जळगाव, प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज २४ रोजी म्हसावद येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा निमित्ताने भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या वतीने सेवा व समर्पण अभियानाच्या अंतर्गत दिनांक 24 सप्टेंबर रोजी म्हसावद येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा परिषद माजी समाज कल्याण सभापती प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत भाऊ महाजन ह भ प ज्ञानेश्वर महाराज जळकेकर अभियान संयोजक मनोहर पाटील भाजपा माजी तालुकाध्यक्ष कैलास…
Author: saimat team
जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा परिसरातील एका ९० वर्षीय वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २३ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शहरातील पिंप्राळा परिसरात राहणारे शिवराम शंकर सोनवणे (वय-९०) असे मयत वृध्दाचे नाव आहे. रामानंदनगर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, शिवराम सोनवणे हे महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी आहे. ते विधवा सुन व नातवंडे यांच्यासह राहतात. त्यांचा मुलगा दोन वर्षांपुर्वी दुर्धर आजाराने निधन झाले आहे. त्यांची सुनबाई माहेरी आईवडीलांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. काल गुरूवार २३ सप्टेंबर रोजी घरी कुणीही नसतांना त्यांनी बाथरूमच्या कडीकोयंडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे सायंकाळी ७ वाजता उघडकीला…
चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील हनुमानवाडी येथे घराच्या कंपाउंडमध्ये भरलेले गॅस अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मीकांत गोविंद कुलकर्णी (वय-६१) रा. हनुमानवाडी, चाळीसगाव हे वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्यास असून आयडीबीआय बॅंकेतून ते सेवानिवृत्त झाले आहेत. दरम्यान गुरुवार, २३ सप्टेंबर रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास घरात विद्युत पुरवठा खंडित असताना कुलकर्णी हे इन्व्हर्टरवर टेलीव्हीजन पहात होते. त्यावेळी अचानक स्वयंपाक गृहातील ग्रॅस सिलेंडर संपल्याने कुलकर्णी हे रात्री ९:४५ वाजता घराच्या कंपाऊंडमध्ये ठेवलेल्या एच.पी कंपनीच्या गॅस सिलेंडर घ्यायला गेले. मात्र एच.पी कंपनीच्या भरलेले ३ गॅस सिलिंडर मुळ ठिकाणी दिसून आले…
पुणे, वृत्तसंस्था । पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गावरील टोल रद्द करून रस्त्याच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ५० कोटींचा निधी देण्यात येईल. तसेच या रस्त्यावर होणारे अपघात व आवश्यक उपाययोजनांचा एक खाजगी संस्था अभ्यास करत असून, लवकरच अहवाल सादर करणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली. राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात तब्बल १३४ कोटी रुपयांची रस्ते, पुलांची कामे करण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. यावेळी गडकरी बोलत होते. कार्यक्रमाला विधान परिषदेच्या उपाध्यक्षा डाॅ.निलम गोऱ्हे, महापौर…
मुंबई, वृत्तसंस्था । कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा अखेर सुरू करण्याचा निर्णय़ राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे. त्यानुसार आता राज्यभरातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिलेली आहे. करोना नियमांचे पालन करून शाळा सुरू केल्या जात आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. तर, शाळा सुरू कधी होणार? याबाबतची प्रतीक्षा आता संपलेली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यंदाही ऑनलाइन पद्धतीनेच शैक्षणिक वर्ष सुरू करावे लागले. मात्र ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शाळा सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण काहीसे कमी होत असल्याने, सर्व नियमांचे पालन करून…
जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 8 ऑक्टोंबर, 2021 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) जारी करण्यात आले आहे. या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास संबंधित स्थानिक पोलीस स्टेशन यांच्या कार्यालयाची पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही. शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
मुंबई, वृत्तसंस्था । राज्यातील महाविकासआघाडी सरकारकडून महिला पोलिसांसाठी एक महत्वपूर्ण व दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे कामाचे तास कमी करण्यात आले असून, त्यांना आता १२ ऐवजी ८ तासांची ड्युटी असणार आहे. महाराष्ट्र सरकारने महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास १२ तासांवरून ८ तास करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्याचे डीजीपी संजय पांडे यांनी दिली आहे. Maharashtra govt has decided to reduce the working hours of women police personnel from 12 hours to 8 hours: Maharashtra DGP Sanjay Pandey (File pic) pic.twitter.com/boa7jUJVtY — ANI (@ANI) September 24, 2021 कुटुंब आणि नोकरी यामध्ये उत्तम असा ताळमेळ साधता…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । दिल्ली कोर्टात मोस्ट वॉण्टेड गँगस्टरची गोळ्या झाडून हत्या; पोलिसांकडून हल्लेखोरांचा एन्काऊंटर रोहिणी कोर्ट नंबर २ मध्ये जितेंद्रला हजर केलं असता वकिलांच्या वेषात आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळ्या झाडत हत्या केली दिल्लीतला मोस्ट वाण्टेड गँगस्टर जितेंद्र उर्फ गोगी याची रोहिणी कोर्टात गोळी झाडून हत्या करण्यात आली. रोहिणी कोर्ट नंबर २ मध्ये जितेंद्रला हजर केलं असता वकिलांच्या वेषात आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळ्या झाडत हत्या केली. जितेंद्रचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी शूटआऊट करत हल्ला करणाऱ्या दोघांना ठार केलं. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून हा एन्काऊंटर करण्यात आला. हल्ला करणारे विरोधी गटातील होते असं सांगितलं जात आहे. शूटआऊटमध्ये एकूण चौघे ठार…
यावल, प्रतिनिधी । यावल नगरपरिषद अंतर्गत नवीन वस्तीत केलेल्या पाईपलाईनचे काम करण्यात आलेले आहे या कामाच्या मंजुरी आदेशानुसार आपल्या स्तरावरून केलेल्या सदर कामाचे इस्टिमेट,एम.बी.रेकॉर्ड व ठेकेदाराला अदा केलेले बिल याचे प्रमाणित प्रती तसेच सदरच्या कामाबाबतचे संपूर्ण कागदपत्राची संचिका अवलोकनार्थ यावल तहसील कार्यालयात तात्काळ सादर करावे असे लेखी पत्र यावल तहसीलदार यांनी दि.14/9/ 2021रोजी यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांना दिले आहे. परंतु संबंधित माहिती अधिकारी बडे यांनी यावल तहसीलदार यांचे पत्रास कचराकुंडी दाखवित तहसीलदारांना माहिती देणे संदर्भात कर्तव्यात कसूर करून शिस्तभंग करीत असल्याने आणि इतर कारणांनी सुद्धा यावल नगरपरिषद राज्य जन माहिती अधिकारी बडे यांच्याविरुद्ध लवकरच लेखी तक्रार दाखल करण्यात येणार आहे.…
जळगाव, प्रतिनिधी । रितेश अशोक भाटिया यांचे आज दीर्घ आजाराने दुपारी 2.15 वा.दुःखद निधन झाले. मा अशापुरा सेवा केंद्राचे संचालक तसेच सरचिटणीस जळगाव जिल्हा पत्रकार संघ व गुजराथी समजाचे कार्यकर्ते, जीवनसाथी परिचय संमेलनाचे आधारस्तंभ, भाटिया सामजाचे कार्यकर्ते व आण्णासाहेब जमनदास भाटिया v सौ.ज्योती भाटिया यांचे लाडके पुतणे होते. सर्व समाजात त्यांच्या ओळखी व परिचय होता तसेच लाकडी गणपती मंदिर मोरया परिवारातील आधारस्तंभ होते.त्यांचा पश्यात पत्नी दोन मुली आई वडील दोन मोठे काका एक भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे .त्याची अंत यात्रा राहते घरून बळीराम पेठ येथून नेरी नाका वैकुंठ धाम येथे संध्याकली ६.०० वाजता निघेल .