Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील कांचन नगरात थेट घरात घुसून गोळीबार करण्यात आला असून या घटनेत ५ ते ६ वेळा फायर झाले आहे. या घटनेतील संशयितांना यश आले नाही, या संशयितांमधील एक जण हा घटनास्थळीच जखमी होऊन बेशुध्द झाल्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आलेले आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास चालू आहे. गेल्या वर्षी 4 नोव्हेंबर २०२० रोजी रात्री शिवाजीनगरातील स्मशानभूमिजवळ माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश अशोक सपकाळे (वय २८) याचा एका टोळक्याने केलेल्या हल्ल्यात खून झाला होता. राकेश सपकाळे हा रात्री साडेअकराच्या सुमारास स्मशानभूमी परिसरातून येत असताना वाटेत दबा धरून बसलेल्या दोन अज्ञात तरुणांनी त्याला अडवले. या तरुणांनी सुरुवातीला त्याला लाथाबुक्क्यांनी…

Read More

जळगाव प्रतिनिधी | शहरातील गोळीबाराची घटना ताजी असतांना आज पुन्हा कांचन नगर येथील परिसरात गोळीबार झाल्याची वृत्त समोर आली आहे, याप्रकरणी पोलिसांनी घटनास्तळी धाव घेऊन पाहणी करून चौकशी सुरु आहे, या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. जळगाव शहरातील कांचननगर भागात सकाळी ८ वाजेच्या सुमारास गोळीबार झाल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. याला पूर्व वैमनस्याची किनार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सविस्तर बातमी थोड्याच वेळात

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । UPI : यूपीआय पेमेंट करण्यासाठी एक सक्रिय इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे, कारण व्यवहार ऑनलाइन केला जातो. बऱ्याचदा असे दिसून येते की तुम्ही अशा ठिकाणी आहात जिथे इंटरनेट नसते किंवा ते संथ गतीने सुरु असते. अशा परिस्थितीत, UPI पेमेंट करणे कठीण होते. पण आमच्याकडे एक चांगली बातमी आहे जी तुमच्यापैकी अनेकांना कदाचित माहीत नसेल. तुम्ही इंटरनेटशिवाय UPI वापरू शकता. तुम्हाला फक्त तुमच्या फोनच्या डायलरवर *99# USSD कोड वापरावा लागेल. (UPI Payment Without Internet) ही *99# सेवा भारतात नॉन-स्मार्टफोन वापरकर्त्यांसह सर्व मोबाईल फोन वापरकर्त्यांसाठी सुरू करण्यात आली. स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी, हे *99# एक आपात्कालीन सुविधा आहे. जे त्यांच्याकडे इंटरनेट नसल्यास…

Read More

मुंबई, दि. 21 : निर्यात क्षेत्राला चालना मिळावी यासाठी केंद्र शासनातर्फे अनेक बदल प्रस्तावित केले आहेत. देशातून 400 बिलीयन डॉलर एवढे निर्यातीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे उद्गार केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खनिकर्म राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काढले आहेत. येथील जागतिक व्यापार केंद्र (वर्ल्ड ट्रेड सेंटर) येथे दोन दिवस चालणाऱ्या राज्यस्तरीय ‘वाणिज्य उत्सव’ या परिषदेचे उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. या परिषदेचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. येथील प्रदर्शन दालनांचे यावेळी पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंग,…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात राज्यातील कुणबी विद्यार्थ्यांसाठी मुंबईत मुलुंड येथे वसतीगृह उभारण्याची घोषणा केली होती. त्यासाठी पाच कोटी रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते मुंबईतील कुणबी समाजोन्नती संघाच्या पदाधिकाऱ्यांकडे सोमवारी (दि. 20) एका विशेष समारंभात सुपुर्द् करण्यात आला. कुणबी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी राज्य सरकार बांधील आहे. कुणबी, ओबीसी समाजबांधवांसह विविध समाजघटकांसाठी कार्यरत विकास महामंडळांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली असून त्यानुसार निधी उपलब्ध केला जात आहे. नवीन घटकांना आरक्षण देत असताना सध्या लागू मूळ आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही, याची काळजी सरकार घेईल, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज दिवसभरात एकही बाधित रूग्ण आढळला नाही. तर जिल्ह्यातून एक रूग्ण बरा होवून घरी परतला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात एकही रूग्ण आढळला नसल्याने जिल्हावासियांसाठी दिलासादायक वृत्त आहे. दरम्यान १ बाधित रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने आता जिल्ह्यात ९ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७३५ रूग्ण बाधित आढळून आले आहे त्यापैकी १ लाख ४० हजार १५१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्रे आधारे सेवेत रूजू झालेल्या व जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या अधिकारी व कर्मचा-यांना अनुज्ञेय करावयाच्या सेवा व सेवा निवृत्ती विषयक लाभांबाबत अभ्यास करण्यासाठी नेमलेला अभ्यासगट हा आपला अहवाल लवकरच मंत्रीमंडळाला सादर करणार असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज दिली. मंत्रालयातील परिषद सभागृहात, अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे सेवेत रुजू झालेल्या व जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय करावयाच्या सेवा व सेवा निवृत्ती विषयक लाभांबाबत शासनास शिफारशी करण्यासाठी गठीत केलेल्या अभ्यास गटाची बैठक अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. आदिवासी…

Read More

मुंबई, प्रतिनिधी । राज्यातील हंगाम २०२१-२२ मधील कापूस खरेदीचे योग्य नियोजन करून शेतकरी हितासाठी कापूस खरेदीला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरवात करावी त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या. हंगाम २०२१-२२मधील कापूस खरेदी नियोजनाबाबत सहकार व पणन मंत्री श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली. राज्यात खरीप हंगाम २०२१-२२मध्ये ३९.३७ लाख हेक्टरवर कापसाचा पेरा झालेला आहे. मागील वर्षी ४२.०८ लाख हेक्टरवर कापसाचा पेरा झालेला होता. यावर्षी कापूस पेरा ६.४४ टक्के घटला असली तरी सद्यस्थितीत कापूस पिकाची परिस्थिती समाधानकारक आहे. त्यानुसार राज्यात ८०-८५ लाख गाठी एवढे उत्पन्न अपेक्षित आहे. त्यानुसार योग्य नियोजन करून खरेदीकेंद्र…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । नशिराबाद येथे दि. २१ रोजीच्या जुन्या वादातून गोळीबारासह चाकूहल्ल्यात जामीनावर सुटलेला संशयित गुन्हेगार धम्मप्रिय मनोहर सुरडकर या तरूणाचा खून झाल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील शेख समीर उर्फ भांजा शेख जाकीर (वय २१) आणि रेहानुद्दीन नईमोद्दीन (वय २१) दोन्ही रा. पंचशिल नगर यांना आज सकाळी ५ वाजता नशिराबाद पोलीसांनी अटक केली. दोघांना पाच दिवस पोलीस कोठडी दिली आहे. धम्मप्रिय उर्फ धम्म मनोहर सुरडकर (वय २०, रा. पंचशील नगर भुसावळ) हा वडिल मनोहर सुरडकर यांच्यासह मंगळवारी २१ सप्टेंबर रोजी जळगाव येथून भुसावळ येथे दुचाकी क्रमांक (एमएच १९ एव्ही ९६५६) जात असताना सायंकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास शमीर आणि रेहानुद्दीन…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहर महानगरपालिका व मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हिरवाई’ या प्रकल्पांतर्गत मेहरुण तलाव परिसरात 1001 झाडे लावली जाणार आहेत. या प्रकल्पांतर्गत प्रत्यक्ष कामाचा प्रारंभ शुक्रवार, दि.24 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी तीन वाजता महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन, उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील, महापालिका आयुक्त श्री.सतीश कुलकर्णी, मराठी प्रतिष्ठानचे प्रवर्तक श्री.विजयकुमार वाणी व मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. जमील देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी देवराई प्रकल्पप्रमुख व हिंदी, मराठी, कन्नड व तमीळ चित्रपटांत भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते श्री.सयाजी शिंदे यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याप्रसंगी सर्व नगरसेवक, नगरसेविका व मराठी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारीही उपस्थितीत राहतील. जळगाव शहर महानगरपालिका व…

Read More