जळगाव, प्रतिनिधी । तालुका ग्रामिण काँग्रेस कमिटीच्यावतीने आज उपजिल्हाधिकारी प्रविण महाजन यांना निवेदन देण्यात आले. जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीपिकांचे खुप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असल्यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तालुका काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. यावेळी तालुका अध्यक्ष मनोज चौधरी, प्रमोद घुगे, सचिन माळी, निलेश बोरा, भाऊसाहेब सोनवणे, भिकन सोनवणे, मुरली सपकाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Author: saimat team
यावल, प्रतिनिधी । यावल नगरपालिकेच्या अतिरीक्त साठवण तलावाच्या बांधकामात पावणदोन कोटी रुपयाच्या भ्रष्टाचार गैरप्रकार आणि अपहाराच्या आरोपाची वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी येथील तालुका भाजपाच्या वतीने बुधवार दि.29 रोजी येथील भाजपा शहर कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेतुन केली आहे. नगराध्यक्षा सौ.नौशाद मुबारक तडवी यांनी दोन दिवसापुर्वी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेवुन त्यांचेकडे यावल नगरपालिकेने उभारलेल्या अतिरिक्त साठवण तलावाचे कामात 1 कोटी 80 लाख रुपयाचा अपहार केल्याची लेखी तक्रार करून चौकशीची मागणी केली. या नगराध्यक्षांनी केलेल्या या भ्रष्ठाचाराच्या चौकशी मागणीस6 भाजपाने समर्थन करीत घडलेल्या या भ्रष्ठाचाराचा जाहीर निषेध करून भाजपने या सर्व प्रकरणाची चौकशीची मागणी…
यावल, प्रतिनिधी । माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील प्राचार्य मुख्याध्यापक सर्व अनुदानित माध्य व उच्च माध्य शाळांना लेखी सूचना देऊन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा दुस-या हप्त्या देण्याची कार्यवाही करावी असे कळविले आहे परंतु प्रत्यक्षात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दुसरा हत्ता मिळत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने जिल्हयामधील सर्व खाजगी अनूदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील सेवानिवृत्त कर्मच-यांना सातवा वेतन आयोग दुस-या हफ्त्याची देयके दिलेल्या तारखाना सादर करावी.ज्या शाळेतील कर्मचारी यांची भ.नि.नि.जमा करावयाची पहिल्या हफ्त्याची देयके तरतूद आभावी कार्यालयाकडे प्रलंबित असतील ती सर्व देयके कार्यालयातून परत घेऊन त्यातील सेवानिवृत्त कर्मच-यांची पहिल्या ह्फ्त्याची देयके रोखीने सादर करावी.तालुका देयके सादर…
जळगाव, प्रतिनिधी । भारत सरकार मान्यताप्राप्त. भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटना. महाराष्ट्र राज्य. जळगाव. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय भाऊसाहेब रघुनाथरावजी कांबळे साहेब. यांनी कुर्डूवाडी जि.सोलापूर.नगरपरिषदेचा जवळजवळ पाचशे कोटी रुपयांचा रुपयांचा घोटाळा पुराव्यासहित उघडकीस आणून सुद्धा शासन प्रशासनाने संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई गुन्हा,अथवा एफ.आय.आर.ची नोंद पुरावे असल्यावर सुद्धा केलेली नाही. संस्थापक अध्यक्ष यांनी सदर पुरावे पोलीस प्रशासनापासून तर संबंधित आणि जबाबदार अधिकाऱ्यांना देऊन सुद्धा गुन्ह्याची नोंद झालेले नाही. या कारणास्तव महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अध्यक्ष. उपाध्यक्ष व इतर पदाधिकारी संस्थापक अध्यक्ष यांचे आदेशानुसार लाक्षणिक उपोषण दि 30 गुरुवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष…
जळगाव, प्रतिनिधी । आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रम अंर्तगत इकरा युनानी मेडीकल कॉलेजतर्फे दि. २९ बुधवार रोजी मेडीकल कॅम्पचे शिरसोली येथे आयोजन करण्यात आले आहे. या कॅम्पचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष अ. करीम सालार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिरसोलीचे सरपंच हिलाल भील, उपसरपंच श्रावण शंकर ताड़े व ग्रामपंचायत सदस्य विनोद बारी, शशिकांत बारी, गौतम चौरे, सुभाष बारी, भगवान बोबड़े, ग्रामसेवक सुनिल दांडगे, नानाभाऊ पाटील, वनाभाऊ बारी, उमेश माळी, सुनिल बारी यांचे पुष्पगुच्छ देऊन महाविद्यालयाचे उप- प्रचार्य डॉ. शोएब शेख यांनी स्वागत केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे डॉक्टर व हॉस्पीटलचे कर्मचारी उपस्थीत होते. शिरसोली येथील बारी समाज मंगल कार्यालयात आरोग्य शिबीराचे आयोजन…
जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले असून याचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. जास्त नुकसानी झालेल्या परिसरात सरसकट पंचनामे करून आपत्तीग्रस्तांना शासकीय नियमानुसार मदत प्रदान करण्याचे निर्देशही ना.गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. याबाबत माहिती अशी की, जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून बर्याच ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने चाळीसगाव आणि पाचोरा तालुक्यात पुन्हा एकदा महापूर आला असून इतर तालुक्यांमध्येही मुसळधार पावसामुळे शेतीची मोठी हानी झाली आहे. जिल्ह्यातील वाघूर, बोरी आणि अंजनी ही धरणे पूर्ण भरली असून गिरणा धरण भरण्याच्या मार्गावर आहे. या…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । पेट्रोल आणि डिझेलचे दर आज वाढले आहेत. आज दिल्लीमध्ये, जिथे पेट्रोलचे दर 25 पैसे प्रति लीटरने वाढून 101.64 रुपये प्रति लीटर झाले. त्याचबरोबर डिझेलचा दर 30 पैसे प्रति लीटर वाढून 89.87 रुपये प्रति लीटर झाला आहे. सरकारी तेल कंपन्या दरांचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम सुधारित करतात आणि रोज संध्याकाळी 6 पासून पेट्रोलचे दर आणि डिझेलचे दर जारी करतात. महानगरांमधील आजचे नवीनतम दर जाणून घ्या आता दिल्लीत 1 लीटर पेट्रोलची किंमत 101.64 रुपये आहे. तर 1 लीटर डिझेल 89.87 रुपये प्रति लिटर उपलब्ध आहे. आता…
मुंबई, वृत्तसंस्था । विमानतळाच्या सभोवतालचा परिसर विकसित करून सर्व सुविधायुक्त शहर वसविण्यासाठी शिर्डीची निवड करण्यात यावी तसेच महाराष्ट्रातील एक उत्तम विकास केंद्र याठिकाणी वसवावे अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. आज ते महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोलत होते. वर्षा येथील समिती कक्षात झालेली ही ७६ वी बैठक होती. एरिया अराऊंड शिर्डी हब एअरपोर्ट म्हणजेच “आशा” असे या भागाचे नाव असेल. या भागाचा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी नावीन्यपूर्ण आणि सुनियोजित विकास करणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह,वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक,मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे,महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक…
मुंबई, वृत्तसंस्था । बंगाल उपसागरातल्या गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी, पुरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला. मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असलेले जलसंपदामंत्री जयंत पाटील व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. उस्मानाबाद जिल्ह्यात पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल पूरग्रस्त मराठवाड्यात पाठवण्यात आले असल्याचेही त्यांना सांगितले. अरबी समुद्रात शाहीन चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवल्यानं रेड अलर्ट असलेल्या पालघर, नाशिक, औरंगाबाद, जालना, जळगाव या जिल्ह्यांच्या तसंच ऑरेंज अलर्ट असलेल्या मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, नंदुरबार, धुळे…
पहूर, प्रतिनिधी । काल दिनांक 28 सप्टेंबर 2021 वार मंगळवार रोजी पहूर बस स्थानक परिसरातील कृषी पंडित कॉम्प्लेक्स मधील स्वामी समर्थ दुकानातून रोकड सह किराणा सामान चोरीला गेला होता. सदर घटनेचा पहूर पोलिस यांनी पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत असताना गुप्त बातमी द्वारा माहिती घेत पो.हे. कॉ. ईश्वर देशमुख, ज्ञानेश्वर ढाकरे, कुमावत यांनी संशयित आरोपी रोहित दिपक थोरात वय 22 याला बस स्थानक परिसरात अटक केली असता त्याच्या जवळ रोकड मिळून आली आहे. सदरील आरोपीला जामनेर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या चोरीचा तपास पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ.…