Author: saimat team

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका २७ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहरातील सम्राट कॉलनी परिसरात लक्ष्मण अशोक जाधव (वय-२७) हा कुटुंबियासह राहतो. मोलमजुरी करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. कौटुंबिक वादामुळे त्यांची पत्नी ह्या गेल्या चार ते पाच महिन्यांपासून माहेरी निघून गेल्या होत्या. त्यामुळे लक्ष्मण जाधव आहे नैराश्य होते. सोमवारी २७ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची उघडकीला आले. सायंकाळी आई शर्मिलाबाई घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. गल्लीतील राहणारा योगेश परदेसी याने मृतदेह खाली जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । मालेगाव-मनमाड -कोपरगाव बीओटी रस्त्याचा जो भाग नादुरुस्त आहे त्याचे डांबरीकरण व नूतनीकरणाचे काम तातडीने पूर्ण करावे असे निर्देश कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. मंत्री श्री.भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आयोजित बैठकीत या रस्त्याच्या कामाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. मालेगाव-मनमाड -कोपरगाव रस्त्यावर शिर्डी व पुण्याच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असून शेजारील दोन- तीन राज्यातील लोकांची रहदारी आहे.मालेगाव ते मनमाड या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले असून हा रस्ता वाहतुकीसाठी योग्य नाही. मालेगाव ते मनमाड हे ३५ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी किमान एक ते दीड तासाचा अवधी लागत आहे.त्यामुळे नादुरुस्त झालेल्या रस्त्याचे नूतनीकरण तातडीने होणे गरजेचे…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शहरामध्ये नोकरी निमित्त एक 28 वर्षीय तरुणी लग्नाच्या आमिषाने सरक पाच वर्षे बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी त्या संशयित आरोपी विरुद्ध एमाडिसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी संपत लक्ष्मण मल्हाड रा. दरीबडची ता. जत, जि. सांगली हा तरुणीच्या संपर्कात आला. त्यानंतर त्याने तरुणीला लग्नाचे आमिष देत तसेच जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. सन २०१६ ते ६ सप्टेंबर २०२१ या कालावधीत घडलेल्या घटनेप्रकरणी तरुणीने सोमवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीवरून संपत मल्हाड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि. प्रमोद कठोरे हे करीत आहेत.

Read More

फैजपूर, प्रतिनिधी । अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या येथील खंडोबा मंदिर देवस्थानात राज्य शासनाच्या तीर्थ-क्षेत्र निधीतून सुमारे ४० लक्ष खर्चाचे संत निवास व जलकुंभचे भूमिपूजन सोहळा स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील व खासदार रक्षाताई खडसे यांच्या शुभहस्ते आ. शिरिष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. हिंदू व भारतीय असल्याचा मला गर्व आहे. प्रत्येकानेच आपल्या धर्माचा व देशाचा अभिमान बाळगला पाहिजे असे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले. ते पुढे म्हणाले की, सत्ता हे साधन आहे त्याचा सदुपयोग करून लोकहिताची कामे केली पाहिजे. आपल्या धार्मिक, आध्यात्मिक संस्कृतीमुळे माणसाला आचरणाचा धाक आहे अन्यथा हा धाक संपुष्टात आल्यास देश…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात आज (28 सप्टेंबर) मुसळधार किंवा अतिमुसळधार पावसाचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. तसेच जळगाव तालुक्यातील वाघूर धरण पूर्णपणे भरल्यानंतर पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यास धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आले आहे. यामुळे धरणाजवळील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार प्रमाणात पाऊस झाला. यामुळे २१ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी पाच वाजता वाघूर धरण हे पूर्णपणे भरले. यानंतर प्रारंभी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले होते. मात्र पावसाचे प्रमाण वाढल्याने आता धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले आहे. वाघूर धरणाच्या खालील बाजूला असणार्‍या नदीकाठावरील गावांमधील नागरिकांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला…

Read More

पहूर, प्रतिनिधी । पहूर बसस्थानक समोरील कृषी पंडित कॉम्प्लेक्स मधील मुळचंद झुंबरलाल चोरडिया यांच्या स्वामी समर्थ प्रोव्हिजन दुकानाचे शटर कुलूप तोडून चोरांनी 4 ते 5 हजार रोकड सह 12 ते 13 हजार रुपयांचे किराणा सामान लंपास केला आहे. सदरील चोरीची घटना ही सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता समोर दुकानाचे कुलूप तोडण्याचे दिसून आल्याने घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यावर पोलिसानं समोर दुकानाचे शटर उघडून पाहणी केली असता दुकानातील ड्रॉवर खुले दिसून आले. तसेच दुकानातील कागदपत्र देखील अस्ताव्यस्त दिसून आले. दुकानातील मालाची तपासणी केली असता दुकानातील गावरानी तुपाचे डब्बे, तेल पाउच, काजू, बदाम, व्हील, लक्स, डव इ प्रकारचे साबण, पाउडर तसेच किरकोळ…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । कच्च्या तेलाच्या महागाईची झळ सोसत इंधनदरवाढ रोखून धरणाऱ्या पेट्रोलियम कंपन्यांनी आता पेट्रोल आणि डिझेल या दोन्हींच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोल २२ दिवसांनी महागले असून, डिझेलचा दर सलग चौथ्या दिवशी वधारला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी केवळ डिझेल दरात वाढ केली होती. मात्र, आज (मंगळवार) पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीचे दर वाढलेले पाहायला मिळत आहेत. गेल्या २२ दिवसांपासून पेट्रोलच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. अखेर पेट्रोलियम कंपन्यांनी डिझेलबरोबरच पेट्रोलच्या दरातही वाढ केली. देशभरात पेट्रोलचा दर २० ते २२ पैशांनी वधारला आहे. तसेच डिझेलच्या दरात गेले सलग चार दिवस वाढ करण्यात येत असून, आज डिझेल २५ पैशांनी महागले…

Read More

कोल्हापूर, वृत्तसंस्था । कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी पीक कर्ज देण्यात येणार आहे. बँकेच अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी बँकेच्या 83 व्या वार्षिक सभेत ही घोषणा केली आहे. बँकेची वार्षिक आढावा बैठक सोमवारी झाली. यामध्ये यंदाच्या आर्थिक वर्षात नऊ हजार कोटी रुपयांच्या ठेवी आणि 175 कोटी रुपयांच्या नफ्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले. शून्य़ टक्क्याने कर्ज देणारी केडीसीसी ही ही पहिलीच बँक असल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला. बँकेचे सभासद असलेल्या लाखो शेतकऱ्यांनी शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज देण्याची मागणी केली होती. यामुळे तीन लाखांची कर्ज मर्यादा वाढवून पाच…

Read More

बोदवड, प्रतिनिधी | दुकानातून अज्ञात चोरट्यांनी तब्बल सहा लाख रूपयांची रोकड लांबविल्याची घटना २६ सप्टेंबर च्या रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील भुसावळ रोडवर प्रमोद सुरेश बडगुजर यांच्या मालकीचे बडगुजर बिल्डिंग मटेरियल सप्लायचे दुकान आहे. २६ सप्टेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून आत दुकानात प्रवेश केला. यानंतर काउंटरच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेली ६ लाख रुपयांची रोकड घेऊन पलायन केले. हा प्रकार सोमवारी लक्षात आला. या संदर्भात प्रमोद बडगुजर यांनी फिर्याद दिली. तपास उपनिरीक्षक एस.एस.माळी करत आहे. जळगाव येथून आलेल्या ठसे तज्ज्ञांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली.

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका ४५ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना २६ रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात एक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगावातील एमआयडीसी परिसरात एका ठिकाणी चहाची विक्री करण्याचे काम ४५ वर्षीय महिला करते. दरम्यान या चहाच्या टपरीवर रविवार २६ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अंकुश साईदास चव्हाण रा. समतानगर जळगाव हा विनापरवानगी दुकानात घुसून महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून अश्लिल शिवीगाळ केली व तिचा विनयभंग केला. याप्रकरणी महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात संशयित आरोपी अंकुश चव्हाण यांच्याविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील…

Read More