जळगाव. प्रतिनिधी । रुग्णांवर उपचार करताना अनेकदा अत्याधुनिक सुविधा नसल्याने रुग्णाला मोठ्या शहरांमध्ये जावे लागते. गोरगरीब रुग्णांचे तर चांगलेच हाल होत असतात. आता देशभरातील रुग्णालयात अत्याधुनिक उपचार भारतीय बनावटीच्या उपकरणांद्वारे आणि सेन्सर्सद्वारा करता येणार आहे. आपत्कालीन, गुंतागुंतीचे उपचार, इन्फेक्शनचे रुग्ण यांना संशोधनाचा फायदा होईल. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शल्यचिकित्सा शास्त्र विभागातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश जाधव यांनी याबाबत गौरवास्पद संशोधन केले आहे. त्यांनी गुजरात राज्यातील राजकोट येथील प्रसिद्ध प्रयोगशाळेत नामवंत शास्त्रज्ञांसमोर त्यांचे ४ संशोधन सादर केले. देशभरातील अनेक रुग्णालयात रुग्णांना अत्याधुनिक उपचार मिळणे अनेकदा दुरापास्त होते. त्यासाठी अनेक डॉक्टर संशोधन करून रुग्णांना उपचार मिळणे सोयीचे व्हावे…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । लखिमपुर येथे शेतकऱ्यांवर वाहन चालवून त्यांची हत्या झाल्याच्या निषेध व्यक्त करण्यासाठी राज्याच्या महविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या सोमवार दिनांक ११ ऑक्टोबर च्या महाराष्ट्र बंदला महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाने पाठिंबा जाहीर केला आहे. गेल्या वर्षभरापासून शेतकरी विरोधी ३ काळे कायदे रद्द करण्या च्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे केंद्र सरकार विरोधात आंदोलन सुरू आहे. मात्र आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा सातत्याने प्रयत्न करणाऱ्या मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हत्या करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे लखिमपुर येथील संतापजनक घटनेवरून समोर आले आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष याचा बचाव करण्याचे पुरेपूर प्रयत्न योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तरप्रदेश सरकारने पोलीस…
जळगाव, प्रतिनिधी । मेहरून बालविकास प्रेरणा केंद्र सामाजिक व शैक्षणिक संस्था जळगाव व आधार हाउसिंग फायनान्सच्या व Y4D फाउंडेशनच्यावतीने दिनांक 6 रोजी मेहरुण येथील हनुमान नगर येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधी वितरण शिबिर राबविण्यात आले. सकाळी 9 वाजेपासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत शिबिरामध्ये 200 रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधी वितरण करण्यात आले. मेहरून बाल विकास प्रेरणा केंद्र या संस्थेचे अध्यक्ष समाधान पवार व उपस्थित डॉक्टर मृण्मयी चौधरी तसेच फार्मसिस्ट धीरजकुमार राठोड तसेच रजिस्ट्रेशनला आनंद पवार, निलेश चौधरी, मनोज शिंपी, ललित कोळी, गणेश शिंपी, चेतन परदेशी, दीपक घ्यार, अनिल पवार, मनोज मराठे, सागर सोनवणे आदी उपस्थित होते.
जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य क्रीडा व शा. शि. शिक्षक महासंघ कडून नुकतीच कल्पना चव्हाण यांची प्रभारी शिक्षणाधिकारी (मध्य.) पदी निवड झाल्या बद्दल यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ ( पुणे ) संघांचे उपाध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष डॉ. प्रदिप साखरे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रसंगी जिल्हा मुख्याध्यापक महासंघा चे उपाध्यक्ष श्री…… सचिव.. जी. आर . चौधरी मुख्याध्यापक एच. डी. धांडे, क्रीडा शिक्षक महासंघ जळगांव महानगर चे कार्याध्यक्ष डॉ. विलास नारखेडे, उपाध्यक्ष दिपक आर्डे प क. कोटे च्या कॉलेजच्या पर्यवेक्षिका डॉक्टर सरोज शुक्ला, भुसावळ हायस्कूल चे क्रीडा शिक्षक पर्यवेक्षक प्रमोद शुक्ला, आदी उपस्थिती त होते…
यावल, प्रतिनिधी । एका अल्पवयीन मुलीवर पंचवीस वर्षाच्या तरुणाने लैंगिक अत्याचार करून दुखापत केल्याने यावल पो.स्टे.ला दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियमानुसार तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मधुकर खांडबहाले हे करीत आहे.यावल तालुक्यात दहिगाव येथे दि.8/10/2021रोजी दुपारी4:30वाजेच्या सुमारास ही घटना घडली असली तरी आज दि.9 रोजी यावल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून सकाळी11:30 वाजता तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आला. या घटनेतील आरोपीस अटक करण्यात आली यामुळे यावल तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलीच्या आईने यावल पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दि. 8/ 10/2021रोजी…
जळगाव, प्रतिनिधी । जळगावात काही दिवसांपूर्वी आंबेडकर नगर येथे काकाचा खून करण्यात आला होता याप्रकरणी संशयित आरोपी ला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करण्यात आली आहे. काकाचा खून करुन फरार झालेल्या संशयीत पुतण्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. राजु पंडीत सोनवणे असे हत्या झालेल्या काकाचे तर सुरज उर्फ विशाल अनिल सोनवणे (वय 33, रा. आंबेडकर नगर जुने जळगाव) असे अटकेतील संशयीत आरोपी असलेल्या पुतण्याचे नाव आहे. या घटनेप्रकरणी शनीपेठ पोलिस स्टेशनला गु.र.न. 200/21 भा.द.वि. 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक केलेला संशयीत सुरज हा कोणताही कामधंदा करत नव्हता तसेच तो नेहमी व्यसन करत होता. त्यामुळे…
यावल, प्रतिनिधी । येथील अतिप्राचीन श्री रेणुका देवी मंदिरात कोरोना नियम पाळत नवरात्र उत्सवानिमित्त स्री-पुरुष,ज्येष्ठ नागरिक,तसेच तरुण मुलं-मुली भाविकांची श्रद्धाळूंची मोठ्या संख्येने श्री रेणुका देवी आरती साठी दर्शनासाठी सकाळ व संध्याकाळ मोठ्या संख्येने उपस्थिती दिली जात आहे. यासाठी मंदिराचे पुजारी तथा व्यवस्थापक विनोद बयाणी,राजू बयाणी सपत्नीसह नियोजन करीत आहेत त्याचप्रमाणे पोलिस होमगार्ड बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे यावल येथील श्री रेणुका देवी मंदिर हे सन1838पासून अति प्राचीन आणि जागृत असे असल्याची आख्यायिका भाविकांमध्ये बोलली जात आहे. नवरात्रीत सकाळी5वाजता आरती साठी यावल शहरातील अनेक महिला आपल्या घरातून प्रज्वलित दिवा श्री रेणुका देवी मंदिरात नेव-आण करीत असतात.तर संध्याकाळी7:45 वाजता सुद्धा यावल शहरातील अनेक…
जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर पेठ येथील केंद्रीय जिल्हा परिषद मुलांची शाळेत नवीन शालेय व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली. आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास शाळेतील पाल्यांची व ग्रामस्थांची बैठक शाळेतील हॉलमध्ये घेण्यात आली या बैठकीत शालेय व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली यामध्ये अध्यक्ष भैया मोरे उपाध्यक्ष अफसर तडवी शिक्षक तज्ञ म्हणून शिवसेना प्रमुख तथा पत्रकार गणेश पांढरे सुरेखा बाई मोरे निर्मलाबाई कलाल मनोज मोरे संजय जवखेडे संगीता लोहार अंजना पांचाळ अलीम तडवी हिना पिंजारी मंगला सावळे शिक्षक प्रतिनिधी म्हणून उपशिक्षक मिलिंद तायडे सचिव मुख्याध्यापक रवींद्र खोडपे आदींची एकमताने निवड करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर…
कल्याण, प्रतिनिधी । सात ते आठ दरोडेखोरांनी धावता ट्रेनमध्ये प्रवाशांना लुटण्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे एका महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. इगतपुरी ते कसारा दरम्यान लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली असून कल्याण जीआरपी पोलिसांनी याप्रकरणी तीन दरोडेखोरांना ताब्यात घेऊन इतर आरोपींचा शोध घेत आहे. मात्र मेल एक्सप्रेसमध्ये लुट आणि बलात्काराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पुष्पक एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनला पोहोचली. इगतपुरी स्थानकातून ट्रेन मुंबईच्या दिशेने येत असताना इगतपुरी स्थानक सोडल्यानंतर ट्रेन बोगद्याजवळ पोचली. त्यावेळी ट्रेन स्लो असल्याने सात ते आठ जण ट्रेनमध्ये चढले. त्यांनी प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हे सर्व दरोडेखोर प्रवाशांकडून…
जळगाव, प्रतिनिधी । कोरोना विषाणूमुळे पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या आणि विधवा महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबध्द आहे. या बालकांच्या मागे राज्य शासन ‘आधारवड’ म्हणून खंबीरपणे उभे राहील. ‘मिशन वात्सल्य अंतर्गत’ अनाथ मुले व विधवांना राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते अजिंठा शासकीय विश्रामगृहात आज सकाळी कोविडमुळे दोन्ही पालक गमावल्याने अनाथ झालेल्या जिल्ह्यातील 20 बालकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या मुदतठेवीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा…