Author: saimat team

मुंबई, वृत्तसंस्था । आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी सरकार आणि बँकांकडून सातत्याने नियमांमध्ये बदल केले जात असतात. त्यामुळे अलीकडच्या काळात अगदी दर महिन्याला आर्थिक व्यवहारांशी संबंधित कोणत्या ना कोणत्या नियमांत बदल होत असतो. येत्या 1 ऑक्टोबरपासून आर्थिक व्यवहारांबाबत असेच काही बदल होऊ घातले आहेत. * 1 ऑक्टोबरपासून एटीएम/डेबिट कार्ड वार्षिक देखभाल शुल्क 125 रुपये अधिक जीएसटी असेल. हे शुल्क 1 ऑक्टोबर 2021 आणि 30 सप्टेंबर 2022 या कालावधीसाठी लागू असतील. याशिवाय, पोस्टाकडून आता आपल्या डेबिट कार्डधारक ग्राहकांकडून एसएमएस अलर्टसाठी 12 रुपये (जीएसटीसह) आकारले जातील. हे शुल्क डेबिट कार्डधारकांना पाठविलेल्या एसएमएस अलर्टसाठी वार्षिक शुल्क असेल. * तुम्ही पोस्टाचे एटीएम…

Read More

यावल, प्रतिनिधी । यावल नगरपरिषदेतर्फे ठेकेदाराने गेल्या तीन महिन्यापूर्वी अतिरिक्त साठवण तलावाचे जे बांधकाम केले त्या कामात सुमारे1कोटी80 लाख रुपयाचा भ्रष्टाचार,गैरप्रकार झाल्याबाबतची तक्रार यावल नगरपरिषद अध्यक्षा आणि इतर काही नगरसेवकांनी केल्याने यावल नगरपालिकेतील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे दि.27सप्टेंबर2021 रोजी दिलेल्या तक्रार अर्जात यावल नगरपरिषद अध्यक्षा सौ.नोशाद तडवी,नगरसेवक मनोहर बाबुराव सोनवणे,सैय्यद युनूस सैय्यद युसुब,नगरसेविका रजीयाबी गुलाम रसूल,शेख सईदाबी हारून,खान शमशाद बेगम महंमद खान यांनी दिलेल्या लेखी तक्रार अर्जात म्हटले आहे की नवीन साठवण तलाव यावल हा एकूण तांत्रिक मंजुरी रक्कम3कोटी51लाख56 हजार रुपयाचा मंजूर होऊन निविदा रक्कम2कोटी84लाख38हजार 516 असून सदर कामात सुरुवातीपासूनच भ्रष्टाचाराचे नियोजन करत सुमारे1कोटी80 लाख रूपये…

Read More

यावल, प्रतिनिधी । हजारो नागरिकांचे आणि दादा भक्तगणांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री रेवानंद स्वामी गुरु केशवानंद धुनीवाले दादाजीचा श्राध्द सोहळा कार्यक्रम गुरुवार दि.30सप्टेंबर2021रोजी यावल तालुक्यातील मनवेल येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. धुनीवाले दादाजी दरबार मनवेल 30सप्टेंबर रोजी सकाळी7 वाजता आरती,8वाजता सेवा, दहा वाजता होम,हवन,सेवा व दुपारी12वाजे पासून महाप्रसाद, सायंकाळी चार वाजता पालखी मिरवणूक,रात्री8वाजता महाआरती व रात्र भर ठिक ठिकाणाहुन आलेल्या दादा भक्त गण भजन गायनच्या कार्यक्रम होणार आहे. श्री.रेवानंद स्वामी यांनी मनवेल येथे काही दिवस वास्तव्य केले आहे.भाद्रपद महिन्यात अविधवा नवमीला त्यानी1939या वर्षी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील अंबाडा या गावी समाधी घेतली…

Read More

यावल, प्रतिनिधी । दि. 28 मंगळवार रोजी सकाळी11 वाजेच्या सुमारास पंचायत राज समिती जळगावहुन विदगाव मार्गे यावल येत असताना रस्त्यात थांबुन डांभुर्णी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली तसेच इयत्ता चौथी नंतर पाचवीचा वर्ग का सुरू केला नाही याचा संबंधितांना जाब विचारला तसेच डांभुर्णी जिल्हा परिषद शाळे जवळ रस्त्यावरील माटीयुक्त गाऱ्यामध्ये/किचडात पंचायत राज समितीचे वाहन अडकल्याने तसेच पंचायत राज समितीचेच दुसरे एक वाहन संरक्षण भिंतीवर आदळल्याने ग्रामीण भागात शासनाचा,यावल पंचायत समिती अधिकारी,बांधकाम कनिष्ठ शाखा अभियंता,कर्मचारी ग्रामसेवकांचा कसा भोंगळ कारभार सुरू आहे हे पंचायतराज समितीच्या प्रत्यक्षात लक्षात येऊन अनुभव आला यामुळे एकच खळबळ उडाली विशेष म्हणजे या…

Read More

मुंबई, प्रतिनिधी । धुळे व नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना वाढली पाहिजे असे शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वप्न आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांनी जोमाने काम करावे असे प्रतिपादन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. धुळे-नंदुरबार जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज मुंबईतील दादर येथील सेना भवनात बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, धुळे जिल्हा प्रमुख तुळशीराम गावित, हेमंत साळुंखे, नंदुरबार जिल्हा प्रमुख आमशा दादा पाडवी, सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी, महेश मिस्तरी शिवसेना उपनेते तथा…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । रोटरी क्लब जळगाव ईस्ट आणि कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विदयमाने “डायबेटिस ला हरवू या” या मोफत शिबिराचे आयोजन २९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत कांताई रुग्णालयात करण्यात आले आहे. या शिबिरात रुग्णांची शुगर लेव्हल, शुगर लेव्हल जास्त असल्यास जास्त झालेल्या शुगर ला नियंत्रणात आणण्यासाठी रुग्णांची मोफत तपासणी फिजिशियन डॉ.मंदार पंडित, तसेच त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अमेय कोतकर आणि नेत्र तपासणी कांताई रुग्णालयातील डॉक्टर करतील. गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लब जळगाव ईस्ट चे अध्यक्ष सीए वीरेंद्र छाजेड, सचिव प्रणव मेहता आणि कांताई नेत्रालयाचे अमर चौधरी यांनी केले.

Read More

जळगाव, प्रतिनिधी । गेल्या महिनाभरापासून चाळीसगाव शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीमुळे नदी किनाऱ्यावरील नागरीक तसेच व्यापारी, व्यावसायिकांना कोट्यावधी रुपयांचे नुकसानीस सामोरे जावे लागले होते. शहरातून जाणाऱ्या डोंगरी व तितूर नदीच्या प्रवाहाला दयानंद ते सदानंद पुलामुळे बंधाऱ्याचे स्वरूप आले होते. कमी उंची आणि पुलाखालून कमीत कमी मोऱ्या असल्याने पाणी अडवले जात असल्याने हे पाणी गल्लीबोळात जाऊन व किनाऱ्यावरील व्यापारी आस्थापनांना मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचत होते. गेल्या पाच पुरांमुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान शहर व तालुक्यात झाले होते. खासदार उन्मेशदादा पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना ही वस्तुस्थिती सांगितल्याने ना.गडकरी यांनी तात्काळ भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या माध्यमातून पुलाला मंजुरी…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका २७ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहरातील सम्राट कॉलनी परिसरात लक्ष्मण अशोक जाधव (वय-२७) हा कुटुंबियासह राहतो. मोलमजुरी करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. कौटुंबिक वादामुळे त्यांची पत्नी ह्या गेल्या चार ते पाच महिन्यांपासून माहेरी निघून गेल्या होत्या. त्यामुळे लक्ष्मण जाधव आहे नैराश्य होते. सोमवारी २७ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची उघडकीला आले. सायंकाळी आई शर्मिलाबाई घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. गल्लीतील राहणारा योगेश परदेसी याने मृतदेह खाली जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । मालेगाव-मनमाड -कोपरगाव बीओटी रस्त्याचा जो भाग नादुरुस्त आहे त्याचे डांबरीकरण व नूतनीकरणाचे काम तातडीने पूर्ण करावे असे निर्देश कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. मंत्री श्री.भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आयोजित बैठकीत या रस्त्याच्या कामाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. मालेगाव-मनमाड -कोपरगाव रस्त्यावर शिर्डी व पुण्याच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असून शेजारील दोन- तीन राज्यातील लोकांची रहदारी आहे.मालेगाव ते मनमाड या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले असून हा रस्ता वाहतुकीसाठी योग्य नाही. मालेगाव ते मनमाड हे ३५ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी किमान एक ते दीड तासाचा अवधी लागत आहे.त्यामुळे नादुरुस्त झालेल्या रस्त्याचे नूतनीकरण तातडीने होणे गरजेचे…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शहरामध्ये नोकरी निमित्त एक 28 वर्षीय तरुणी लग्नाच्या आमिषाने सरक पाच वर्षे बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी त्या संशयित आरोपी विरुद्ध एमाडिसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी संपत लक्ष्मण मल्हाड रा. दरीबडची ता. जत, जि. सांगली हा तरुणीच्या संपर्कात आला. त्यानंतर त्याने तरुणीला लग्नाचे आमिष देत तसेच जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. सन २०१६ ते ६ सप्टेंबर २०२१ या कालावधीत घडलेल्या घटनेप्रकरणी तरुणीने सोमवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीवरून संपत मल्हाड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि. प्रमोद कठोरे हे करीत आहेत.

Read More