Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हाधिकारी जळगाव कार्यालयाबाहेर जळगाव शहरातील विविध राजकीय पक्ष ,सामाजिक संघटना व बिरादरी यांच्यामार्फत लखीमपूर घटनेचा व आसाम राज्यातील घटनेचा धिक्कार करण्यात आला व भर उन्हात बारा ते एक वाजेपर्यंत निदर्शन करण्यात आले. रस्त्यावररून जाणारे चे लक्ष वेधण्यासाठी निदर्शक योगी सरकार किसान विरोधी, मोदी सरकार किसान विरोधी, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांची मंत्री मंडळातून हकालपट्टी करा, अजय मिश्रा यांना अटक झालीच पाहिजे , आसम सरकारचा निषेध असो अशा घोषणा देण्यात येत होत्या. राष्ट्रपति – पंतप्रधान व मुख्य न्यायाधीश यांना निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्या माध्यमाने भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र जी मोदी व भारताचे सुप्रीम कोर्टाचे…

Read More

धुळे, प्रतिनिधी । माजी मंत्री कमलाबाई अजमेरा यांचे नातू व पश्चिम खान्देश सेवा मंडळाचे अध्यक्ष अतुल अजमेरा (वय ५३) यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांचा पार्थिवदेह गुरुवारी सकाळी नऊ ते साडेदहा या वेळेत देवपुरातील पश्चिम खान्देश सेवा मंडळाच्या महिला कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. अतुल यांची गेल्या आठवड्यात स्टेट यूथ हाॅस्टेलच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. ते आदिवासी व गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील हाेते. अतुल यांचा पार्थिवदेह सकाळी ११ वाजता भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. ते धुळे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष…

Read More

जळगाव प्रतिनिधी | भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहराजवळ ट्र्कचे चाक फुटल्यामुळे रस्त्यावर उभ्या असणार्‍या ट्रकला धडक दिली. याप्रकरणी या धडकेत चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. वरणगाव शहरापासून कुशल ढाब्यासमोर एका ट्रकचे चाक फुटल्यामुळे तो रस्त्यातच उभा होता पाठी मागून येणारा आयशर मालवाहू ट्रक समोर उभ्या असलेल्या या ट्रकला जोरात धडक दिल्यामुळे भुसावळ कडे जाणार्‍या ट्रक मधील ड्रायव्हर जागीच ठार झाल्याची घटना काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. भुसावळ तालुक्यातील वरणगाव हद्दीतील नॅशनल हायवे क्रमांक ६ वरील कुशल ढाब्याच्या समोर टायर फुटल्यामुळे ट्रक रस्त्याच्या मधोमध उभा होता. हा ट्रक उभा असल्याचे लक्षात न आल्यामुळे पाठीमागून येणार्‍या ट्रकने…

Read More

चाळीसगाव, प्रतिनिधी । शहरातील सर्वात वर्दळीच्या असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते घाट रोड मार्गावरील बँक ऑफ बडोदा समोरील ४० वर्ष जुनी गटार ब्लॉक झाल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर तुंबून मोठा तलाव साचत होता. यामुळे वाहन धारकांचे छोटे मोठे अपघात नित्याचे झाले होते. आमदार मंगेश चव्हाण यांच्या पुढाकाराने सदरील गटारींतील घाण – कचरा काढण्यात येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बँक ऑफ बडोदा पर्यंतचा रस्ता दुरुस्ती सुरुवात करण्यात आली होती. या कामासाठी साधारणपणे 2 ते 3 दिवस लागू शकतात असा प्राथमिक अंदाज असल्याने दोन दिवसांसाठी सदर मार्गावरील वाहतूक देखील वाहतूक देखील वळवण्यात आली मात्र जवळपास 10 फूट खोल व 6 फुट…

Read More

जळगाव प्रतिनिधी । सावखेडा शिवारातील ४० वर्षीय व्यक्तीचा खून झाल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. जळगावातील सावखेडा शिवारात श्रावण लालचंद भिल (वय ४०) त्याच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून खून झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत असून घटनास्थळी सहायक पोलीस उपअधीक्षक कुमार चिंता यांच्यासह पोलिसांचा ताफा दाखल झाला आहे. मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. तालुका पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Read More

जळगाव, प्रतिनिधी । राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे गुरुवार दि. 7 ऑक्टोबर, 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. गुरुवार, दि. 7 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 6.18 वाजता जळगाव रेल्वे स्थानक येथे अमृतसर एक्सप्रेसने आगमन व पाळधी, ता. धरणगाव, जि. जळगावकडे शासकीय वाहनाने प्रयाण व राखीव. सकाळी 9.00 वा. पाळधी येथे अभ्यागत व कार्यकर्त्यांच्या भेटी व चर्चा. सकाळी 10.00 वा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे ऑक्सिजन प्लँटच्या उद्घाटनास उपस्थिती. सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4.00 वा. पाळधी, ता. धरणगाव येथून प्रयाण व धरणगाव तालुक्यातील विविध गावातील नियोजित कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार पाळधी,…

Read More

जळगाव, – शासनाकडील 2 ऑगस्टच्या आदेशान्वये नाशिक विभागातील अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे निर्बध लागु असुन इतर जिल्ह्यात निर्बध शिथील करण्यात आले आहे. नाशिक विभागाचा विभागीय लोकशाही दिन दिनांक 11 ऑक्टोबर, 2021 रोजी दुपारी 12.00 वाजता विभागातील दहा विभागप्रमुख यांचे उपस्थित आयोजित करण्यात येणार आहे. अशी माहिती गोरक्ष गाडीलकर, उपायुक्त (महसुल) विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांचेकडील 2 ऑगस्ट, 2021 च्या आदेशान्वये कोविड-19 च्या फैलावास प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यात निर्बध/सुचना निर्गमित करण्यात आल्याचेही श्री. गाडीलकर यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

Read More

जळगाव, प्रतिनिधी । पाचोराचे आमदार किशोर पाटील व गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांच्या नेतृत्वात जळगाव महानगर गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नगर विकास मंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्यासोबत मुंबई येथे झाली. यावेळी नगर विकास विभाग प्रधान सचिव भूषण गगराणी, विशेष कार्य अधिकारी कृष्णा जाधव व डॉ. राजेश कावडे आदी उपस्थित होते. तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सवर जळगावचे आयुक्त सतीश कुलकर्णी सुद्धा उपस्थित होते. जळगाव महानगरपालिकेतर्फे गाळे सील करण्याची कारवाई करण्यात येत असल्याबाबत तीव्र नाराजी गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे समोर व्यक्त केली. तसेच १२ मे २०२१ रोजी महासभेत ४५८ नंबर ठराव पारित करण्यात आला आहे, तो त्वरित रद्द करून मिळावा अशी मागणी…

Read More

जामनेर, प्रतिनिधी । शहरातील शिवशक्ती ढाबा परिसरात जळगावहून संभाजीनगरकडे जाण्यासाठी गुरांनी ट्रक भरून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याची घटना घडली. याप्रकरणी संबंधित ट्रकचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामनेर तालुक्यातील वाकोद गावाजवळ शिवशक्ती ढाबा ठिकाणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे पेट्रोलिंग ला जात असताना आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांना जळगाव हुन संभाजीनगर कडे तीन ट्रक त्यात गीर जातीच्या गाई असलेले त्यांना आढळून आले या सर्व गाड्यांमध्ये एकूण 42 गाई निदर्शनात आले असून त्यांची एकूण किंमत सात लाख रुपये किमतीच्या असून या सर्व गाई राजस्थान ना मधून येत होत्या संभाजीनगर येथे कत्तलखान्या साठी जात असल्यास प्राथमिक स्वरूपाचा अंदाज व…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । राज्यातील कंत्राटदारांची हजारो कोटींची बिले प्रलंबित आहेत. सतत पाठपुरावा करुनही कोविडच्या नावाखाली देयके काढली जात नाहीत. सरकारी कारभाराच्या निषेधार्थ बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेकडून राज्यात 8 रोजी सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. जानेवारीपासून सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामविकास विभागाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजना खात्यांतर्गत निधी अचानकपणे बंद करण्यात आला. मार्च 2021 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने निधी देऊन देयके अदा करण्यापूर्वीच कोविड लॉकडाऊनच्या कारणामुळे निधी परत घेतला. अशा परिस्थितीत कोट्यवर्धीची देयके राज्य शासनाकडे प्रलंबित आहेत. केवळ तिमाही 15 ते 20 टक्क्यांपर्यंतच निधी देऊन ठेकेदारांची चेष्टाच…

Read More