Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरच्यावतीने 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोंबरपर्यंत सेवा समर्पण अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून उद्या दि 2 ऑक्टोंबर शनिवार रोजी महात्मा गांधी,व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त भाजपा जिल्हा महानगरतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळयाला माल्यार्पण करण्यात येईल, फुले मार्केट परीसर येथे स्वछता अभियानाची सुरवात ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, स्थायी सभापती राजेंद्र घुगे – पाटील, गटनेते भगत बालाणी व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात येईल तसेच खालील प्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे मंडल क्र…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । नारी शक्ती ग्रुप जळगाव तर्फे बेघर निवारा केंद्रातील आजी-आजोबांसाठी नेत्र तपासणी शिबिर मांगीलालजी बाफना नेत्रपेढी जळगाव येथे आयोजित करण्यात आले होते. यात आदित्य ढवळे पाटील बहुद्देशीय सेवाभावी संस्था बेघर निवारा केंद्र येथील एकूण 32 जणांची नेत्रतपासणी केशव स्मृती प्रतिष्ठान व आर सी बाफना फाऊंडेशन संचलित मांगीलालजी बाफना नेत्रपेढी व चिकित्सालय या ठिकाणी डॉ.नयना उभाड पाटील एम. एस.ऑप्थो. यांनी केली व नेत्र तपासणीतून चष्मे तयार करण्यात आले असून चष्मे वाटप महापौर जयश्री महाजन, उपायुक्त शाम गोसावी व इतर मान्यवरांच्य्या हस्ते करण्यात येणार आहे. बऱ्याचदा आपण बघतो की वाढदिवस हे पुष्पगुच्छ देऊन केक कापून अथवा अन्नदान करून साजरे केले…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या संकटातून बाहेर काढणे आवश्यक आहे. त्याकरीता झालेल्या नुकसानीचे पंचनामे चार दिवसाच्या आत पूर्ण करुन अहवाल शासनास सादर करा. असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिलेत. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता रुपा गोजरे, लघु पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता श्री.…

Read More

एरंडोल, प्रतिनिधी । भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या एरंडोल शाखेमार्फत विविध प्रकारचे उपक्रम राबविले जात असून शिक्षक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील एकूण दहा आदर्श शिक्षकांची निवड करून त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यात महिला व बालविकास विभागांतर्गत सुरू असलेले कै.यशवंत बळीराम पाटील शिक्षण प्रसारक मंडळ तळई संचलित अनाथ निराधार निराश्रित मुलांचे बालगृह खडके बु. ता.एरंडोल येथील अधीक्षक मधुकर कपाटे यांना अनाथ मुलांचे पालन पोषण संगोपन व पुनर्वसनासाठी आणि मुलांच्या सुप्त गुणांना वाव देऊन विविध उपक्रम राबवून बालकांना देशाचे भावी नागरीक घडविण्याचे कार्य करुन राष्ट्र निर्माण करण्यासाठी अतुलनीय योगदान देत असल्यामुळे सागर महाजन जिल्हा समन्वयक मिलिंद सूर्यवंशी, एरंडोल तालुका अध्यक्ष राकेश राजपूत,…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । अन्न व औषध प्रशासन विभाग आणि दी जळगाव मार्केट यार्ड आडत असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी उत्पन्न बाजार समितीत असोसिएशनच्या सभागृहात अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 अंतर्गत परवाना/नोंदणीबाबत विशेष शिबिर घेण्यात आले. या शिबिरात अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांनी अन्न व्यावसायिकांना अन्न सुरक्षा मानके कायद्यातील तरतुदींबाबत मार्गदर्शन केले. यात प्रामुख्याने 1 ऑक्टोबरपासून विक्री बिलांवर अन्न सुरक्षा मानके कायद्यातंर्गत परवाना क्रमांक नमूद करणे बंधनकारक असल्याचे सांगितले. तसेच अन्न धान्य घाउक विक्री, आडतदार, अन्न धान्य वितरक आणि अन्न पदार्थ साठवणुकीसाठी वापरले जाणारे गोदाम याकरीता परवाना/ नोंदणी बंधनकारक असल्याचे सांगितले. या वेळी त्यांनी अन्न व्यावसायिकांच्या शंकांचे निराकरण करुन शिबिराच्या…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । केसीई सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या एकपात्री नाट्यछटा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पाडण्यात आला. सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हर्षल पाटील केसीई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर केसीई सोसायटीचे शालेय शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी , संदीप केदार , मुख्या. रेखा पाटील तसेच डी व्ही चौधरी यांच्या हस्ते गणेश पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नाटकाने आपल्या जीवनाचे खरे चित्र समोर येते. कालबाह्य झालेल्या गोष्टी शिकणे आणि त्यामध्ये प्रावीण्य संपादन करणे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती प्रत्येकाने केली पाहिजे. ज्या प्रमाणे नाटकात आपल्या चेहऱ्यावर ती आपल्या जीवनाचे वेगवेगळे हावभाव दिसतात त्याचप्रमाणे आपला चेहरा सदा बोलका…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील नूतन वर्षा कॉलनी येथे भारत विकास परिषदेच्यावतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील महाबळ परिसर येथील नूतन वर्षा कॉलनी भागात भारत विकास परिषदेच्यावतीने आज 1 ऑक्टोबर दुपारी ३ वाजेपासून ते 5 वाजेपर्यंत महिलांसाठी लहान मुलांसाठी हिमोग्लोबीन व दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी डॉ. प्रभू व्यास, डॉ. राहुल व्यास, डॉ. योगेश पाटील, डॉ. दिक्षा सिकवाल, भारत विकास परिषद जळगाव शाखेचे अध्यक्ष उज्वल चौधरी, महिला संयोजिका सीमा महाजन, सचिव उमेश पाटील, सभासद प्रशांत महाजन, राधिका नारखेडे, जानवी खाडिलकर, हेमांगीनी महाजन, शैलेजा कोचर, नाना कोळी आदींची उपस्थिती होती.

Read More

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील विविध समस्या आणि नागरिकांच्या अडीअडचणी संदर्भात जळगाव जिल्हा काँग्रेस सेवा फाउंडेशन तर्फे दि.30रोजी यावल तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले. यावल तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की यावल तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेचे मानधन दोन तीन महिन्यापासून लाभार्थ्यांना मिळाले नाही. त्यामुळे आपण वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करून ते मानधन तात्काळ मिळणे कामी कार्यवाही करावी.तालुक्‍यातील अनेक नागरिकांनी लाभ मिळण्यासाठी संजय गांधी निराधार योजनेसह इतर अनेक योजनेत शासनाकडून लाभ मिळणे कामी अनेकांनी अर्ज दाखल केलेले आहेत.यासाठी समितीची बैठक लवकर घेऊन सदर प्रकरणाचा निपटारा करावा. ग्रामीण भागातील अनेक गोरगरीब आदिवासी,दलित, अल्पसंख्यांक आणि इतर अनेक लाभार्थ्यांना पॉश मशीन थम्ब टेक्नॉलॉजीमुळे…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । कापसाच्या नवीन वाणांची माहिती, कापूस पिकाच्या उत्पादन वाढीसाठी करावयाच्या उपाययोजना, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, यांत्रिकीकरण व इतर घटकांबाबत जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीजास्त माहिती व्हावी, याकरीता जागतिक कापूस दिनाचे औचित्य साधून कृषि विभागातर्फे जिल्ह्यात 7 ऑक्टोबर, 2021 रोजी एकदिवशीय राज्यस्तरीय कापसू परिषद आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे. येथील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात कृषी विभागातर्फे या एक दिवसीय राज्यस्तरीय कापूस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत कापूस पिकासाठीचे तंत्रज्ञान, उत्पन्नवाढीसाठी करावयाच्या उपाययोजनांसह इतर विषयांवर तज्ञांची चर्चासत्रे व नाविन्यपूर्ण बाबींचे कृषी प्रदर्शन लावण्यात येणार आहे. राज्यस्तरीय कापूस…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यालयाच्या परीसरात कोणी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करीत असतील अथवा सार्वजनिक ठिकाणी थुंकत असतील अशा व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करावी. असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेत. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा मौखिक आरोग्य व तंबाखू नियंत्रण समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच ऑनलाईन पार पडली, यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भीमाशंकर जमादार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रमोद पांढरे, श्रीमती विद्या राजपूत, डॉ नितीन एस भारती, जिल्हा सल्लागार, निशा कटरे, सायकॉलॉजीस्ट, राष्ट्रीय तंबाखू…

Read More