पाचोरा प्रतिनिधी । पाचोऱ्यातील हिवरा नदीमध्ये ४० वर्षीय तरुण वाहून गेल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी प्रशासनाची शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. पाचोरा शहरातील कृष्णापूरी भागात राहणारा तरूण देवेंद्र धनराज शिंपी (वय – ४०) हा आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पाचोरा शहरातून कृष्णापुरीकडे जाण्याच्या प्रयत्नात असतांना पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेल्याची घटना घडली आहे. दि. २१ रोजी रात्री वरील भागात जास्त पाऊस झाल्याने नदीला पूर आला आहे. त्यामुळे नदी पार करून जाणे अडचणीचे असतांना देवेंद्र शिंपी हे रात्री शहरातच नातेवाईकांकडे मुक्कामी थांबले होते. मात्र सकाळी घरी परत येत असतांना ही घटना घडली असल्याचे प्रथमदर्शनींनी सांगितले. देवेंद्र…
Author: saimat team
मुंबई, वृत्तसंस्था । राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभा सदस्य जागेवर आज कौंग्रेसच्या उमेदवार रजनी पाटील यांनी मुंबई स्थित विधानभवनात विधाभवन सचिव राजेंद्र भागवत यांच्या समोर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला . त्यांनी यावेळी सांगितले की ,पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला राज्यसभेवर उम्मेदवारी दिली. त्या बद्दल मी पक्ष अध्यक्षा सोनिया गांधी , नेते राहुल गांधी तसेच पक्षाचे सर्व नेत्यांचे आभार मानतो . त्यांनी दाखवलेल्या विश्वस मी सार्थक करेल . यावेळी त्यांच्या बरोबर काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात , काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पाटोळे , शिवसेना नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार , यांच्या सह…
मुंबई, वृत्तसंस्था । नाशिक व रत्नागिरी जिल्ह्यातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आज टिळक भवन येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने नाशिक व रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटना बळकट होईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. टिळक भवन येथे, आमदार हिरामन खोसकर यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातील विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यात जिल्हा परिषदेचे माजी सभापती भाजपाचे संपतराव काळे, सरपंच बाळू वाजे, रतन बांबळे, राजाराम भोसले, ज्ञानेश्वर भोसले, दत्तू वाजे, सदाशिव काळे, विनायक काळे, पांडुरंग शिंदे, भाजपा युवा मोर्चाचे निलेश कडू, तुकाराम सहाणे, मधूकर सहाणे, त्र्यंबक…
मुंबई, वृत्तसंस्था । नाशिक – मुंबई राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दुर्दशा झाली आहे या मार्गावरील रस्ते निकृष्ठ असल्यामुळे जनतेला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यांच्या सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी तात्काळ रस्त्यांची काम पूर्ण करावेत टोल नाका परिसरातील रस्त्यांची कामे विहित वेळेत पूर्ण केले नाही तर संबधित यंत्रणेवर कारवाई करण्याचे निर्देश अन्न,नागरी पुरवठा,ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. मंत्री छगन भुजबळ यांच्या मंत्रालयातील दालनात राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ वडपे ते गोंदे आणि वडपे ते मुलुंड टोलप्लाझा या रस्त्याची दुरावस्था,वाहतुकीची कोंडीच्या उपाययोजनांबाबत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीला…
नवी मुंबई, वृत्तसंस्था । लहरी पावसामुळे घटलेले उत्पादन, इंधन दरवाढ आणि आता पितृपक्ष पंधरवड्यामुळे मागणीत झालेली वाढ यामुळे भाज्या कडाडल्या आहेत. कांदा-बटाटा आणि कोबी वगळता बहुतांश सर्व भाज्यांचे दर तेजीत आहेत. काही दिवसांपूर्वी मागणीच्या तुलनेत घाऊक बाजारात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत होती. त्यामुळे सर्व प्रकारच्या भाज्यांचे दर घटले होते. शेतक ऱ्यांनी मिळेल त्या दरात भाज्यांची विक्री केली. घाऊक बाजारांमध्ये कवडीमोल दर मिळाल्याने टोमॅटो, ढोबळी मिरची शेतक ऱ्यांनी फेकून दिली. मध्यंतरी पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे भाजीपाला लागवडीवर लक्षणीय परिणाम झाला. पुरेशी लागवड न झाल्याने गेल्या काही दिवसांपासून भाज्यांची आवक कमी होत आहे, असे किरकोळ बाजारातील भाजीपाला विक्रेत्यांनी सांगितले. काही…
जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सहकार क्षेत्रात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी सहकार सेल सुरू केले असून जळगाव जिल्हा राष्ट्रवादी सेल ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी वाल्मीक पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी सहकार विभागाची निर्मिती झाली अाहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाचे काम महाराष्ट्रभर सुरू झाले आहे. सहकार क्षेत्रातल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी राष्ट्रवादी सहकार विभाग कार्यान्वित झाला अाहे. या विभागाकडे शरद पवार लक्ष ठेवून आहेत. त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात सहकार क्षेत्रात काम केलेल्या व्यक्तींना जिल्हाध्यक्षपदी नेमण्यात आले आहे. जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष व जिल्हा बँकेचे माजी संचालक तसेच नियोजन मंडळाचे सदस्य…
जळगाव, प्रतिनिधी । शहरातील खड्डेमय रस्त्यांची अवस्था जळगावकरांसाठी खूप तापदायक ठरत आहे. महापालिका प्रशासन याकडे डाेळेझाक करीत असल्याने हा प्रश्न अवघड झाला आहे. त्यामुळे बॉक्स ऑफ हेल्प फाउंडेशन व युवक बिरादरीने पुढाकार घेऊन शहरातील खड्डे बुजवण्याची माेहीम हाती घेतली आहे. बुधवारपासून या माेहिमेला सुरुवात होणार असल्याची माहिती बॉक्स ऑफ हेल्प फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा काबरा यांनी दिली. शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. तरी देखील मनपाने ठाेस असे कार्य सुरू केलेले नाही. काही भागात मनपाने खड्डे बुजवले मात्र अनेक रस्त्यांवर अजूनही खड्डे आहेत. खड्ड्यांमुळे वाहनाधारकांना विविध व्याधी जडल्या आहेत. काव्यरत्नावली चौक ते आकाशवाणी चौक, शिरसोली नाका ते काव्यरत्नावली चौक, शिव कॉलनी…
जळगाव, प्रतिनिधी । महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाने गाळेधारकांकडील थकबाकी वसुलीला पुन्हा सुरुवात केली अाहे. मंगळवारी उपायुक्त प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वात दुपारी दाेन तासात ३० लाख रुपयांची वसुली करण्यात आली. तसेच जप्त केलेल्या गाळ्यांमधील साहित्याचा लिलाव करण्यासाठी साहित्याची यादी तयार करण्यात येत अाहे. महापालिकेने गेल्या पंधरा दिवसांपासून थांबवलेली थकबाकीदारांविरुद्ध माेहीम पुन्हा सुरू केली अाहे. पालिकेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मार्केट असलेल्या सेंट्रल फुले मार्केटमध्ये पालिकेच्या पथकाने दुपारी ३ ते ५ या वेळेत थकबाकीदारांची भेट घेतली. या वेळी बहुसंख्य गाळेधारकांनी धनादेश सुपुर्द करत तीस लाखांचा भरणा केला.
जळगाव, प्रतिनिधी । रिक्षाचालक, मालकांनी बुधवारपासून व्यवसाय करीत असताना गणवेश, कागदपत्र साेबत ठेवावे अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, अशा सूचना वाहतूक शाखेने दिल्या आहेत. शहरात अनेक रिक्षाचालक भाडेतत्त्वावर रिक्षा घेऊन व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे मूळ कागदपत्र नसतात. गणवेश परिधान करीत नाहीत. नेमून दिलेल्या स्टॉपवर रिक्षा उभी करीत नाहीत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात असे निदर्शनास आल्यामुळे वाहतूक शाखेने सूचना जारी केल्या आहेत. बुधवारपासून नियम मोडणाऱ्या रिक्षाचालक, मालकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे वाहतूक शाखेतर्फे कळवण्यात आले आहे.
जळगाव, प्रतिनिधी । सार्वजनिक बांधकाम विभागाकडील २० किलाेमीटर अंतराचे प्रमुख जिल्हा मार्ग व राज्य मार्गावरील अतिक्रमण हटाव माेहिमेला मंगळवारी सुरुवात झाली. कानळदा राेडवरील अतिक्रमण काढल्यानंतर इच्छादेवी ते शिरसाेली नाक्यादरम्यान अभियान राबवण्यात अाले. अनेक वर्षापासून पक्के अतिक्रमण असलेल्या रहिवाशांना बुधवारी सकाळी ११ वाजेचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. अन्यथा जेसीबीने सरसकट ताेडण्याचा इशारा देण्यात आला. गेल्या महिनाभरापासून शहरातून जाणाऱ्या २० किमी लांबीचा प्रमुख जिल्हा मार्ग व राज्य मार्ग असलेल्या सहा रस्त्यांच्या विकासावर अधिक भर दिला जात आहे. या रस्त्यांची कायदेशीर हस्तांतरणाची प्रक्रिया लवकरच पार पाडली जाणार आहे. तत्पूर्वी जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाचीच असल्याने दिवाळीपूर्वी रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी…