जळगाव प्रतिनिधी । नवीन बस स्टॅन्ड परिसरातून आज ५ पाच हजार रुपये किंमत असेलेला मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील कृष्णराज हेमराज पाटील (वय-५२) रा.पाचोरा हे जळगावात एका दैनिकात पत्रकार म्हणून काम करतात. २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणेसात ते सात वाजेच्या दरम्यान पाचोरा येथे जाण्यासाठी नवीन बसस्थानकात आले असता त्यांच्या खिशातील ५ हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल चोरीस गेला. त्यांनी परिसरात शोधाशोध केली परंतु मोबाईल मिळून आला नाही. त्यांनी या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी ओळखपत्रासाठी सामाजिक न्याय विभागाच्या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष अभिजित राऊत यांनी केले आहे. तृतीय पंथीयांच्या तक्रार निवारणासाठी गठित जिल्हास्तरीय समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, समितीचे सचिव तथा सहाय्यक आयुक्त योगेश पाटील आदी या बैठकीस उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. राऊत म्हणाले, तृतीयपंथीयांच्या नोंदणीसाठी NATIONAL PORTAL FOR TRANSGENDER PERSON हे पोर्टल सुरू करण्यात आले…
जळगाव, प्रतिनिधी । जळगाव जिल्हा परिषदेत अनेक अधिकाऱ्यांकडे इतर विभागाचा अतिरिक्त पदभार असल्याने मोठ्याप्रमाणात गैरप्रकार होत असून प्रभारी राज संपविण्यात यावे अशी तक्रार महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाने जिल्हा दौ-यावर आलेल्या पंचायत राज समितीकडे केली आहे. पंचायत राज समितीचे अध्यक्ष आ.संजय रायमुलकर यांची महाराष्ट्र जन क्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे,भारत ससाणे,रमेश सोनवणे,चंदन बिऱ्हाडे,निलेश बोरा,अमोल कोल्हे आदींनी भेट घेऊन जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची तक्रार करून निवेदन सादर केले. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात ऑडिट होत असते.पण कामावर ऑडिटर प्रत्यक्षात जात नसून कार्यालयात बसून एम.बी.ऑडिट करतात. यामुळे बांधकामात गैरप्रकार होऊन भ्रष्टाचारास चालना मिळाली आहे.बांधकाम विभागाचा पदभार प्रभारी स्वरूपात शाखा अभियंता पहात असून अशाच…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील ४२ वर्षीय व्यक्तीचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील सुरेश दौलतराम खत्री (वय-४२) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश खत्री हे सिंधी कॉलनीत पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला आहे. मिळेल ती मोलमजूरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. गेल्याकाही दिवसांपासून काहीही कारण नसतांना मानसिक तणावात होते. त्यामुळे त्यांनी भुसावळ रोडवरील खासगी रूग्णालयात २१ सप्टेंबर रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान हॉस्पीटलजवळून काही अंतरावर असलेल्या जळगाव खूर्द रेल्वे फाट्याजवळ आज बुधवार २९ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेच्या…
धानोरा ता. चोपडा, वार्ताहर । चोपडा तालुक्यातील धानोरा येथे दि २९ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी प्रचंड झुंबड उडाली.यावेळी वशीला सुरु असल्याचे सांगत गावातील,परीसरातील ग्रामस्थ यांनी सांगितले.तर नाव नोंदणी साठी एकच टेबल असल्याने नोंदणी करण्यास उशीर लागत होता. येथिल स्थानिक कर्मचारी आपल्या मर्जीतील लोकांची नोंदणी अगोदरच ठेवत आहेत.यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.दुसरीकडे दोन वैद्यकिय अधिकारी असुनही येथे लस साठी नियोजन केले जात नसल्याने समस्या अधिक वाढत आहेत.लशींचा पुरवठा व्यवस्थितपणे होत आहे पण येथे लस उपलब्ध असुनही नियोजनशुन्य कामामुळे आलेल्या ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळत आहे.काही महीला रोजंदारी थांबवून लस साठी पूर्ण दिवस ताटकळत बसत आहेत.यावेळी खामखेडा बोआ,ज्ञानेश्वर सोनवणे,रवि पाटील यांनी…
जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील स्वातंत्र्य चौक येथे २८ रोजी डंपरच्या धडकेत जखमी झालेल्या वृद्धाचा आज सकाळच्या सुमारास मृत्यू झाला आहे, याप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील मंदीराजवळ, व्यंकटेश नगर, हरिविठ्ठल नगर येथे बुधा खंडू बनसोडे (वय ७०) हे शहरात हमालीचे काम करतात. मंगळवारी २८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता काम आटोपून घराकडे स्वातंत्र्य चौकातून पायी जात होते. त्यावेळी भास्कर मार्केटकडून अमृत योजनेचे डंपर (एमएच १९ झेड २५३४) भरधाव वेगाने आले व बुधा वनसोडे यांना जोरदार धडक दिली. यात ते रस्त्यावर पडले. त्यामुळे डंपरचे पुढचे चाक बनसोडे यांच्या उजव्या पायावरून गेल्याने गंभीर दुखापत…
जळगाव, प्रतिनिधी । शिवाजीनगर हुडको भागात किरकोळ कारणावरून एका तरुणास बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण करणाऱ्यांपैकी एकाने दहशत पसरवण्यासाठी हवेत गोळीबार केल्याचीही माहिती समोर आली आहे. २७ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता ही घटना घडली. गजानन विलास बाविस्कर (वय २७) हा तरुण मारहाणीत जखमी झाला आहे. तर मारहाण करणारी टोळी वाल्मीकनगर भागातील असल्याची माहिती आहे. गजानन याने शिवाजीनगर हुडको परिसरात चाकूचा धाक दाखवून दहशत पसरवली हाेती. सोमवारी दुपारी त्याचे एका जणाशी वाद झाले. यानंतर काही वेळातच वाल्मीकनगरातून एका चारचाकीतून तसेच पाच-सहा दुचाकीने काही तरुण हुडको परिसरात आले. त्यांना पाहून गजानन एक स्वच्छतागृहात लपून बसला होता. या तरुणांनी स्वच्छतागृह तोडून त्याला…
जळगाव, प्रतिनिधी । सोमवारी मध्यरात्रीपासून तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने नदी-नाल्यांना पूर आला असून धरणांचा साठा वाढला आहे. बोरी धरणाचे १२ दरवाजे उघडून मंगळवारी विसर्ग करण्यात आला. सध्या बोरी धरणाची पाणी पातळी २६७.१० मीटर असून, मंगळवारी दुपारी १ वाजता धरणाचे १२ दरवाजे .०१५ मीटरने उघडून ५४१२ क्युसेक वेगाने नदीपात्रात विसर्ग केला जात आहे. त्यामुळे बोरी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मंगळवारपर्यंत तालुक्यात ९०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. बहादरपूर, शिरसोदे, महालपूर या गावांना जोडणाऱ्या फरशी पुलावर पाणी वाहत असल्याने मंगळवारी या गावांचा संपर्क तुटला होता. परिणामी या परिसरातील नागरिकांना दळवेल, मुकटीमार्गे पारोळा येथे यावे लागत आहे. अतिवृष्टीमुळे कापसाच्या पिकाचे मोठे…
मुंबई, वृत्तसंस्था । कोरोना ओसरत असल्याने थाळीचा भाव पूर्वपदावर कोरोनाकाळात लॉकडाऊनमध्ये गरीब व गरजू लोकांना जेवणाची सोय व्हावी या हेतूने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन थाळी मोफत उपलब्ध करून दिली होती. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिवभोजन थाळी दर पूर्वीप्रमाणे दहा रुपये प्रतिथाळी इतका करण्याचा निर्णय घेतला आहे. १ ऑक्टोबरपासून थाळीसाठी दहा रुपये मोजावे लागणार आहेत. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. अनेकांचे रोजगार गेले होते. परगावी राहणाऱ्या तसेच हातावर पोट असलेल्या अनेक लोकांचे खाण्याचे हाल होत होते. याच काळात महाराष्ट्रातून लाखो परप्रांतीय मजुरांनी पायी आपल्या गावाची वाट धरली होती. त्या वेळी…
मुंबई, वृत्तसंस्था । अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबई कार्यालयातील सहसंचालक सत्यव्रत कुमार यांची बदली करण्यात आली आहे. राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील प्रकरणे सध्या मुंबईचे कार्यालय हाताळत असताना ही बदली करण्यात आली आहे. सत्यव्रत कुमार हे ईडीमध्ये प्रतिनियुक्तीवर होते. त्यांचा प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ वाढविण्यासंदर्भातील प्रस्ताव वित्त विभागाने कार्मिक विभागाकडे पाठविला होता. त्यास मंजुरी देण्यापूर्वी केंद्रीय दक्षता आयोगाची मान्यता घ्यावी लागते. केंद्रीय दक्षता आयोगाच्या अध्यक्षांच्या समितीने हा प्रस्ताव अमान्य केला. त्यामुळे दीर्घकाळ मुंबईत राहिलेले सत्यव्रत कुमार हे त्यांच्या मूळ विभागात (कस्टम आणि केंद्रीय अबकारी) परत जातील. सत्यव्रत कुमार यांना सहसंचालक पदावर कायम ठेवत सहा महिन्यांपूर्वी दिल्लीत ईडी संचालकांचे सल्लागार ही जबाबदारी देण्यात आली…