Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील मेहरूण परिसरामध्ये प्रभाग क्रं १५ मधील महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते एलईडी लाईट्स उभारण्यात आले. शहरातील मेहरूण परिसरातील प्रभाग क्रमांक १५ मध्ये माननीय नामदार गुलाबरावजी पाटील त्यांनी डीपीडीसी मधील नागरी दलितेतर वस्ती सुधार योजना 2020 21 अंतर्गत नऊ मीटर 21 नगर साडेबारा मीटर तिचे दोन नग चे हायमास्ट व मिनी हायमास्ट उभे करणे या कामासाठी सोडा लक्ष रुपये दिले होते. सदर कार्यक्रमास महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महापौर नितीन लढ्ढा, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक प्रशांत नाईक, सलमान खाटीक, अनिल सोनवणे, ठेकेदार सत्यम इलेक्ट्रिकलचे मयूर चौधरी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read More

जळगाव, प्रतिनिधी । अनेक दात्यांनी आपल्या घरच्या जुन्या सायकली भरारी फाऊंडेशनला हाकेला प्रतिसाद देत उपलब्ध करून दिल्या. भरारी संस्थेने त्या सायकली दुरुस्त करून घेतल्या. जिल्हाभरातील गरीब, गरजू व होतकरू अशा पंधरा विद्यार्थ्यांना शोधून त्यांना सायकली उपलब्ध करून दिल्या. अनेक विद्यार्थ्यांना बस, रिक्षाचा खर्च परवडत नाही. अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये हा यामागचा हेतू आहे. दोन गरजू, मजूर व्यक्तीही या उपक्रमाच्या लाभार्थी ठरल्या. त्यांनाही मान्यवरांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले. भरारी फाऊंडेशनला या उपक्रमात लक्ष्मीनारायण मनियार यानी दोन नवीन साइकल उपलब्ध करुन दिल्या.दिलीप चोपड़ा,गजानन मालपुरे,बाळासाहेब सूर्यवंशी,कृष्णा श्रीवास्तव, संजय सालुंखे,अर्चना जाधव,अभय मुथा, बाली वर्मा,नीलेश ललवानी,संगीता धनगर,ज्योति राजपूत यानी प्रत्येकी एक साइकल उपलब्ध…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज दिवसभरापासून दोन रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे, तसेच सहा रुग्ण आता उपचार घेत असल्याची माहिती अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज जळगाव शहर आणि चोपडा तालुक्यातील प्रत्येक एक असे एकुण दोन बाधित रूग्ण आढळून आले आहे. आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख ४२ हजार ७३७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार १५६ रूग्ण बरे होवून घरी परतले. आता सध्या सहा संक्रमित रूग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा बंदचे आवाहन संयुक्त किसान मोर्चाने मोदी सरकारच्या दिवाळखोर आणि देश बुडव्या धोरणाच्या विरोधात आज 27 सोमवार रोजी भारत बंद करण्याचे बुलंद हाक दिली आहे. राज्यात हा बंद यशस्वी करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मार्क्सवादी कम्युनिट पक्ष इत्यादी राजकीय पक्ष व सर्व पुरोगामी संघटनांनी बंदचे आवाहन केलेले आहे. जनविरोधी व कॉर्पोरेट धार्जिणे ३ कृषी कायदे व ४ श्रम संहिता रद्द करा, विज दुरुस्ती विधेयक मागे घ्या; संपूर्ण उत्पादन खर्चाच्या दीड पट हमी भाव शेतकऱ्याना मिळावा यासाठी केंद्रीय कायदा करा; खाजगीकरणाचे धोरण बंद करा; डिझेल;पेट्रोल; गॅस इत्यादीचे भाव वाढ कमी करा;नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा;लोकशाही धर्मनिरपेक्षता आणि देशाच्या संविधानाचे…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । अखिल भारतीय मराठा महासंघांची जिल्हा कार्यकारिणी घोषीत करण्यात आली. मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे, कोषाध्यक्ष प्रकाश देशमुख, चिटणीस प्रमोद जाधव, राष्ट्रीय युवक प्रतिनिधी अतिष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यावेळी जिल्हा अध्यक्षपदी प्रा.मनोज पाटील, संपर्क प्रमुखपदी सुदर्शन देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष चंदन पाटील, उपाध्यक्ष अतुल सोनवणे, उपाध्यक्ष राहुल पाटील, सरचिटणीस दिपक पाटील, जिल्हा संघटक गोपाल पाटील, युवक अध्यक्ष शुभम पवार, जिल्हा युवक कार्याध्यक्ष मंगेश पाटील, युवक उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, युवक सरचिटणीस पंजाब देशमुख, महानगर अध्यक्ष जयेश पाटील, महानगर उपाध्यक्ष विजय बांदल, महानगर युवक अध्यक्ष प्रदीप पाटील, महानगर युवक उपाध्यक्ष पंकज पाटील व तसेच जिल्हा भरातील…

Read More

चाळीसगाव, प्रतिनिधी । शहरातील कन्नड घाटामध्ये पुन्हा दरड कोसळली आहे. दरम्यान या घाटामधून कोणीही प्रवास करू नये, असे आवाहन महामार्ग पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे. चाळीसगाव परिसरासह इतर अन्य भागांमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे डोंगर भागातील तितुर व डोंगरी नदीला मोठा पूर आला आहे. दरम्यान, ३१ ऑगस्ट रोजी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे कन्नड घाटामध्ये दरड कोसळून रस्ता खचला होता. त्यामुळे काही दिवसांसाठी घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. जिल्हाप्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून व पाहणी करून दुचाकी, हलक्या व छोट्या वाहनांच्या वाहतुकीसाठी हा घाट खुला केला होता. अवजड वाहनांना अजूनही हा घाट प्रवासासाठी खुला करण्यात आलेला नव्हता. घाट खुला करून १० दिवस…

Read More

यावल, प्रतिनिधी । सावदा येथील कोथरूड खुर्द गावात विजेच्या खांबावरील तार तुटून अंगावर पडल्याने पाच बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी घटनास्थळी सावदा पोलिस दाखल झाले. येथून जवळच असलेल्या कोचुर खुर्द गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील विजेचा खांबावरील तार तुटून पाच बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सकाळी बकऱ्यांना चारण्यासाठी नेत असतांना हा अपघात घडला असून संबधितांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. कोचुर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात विजेचा खांबावरील तार तुटून अचानक चरण्यासाठी जात असलेल्या ५ बकऱ्यांवर पडली. यात गौतम तायडे यांच्या मालकीच्या तीस हजार किमतीच्या तीन, युवराज तायडे यांच्या मालकीची सात हजार किमतीची १तर संतोष तायडे यांच्या मालकीची…

Read More

भुसावळ प्रतिनिधी | शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांची जळगाव येथील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. या माध्यमातून जिल्हा पोलीस प्रशासनाने झाडाझडतीस प्रारंभ केल्याचे दिसून येत आहे. पंचशीलनगरातील धम्मप्रिय सुरळकर या तरुणाचा २० सप्टेबर रोजी नशिराबाद उड्डाण पुलाच्या खाली खून झाल्याने खळबळ उडाली आहे. पूर्व वैमनस्यातून हे हत्याकांड घडले असून यात आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांचा हलगर्जीपणा कारणीभूत होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. या अनुषंगाने भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. समीरचा भाऊ मोहंमद कैफ याच्या खून खटल्यातील संशयित म्हणून धम्मप्रिय ११ महिन्यांपासून…

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । भारतीय आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) सातत्याने चढ-उतार होत असते. मागच्या आठवड्यात सोन्याचे भाव वधारले होते. मात्र या आठवड्यात सलग चार ते पाच दिवस सोन्याच्या किंमतीत (Gold Price) घट होताना दिसत आहे. त्यामुळे या महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये सोन्या-चांदीचा दर सर्वात कमी आहे. आज (शनिवारी) 22 कॅरेट सोन्याच्या दर 45,240 रुपये आहे. तर चांदीची किॆमत (Silver Price) 60,600 रुपये प्रति किलो पोहचली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये सलग घसरण झाली आहे. त्यामुळे या महिन्यात ग्राहकांना सोनं खरेदी करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. त्यामुळे आतंरराष्ट्रीय सराफा बाजारातही सोन्याच्या…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । राज्यातील महाविकासआघाडी सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. शाळा, धार्मिकस्थळांपाठोपाठ आता, राज्यभरतील चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करण्यास देखील परवानगी दिली गेली आहे. त्यानुसार २२ ऑक्टोबर पासून राज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू होणार आहेत. आज मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवास्थान ‘वर्षा’ येथे झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. करोना नियमांचे पालन करून चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू करण्यास राज्य सरकारकडून परवानगी दिली गेली आहे. राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे. यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर…

Read More