Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेंतर्गत जळगाव शहरातील 14 कुटुंबांना प्रत्येकी 20 हजार रुपये याप्रमाणे 2 लाख 80 हजार रुपयांच्या रकमेचे धनादेशांचे वितरण जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. त्याचबरोबर पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते इस्त्राइल केमिकल कंपनीतर्फे जिल्हा रुग्णालयास प्राप्त दहा लाख रुपये किमतीचे अत्याधुनिक व्हेन्टिलेटरचे वितरण जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांचेकडे करण्यात आले. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, समितीचे अध्यक्ष बाळा कंखरे, नगरसेवक नितीन लढ्ढा, तहसीलदार ज्योती देवरे, विष्णू भंगाळे, शरद तायडे,…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । सातत्याने महागणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरामुळे (Petrol diesel price hike) सामान्यांचं जगणं आणखी कठीण झालं आहे. आज सलग नवव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली ( Petrol diesel price hike on 09th October 2021 ) आहे. सरकारी तेल कंपन्यानी आज पेट्रोलच्या किंमतीत 30 पैशांची वाढ केली आहे. तर डिझेलचे दर 35 पैसे प्रति लीटरने वाढले आहेत. आज मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लीटर 109.83 रुपये आणि डिझेलचे दर प्रति लीटर शंभरीपार गेल्याने 100.29 रुपये प्रति लीटर आहेत. या राज्यांत 100 रुपयांपार पेट्रोल मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांपार आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचे…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । दरवर्षीप्रमाणे पितृ पंधरवडा यंदा नुकताच संपन्न झाला. या काळात पूर्वजांसह आई-वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे शुभाशीर्वाद अर्थात कृपादृष्टी परिवारावर कायम राहावी, या उद्देशातून प्रत्येकजण आपापल्या घरी पूजा-विधी करून त्यांच्याप्रती अर्पित करण्यात येणारा नैवेद्य स्मशानभूमीतील चौथर्‍यावर काकस्पर्शासाठी ठेवतो. यामुळे या काळात चौथरा परिसरात काहीशी अस्वच्छता निर्माण होते. तसाच काहीसा प्रकार मेहरुण स्मशानभूमीतील चौथरा परिसरात झाला होता. यासंदर्भात 7 ऑक्टोबर 2021 रोजी ‘महापौर मित्र’कडून व्हॉटस्अ‍ॅपद्वारे ‘महापौर सेवा कक्ष’कडे तक्रार (क्र. 2423) नोंदविण्यात आली होती. संबंधित तक्रार निवारणासाठी या कक्षातील प्रतिनिधीने तत्काळ महापालिका अधिकार्‍यांशी संपर्क साधला. त्यावर महापालिका आरोग्य विभागाचे अधिकारी श्री.सतीश करोसिया यांनीही तत्परतेने संबंधित स्थळाची पाहणी करून सफाई…

Read More

जळगाव प्रतिनिधी । दवाखान्याच्या निमित्ताने जात असलेल्या एका तरूणाला मेडीकलवर जाणाऱ्या चार तरूणांनी किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पायधन हॉस्पीटल समोर कंजरवाडा येथे राहणारा गोकुळे बबन लोंढे (वय-३०) हा वडीलांसह ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता पंचमुखी हनुमान मंदीराजवळील शोभा हॉस्पिटलशेजारी असलेले मेडीकलवर मास्क घेण्यासाठी गेले. मेडीकलवरील चार अनोळखी तरूणांनी चिडवले. याचा जाब विचारण्यासाठी गेला असता चौघांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी अनोळखी चार जणांविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुनिल सोनार करीत आहे.

Read More

जळगाव, प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यात 8 ते 14 ऑक्टोबर, 2021 या कालावधीत कोविड-19 विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून लसीकरणासाठी आरोग्य विभागाच्यावतीने विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यात अद्याप ज्या नागरीकांनी लसीचा पहिला डोस घेतलेला नसेल त्यांनी लसीकरण करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी आज दुपारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यातील आरोगय यंत्रणेचे वैद्यकीय अधिकारी यांचेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा परिषदेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. पांढरे, तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी ऑनलाइन सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी…

Read More

यावल, प्रतिनिधी । शहरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेकरिता जलशुद्धीकरण केंद्र व साठवण तलावाजवळ उच्च कार्यक्षमतेचे ट्रांसफार्मर बसविण्यासाठी जिल्हाधिकारी जळगाव अभिजित राऊत यांनी दि.4ऑक्टोंबर2021रोजी प्रशासकीय मान्यता दिल्याची माहिती माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी दिली. प्रशासकीय मान्यताचा आदेश बघितला असता यावल शहरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेकरिता जलशुद्धीकरण केंद्र व साठवण तलाव येथे उच्च कार्यक्षमतेचे ट्रांसफार्मर बसविणे साठी जिल्हाधिकारी जळगाव यांनी26लाख96हजार195 रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली. गेल्या20ते25 वर्षापासून यावल शहरातील विकसित भागात पाणी पुरवठ्यासाठी पाईप लाईन आणि पाण्याची टाकी नसल्यामुळे यावल नगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा होत नव्हता त्यामुळे गेल्या तीन वर्षांपूर्वी तत्कालीन नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी10लाख लिटर क्षमतेच्या नवीन पाण्याच्या टाकीचे…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । दीर्घकाळ झालेल्या घसरणीनंतर आता सोन्याचा दर आता पुन्हा वरच्या दिशेने प्रवास करु लागला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या किंमतीत बरेच चढउतार पाहायला मिळायला आहेत. सोने सध्या गेल्या अनेक महिन्यांतील निच्चांकी पातळीवर आहे. जाणकरांच्या सल्ल्यानुसार सोने खरेदीसाठी ही योग्य वेळ आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर शुक्रवारी सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली. ऑक्टोबर डिलिव्हरीच्या सोन्याची किंमत 0.14 टक्क्यांनी वाढून 46,892 रुपये प्रतितोळा या पातळीवर पोहोचली. तर चांदीच्या दरात 0.48 टक्क्यांची घसरण झाली. त्यामुळे चांदीचा भाव प्रतिकिलो 60,963 रुपयांच्या पातळीवर पोहोचला. कमोडिटी मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, डॉलर आणि बॉण्ड्सवरील व्याज वाढल्यामुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव आहे. आगामी काळातही हा दबाव कायम…

Read More

फैजपूर, प्रतिनिधी । नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फैजपूर पोलीस ठाण्याच्या वतीने शहरात रुट मार्च करण्यात आला. नवरात्रोत्सवात कोठेही अनुचित प्रकार घडू नये, सण, उत्सव शासनाच्या नियमानुसार शांततेत साजरे व्हावे आणि समाजकंटकांवर वचक निर्माण व्हावा या उद्देशाने पोलिसांनी संचलन करत शक्तीप्रदर्शन केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार संध्याकाळी पाच वाजता संचलनाला सुरुवात करण्यात आली. त्यात २ अधिकारी, १५ पोलीस कर्मचारी, १९ होमगार्डसह पोलिसांच्या फौजफाट्याने शहरात पायी संचलन केले. दरम्यान, आखेगावकर यांनी नवरात्रोत्सव दरम्यान शासनाच्या अटी, शर्तींचे कोणत्याही प्रकारे कोणीही उल्लंघन करणार नाही, याबाबत समजावून सांगितले. नियमांचा भंग झाल्यास संबंधितांविरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

Read More

नाशिक, वृत्तसंस्था । 15 वर्षीय मुलीला ओलीस ठेवून पुण्यातील बडतर्फ सहायक पोलीस उपनिरीक्षकाने गावठी कट्टय़ातून गोळीबार केल्याची घटना राहुरी तालुक्यातील डिग्रस येथे घडली आहे. दरम्यान, गोळीची दिशा बदलल्याने श्रीरामपूरचे विभागीय पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके बालंबाल बचावले आहेत. गोळीबार करणाऱया बडतर्फ सहायक पोलीस उपनिरीक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून एका कारसह दोन गावठी कट्टे हस्तगत करण्यात आले आहेत. सुनील लक्ष्मण लोखंडे (रा. शिवानंद सोसायटी, वानवडी, जि. पुणे) अशी अटक केलेल्याचे नाव आहे. संबंधित मुलीच्या आईने आरोपीविरोधात आर्म ऍक्ट, अपहरण तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा श्रीरामपूर पोलिसांत दाखल केला होता. हा गुन्हा राहुरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. हा…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । धरणगाव येथे धान्य गोडाऊनला विशेष पोलीस महानिरीक्षकांनी व त्यांच्या नवीन पोलीस पथकाने धाड टाकली. पण ते धान्य रेशनचे आहे की खासगी आणि रेशनचे असेल तर नियमाप्रमाणे साठा आहे की नाही हे ठरविण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऐनवेळी पंचनामा करायला नकार दिला. त्यामुळे गोदामाला सील करून ठेवण्यात आले आहे. शहरातील कमल जिनिंगमध्ये धान्याचा अवैध साठा करून ठेवला आहे, अशी माहिती मिळताच विशेष पोलिस महानिरीक्षकांनी स्थापन केलेल्या पोलिसांच्या विशेष पथकाने त्या जिनिंगमध्ये छापा टाकला; पण ते धान्य रेशनचे आहे की खासगी आणि रेशनचे असेल तर नियमाप्रमाणे साठा आहे की नाही हे ठरविण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऐनवेळी पंचनामा करायला नकार दिला.…

Read More