Author: saimat team

मलकापूर प्रतिनिधी सतीश दांडगे मोबाईल फोन मधील फोटो आणि इतर सामग्री नेस्तनाबूत करण्यामागचा पोलिसांचा हेतू काय! दैनिक देशोन्नती चे पत्रकार समाधान भाऊ गाडेकर आपले कर्तव्य बजावत असताना पोलिसांनी त्यांना फोटो काढण्यापासून मज्जाव करीत लोटपोट करून मारहाण केली या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने उपरोक्त पोलिसांवर कारवाई करून त्यांना नोकरीवरून बडतर्फ करण्यात यावे या मागणीच्या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी बुलढाणा यांना देण्यात आले.  सविस्तर असे की,१४ सप्टेंबर च्या सकाळी अकरा वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा व स्थानिक चिखली पोलीसांनी चिखली खामगाव रोडवरील हाॅटेल अमृतत्युल्य जवळ एका ट्रकमधून प्रवासी वाहतुक करीत असलेल्या लोकांकडुन जवळपास ८८ कीलो गांजा पकडल्याची माहिती मिळताच…

Read More

 जामनेर प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील पहूर येथे संभाजी नगर जळगाव महामार्गावर लाबेला  हॉटेल जवळ आज मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास लघुशंकेला थांबलेला आयशर मधील चालक-वाहक थांबलेले असताना  पाठीमागून आयशर ट्रक ने भरधाववेगाने येऊन जोरदार धडक देऊन यात एक जण ठार तर दोन जण जखमी झाले आहे सविस्तर माहिती अशी की आज मध्यरात्री तीन वाजेच्या जळगाव संभाजीनगर महामार्गावर येथील लाबेला हॉटेल जवळ संभाजीनगर हुन जळगाव कडे जाणाऱ्या आयशर ट्रक क्रमांक mh19z3346 चालक विलनर लघुशंकेसाठी थांबले असताना भरधाव वेगाने पाठीमागून येणाऱ्या आयशर ट्रक क्रमांक,mp04gb7763 या अशा ट्रकने उभ्या असलेल्या आशयरट्रकला जोरदार धडक दिल्याने लघुशंकेसाठी थांबलेला विलन्नर राजीक जहुर शेख,, वय 40 हा जागीच ठार…

Read More

जामनेर (प्रतिनिधि) – जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचा 2003 ते 2008 साठी संचालक मंडळ  चेंज रिपोर्ट करीता सन 2004 मध्ये दिवंगत आबाजी नाना पाटील यांनी केलेला अर्ज क्रमांक 614/2004 धर्मदाय आयुक्त जळगाव यांनी फेटाळून दिला आहे. तसा आदेश 21/09/2021 रोजी पारित केलेला आहे . याबाबत सविस्तर वृत्त असे की जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी मधे संचालक मंडळ अधिकृत कोण याबाबत बऱ्याच वर्षा पासून वाद असून 1999 पासून संस्थेचे चेंज रिपोर्ट प्रलंबित असल्याने संस्थेचे खरे हक्कदार कोण हे प्रश्न चिन्ह कायम आहे. प्रशासकीय लढाई सुरु असताना 1999 ते 2003 या काळात दिवंगतआबाजी नाना पाटील व नारायण चौधरी यांनी अध्यक्ष व सचिव म्हणुन काम…

Read More

धरणगांव प्रतिनिधी – येथे दि. २२ सप्टेंबर, २०२१ बुधवारी वसंतराव भोलाणे यांचा ६४ वा जन्मदिनाचे औचित्य साधून महाआरोग्य शिबिराचे आयोजन पी आर हायस्कूल येथे करण्यात आलेले होते. सविस्तर वृत्त असे की, शिबीराचे उद्घाटन बापूसाहेबांचे आई- वडील सौ. व श्री. वैजंताबाई – शिवदास गरबड भोलाणे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यानंतर विचार मंचावर अभिष्टचिंतन समारोह कार्यक्रम साजरा करण्यात आला. याप्रसंगी जागृत जनमंचचे शिवराम पाटील व तेली समाजाचे के डी चौधरी यांनी सत्कारमूर्ती ऍड. व्ही एस भोलाणे यांच्याविषयी गौरवोद्गार केले. तसेच, भाजपचे नेते सुभाष पाटील, जिल्हा उपाध्यक्ष पी.सी. पाटील, कन्हैया रायपुरकर, शिवदास भोलाणे, अरविंद देवरे, पी.डी.पाटील सर, लक्ष्मण पाटील सर, जितेंद्र…

Read More

जळगाव प्रतिनिधी :- स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करणाऱ्या कोरोना योद्धयांना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या मागण्यासाठी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्या वतीने आज दिनांक २४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनात यापुढे लोकप्रतिनिधींच्या  घरासमोर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.         कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची सेवा करण्यासाठी जीवाच्या भीतीपोटी कोणीही पुढे येत नसताना कंत्राटी स्वरूपात काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, आया, डाटा एंट्री ऑपरेटर, सुरक्षारक्षक, सफाई कामगार यांच्या समर्पित त्यामुळे नागरिकांचा जीव वाचला आहे.या कोरोना योद्धयांना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाने राष्ट्रव्यापी आंदोलन पुकारले आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणांच्या निनादात ठिय्या आंदोलन…

Read More

धानोरा ता.चोपडा (वार्ताहर )  :— निखिल अनिल बडगुजर याने कोकण ज्ञानपीठ काॅलेज ऑफ इंजिनिअरींग कर्जत येथे बी.ई.मॅकेनिकल ची पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन त्याने पुढील उच्च  शिक्षणासाठी  Nottingham Union University Englend ( UK ) नाॅटिंगहम युनियन विद्यापीठ इंग्लंड येथे रवाना झाला  .निखिल याने पुढील शिक्षणासाठी इंग्लंड येथे  Industrial Management  (इंडस्ट्रीअल मॅनेजमेंट) या विषयाची निवड केली आहे. चि.निखिल हा चिंचोली ता.यावल येथिल मधुकर दामु बडगुजर यांचा नातु तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत असलेले अनिल बडगुजर यांचा द्वितीय मुलगा आहे.अनिल बडगुजर यांचा मोठा मुलगा अभिषेक बडगुजर हा देखील चार वर्षे पुर्वी अमेरिकेत एम.एस चे उच्च शिक्षण घेवुन तिथे नोकरी करीत आहे.निखिल बडगुजर हा…

Read More

नाशिक: भारतातील अग्रगण्य निदान सेवा प्रदाता मेट्रोपॉलिस  हेल्थकेअर लि.ने त्यांचे नवीन चाचणी केंद्र महाराष्ट्रातील नाशिक मध्ये सुरू केले आहे. 750 स्क्वेअर फूट इतक्या जागेवर असलेल्या या प्रयोगशाळेत दरमहा सुमारे 30,000 नमुने चाचणी करण्याची क्षमता आहे. या मुळे उच्च-गुणवत्तेचे अहवाल किमान वेळेत प्राप्त करणे शक्य होणार आहे. केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.आवेश पल्लोड लाभले. मेट्रोपॉलिस  लॅबोरेटरी, नाशिक, मध्ये मूलभूत पॅथॉलॉजी चाचण्यांपासून ते मॉलिक्यूलर डायग्नोस्टिक या हाय-एंड निदान चाचण्यांपर्यंत सुमारे 80+ वेगवेगळ्या चाचण्या केल्या जाऊ शकतात. मेट्रोपॉलिस  हेल्थकेअर लिमिटेडची प्रयोगशाळा औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर आणि इतर ठिकाणी आहेत. मेट्रोपॉलिस  हेल्थकेअर लि.च्या नाशिकमधील डॉ. पटेल मेट्रोपॉलिस…

Read More

विविध पार्श्‍वभूमींमधील, तसेच जीवनाच्‍या विविध स्‍तरांमधील व्‍यक्‍तींसाठी या संधी खुल्‍या आहेत नाशिक: अॅमेझॉन इंडियाने आज सणासुदीच्‍या काळानिमित्त त्‍यांच्‍या कार्यसंचालन नेटवर्कमध्‍ये ११०,००० हून अधिक हंगामी रोजगार संधींची निर्मिती केल्‍याची घोषणा केली आहे. अर्थपूर्ण रोजगार निर्माण करण्‍याप्रती कटिबद्धता कायम राखत या संधींमध्‍ये भारतभरातील मुंबई, दिल्‍ली, पुणे, बेंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, लखनौ व चेन्‍नई या शहरांमधील प्रत्‍यक्ष व अप्रत्‍यक्ष रोजगारांचा समावेश आहे. या बहुतांश नवीन नियुक्‍तींना अॅमेझॉनच्‍या विद्यमान सहयोगी नेटवर्कमध्‍ये सामील करण्‍यात आले आहे आणि त्‍यांना सुरक्षितपणे व कार्यक्षमपणे ग्राहकांच्‍या ऑर्डर्स पिक-अप, पॅकिंग, शिपिंग व डिलिव्‍हर करण्‍यासाठी साह्य करण्‍यात येईल. नवीन नियुक्‍तींमध्‍ये कस्‍टमर सर्विस सहयोगींचा देखील समावेश आहे, ज्‍यापैकी काहीजण घरातून आरामात काम…

Read More

नाशिक-मूकबधीर (स्पीच-अँड-हीअरिंग-इम्पेअर्ड अर्थात एसएचआय) असणे हा तरुणांसाठी रोजगार मिळवण्यातील मोठा अडथळा ठरत आहे. यामागील प्रमुख कारण, कामाची ठिकाणे एसएचआय कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी, पूरक ठरण्यासाठी सुसज्ज नसतात, हे आहे. २२ वर्षीय हर्षल महाजनची हीच कथा आहे. कुटुंबाला हातभार लावणे आणि आपल्या धाकट्या भावाला शिक्षणाच्या पुरेशा संधी मिळवून देणे हे हर्षलचे सर्वांत मोठे स्वप्न आहे. मात्र मूकबधीर असल्यामुळे त्याला अनेक संधी नाकारल्या जात होत्या. नाशिकचा रहिवासी असलेल्या हर्षलला १२व्या इयत्तेत शिक्षण सोडावे लागले. त्याने अनेक ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न केला पण त्याला ऐकू येत नसल्यामुळे बहुतेक ठिकाणी त्याला कामावर ठेवून घेण्यास नकार दिला गेला. दादरच्या विशेष कौशल्य शाळेतील मार्गदर्शकांकडून हर्षलने अमेझॉन इंडियाबद्दल…

Read More

चाळीसगाव –  शुक्रवार  रोजी आरोग्य विभाग,महाराष्ट्र शासन,तसेच चाळीसगाव तालुक्याचे *माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे संचालक राजीवदादा देशमुख यांच्या संकल्प व मार्गदर्शनाखाली तसेच रिक्की हरेशकुमार सोनार ,यांच्या प्रयत्नांतून शहरातील प्रभाग क्र 11 मध्ये भव्य लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या शिबिरात नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला* याप्रसंगी उपस्तित असलेले मान्यवर माजी. आमदार राजीवदादा देशमुख माजी नगरध्यक्ष भोजराज पुन्शी माजी उपनगराध्यक्ष प्रदीप निकम नगरसेवक भगवान बापू राजपूत, दीपक पाटिल, सूर्यकांत ठाकुर, शेखर बजाज, रामचंद्र जाधव, योगेश रा पाटिल, महेंद्र रावलानी, राज पुन्शी, प्रवीण जाधव, लंकेश भाऊ शर्मा, रमेश मुरपानी , मोहित भोसले, शुभम पवार, गौरव पाटिल, पिनु सोनवणे, गुंजन मोटे, लवेश राजपूत, पंकज बिधे,…

Read More