासी दया खामकर, बाजीराव खामकर, खंडू देसले, वंदना खामकर, सोनी बाजीराव खामकर, त्रिशा, वैशाली (पूर्ण नाव माहीत नाही) यांनी विवाहिता दांडिया खेळत असताना धक्का लागल्याने वरील आठ जणांनी शिवीगाळ करून मारहाण करत विनयभंग केला. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून आठ जणांवर एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ फारूक…
मलकापूर, प्रतिनिधी । शहरातील दोन इसमांनी एकाच दिवशी आत्महत्या केली. यात जुन्या गावातील मंगलगेट जवळील 29 वर्षीय या इसमाने स्वतःच्या घरात साडीने गळफास घेतला तर व वृंदावन नगरातील 38 वर्षीय याने शेतात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडल्या. याबाबत मलकापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती अशी की, जुन्या गावातील मंगलगेट येथे राहणारे किशोर वसंता वानखेडे (वय 29 वर्षे) याने राहत्या घरातील मागच्या खोलीत टिनाच्या पाईपला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. तर दुसऱ्या घटनेत वृंदावन नगर येथील रोशन मुरलीधर टावरी (वय 38) याने वृंदावन नगरच्या मागे असलेल्या शेतामध्ये आंब्याच्या झाडाखाली विषारी औषध…