फैजपूर, प्रतिनिधी । अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या येथील खंडोबा मंदिर देवस्थानात राज्य शासनाच्या तीर्थ-क्षेत्र निधीतून सुमारे ४० लक्ष खर्चाचे संत निवास व जलकुंभचे भूमिपूजन सोहळा स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील व खासदार रक्षाताई खडसे यांच्या शुभहस्ते आ. शिरिष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. हिंदू व भारतीय असल्याचा मला गर्व आहे. प्रत्येकानेच आपल्या धर्माचा व देशाचा अभिमान बाळगला पाहिजे असे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले. ते पुढे म्हणाले की, सत्ता हे साधन आहे त्याचा सदुपयोग करून लोकहिताची कामे केली पाहिजे. आपल्या धार्मिक, आध्यात्मिक संस्कृतीमुळे माणसाला आचरणाचा धाक आहे अन्यथा हा धाक संपुष्टात आल्यास देश…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात आज (28 सप्टेंबर) मुसळधार किंवा अतिमुसळधार पावसाचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. तसेच जळगाव तालुक्यातील वाघूर धरण पूर्णपणे भरल्यानंतर पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यास धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आले आहे. यामुळे धरणाजवळील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार प्रमाणात पाऊस झाला. यामुळे २१ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी पाच वाजता वाघूर धरण हे पूर्णपणे भरले. यानंतर प्रारंभी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले होते. मात्र पावसाचे प्रमाण वाढल्याने आता धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले आहे. वाघूर धरणाच्या खालील बाजूला असणार्या नदीकाठावरील गावांमधील नागरिकांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला…
पहूर, प्रतिनिधी । पहूर बसस्थानक समोरील कृषी पंडित कॉम्प्लेक्स मधील मुळचंद झुंबरलाल चोरडिया यांच्या स्वामी समर्थ प्रोव्हिजन दुकानाचे शटर कुलूप तोडून चोरांनी 4 ते 5 हजार रोकड सह 12 ते 13 हजार रुपयांचे किराणा सामान लंपास केला आहे. सदरील चोरीची घटना ही सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता समोर दुकानाचे कुलूप तोडण्याचे दिसून आल्याने घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यावर पोलिसानं समोर दुकानाचे शटर उघडून पाहणी केली असता दुकानातील ड्रॉवर खुले दिसून आले. तसेच दुकानातील कागदपत्र देखील अस्ताव्यस्त दिसून आले. दुकानातील मालाची तपासणी केली असता दुकानातील गावरानी तुपाचे डब्बे, तेल पाउच, काजू, बदाम, व्हील, लक्स, डव इ प्रकारचे साबण, पाउडर तसेच किरकोळ…
मुंबई, वृत्तसंस्था । कच्च्या तेलाच्या महागाईची झळ सोसत इंधनदरवाढ रोखून धरणाऱ्या पेट्रोलियम कंपन्यांनी आता पेट्रोल आणि डिझेल या दोन्हींच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोल २२ दिवसांनी महागले असून, डिझेलचा दर सलग चौथ्या दिवशी वधारला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी केवळ डिझेल दरात वाढ केली होती. मात्र, आज (मंगळवार) पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीचे दर वाढलेले पाहायला मिळत आहेत. गेल्या २२ दिवसांपासून पेट्रोलच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. अखेर पेट्रोलियम कंपन्यांनी डिझेलबरोबरच पेट्रोलच्या दरातही वाढ केली. देशभरात पेट्रोलचा दर २० ते २२ पैशांनी वधारला आहे. तसेच डिझेलच्या दरात गेले सलग चार दिवस वाढ करण्यात येत असून, आज डिझेल २५ पैशांनी महागले…
कोल्हापूर, वृत्तसंस्था । कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी पीक कर्ज देण्यात येणार आहे. बँकेच अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी बँकेच्या 83 व्या वार्षिक सभेत ही घोषणा केली आहे. बँकेची वार्षिक आढावा बैठक सोमवारी झाली. यामध्ये यंदाच्या आर्थिक वर्षात नऊ हजार कोटी रुपयांच्या ठेवी आणि 175 कोटी रुपयांच्या नफ्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले. शून्य़ टक्क्याने कर्ज देणारी केडीसीसी ही ही पहिलीच बँक असल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला. बँकेचे सभासद असलेल्या लाखो शेतकऱ्यांनी शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज देण्याची मागणी केली होती. यामुळे तीन लाखांची कर्ज मर्यादा वाढवून पाच…
बोदवड, प्रतिनिधी | दुकानातून अज्ञात चोरट्यांनी तब्बल सहा लाख रूपयांची रोकड लांबविल्याची घटना २६ सप्टेंबर च्या रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील भुसावळ रोडवर प्रमोद सुरेश बडगुजर यांच्या मालकीचे बडगुजर बिल्डिंग मटेरियल सप्लायचे दुकान आहे. २६ सप्टेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून आत दुकानात प्रवेश केला. यानंतर काउंटरच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेली ६ लाख रुपयांची रोकड घेऊन पलायन केले. हा प्रकार सोमवारी लक्षात आला. या संदर्भात प्रमोद बडगुजर यांनी फिर्याद दिली. तपास उपनिरीक्षक एस.एस.माळी करत आहे. जळगाव येथून आलेल्या ठसे तज्ज्ञांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली.
जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका ४५ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना २६ रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात एक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगावातील एमआयडीसी परिसरात एका ठिकाणी चहाची विक्री करण्याचे काम ४५ वर्षीय महिला करते. दरम्यान या चहाच्या टपरीवर रविवार २६ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अंकुश साईदास चव्हाण रा. समतानगर जळगाव हा विनापरवानगी दुकानात घुसून महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून अश्लिल शिवीगाळ केली व तिचा विनयभंग केला. याप्रकरणी महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात संशयित आरोपी अंकुश चव्हाण यांच्याविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील…
जळगाव प्रतिनिधी । आज देशव्यापी भारत बंद संप पाळण्यात येत आहे. या अनुषंगाने आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बाजारपेठेतून रॅली काढून व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन आज सोमवार सकाळी 11 वाजता केले. भारत बंदला शहरातून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या शेतकरी विरोधी तीन काळे कायद्याच्या विरोधात विविध मागण्यांसाठी आज देशव्यापी भारत बंदचा संप पुकारण्यात आला आहे. देशातील जनतेचा आक्रोश समाजासमोर यावा, यासाठी भारत बंदची हाक सर्व पक्षांनी एकत्र येऊन दिली आहे. कायद्याची तोडमोड करून देशात हुकुमशाही आणण्याचा कट मोदी सरकारने केला आहे. याला तोंड फोडणे आवश्यक असल्याने भारत बंदचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीत अकरा महिन्यांपासून शेतकरी…
जळगाव प्रतिनिधी । शहरात २४ वर्षीय तरुणाने तलवार घेऊन दहशत पसरविणाऱ्याला एमआयडीसी पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामेश्वर कॉलनी येथील सिद्धार्थ नगरात राहणाऱ्या सागर पुनम कंडारे (वय-२४) अश्या संशयित आरोपीचे नाव आहे. एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर कंडारे हा शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात हातात ३० इंच लांबीची लोखंडी तलवार घेऊन दहशत माजवत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारी यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख, पोलीस नाईक सुधीर साळवे, हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, इमरान शेख यांनी रामेश्वर कॉलनीत रात्री १२.३० वाजेच्या सुमारास गस्तीवर असतांना संशयित आरोपी सागर…
चाळीसगाव, प्रतिनिधी । केंद्र सरकारने कृषी धोरणाच्या विरोधात पारीत केलेले काळे कृषी कायदे त्वरित मागे घ्यावे या मागणीसाठी चालवलेल्या शेतकरी उपोषणाला पाठिंबा म्हणून अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने भारत बंद चे आयोजन केले. या बंद साठी चाळीसगाव तालुका महिला कांग्रेस, तालुका काँग्रेस व सेवादल तर्फे कचेरी चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले शेतकरी विरोधी काळा कायदा त्वरित मागे घ्यावे या आशयाचे निवेदन चाळीसगाव चे तहसीलदार श्री अमोल मोरे साहेब यांना देण्यात आले. यावेळी महिला अध्यक्षा सौ अर्चना पोळ, तालुका अध्यक्ष अनिल निकम, सेवादल अध्यक्ष आर डी चौधरी, माजी आमदार ईश्वर जाधव, राहुल मोरे, रविंद्र पोळ, रविंद्र जाधव,अलताफ खान जमशेर खान, प्रदिप…