जळगाव, प्रतिनिधी । निराधारांच्या निस्वार्थ सेवेकरी यशस्विनी सामाजिक अभियान जनजागृती अभियान प्रमुख नगरसेविका योजनाताई पाटील यांना त्यांच्या निःश्वार्थ जनसेवा तथा विविध लोकाभिमुख उपक्रमशील योगदानाची दख़ल घेत आघाडीचे आंतरराष्ट्रिय दर्जा प्राप्त दैनिक दिव्यमराठी समुहाने जळगाव येथे नारीशक्ती पुरस्काराने समारंभपूर्वक जळगांव जिल्हा पोलिस अधीक्षक मा.प्रविणजी मुंडे, जिल्हाधिकारी अभिजितजी राऊत, निवासी संपादक दिपकजी पटवे, यूनिट हेड संजीवजी पाटील, पत्रकार प्रतिनिधी सुनीलजी कासार यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थितित गौरविण्यात आले. त्यानिमित्त सिद्धिविनायक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.स्वप्निलजी पाटील, प्र.प्राचार्य मा.सरपंच बी.वाय.पाटील, डॉ.भरत एस.पाटील, प्रा.संजय तांबटकर, प्रा.भाऊसाहेब बोरसे, ई.एम.पाटील, वाय.ए.पाटील, नगरसेविका योजनाताई पाटील यांचे पुरस्कार प्रदान प्रतिनिधी विद्याताई पाटील, प्राचार्य डी.डी.पाटील सह मान्यवरांनी योजनाताई पाटील यांचे विशेष…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी | जिल्ह्यातील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या निकालात तीन जणांना यश मिळाले आहे. परीक्षांची अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झालेली आहे. या वर्षी घेण्यात आलेल्या परीक्षांचे अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाले. यात जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थी यशस्वी झाले आहे. यात चोपडा येथील गौरव साळुंखे हा देशभरातून १८२व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. भुसावळ येथील श्रीराज मधुकर वाणी यांना ४३० वी रँक तर जळगाव येथील अक्षय साबद्रा यांना ४८०वी रँक मिळाली आहे. चोपडा येथील रहिवासी गौरव साळुंखे हा असून रवींद्र साळुंखे आणि सुरेखा साळुंखे यांचा चिरंजीव आहे रवींद्र साळुंखे व सुरेखा साळुंखे हे दोन्ही शिक्षक असून गौरवचे दहावीपर्यंतचे शिक्षण प्रताप विद्या मंदिर…
जळगाव प्रतिनिधी | शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कैलास पाटील यांचे आज ना. छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आपल्या समर्थकांसह प्रवेश घेतला आहे. माजी आमदार कैलासबापू पाटील यांनी २००४ च्या विधानसभा निवडणुकीत तेव्हाचे विधानसभाध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांचा दणदणीत पराभव केला होता. एक जायंट किलर म्हणून त्यांचा राज्यभरात लौकीक झाला होता. यानंतर २००९ साली हा मतदारसंघ राखीव झाल्यामुळे ते पुन्हा निवडणूक लढवू शकले नाहीत. यानंतर २०१४ च्या निवडणुकीत प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना निवडून आणण्यातही त्यांनी महत्वाची भूमिका निभावली. नंतर मात्र प्रा. सोनवणे आणि कैलासबापू यांच्यात दुरावा निर्माण झाला. पक्षविरोधी कारवाया केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. कैलास पाटील हे हातावर घड्याळ बांधणार…
मलकापूर प्रतिनिधी सतीश दांडगे मोबाईल फोन मधील फोटो आणि इतर सामग्री नेस्तनाबूत करण्यामागचा पोलिसांचा हेतू काय! दैनिक देशोन्नती चे पत्रकार समाधान भाऊ गाडेकर आपले कर्तव्य बजावत असताना पोलिसांनी त्यांना फोटो काढण्यापासून मज्जाव करीत लोटपोट करून मारहाण केली या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने उपरोक्त पोलिसांवर कारवाई करून त्यांना नोकरीवरून बडतर्फ करण्यात यावे या मागणीच्या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी बुलढाणा यांना देण्यात आले. सविस्तर असे की,१४ सप्टेंबर च्या सकाळी अकरा वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा व स्थानिक चिखली पोलीसांनी चिखली खामगाव रोडवरील हाॅटेल अमृतत्युल्य जवळ एका ट्रकमधून प्रवासी वाहतुक करीत असलेल्या लोकांकडुन जवळपास ८८ कीलो गांजा पकडल्याची माहिती मिळताच…
जामनेर प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील पहूर येथे संभाजी नगर जळगाव महामार्गावर लाबेला हॉटेल जवळ आज मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास लघुशंकेला थांबलेला आयशर मधील चालक-वाहक थांबलेले असताना पाठीमागून आयशर ट्रक ने भरधाववेगाने येऊन जोरदार धडक देऊन यात एक जण ठार तर दोन जण जखमी झाले आहे सविस्तर माहिती अशी की आज मध्यरात्री तीन वाजेच्या जळगाव संभाजीनगर महामार्गावर येथील लाबेला हॉटेल जवळ संभाजीनगर हुन जळगाव कडे जाणाऱ्या आयशर ट्रक क्रमांक mh19z3346 चालक विलनर लघुशंकेसाठी थांबले असताना भरधाव वेगाने पाठीमागून येणाऱ्या आयशर ट्रक क्रमांक,mp04gb7763 या अशा ट्रकने उभ्या असलेल्या आशयरट्रकला जोरदार धडक दिल्याने लघुशंकेसाठी थांबलेला विलन्नर राजीक जहुर शेख,, वय 40 हा जागीच ठार…
जामनेर (प्रतिनिधि) – जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचा 2003 ते 2008 साठी संचालक मंडळ चेंज रिपोर्ट करीता सन 2004 मध्ये दिवंगत आबाजी नाना पाटील यांनी केलेला अर्ज क्रमांक 614/2004 धर्मदाय आयुक्त जळगाव यांनी फेटाळून दिला आहे. तसा आदेश 21/09/2021 रोजी पारित केलेला आहे . याबाबत सविस्तर वृत्त असे की जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी मधे संचालक मंडळ अधिकृत कोण याबाबत बऱ्याच वर्षा पासून वाद असून 1999 पासून संस्थेचे चेंज रिपोर्ट प्रलंबित असल्याने संस्थेचे खरे हक्कदार कोण हे प्रश्न चिन्ह कायम आहे. प्रशासकीय लढाई सुरु असताना 1999 ते 2003 या काळात दिवंगतआबाजी नाना पाटील व नारायण चौधरी यांनी अध्यक्ष व सचिव म्हणुन काम…
धरणगांव प्रतिनिधी – येथे दि. २२ सप्टेंबर, २०२१ बुधवारी वसंतराव भोलाणे यांचा ६४ वा जन्मदिनाचे औचित्य साधून महाआरोग्य शिबिराचे आयोजन पी आर हायस्कूल येथे करण्यात आलेले होते. सविस्तर वृत्त असे की, शिबीराचे उद्घाटन बापूसाहेबांचे आई- वडील सौ. व श्री. वैजंताबाई – शिवदास गरबड भोलाणे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यानंतर विचार मंचावर अभिष्टचिंतन समारोह कार्यक्रम साजरा करण्यात आला. याप्रसंगी जागृत जनमंचचे शिवराम पाटील व तेली समाजाचे के डी चौधरी यांनी सत्कारमूर्ती ऍड. व्ही एस भोलाणे यांच्याविषयी गौरवोद्गार केले. तसेच, भाजपचे नेते सुभाष पाटील, जिल्हा उपाध्यक्ष पी.सी. पाटील, कन्हैया रायपुरकर, शिवदास भोलाणे, अरविंद देवरे, पी.डी.पाटील सर, लक्ष्मण पाटील सर, जितेंद्र…
जळगाव प्रतिनिधी :- स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करणाऱ्या कोरोना योद्धयांना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या मागण्यासाठी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्या वतीने आज दिनांक २४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनात यापुढे लोकप्रतिनिधींच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची सेवा करण्यासाठी जीवाच्या भीतीपोटी कोणीही पुढे येत नसताना कंत्राटी स्वरूपात काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, आया, डाटा एंट्री ऑपरेटर, सुरक्षारक्षक, सफाई कामगार यांच्या समर्पित त्यामुळे नागरिकांचा जीव वाचला आहे.या कोरोना योद्धयांना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाने राष्ट्रव्यापी आंदोलन पुकारले आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणांच्या निनादात ठिय्या आंदोलन…
धानोरा ता.चोपडा (वार्ताहर ) :— निखिल अनिल बडगुजर याने कोकण ज्ञानपीठ काॅलेज ऑफ इंजिनिअरींग कर्जत येथे बी.ई.मॅकेनिकल ची पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन त्याने पुढील उच्च शिक्षणासाठी Nottingham Union University Englend ( UK ) नाॅटिंगहम युनियन विद्यापीठ इंग्लंड येथे रवाना झाला .निखिल याने पुढील शिक्षणासाठी इंग्लंड येथे Industrial Management (इंडस्ट्रीअल मॅनेजमेंट) या विषयाची निवड केली आहे. चि.निखिल हा चिंचोली ता.यावल येथिल मधुकर दामु बडगुजर यांचा नातु तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत असलेले अनिल बडगुजर यांचा द्वितीय मुलगा आहे.अनिल बडगुजर यांचा मोठा मुलगा अभिषेक बडगुजर हा देखील चार वर्षे पुर्वी अमेरिकेत एम.एस चे उच्च शिक्षण घेवुन तिथे नोकरी करीत आहे.निखिल बडगुजर हा…
नाशिक: भारतातील अग्रगण्य निदान सेवा प्रदाता मेट्रोपॉलिस हेल्थकेअर लि.ने त्यांचे नवीन चाचणी केंद्र महाराष्ट्रातील नाशिक मध्ये सुरू केले आहे. 750 स्क्वेअर फूट इतक्या जागेवर असलेल्या या प्रयोगशाळेत दरमहा सुमारे 30,000 नमुने चाचणी करण्याची क्षमता आहे. या मुळे उच्च-गुणवत्तेचे अहवाल किमान वेळेत प्राप्त करणे शक्य होणार आहे. केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.आवेश पल्लोड लाभले. मेट्रोपॉलिस लॅबोरेटरी, नाशिक, मध्ये मूलभूत पॅथॉलॉजी चाचण्यांपासून ते मॉलिक्यूलर डायग्नोस्टिक या हाय-एंड निदान चाचण्यांपर्यंत सुमारे 80+ वेगवेगळ्या चाचण्या केल्या जाऊ शकतात. मेट्रोपॉलिस हेल्थकेअर लिमिटेडची प्रयोगशाळा औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर आणि इतर ठिकाणी आहेत. मेट्रोपॉलिस हेल्थकेअर लि.च्या नाशिकमधील डॉ. पटेल मेट्रोपॉलिस…