यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेल्या “श्री साईबाबा देवस्थान वनोली ” तालुका यावल या मंदिरात सालाबादप्रमाणे नवरात्रोत्सवाची पूर्ण तयारी झाली असून घटस्थापनेच्या नंतर अश्विन शुद्ध अष्टमी ही या वर्षी 14ऑक्टोबर21गुरुवार रोजी येत असल्याने या दिवशी महापूजा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे यावर्षी अजुन कोरोनाचे संकट कायम असल्याने भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम मात्र रद्द करण्यात आला आहे.असे या मंदिराचे विश्वस्त यावल तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल व्यंकट चौधरी तसेच या गावचे सरपंच प्रकाश हिरालाल चौधरी व ग्रामपंचायत सदस्य,आयोजक आणि ग्रामस्थ यांनी कळविले आहे. वनोली ता.यावल हे गाव भुसावळ फैजपूर रस्त्यावरील पाडळसे व बामणोद गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असून…
Author: saimat team
यावल, प्रतिनिधी । यावल नगरपरिषदे मार्फत जुन्या व नव्या साठवण तलावाचे कोणतेही दुरुस्तीचे व नवीन काम करू नये अशी लेखी स्वरूपात मागणी यावल तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आली आहे. दि.12 रोजी यावल नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की यावल नगरपरिषदेच्या जुन्या व नव्या साठवण तलावाची कोणतीही दुरुस्ती व नवीन कामे करू नये या विषयाला धरून भारतीय जनता पार्टीने दि.30/9/ 2021रोजी जिल्हाधिकारी जळगाव, नगरविकास मंत्री, विरोधी पक्षनेते,तसेच विधान परिषद विरोधी पक्ष नेते,पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे, लोकप्रतिनिधीकडे साठवण तलावातील भ्रष्टाचाराबाबत चौकशी होऊन कारवाई होण्यासाठी लेखी तक्रार केली आहे.भ्रष्टाचाराबाबत केलेल्या तक्रारीचा वरिष्ठ पातळीवर चौकशी…
यावल, प्रतिनिधी । राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था व राजपूत करणी सेना जळगांव यांच्या संयुक्त विद्यमानाने दि.10 रविवार रोजी दर्जी फाऊंडेशन जळगांव येथे मान्यवरच्या हस्ते बाल संस्कार विद्या मंदिर,यावल शाळेचे मुख्याध्यापक सुनील कृष्णाजी माळी सर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2020/21देण्यात आला. राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2020/21राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था व राजपूत करणी सेना जळगांव यांच्या संयुक्त विद्यमानाने दि.10 रविवार रोजी दर्जी फाऊंडेशन जळगांव येथे मान्यवर साहित्यिक अ.फ. भालेराव,सौ.मिनाक्षी चव्हाण अध्यक्षा सिंगल वुमन फाऊंडेशन, विलाससिंह पाटील कार्याध्यक्ष, राजपूत करणी सेना,लोक कलावंत गणेश अमृतकर,जिल्हा उपाध्यक्ष जी.एच.खंडाळकर, संस्था अध्यक्षा सौ.संदीपा वाघ, एस.आर.वाघ सेवानिवृत्त मुख्याध्यापक सानेगुरुजी विद्या मंदिर यावल यांचे उपस्थीतीत बाल संस्कार विद्या मंदिर यावल…
जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या (खेळ, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकाचा पुरस्कार मिळवणारे, संगणक क्षेत्रात अति उत्कृष्ट कामगिरी करणारे, पूर, जळित, दरोडा, अपघात इतर नैसर्गिक आपत्तीत बहुमोल कामगिरी करणारे तसेच देश/राज्याची प्रतिष्ठा वाढवतील, अशा स्वरुपाचे लक्षणीय काम करणारे माजी सैनिक, त्यांच्या पत्नी, पाल्य तसेच सामाजिक कार्य आणि पर्यावरणविषयक पुरस्कार मिळवणारे आणि शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये दहावी, बारावीच्या परीक्षेत ९० टक्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेल्या तसेच पदवी किंवा पदव्युतर परीक्षेत विद्यापीठात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण व आयआयटी. आयआयएम व एम्स अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक पाल्यांना…
जळगाव, प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील काही ठिकाणी 16 व 17 ऑक्टोबर, 2021 रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील शेतमालाची काढणी करावी व शेतात साठवणूक केलेला शेतमाल सुस्थितीत योग्य ठिकाणी ठेवावा. जेणेकरुन वरील कालावधीत होणाऱ्या वादळी वारा, अवकाळी पावसापासून शेतमालाचे संरक्षण करणे सोयीचे होईल, असेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकात म्हटले आहे.
यावल, प्रतिनिधी । डी.एस.फोर तसेच बामसेफ व बी.एस.पी.चे संस्थापक मा. कांशीराम जी यांचा15 वा परिनिर्वाण दिवस साजरा करण्यात आला.यावल येथे बोरावल गेट परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी चौकात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मा. कांशीराम साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच या कार्यक्रमांस निळे निशाण संघटनेचे ता.अध्यक्ष विलास भास्कर तसेच रोजगार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष युवराज सोनवणे,तसेच निळे निशाण संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे तसेच संघटनेचे युवा ता. अध्यक्ष विशाल तायडे,तसेच शाखा अध्यक्ष अट्रावल भूषण संपकाळे,कैलास लोहार,ए.के. तायडे,विष्णू लोखंडे,राजू अडकमोल,भरत अडकमोल, विवेक…
मुंबई, वृत्तसंस्था । राज्यातल्या वीज ग्राहकांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. वीज दरवाढ अटळ असल्याचे म्हटलं जात आहे. विजेचे दर 7.25 वरून 12 रूपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. खासगी कंपन्यांकडील कोळसाही संपू लागला आहे. राज्य सरकारचा खुल्या बाजारातून वीज खरेदीचा विचार केला जात आहे. कोळशाअभावी राज्यातले औष्णिक वीज प्रकल्प बंद पडत आहेत. त्यातच आता खासगी कंपन्यांकडचा कोळसाही संपायला लागलाय. कंपन्यांकडे ६ दिवस पुरेल एवढाच कोळसा आहे. त्यामुळे सरकार खुल्या बाजारातून वीज खरेदीचा विचार करत आहे. कंपन्या या संधीचा फायदा घेण्याच्या तयारीत आहे. विजेचे दर ७.२५ पैसे प्रतियुनिटवरून थेट १२ रूपयांवर जाण्याची शक्यता आहे. इंडियन एनर्जी एक्स्चेंज म्हणजे खुल्या बाजारातही वीज दर…
यावल, प्रतिनिधी । यावल शहरात व तालुक्यात अवैध गौण खनिज चोरट्या वाहतूकीकडे जिल्हाधिकारी जळगाव आणि जिल्हा गौण खनिज प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने यावल तालुक्यातील अवैध गौण खनिज अनेक प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी यावल तालुक्यातून करण्यात आली आहे. यावल तालुक्यात संपूर्ण मंडळांमध्ये अवैध गौण खनिज वाहतूक सर्रासपणे खुलेआम सुरू आहे.अवैध गौण खनिज वाहतुकीत महसूल विभागातील एक जबाबदार अधिकारी आपल्या पदाचा आणि अधिकाराचा वैयक्तिक स्वार्थापोटी सोयीनुसार वापर करून लाखो रुपयाची कमाई करून घेत आहे. अवैध गौण खनिज चोरटी वाहतूक करणारे राजकीय आणि सामाजिक प्रभावामुळे रोज नवीन नवीन शक्कल लढवून अवैध वाळू वाहतूक करीत आहेत अवैध गौण खनिज वाहतूक करणारी डंपर, ट्रॅक्टर वाहने…
मुंबई, वृत्तसंस्था । खजूर सुकामेवा म्हणून वापरतात. हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि फायबर असतात. यामुळे तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढतेच पण अनेक आजार कमी होण्यास मदत होते. आपण दररोज दुधासह खजूर देखील घेऊ शकता. जाणून घेऊया त्याचे फायदे. हाडे मजबूत करते खजूरमध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम असते. हे हाडांसाठी फायदेशीर आहे, ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. तसेच हाडांशी संबंधित समस्या टाळते. रोगप्रतिकार शक्ती वाढवते खजूरमध्ये प्रथिने, लोह आणि जीवनसत्वे असतात. यामुळे शरीरात ऊर्जा येते. खजूरांमध्ये असलेले प्रथिन स्नायूंना बळकट करते. याचे सेवन केल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते. बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते खजूरमध्ये फायबर असते. हे बद्धकोष्ठतेची समस्या…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर(Petrol-Diesel Price) जाहीर केले आहेत. आज इंधनाच्या किंमतीत कोणतेही बदल झालेले नाहीत. राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोल 104.44 रुपये प्रति लीटर आहे, तर डिझेल 93.18 रुपये प्रति लीटर आहे. काल पेट्रोलच्या किंमतीत 30 पैसे प्रति लीटर आणि डिझेलच्या दरात 35 पैशांनी वाढ झाली होती. या महिन्यातही पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या 10 दिवसात पेट्रोलच्या किंमतीत 2.80 रुपयांची तर डिझेलच्या किंमतीत 3.30 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. चार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल डिझेलची किंमत >>मुंबई पेट्रोल 110.41 रुपये आणि डिझेल 101.03 रुपये प्रति लीटर >>दिल्ली पेट्रोल 104.44…