चाळीसगाव, प्रतिनिधी । मांगवली आदिवासी वाडी (ता.माणगाव जि.रायगड) व पाटखडकी (ता.चाळीसगाव) येथे अतिवृष्टीमुळे पूरपरीस्थिती निर्माण झाली होती. पुराचे पाणी घरांमध्ये शिरल्याने अनेक कुटुंबांचे नुकसान झाले होते. अशा पूरग्रस्त कुटूंबांना अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज युवा आघाडीतर्फे किराणा किट, ब्लँकेट, चटई, साडी, ड्रेस व संसारोपयोगी साहित्य युवा आघाडीचे अध्यक्ष प्रमोद शिंपी, सचिव गणेश निकुंभ व कार्यालयप्रमुख रुपेश पवार यांच्याहस्ते वाटप करण्यात आले. या उपक्रमाकरीता युवा आघाडीने शिंपी समाजाला आवाहन करुन महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांमधून पूरग्रस्त निधी जमा केला होता. विशेषकरुन औरंगाबाद, अहमदनगर व जळगाव या जिल्ह्यांतून पूरग्रस्तांसाठी भरघोस निधी मिळाला. पूरग्रस्तांना मदत देण्याकरीता समाजातील मान्यवर, समाज पदाधिकारी…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । आज दि.१९ रविवार रोजी अनंत चतुर्दशी दिनी जळगाव शहरातील श्री.गणेशाचे विसर्जन ११ व्या दिवशी मेहरूण तलावात संपन्न झाले, या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय युवा परिषद व नीर फाऊंडेशन यांच्यावतीने मेहरूण तलाव परिसरात विसर्जन स्थळी निर्माल्य संकलन करत नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयक जनजागृती करण्यात आली. मेहरूण तलावावर घरगुती व गणेश मंडळाच्या मुर्तींचे विसर्जन करण्यासाठी आलेल्या भक्तांकडून ३ तासाच्या कालावधीत तब्बल ४ ट्रॉली निर्माल्य संकलन करुन मनपाच्या निर्माल्य संकलन पथकाकडे सोपविण्यात आले. ‘सदर उपक्रम भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेचे राज्य अध्यक्ष श्री.प्रशांत गूरव सर यांच्या संकल्पनेतून तथा राज्य उपाध्यक्ष ॲड.राहूल वाकलकर सर यांच्या मार्गदर्शनातून संपन्न झाला’. निर्माल्य संकलनासाठी भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष…
जळगाव, प्रतिनिधी । शहरातील काव्यरत्नावली चौक येथे जैन फाउंडेशन व युवाशक्तीच्यावतीने २२२३ श्री गणपती मूर्तीचे व ३ ट्रॅक्टर भरून निर्माल्याचे संकलन करण्यात आले आहे. शहरातील काव्यरत्नावली चौक येथे २२२३ घरगुती व सार्वजनिक श्रीगणेश मुर्तींचे संकलन करण्यात आले. यासह ३ ट्रॅक्टर निर्माल्य संकलित करण्यात आले. सकाळी ७. १० वाजता पहिली मुर्ती संकलीत करण्यात आली व सायंकाळी ९.५५ मि. शेवटची मुर्ती संकलीत झाली. दिवसभरात २२२३ कुटुंबांनी या केंद्रावर भेट देऊन श्री. गणेश मुर्ती केंन्द्राला अर्पण करून या उपक्रमात सहभाग नोंदविला. महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी देखील या ठिकाणी आपल्या घरगुती मुर्तीला अर्पण केले. जळगाव शहरातील विविध केंद्राला महापौर जयश्री महाजन,…
पंजाब, वृत्तसंस्था । चरणजित सिंग चन्नी यांनी घेतली पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना शपथ दिली. राजभवनात हा शपथग्रहण सोहळा सुरू आहे. चन्नी यांच्या व्यतिरिक्त पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी काँग्रेस नेते सुखजिंदर सिंग रंधावा यांना मंत्री पदाची शपथ दिली आहे. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित आहेत. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी चन्नी यांना शपथ घेतल्यानंतर भेटून शुभेच्छा दिल्या आहेत. शनिवारी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर चरणजित सिंग चन्नी यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा करण्यात आली. रविवारी दिवसभर चाललेल्या बैठकीनंतर चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावावर काँग्रेस हायकमांडकडून शिक्कामोर्तब…
जळगाव, प्रतिनिधी । टायगर ग्रुप महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर जाधव, व टायगर ग्रुप महाराष्ट्राचे अध्यक्ष तानाजी जाधव ,उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष सागर कांबळे ,व टायगर ग्रुप खान्देश चे अध्यक्ष ऋषिकेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुप जळगाव जिल्ह्याकडून गणेश मुर्त्या व निर्माल्य संकलन केंद्र करण्यात आले. टायगर ग्रुप जळगाव जिल्हा कडून सिंधी कॉलनी भागात टायगर ग्रुप कडून उभारण्यात आलेल्या संकलन केंद्रावर जवळपास 600 गणेश मूर्त्या संकलन करण्यात आले. सध्या संपूर्ण जग हे covid-19 सारख्या जागतिक महामार्ग च्या संकटाला समजत सामोरे जात आहे गणेश उत्सवामध्ये गणेश विसर्जन नोकरीसाठी विसर्जनस्थळी करती होऊ नये याकरिता टायगर ग्रुप जळगाव जिल्हा तर्फे व महानगरपालिका तर्फे सिंधी कॉलनी…
पाचोरा, प्रतिनिधी । शहरात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून अधून मधून दूषित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडल्याचे चित्र दिसत आहे, शहरातील हॉस्पिटलमध्ये आजारी कुटुंबीयांची संख्या दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. लहान मुलांसाठी हे वातावरणात खूप धोक्यात असल्याचे वृत्ताने नागरिकांन मध्ये आरोग्यची बाबत भीती निर्माण झाली आहे. पाचोरा नगरपालिका मुख्याधिकारी सो शोभा बाविस्कर यांच्या कडे पदभार असल्याने प्रशासन हे पूर्णत कोलमडून पडल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. पालिकेत गेल्या दहा वर्षांपासून *शिवसेना सतेत आहे. प्रमुख लोकप्रतिनिधींच्या विरोधात शहरवासीयांनी शिवसेनेकडे आत्मविश्वासाने सत्ता सोपवली आहे. कारण शहरांतील नागरिकांना अपेक्षा असणाऱ्या मूलभूत सुविधा तरी योग्य मिळाव्यात असा आत्मविश्वास जनतेला आहे . शहरात विविध विकास…
यावल प्रतिनिधी । येथील पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढीदिवसानिमित्त माजी मंत्री गिरीश महाजन व आ. राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत समाजसेवक हेमराज फेगडे यांची भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील धनश्री चित्र मंदीरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बुथ कार्यकर्ता मेळाव्यात माजी मंत्री गिरीष महाजन, आमदार राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. याप्रसंगी खासदार रक्षाताई खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्याभरातून अभिनंदन करण्यात येत आहे. याप्रसंगी माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन खासदार रक्षाताई खडसे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे, आमदार संजय सावकारे, जिल्हा परिषद अध्यक्ष रंजनाताई पाटील, जिल्हा परिषदचे…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । सोन्याचे भाव दररोज कमी जास्त होताना दिसतात. यामागे वेगवेगळी कारणं असतात. गेल्या वर्षीपासून सुरु असलेल्या कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे सोनाच्या आणि चांदीच्या भावामध्ये उच्चांक आणि नीचांक दोन्ही बघायला मिळाले. २२ ग्रॅम कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत आज कालच्या एवढीच आहे. आजची किंमत ४५,३९० रुपये झाली. मागील ट्रेडमध्ये, मौल्यवान धातूची किंमत ४५,३९० रुपये प्रति १० ग्रॅमवरच बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ५९,३०० रुपये प्रति किलोने विकली जाईल. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे संपूर्ण भारतात सोन्याच्या दागिने किंमतीमध्ये बदल दिसून येतो. सोन्याचा काय आहे आजचा दर? २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर ४६,३९० रुपये प्रति…
जयपूर, वृत्तसंस्था । राजस्थानच्या जयपूरमध्ये एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. ऑनलाईन क्लास दरम्यान एका मुलीच्या वडिलांनी चुकून शाळेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अश्लील व्हिडिओ अपलोड केले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आरोपी वडिलांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपीला पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. जयपूरमध्ये वडिलांनी कथितरित्या आपल्या मुलीच्या शाळेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चुकून 10 अश्लील व्हिडिओ पोस्ट केले. ऑनलाइन क्लास दरम्यान ग्रुपमध्ये आलेले हे अश्लील व्हिडिओ पाहून सर्वांनाच धक्का बसला. मुलांच्या पालकांसह शाळा प्रशासनही आश्चर्यचकित झाले. त्यानंतर शाळा प्रशासनानेच याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली. जयपूरच्या मुहाना परिसरातील कल्याणपूरच्या शासकीय शाळेत ऑनलाइन क्लासदरम्यान, शाळेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधील मुलांच्या मोबाईलवर 10 अश्लील व्हिडिओ एकामागून…
जळगाव, प्रतिनिधी । भुसावळ , बोदवड व मुक्ताईनगर तालुक्यांच्या विविध गावांमधील असंख्य तरुण अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघात प्रवेश करण्यास ईच्छुक आहेत त्यापार्श्वभुमीवर पदविस्तार व नियोजन करण्यासाठी आढावा बैठक नागेश्वर मंदिर वरणगाव येथे घेण्यात आली . कार्यक्रमाच्या प्रारंभी सप्तश्रृंगी माता , लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल व बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला वंदन करून व प्रदेशाध्यक्ष मा.श्री. प्रदिप (बंडू ) भोळे व जिल्हा कार्याध्यक्ष श्री. अमोल कोल्हे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला . उपस्थित युवकांच्या वतीने प्रदेशाध्यक्ष श्री. प्रदिप ( बंडू ) भोळे , जिल्हा कार्याध्यक्ष श्री. अमोल कोल्हे , प्रदेश सदस्य श्री. निखिल रडे , जिल्हा सदस्य श्री. अविनाश…