जळगाव प्रतिनिधी । आज देशव्यापी भारत बंद संप पाळण्यात येत आहे. या अनुषंगाने आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बाजारपेठेतून रॅली काढून व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन आज सोमवार सकाळी 11 वाजता केले. भारत बंदला शहरातून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या शेतकरी विरोधी तीन काळे कायद्याच्या विरोधात विविध मागण्यांसाठी आज देशव्यापी भारत बंदचा संप पुकारण्यात आला आहे. देशातील जनतेचा आक्रोश समाजासमोर यावा, यासाठी भारत बंदची हाक सर्व पक्षांनी एकत्र येऊन दिली आहे. कायद्याची तोडमोड करून देशात हुकुमशाही आणण्याचा कट मोदी सरकारने केला आहे. याला तोंड फोडणे आवश्यक असल्याने भारत बंदचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीत अकरा महिन्यांपासून शेतकरी…
Author: saimat team
जळगाव प्रतिनिधी । शहरात २४ वर्षीय तरुणाने तलवार घेऊन दहशत पसरविणाऱ्याला एमआयडीसी पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामेश्वर कॉलनी येथील सिद्धार्थ नगरात राहणाऱ्या सागर पुनम कंडारे (वय-२४) अश्या संशयित आरोपीचे नाव आहे. एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर कंडारे हा शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात हातात ३० इंच लांबीची लोखंडी तलवार घेऊन दहशत माजवत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारी यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख, पोलीस नाईक सुधीर साळवे, हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, इमरान शेख यांनी रामेश्वर कॉलनीत रात्री १२.३० वाजेच्या सुमारास गस्तीवर असतांना संशयित आरोपी सागर…
चाळीसगाव, प्रतिनिधी । केंद्र सरकारने कृषी धोरणाच्या विरोधात पारीत केलेले काळे कृषी कायदे त्वरित मागे घ्यावे या मागणीसाठी चालवलेल्या शेतकरी उपोषणाला पाठिंबा म्हणून अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने भारत बंद चे आयोजन केले. या बंद साठी चाळीसगाव तालुका महिला कांग्रेस, तालुका काँग्रेस व सेवादल तर्फे कचेरी चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले शेतकरी विरोधी काळा कायदा त्वरित मागे घ्यावे या आशयाचे निवेदन चाळीसगाव चे तहसीलदार श्री अमोल मोरे साहेब यांना देण्यात आले. यावेळी महिला अध्यक्षा सौ अर्चना पोळ, तालुका अध्यक्ष अनिल निकम, सेवादल अध्यक्ष आर डी चौधरी, माजी आमदार ईश्वर जाधव, राहुल मोरे, रविंद्र पोळ, रविंद्र जाधव,अलताफ खान जमशेर खान, प्रदिप…
चाळीसगाव, प्रतिनिधी । विजेचे बिल कमी करण्यासाठी महिलेकडे 5 हजार रुपयांची मागणी वायरमन ने केली असून अशी आपबीती महिलेने पत्रकाराकडे केली असून अशा वायरमन वर कारवाई ची मागणी केली आहे. शहरातील हिरापुर रोडवर गणेश मंगल कार्यालयाजवळ पिठाची गिरणी असून या गिरणी चालक महिलेला 10400 रुपयांचे वीज बिल आले एवढे बिल कसे आले याची विचारणा त्यांनी वायरमन भालचंद्र वाघ व अधिकारी यांच्याकडे केली असता तुम्ही वीजचोरी केली म्हणून आपणास 8500 रुपये दंड आला असल्याचे सांगण्यात आले बिल न भरल्यास मीटर कट केला जाईल आणि यातून मार्ग काढायचा असेल तर मला 5000 रुपये द्या असे वायरमन ने त्या महिलेला सांगितले असता मी…
यावल, प्रतिनिधी । गेल्या तीन महिन्यापूर्वी यावल नगरपालिकेतर्फे2कोटी84लाख 38हजार516रुपये किमतीचा अतिरिक्त साठवण तलाव बांधण्यात आला आहे तो अतिरिक्त साठवण तलाव कार्यान्वित करू नये अशी लेखी स्वरूपात नोटीस वकिलामार्फत शेतमालक शेतकऱ्याऱ्याने नगरपरिषदेला दिली. शेतकऱ्याच्या शेतात अनधिकृत अतिक्रमण करून बांधकाम करणाऱ्या यावल नगरपरिषदेचा प्रताप आणि बौद्धिक दिवाळे नागरिकांच्या व प्रशासनाच्या समोर आले आहे. अतिरिक्त तलाव निर्मितीसाठी जिल्हाधिकारी जळगाव यांनी दि.9/8/2020 रोजी प्रशासकीय मान्यता दिली होती.त्यानुसार यावल नगरपरिषद तत्कालीन मुख्याधिकारी बबन तडवी यांनी सोलापूर येथील ठेकेदार अनिल शामराव पाटील यास दि.21जानेवारी2021रोजी 2 कोटी84लाख38हजार516 रुपयाचा कार्यादेश दिला आहे.(कार्यादेश सोलापूर येथील अनिल शामराव पाटील ठेकेदाराच्या नावाने असला तरी प्रत्यक्षात काम मात्र जळगाव येथील एका राजकीय…
चोपडा, प्रतिनिधी । चोपडा शहर व तालुका काँग्रेस तर्फे 27 सप्टेंबर 2021 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडाच्या दक्षिण गेट जवळील रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारचा निषेध करून केंद्र सरकारचा धिक्कार करण्यात आला. दिल्ली येथील शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत चोपडा शहर आणि तालुका काँग्रेसतर्फे भारत बंदला या आंदोलनाद्वारे पाठिंबा देण्यात आला. या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा दिल्याने काँग्रेस पक्षातर्फे, जनतेचे आभार मानण्यात आले. केंद्र सरकारने केलेल्या तीन काळे कृषी कायदे त्वरित रद्द करावे, कामगार विरोधी केलेले कायदे रद्द करावेत, पेट्रोल व डिझेलची दरवाढ कमी करावी. अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. मोदी सरकार विरुद्ध घोषणा देत शेतकर्यांच्या आंदोलनाला…
धरणगाव, प्रतिनिधी । शहरातील रमाई घरकुल योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांना मिळावा असे आश्वासन देवून सुध्दा लाभ देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याने मनसेने आज एक दिवशीय आंदोलन तहसील कार्यालयाजवळ केले. रस्ते साधन सुविधा व अस्थापणा यांच्या अध्यक्षतेखाली धरणगाव येथे रमाई घरकुल योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांना मिळावा असे आश्वासन देवून सुध्दा लाभ देण्यास टाळाटाळ करण्यात आले. म्हणुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक दिवसीय आंदोलन करून संबंधित कामचुकार अधिकारी यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आज 27 सोमवारी सकाळी 11:30 वाजता धरणगाव तहसील कार्यालयाच्या आवारात आंदोलन व जाहीर निषेध करण्यासाठी सर्व महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
जळगांव, प्रतिनिधी । कोविडचे सावट पूर्ण गेले नसतांनाही पाणी पुरवठा व स्वच्छता खात्यातील निधीला कोणतीही कात्री लागली नाही. या अनुषंगाने जिल्ह्यात यंदा तब्बल ४०० कोटी रूपयांच्या पाणी पुरवठा योजना मार्गी लागणार असल्याचे प्रतिपादन आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते तालुक्यातील रिंगणगाव, सावदा आणि पिंपळकोठा येथे विविध विकासकामांचे भूमिपुजन आणि लोकार्पण केल्यानंतर बोलत होते. एरंडोल हा आपला जुना मतदारसंघ असून इतर तालुक्यांप्रमाणेच यावर आपले विशेष प्रेम असल्याचेही पालकमंत्र्यांनी याप्रसंगी आवर्जून नमूद केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार चिमणआबा पाटील होते तर विशेष उपस्थिती जि. प. अध्यक्षा रंजनाताई पाटील यांची होती. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव, सावदा…
जळगाव, प्रतिनिधी । दाम्पत्याची छेड काढल्याने रोडरोमियोंना नागरिकांनी चांगलाच चोप दिल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी नागरिकांनी त्या तरुणांना पोलिसांच्या ताब्यात दिले. जळगाव शहरात मुळात फिरायला काही मनोरंजनाची ठिकाणे नाही. मेहरूण तलाव, कोल्हे हिल्स परिसर, भाऊंचे उद्यान, गांधी उद्यान सोडले तर इतर काहीही नाही. आरएमएस कॉलनी परिसरात राहणारे एक दाम्पत्य पत्नीचा वाढदिवस असल्याने सहज फेरफटका मारायला सायंकाळी ४ च्या सुमारास गेले होते. कोल्हे हिल्स परिसरात दाम्पत्य बसलेले असताना दोन टवाळखोर तरुणांनी त्यांच्याकडे पाहून शिट्ट्या वाजवल्या आणि शेरोशायरी केली. वाद नको म्हणून दाम्पत्य तिथून निघाले आणि खाली आले. टवाळखोर अधिकच शिरजोर होत त्यांनी दाम्पत्याच्या दिशेने दगड मारून फेकला. दाम्पत्याने जाब…
जळगाव, प्रतिनिधी । खान्देशात कवयित्री बहिणाबाई चौधरी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासारख्या अनेक कर्तृत्त्ववान महिला घडल्या. जिल्हा मार्केटींग सोसायटीच्या चेअरमन शैलजादेवी दिलीपराव निकम यांचेही राजकारण, समाजकारण, सहकार, कृषी आदी क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य आहे. अशा नारीशक्तीचा सन्मान करणे, हे आपल्या भारतीय संस्कृतीचे प्रतिक आहे, असे प्रतिपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी केले. राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेतर्फे शैलजादेवी निकम यांना नारीरत्न पुरस्कार २०२०-२१ चे वितरण महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी दुपारी व.वा.वाचनालयाच्या अग्रवाल सभागृहात झाला. याप्रसंगी अरुणभाई गुजराथी बोलत होते. व्यासपीठावर महापौर जयश्री महाजन, सिंगल वुमन फाउंडेशनच्या अध्यक्षा मीनाक्षी चव्हाण, सत्कारमूर्ती शैलजादेवी निकम, संस्थेच्या अध्यक्षा…