जळगाव, प्रतिनिधी । सेवा समर्पण अभिमान अंतर्गत मा पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या १७ सप्टेंबर वाढदिवसा पासून तर २ ऑक्टोबर पर्यंत सेवा समर्पण अभियान भाजपतर्फे राबविण्यात येत असुन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये आरोग्य तपासणी शिबीर, गरीबजन कल्याणकारी, अंतर्गत अन्न वाटप, युवा मोर्चा तर्फे रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, केंद्र सरकारचे जन कल्याण कारी योजना ची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविने आदी अनेक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. मुख्य कार्यक्रम दिनांक २५ सप्टेंबर शनिवार रोजी सकाळी १० वाजता भा ज पा कार्यालय वसंत स्मृति येथे भारतीय जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यारपन जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) आ सुरेश भोळे…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । श्री क्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे आदिशक्ती मुक्ताईचे अंतर्धान स्थळ असुन वारकरी संप्रदायात आदिशक्ती मुक्ताईला मानाचे स्थान आहे.श्री क्षेत्र कोथळी येथे वर्षभर भाविक भक्तांचा राबता असतो. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नाने सदर तीर्थ स्थळाला “ब” दर्जा मिळाला असून एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नाने मुक्ताई अंतर्धान स्थळी असलेल्या मुक्ताई मंदिर जिर्णोद्धाराचे काम शासनाच्या ग्रामविकास विभाग कडुन तिर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत सुरू आहे. यात मुक्ताई मंदिराला प्राचीन हेमाडपंथी लुक देण्यात येत आहे. त्यासाठी सुमारे २५ कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी मिळाली असुन आतापर्यंत ९ कोटी ९७ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. मिळालेल्या निधीतून आतापर्यंत मंदिरातील गाभारा, सभामंडप, दुमजली दर्शनबारी, पहिला मजला मंदिराचे…
नाशिक, वृत्तसंस्था । आज सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने इंपिरिकल डाटा देण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणीसाठी आता चार आठवड्याची वेळ दिली आहे.ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नात हात वर करण्याचं काम केंद्राने केले आहे.केंद्राने इंपिरिकल डाटा दिल्यास सर्वच प्रश्न मार्गी लागू शकतात, मात्र केंद्राची नकारात्मक भूमिका ओबीसींना अडचणीत आणणारी असल्याचे मत राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. आज नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की २०११ ला आम्ही ओबीसींच्या जनगणनेची मागणी केली होती. त्यानुसार जनगणना झाली आणि त्याचा डाटा हा २०१६ ला तयार करण्यात आला. त्यावर सुधारणा करण्यासाठी अरविंद पनगाडीया…
नाशिक, प्रतिनिधी । कोरोनाच्या परिस्थितीवर पूर्णपणे मात करून सशक्त नाशिक जिल्हा करणे हे आपले पहिले उद्दिष्ट असणार आहे. यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांची भूमिका अतिशय महत्वाची असेल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. घोटी ग्रामीण रुग्णालय येथे ऑक्सिजन जनरेशन प्लांटच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार शिवराम झोले, जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, सरपंच अलका जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडखे, संदीप गुळवे, बाळासाहेब गाढवे, आरोग्य उपसंचालक पी.डी. गांडाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी कपिल आहेर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत…
मुंबई, वृत्तसंस्था । स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुका राखीव जागांवर लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी जात प्रमाणपत्रासह जातवैधता प्रमाणपत्र वेळीच प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधितांनी आतापासूनच वैयक्तिक स्तरावर पूर्तता करावी, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केले आहे. मदान यांनी सांगितले की, राज्यभरातील महानगरपालिका, नगरपरिषदा/ नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समिती व ग्रामपंचायती या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी काळात मोठ्याप्रमाणावर निवडणुका होणार आहेत. संबधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेगवेगळ्या कायद्यानुसार राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. त्यासाठी इच्छूक उमेदवारांनी प्रथमत: जात…
जळगाव, प्रतिनिधी । युवासेना कोअर कमिटी सदस्य व मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्या सौ.शीतल ताई देवरुखकर- शेठ दोन दिवसाच्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून शुक्रवार व शनिवारी जळगावात असणार आहे. युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर महाराष्ट्र स्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन युवासेना व शिवसेनेतर्फे रायसोनी महाविद्यालय, शिरसोली रोड जळगाव येथे करण्यात आले असून स्पर्धेचे उदघाटन व बक्षिक वितरण समारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेत जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे मुलं व मुलींचे १० संघ सहभागी होणार असून स्पर्धेला जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे सहकार्य लाभणार आहे. या वेळी पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, हर्षल माने, महिला जिल्हाप्रमुख…
जळगाव, प्रतिनिधी । शहरातील मेहरूण येथील बगिच्यामध्ये विहिरीजवळ एक ५५ – ६० वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस घटनस्थळी दाखल झाले आहे. सदर मृतदेह विहीरीत असल्याची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलिस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल गफ्फार तडवी, साईनाथ मुंडे, चंद्रकांत पाटील, नरसिंग पाडवी आदींनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरु केली. पोलीस मित्र समाधान नाईक व राहुल कोळी यांच्या मदतीने मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आला. सदरचा अनोळखी मयत इसम हा गेल्या तीन दिवसापूर्वी विहिरीत पडून मयत झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृतदेह सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले असून ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जळगाव, प्रतिनिधी । शहरातील कांचन नगरात थेट घरात घुसून गोळीबार करण्यात आला असून या घटनेत ५ ते ६ वेळा फायर झाले आहे. या घटनेतील संशयितांना यश आले नाही, या संशयितांमधील एक जण हा घटनास्थळीच जखमी होऊन बेशुध्द झाल्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आलेले आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास चालू आहे. गेल्या वर्षी 4 नोव्हेंबर २०२० रोजी रात्री शिवाजीनगरातील स्मशानभूमिजवळ माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश अशोक सपकाळे (वय २८) याचा एका टोळक्याने केलेल्या हल्ल्यात खून झाला होता. राकेश सपकाळे हा रात्री साडेअकराच्या सुमारास स्मशानभूमी परिसरातून येत असताना वाटेत दबा धरून बसलेल्या दोन अज्ञात तरुणांनी त्याला अडवले. या तरुणांनी सुरुवातीला त्याला लाथाबुक्क्यांनी…
जळगाव प्रतिनिधी | शहरातील गोळीबाराची घटना ताजी असतांना आज पुन्हा कांचन नगर येथील परिसरात गोळीबार झाल्याची वृत्त समोर आली आहे, याप्रकरणी पोलिसांनी घटनास्तळी धाव घेऊन पाहणी करून चौकशी सुरु आहे, या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. जळगाव शहरातील कांचननगर भागात सकाळी ८ वाजेच्या सुमारास गोळीबार झाल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. याला पूर्व वैमनस्याची किनार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सविस्तर बातमी थोड्याच वेळात
मुंबई, वृत्तसंस्था । UPI : यूपीआय पेमेंट करण्यासाठी एक सक्रिय इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे, कारण व्यवहार ऑनलाइन केला जातो. बऱ्याचदा असे दिसून येते की तुम्ही अशा ठिकाणी आहात जिथे इंटरनेट नसते किंवा ते संथ गतीने सुरु असते. अशा परिस्थितीत, UPI पेमेंट करणे कठीण होते. पण आमच्याकडे एक चांगली बातमी आहे जी तुमच्यापैकी अनेकांना कदाचित माहीत नसेल. तुम्ही इंटरनेटशिवाय UPI वापरू शकता. तुम्हाला फक्त तुमच्या फोनच्या डायलरवर *99# USSD कोड वापरावा लागेल. (UPI Payment Without Internet) ही *99# सेवा भारतात नॉन-स्मार्टफोन वापरकर्त्यांसह सर्व मोबाईल फोन वापरकर्त्यांसाठी सुरू करण्यात आली. स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी, हे *99# एक आपात्कालीन सुविधा आहे. जे त्यांच्याकडे इंटरनेट नसल्यास…