पाचोरा, प्रतिनिधी । संपूर्ण जिल्ह्यासह पाचोरा व भडगाव तालुक्यात गुलाब चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे व मागील काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसाने उद्भवलेल्या पूर सदृष्य परिस्थितीने दोन्ही तालुक्यात कापूस,मका,ज्वारी, बाजरी,तूर इ.पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी पूर्णपणे आर्थिक दृष्ट्या संकटात सापडला आहे.तसेच पाचोरा व भडगाव तालुक्यात खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या उडीद मूग सोयाबीन इत्यादी पिकांची मागील काळात पावसात मोठा खंड पडल्याने पिकाच्या दाणे भरण्याच्या अवस्थेत पूर्णपणे नुकसान झाले होते.त्यावेळी देखील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. यावर्षी जळगाव जिल्ह्यात पर्जन्यमानाची परिस्थिती पाहता खरीप हंगामाच्या सुरुवातीला कमी पाऊस झाल्याने पिकांची वाढ खुंटली होती.परंतु शेतकरी बांधवांनी उपलब्ध सिंचन सुविधेद्वारे पीके जतन…
Author: saimat team
जळगाव प्रतिनिधी । शहरातील टॉवर चौक येथे शहर पोलीस स्थानकाच्या पोलीस कर्मचाऱ्यांना काही तरुणांनी मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी त्या तरुणांविरुद्ध शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या बाहेरच टॉवर चौकात गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास विनाकारण फिरणाऱ्या तरुणांना हटकल्याचा राग आल्याने काही तरुणांनी चक्क पोलीस कर्मचाऱ्यालाच त्याच्याच काठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, जमावाने पोलीस ठाण्यात देखील वाद घातल्याने तणाव वाढला होता. सहाय्यक अधीक्षक आल्यानंतर याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी किशोर निकुंभ हे गुरुवारी आपले कर्तव्य बजावून नातेवाईकांना सोडविण्यासाठी रेल्वे स्थानकावर गेले…
जामनेर, प्रतिनिधी । तालुक्यातील तोंडापुर येथील नवोदित अभिनेता विशाल गवळी याचं एक अहिराणी गाण्याचं चित्रीकरण ढालखीची धार या निसर्गरम्य परिसरात, नुकतच पार पडले असून या गाण्यत विशाल गवळी नावाचा तरुण मुख्य भुमिकेत दिसणार आहे. विशाल सोबत, रिया चित्ते आणि विशाल बोरसे हे दोन नामांकित चेहरे सुद्धा या गाण्यात पहायला मिळणार आहेत, या गाण्याचे गीतकार खानदेशातील सुप्रसिद्ध गीतकार ज्यांची गाणे आख्या खांदेशभर पोहचले आहेत असे नामांकित गीतकार कंपोझर प्रा रत्नाकर कोळी सर असून दिग्दर्शक म्हणून देखील त्यांनीच काम पाहिले आहे. गाण्याचे गायक बेवफा साॅंग किंग अशोक कोळी असून नरेंद्र गायकवाड यांनी संगीत दिले आहे व आर के म्युझिक स्टुडिओ जळगाव येथे…
जळगाव, प्रतिनिधी । शहरातील एक उच्चभ्रू वस्तीत असणाऱ्या कुंटणखाना एमआयडीसी पोलिसांनी 30 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास धाड टाकली आहे याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजिंठा चौकाजवळील एक भागात असणाऱ्या उच्चभ्रू वस्तीत भाड्याच्या घरात सुरू असलेल्या कुटंनखान्यावर एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने आज गुरुवारी 30 सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता छापा मारला. या ठिकाणाहुन एक महिला व दोन दलालांना ताब्यात घेण्यात आले. तीन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली. अमोन आदिनाथ दारकुंडे (वय २९, रा. क्रांतीचौक, शिवाजीनगर) व प्रशांत रतन जैन (वय ३१, रा. अयोध्यानगर, अजिंठा हौसिंग सोसायटी) असे अटक केलेल्या दलालांची नावे आहेत. त्यांच्यासह एका…
जळगाव, प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे. जळगाव जिल्ह्यात अधिकाधिक पात्र नागरिकांचे लसीकरण करून घेण्यासाठी लसीकरण मोहीम मिशन मोडवर राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले. जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी आज सायंकाळी कोविड- 19 लसीकरण आढावा बैठक ऑनलाइन आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. राऊत बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी ऑनलाइन सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी श्री. राऊत म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून पुरेशा प्रमाणात आता लस उपलब्ध होत आहे. त्यामुळे…
जळगाव, प्रतिनिधी । अनाथाच्या हातून घडले समाजकार्य अमोल पाटील यांनी त्यांच्या अन त्यांच्या भावनातून निघालेल्या समाजकार्य या महान कार्यात त्यांच्या मित्रांनी मिळून अनाथ व विधवा विकास बहुउद्देशीय संस्था स्थापन करून समाजातील अनाथ व विधवा विकास बेघर गोरगरीब सेवा करण्याची त्यांची व त्यांच्या मित्रांची इच्छा आहे त्यांनी आतापर्यंत शालेय साहित्य 15 ऑगस्ट रोजी वाटप केले. मुलांना अभ्यासात गोडी निर्माण व्हावी, म्हणून व आता त्यांचे सहकारी मित्र हरीश मांडोळे यांनी त्यांच्या मित्रा च्या काकूचे वर्ष श्राध्द चे कार्यक्रम त्यामधून दहा अनाथ मुलांना व मुलींना शालेय साहित्य व स्कूल बॅग ड्रेस कपडे चप्पल जेवण व विधवा महिलांना साडी वाटप केली हे वाटपाचे कार्यक्रम…
मुंबई, वृत्तसंस्था । भाजपच्या नेत्यांना भाजप कार्यकर्ते भेटतात ही काही बातमी नाही कारण राज्यपाल भवन हे आता राजकीय अड्डा झालाय, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. भाजप नेते राज्यपालांची भेट घेणार अशा बातम्या चालवल्या जात असल्याने त्यावर नवाब मलिक यांनी जोरदार प्रहार केला आहे. राज्यपाल भवन हे राजकीय अड्डा झाला आहे. भाजपचे नेते व कार्यकर्ते राज्यपालांना नेहमीच भेटत असतात. राज्यपाल पदाचा वापर राजकीय हेतूने होतोय हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यपाल भवन राजकीय अड्डा झाला असल्याबाबत कुणाचे दुमत नाही असेही नवाब मलिक म्हणाले.
मुंबई, वृत्तसंस्था । महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) दहशतवादी कृत्यासंबंधी आणखी एका संशयिताला अटक केली आहे. मोहम्मद इरफान रहमत अली शेख (वय ५०) असं संशयित दहशतवाद्याचा नाव आहे. एटीएसने दोन संशयित दहशतवादी झाकीर हुसेन शेख आणि रिझवान मोमीन यांना ताब्यात घेतल्यानंतर तीन दिवसांनी, एटीएसने गुरुवारी या प्रकरणात पुन्हा तिसरी अटक केली. मोहम्मद इरफान रहमत अली शेख (५०) या संशयिताला त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली. एटीएसने उघड केले की, झाकीर आणि रिझवानच्या चौकशी दरम्यान अली शेखच्या भूमिकेबद्दल सांगितले. त्यानंतर त्याला नागपाडा येथील एटीएसच्या कार्यालयात चौकशीसाठी आणण्यात आले आणि गुरुवारी पहाटे अटक करण्यात आली. एका सुत्राने सांगितले, “सतत चौकशी केल्यानंतर…
जळगाव, प्रतिनिधी । चप्पल विक्री करणाऱ्या विक्रेत्याच्या १५ हजार रूपये किंमतीच्या गोणीभर चप्पल, सॅंडल लंपास केल्याची घटना २८ सप्टेंबर रोजी घडली होती, याप्रकरणी शहर पोलिसांनी त्या चोरट्यांना २९ रोजी सायंकाळच्या सुमारास अटक केली आहे. जळगावातील पिंप्राळा हुडको परिसरातील रहिवासी जुबेर युसूफ शेख (वय २७) हा फुले मार्केट परिसरात हातगाडीवर चप्पल, सॅंडल विक्रीचा व्यवसाय करतो. मंगळवार २८ रोजी दुपारी १२ वाजता काँग्रेस भवन, फुले मार्केट गेट जवळ दुकान लावले होते. दुपारी १२.३० च्या सुमारास अचानक पाऊस सुरू झाल्याने सर्व माल ६ गोणीत भरून त्याने समोर असलेल्या दु.क्र.१२८ च्या बाहेर ठेवून घरी निघून गेलो. दुकान मालक अजय चौधरी यांना सांगून जुबेर घरी…
जळगाव, प्रतिनिधी । रोटरी क्लब जळगाव ईस्ट आणि कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विदयमाने ” चला मधुमेह ला हरवू या” या मोफत शिबिरात २९३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. हे शिबिर कांताई रुग्णालय आणि जैन इरिगेशनच्या बांभोरी येथील आस्थपनेत झाले. या शिबिरात रुग्णांची शुगर लेव्हल, शुगर लेव्हल जास्त असल्यास जास्त झालेल्या शुगरला नियंत्रणात आणण्यासाठी रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. डॉ.राहुल भन्साळी, डॉ. डॉली रणदिवे, त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अमेय कोतकर आणि नेत्र तपासणी कांताई रुग्णालयातील डॉक्टरांनी केली, अशी माहिती रोटरी क्लब जळगाव ईस्टचे अध्यक्ष सीए वीरेंद्र छाजेड, सचिव प्रणव मेहता यांनी दिली. शिबिर यशस्वीतेसाठी कांताई नेत्रालयाचे अमर चौधरी, तसेच डॉ. जगमोहन छाबडा, संग्राम…