श्रीनगर, वृत्तसंस्था । जम्मू-कश्मीरच्या शोपिया परिसरात तीन दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यात सुरक्षा दलांना यश मिळाले आहे. घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात हत्यारे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. श्रीनगर जम्मू-कश्मीरच्या शोपिया परिसरात तीन दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यात सुरक्षा दलांना यश मिळाले आहे. घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात हत्यारे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. शोपियाच्या तुलरान परिसरात सोमवारी या चकमकीला सुरुवात झाली होती. चकमकीत मारले गेलेले तिन्ही दहशतवादी हे लष्कर ए तोयब्बाचे LeT (TRF) असल्याचे सांगण्यात येते आहे. यातील एका दहशतवाद्याची ओळख पटली असून, तो मुख्तार शाह असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी या मुख्तारने श्रीनगरमध्ये बिहारहून आलेल्या वीरेंद्र पासवान याची हत्या केली होती. त्यानंतर मुख्तार…
Author: saimat team
कॅलिफोर्निया, वृत्तसंस्था । अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात सोमवारी एक मोठा विमान अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक विमान कॅलिफोर्नियातील घरांवर कोसळलं आहे. या अपघातात एका शाळेच्या इमारतीलाही नुकसान झालं आहे. कॅलिफोर्निया राज्यात एक जुनं विमान रहिवासी भागात कोसळलं. हे विमान कोसळताच घराला आग लागली. हा अपघात लॉस एंजेलिसच्या सँटी शेजारील सँटाना हायस्कूलजवळ झाला. या अपघातात किमान दोन जणांचा मृत्यू झाला आहे. माहिती मिळताच अग्निशामक दल आग विझवण्यासाठी पोहोचले. रिपोर्ट्सनुसार, दोन इंजिनचे सेस्ना 340 विमानाने अॅरिझोना येथून उड्डाण घेतली होती. उड्डाण घेतल्यानंतर हे विमान लॉस एंजेलिस भागातील रहिवासी भागात कोसळलं. घरावर कोसळण्यासोबतच विमानाने एका…
जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहर महानगरपालिकेने मूल्यांकनमध्ये दरवाढ केल्याच्या निषेधार्थ आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्यावतीने महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. त्यात प्रमुख मागणी शहरातील रस्त्याची अक्षरश चाळणी झाली असून दैनंदिन स्वच्छता चांगल्या शाळा मिळाव्या गटारी साफ कराव्या, अशा विविध मागण्यांच्या संदर्भात आज पक्ष्याचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी युवक अध्यक्ष मिलिंद सोनवणे, कार्याध्यक्ष सागर सपकाळे, सचिन अडकमोल, महानगर उपाध्यक्ष प्रताप बनसोडे, जेष्ठ नेते यशवंत घोडेस्वार, बबलू शिंदे, नरेंद्र मोरे, भिमराव सोनवणे, अनिल लोंढे, संदीप तायडे, अक्षय मेघे, हरीश शिंदे, शांताराम अहिरे, मनोहर इंगळे, चंद्रकांत खरोटे, जुलाल बाविस्कर आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थितीत होता. यावेळी घोषणाने परिसर…
जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्रातील शेतकरी व सामान्य जनता संकटांमध्ये होरपळत असताना, उत्तर प्रदेशातील जनतेचे तारणहार असल्याच्या अविर्भवत मंत्रिमंडळाच्या बैठकीत शोकप्रस्ताव संमत करणे ही ठाकरे सरकारची निव्वळ ढोंगबाजी आहे. एक हजार पन्नास कोटींच्या दलालीचे पुरावे आयकर खात्याला सापडल्याने लखीमपूर प्रकरणाच्या ढालीआडून महाराष्ट्र बंद पुकारून या गंभीर प्रकरणावरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्याचे हीन राजकारण ठाकरे सरकार करत आहे, असा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे (राजु मामा) यांनी आज ११ ऑक्टोबर रोजी प्रसिध्दी पत्राद्वारे केले असुन प्रदेशातील शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखविणाऱ्या ठाकरे सरकारने महाराष्ट्रातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर का सोडले, असा सवालही त्यांनी केला. वादळे, अतिवृष्टी, दुष्काळ, महापूर अशा संकटात महाराष्ट्रातील शेतकरी व जनता त्रस्त…
मुंबई, | भाजपला सत्तेची मस्ती आहे बाकी काही नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी भाजपवर शरसंधान साधले. आज लखीमपूर हत्याकांड प्रकरणी निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने ‘महाराष्ट्र बंद’ चे आवाहन केले होते. त्यानुसार हुतात्मा चौकात राष्ट्रवादीच्यावतीने मोदी व योगी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी माध्यमांनी पहिल्यांदा तो व्हिडीओ बघावा त्यात माणुसकी दिसते आहे का? त्यात क्रुरता दिसतेय असे सांगतानाच पहिले आपण माणसं आहोत ना असा सवालही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केला. सरकार कुणाचंही असो ही जी कृती झाली ती चिंताजनक आहे. त्यामुळे केंद्रसरकारने जनतेला व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा…
मुंबई, वृत्तसंस्था । लखीमपूर येथील शेतकरी हत्येला भाजपचा पाठिंबा आहेच शिवाय मनसेचेही शेतकऱ्यांच्या हत्येला समर्थन आहे म्हणजे मविआने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ ला विरोध करुन मनसे शेतकरी हत्येला पाठिंबा देत आहे का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांसमोर बोलताना उपस्थित केला आहे. उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खीरी येथील शेतकऱ्यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली. यावेळी हुतात्मा चौकात शेतकर्यांच्या समर्थनार्थ आंदोलन करताना नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खीरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या मुलाने गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडून मारले होते. त्यांना अटक करण्यासाठी टाळाटाळ…
जम्मू, वृत्तसंस्था । जम्मू काश्मीरमधील पुंछ भागात आज (११ ऑक्टोबर) दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत भारतीय सैन्य दलाचे ५ जवान शहीद झालेत. सैन्याने हा पूर्ण परिसर सील केला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती सैन्याच्या प्रवक्त्यांनी दिलीय. भारतीय सैन्याने गुप्त माहितीच्या आधारे पुंछ भागातील जंगलात ३ ते ४ दहशतवाद्यांना घेरलं. त्यानंतर ही चकमक उडाली. सध्या सैन्याने या पूर्ण परिसराची घेराबंदी केलीय. पुंछ जिल्ह्यातील सुरणकोटे भागात डेरा की गली या गावात हे सैन्य अभियान सुरू आहे. A junior commissioned officer (JCO) & four soldiers killed in action during a counter-terrorist operation in the Rajouri sector in the Pir Panjal ranges: Sources —…
पाचोरा प्रतिनिधी । आज सोमवार ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्यात महा विकास आघाडीतर्फे केंद्र सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांन वर भाजप आमदारांच्या मुलाने अन्या केल्यापासून या अन्यायाबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य बंद पुकारण्यात आलेला असून पाचोरा महाविकास आघाडीतर्फे संपूर्ण व्यापार व बाजार पेठ बंद करण्यात आला असून शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी या बंद मध्ये सहभाग नोंदवावा असे आव्हान शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर्फे करण्यात आले होते. या बंदमध्ये शेतकरी व व्यापाऱ्यांनी महा विकास आघाडी सरकारला पाठिंबा देत सर्व भाजीपाला फळ मार्केट विविध दुकाने बंद ठेवून राज्य सरकारला पाठिंबा दर्शविला आहे.आज सकाळी १० वा मा विकास आघाडीच्या अधिकारांत तर्फे शंभर टक्के…
जामनेर, प्रतिनिधी । तालुक्यातील पहूर येथे महा विकास आघाडीतर्फे कडकडीत बंद करण्यात आला होता येथील सर्व व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठान संचालकांनी 100% प्रतिसाद सर्व व्यापाऱ्यांनी महा विकास आघाडीच्या बंदला पाठिंबा दिला. शहरातील सर्व हॉटेल्स टपरीधारक सर्व प्रतिष्ठाने दुकाने शंभर टक्के बंद होते उत्तर प्रदेश येथील लखीमपुर हत्याकांडाची घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी तर्फे महाराष्ट्र बंदची हाक दिली होती महाराष्ट्र बंद मध्ये महा विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले होतेयावेळी पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांना घटनेच्या निषेधार्थ निवेदन सादर करून या घटनेचा निषेध करण्यात आला या प्रसंगी संजय गांधी निराधार समितीचे तालुकाध्यक्ष तथा माजी कृषी सभापती जळगाव प्रदीप भाऊ लोढा ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्याम भाऊ सावळेशिवसेना…
यावल, प्रतिनिधी । महाविकास आघाडीचा आज राज्यव्यापी बंद असला तरी मात्र यावल शहरात महाविकास आघाडीला अल्प प्रतिसाद मिळाला आहे महाविकास आघाडीचे पदाधिकारी,कार्यकर्ते, व्यापारी,नागरिकांना आप- आपली दुकाने प्रतिष्ठाने बंद करण्याचे आव्हान करीत असताना किरकोळ विक्रेते,हातगाडीवर विविध वस्तू विक्रेते,व्यापारी,नागरिकांनी तेवढ्यापुरता म्हणजे पंधरा-वीस मिनिटं आपली दुकाने बंद करून मार्केट बंद करण्याच्या आव्हानाला प्रतिसाद दिला. बाजारपेठ बंद करण्यासाठी महा विकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते पुढे गेल्यानंतर यावल शहरातील दुकाने,बाजारपेठ पूर्ववत सुरू झाली यात महाविकास आघाडीला फक्त पंचवीस टक्के प्रतिसाद मिळाला.बाजार मार्केट दुकाने बंद करण्याच्या आव्हानामुळे यावल शहरातील नागरिकांमध्ये आणि अनेक व्यवसायिकांमध्ये महाविकास आघाडी बाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस,आणि भारतीय…