जामनेर, प्रतिनिधी । जामनेर येथील स्थानिक इयत्ता बारावी शाखेमध्ये शिकणाऱ्या 20 वर्षीय तरुणीने पब्जी खेळाच्या नादात स्वतः आत्महत्या केली. तशी सुसाईड नोट या मुलीने लिहून ठेवली आहे . याबाबत मिळालेली माहिती अशी की कुमारी नम्रता पद्माकर खोडके [मूळ राहणार भराडी] हल्ली मुक्काम जामनेर या 12 वी इयत्तेत शिकणाऱ्या वीस वर्षीय तरुणीने आज पब्जी खेळाच्या नादात एका स्टेपवर आत्महत्या केली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. पोलीस अधिक तपास करत आहे. नम्रता चे वडील हे स्थानिक डॉक्टरांकडे सहाय्यक डॉक्टर म्हणून काम पाहतात .तरुण मुलगी गेल्यामुळे आई-वडिलांवर आभाळ कोसळले . वडील हे डॉक्टर के. एम .जैन यांच्याकडे सहाय्यक म्हणून कार्य करतात…
Author: saimat team
पिंपरी-चिंचवड, वृत्तसंस्था । विधान परिषद सदस्यपदी निवड झाल्याचे नमूद करून महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या खोट्या सहीचे पत्र सोशल मीडियात व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रमोद ठोंबरे या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. खराळवाडी (पिंपरी) येथे २५ सप्टेंबरला हा प्रकार उघडकीस आला. अजीज नवाब शेख यांनी या प्रकरणी शुक्रवारी फिर्याद दिली. ठोंबरे हा फिर्यादी अजीज शेख यांच्याकडे चालक म्हणून कामास होता. त्याने फिर्यादी अजीज शेख यांची विधान परिषद सदस्यपदी निवड झाल्याचे पत्र संगणकावर तयार करुन त्यावर राज्यपालांची खोटी सही केली
लखनऊ, वृत्तसंस्था । लखीमपूर खेरी प्रकरणातील मुख्य आरोपी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अटक करण्यात आली आहे. आशिष मिश्रा याची एसआयटीच्या पथकाकडून सुमारे १२ तास चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. चौकशीदरम्यान त्याने पोलिसांना सहकार्य केले नाही, तसेच अनेक प्रश्नांची उत्तरे त्याने दिली नाहीत असे अटकेनंतर पोलिसांनी सांगितले आहे. या हिंसाचारप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल असलेला आशिष शनिवारी सकाळी १०.३० वाजता उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष चौकशी पथकासमोर हजर झाला होता. पोलीस उपमहानिरीक्षकांच्या नेतृत्वाखालील नऊ अधिकाऱ्यांच्या विशेष चौकशी पथकाने त्याची चौकशी केली.
जळगाव. प्रतिनिधी । रुग्णांवर उपचार करताना अनेकदा अत्याधुनिक सुविधा नसल्याने रुग्णाला मोठ्या शहरांमध्ये जावे लागते. गोरगरीब रुग्णांचे तर चांगलेच हाल होत असतात. आता देशभरातील रुग्णालयात अत्याधुनिक उपचार भारतीय बनावटीच्या उपकरणांद्वारे आणि सेन्सर्सद्वारा करता येणार आहे. आपत्कालीन, गुंतागुंतीचे उपचार, इन्फेक्शनचे रुग्ण यांना संशोधनाचा फायदा होईल. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शल्यचिकित्सा शास्त्र विभागातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश जाधव यांनी याबाबत गौरवास्पद संशोधन केले आहे. त्यांनी गुजरात राज्यातील राजकोट येथील प्रसिद्ध प्रयोगशाळेत नामवंत शास्त्रज्ञांसमोर त्यांचे ४ संशोधन सादर केले. देशभरातील अनेक रुग्णालयात रुग्णांना अत्याधुनिक उपचार मिळणे अनेकदा दुरापास्त होते. त्यासाठी अनेक डॉक्टर संशोधन करून रुग्णांना उपचार मिळणे सोयीचे व्हावे…
जळगाव, प्रतिनिधी । लखिमपुर येथे शेतकऱ्यांवर वाहन चालवून त्यांची हत्या झाल्याच्या निषेध व्यक्त करण्यासाठी राज्याच्या महविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या सोमवार दिनांक ११ ऑक्टोबर च्या महाराष्ट्र बंदला महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाने पाठिंबा जाहीर केला आहे. गेल्या वर्षभरापासून शेतकरी विरोधी ३ काळे कायदे रद्द करण्या च्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे केंद्र सरकार विरोधात आंदोलन सुरू आहे. मात्र आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा सातत्याने प्रयत्न करणाऱ्या मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हत्या करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे लखिमपुर येथील संतापजनक घटनेवरून समोर आले आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष याचा बचाव करण्याचे पुरेपूर प्रयत्न योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तरप्रदेश सरकारने पोलीस…
जळगाव, प्रतिनिधी । मेहरून बालविकास प्रेरणा केंद्र सामाजिक व शैक्षणिक संस्था जळगाव व आधार हाउसिंग फायनान्सच्या व Y4D फाउंडेशनच्यावतीने दिनांक 6 रोजी मेहरुण येथील हनुमान नगर येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधी वितरण शिबिर राबविण्यात आले. सकाळी 9 वाजेपासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत शिबिरामध्ये 200 रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधी वितरण करण्यात आले. मेहरून बाल विकास प्रेरणा केंद्र या संस्थेचे अध्यक्ष समाधान पवार व उपस्थित डॉक्टर मृण्मयी चौधरी तसेच फार्मसिस्ट धीरजकुमार राठोड तसेच रजिस्ट्रेशनला आनंद पवार, निलेश चौधरी, मनोज शिंपी, ललित कोळी, गणेश शिंपी, चेतन परदेशी, दीपक घ्यार, अनिल पवार, मनोज मराठे, सागर सोनवणे आदी उपस्थित होते.
जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य क्रीडा व शा. शि. शिक्षक महासंघ कडून नुकतीच कल्पना चव्हाण यांची प्रभारी शिक्षणाधिकारी (मध्य.) पदी निवड झाल्या बद्दल यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ ( पुणे ) संघांचे उपाध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष डॉ. प्रदिप साखरे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रसंगी जिल्हा मुख्याध्यापक महासंघा चे उपाध्यक्ष श्री…… सचिव.. जी. आर . चौधरी मुख्याध्यापक एच. डी. धांडे, क्रीडा शिक्षक महासंघ जळगांव महानगर चे कार्याध्यक्ष डॉ. विलास नारखेडे, उपाध्यक्ष दिपक आर्डे प क. कोटे च्या कॉलेजच्या पर्यवेक्षिका डॉक्टर सरोज शुक्ला, भुसावळ हायस्कूल चे क्रीडा शिक्षक पर्यवेक्षक प्रमोद शुक्ला, आदी उपस्थिती त होते…
यावल, प्रतिनिधी । एका अल्पवयीन मुलीवर पंचवीस वर्षाच्या तरुणाने लैंगिक अत्याचार करून दुखापत केल्याने यावल पो.स्टे.ला दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियमानुसार तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मधुकर खांडबहाले हे करीत आहे.यावल तालुक्यात दहिगाव येथे दि.8/10/2021रोजी दुपारी4:30वाजेच्या सुमारास ही घटना घडली असली तरी आज दि.9 रोजी यावल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून सकाळी11:30 वाजता तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आला. या घटनेतील आरोपीस अटक करण्यात आली यामुळे यावल तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलीच्या आईने यावल पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दि. 8/ 10/2021रोजी…
जळगाव, प्रतिनिधी । जळगावात काही दिवसांपूर्वी आंबेडकर नगर येथे काकाचा खून करण्यात आला होता याप्रकरणी संशयित आरोपी ला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करण्यात आली आहे. काकाचा खून करुन फरार झालेल्या संशयीत पुतण्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. राजु पंडीत सोनवणे असे हत्या झालेल्या काकाचे तर सुरज उर्फ विशाल अनिल सोनवणे (वय 33, रा. आंबेडकर नगर जुने जळगाव) असे अटकेतील संशयीत आरोपी असलेल्या पुतण्याचे नाव आहे. या घटनेप्रकरणी शनीपेठ पोलिस स्टेशनला गु.र.न. 200/21 भा.द.वि. 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक केलेला संशयीत सुरज हा कोणताही कामधंदा करत नव्हता तसेच तो नेहमी व्यसन करत होता. त्यामुळे…
यावल, प्रतिनिधी । येथील अतिप्राचीन श्री रेणुका देवी मंदिरात कोरोना नियम पाळत नवरात्र उत्सवानिमित्त स्री-पुरुष,ज्येष्ठ नागरिक,तसेच तरुण मुलं-मुली भाविकांची श्रद्धाळूंची मोठ्या संख्येने श्री रेणुका देवी आरती साठी दर्शनासाठी सकाळ व संध्याकाळ मोठ्या संख्येने उपस्थिती दिली जात आहे. यासाठी मंदिराचे पुजारी तथा व्यवस्थापक विनोद बयाणी,राजू बयाणी सपत्नीसह नियोजन करीत आहेत त्याचप्रमाणे पोलिस होमगार्ड बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे यावल येथील श्री रेणुका देवी मंदिर हे सन1838पासून अति प्राचीन आणि जागृत असे असल्याची आख्यायिका भाविकांमध्ये बोलली जात आहे. नवरात्रीत सकाळी5वाजता आरती साठी यावल शहरातील अनेक महिला आपल्या घरातून प्रज्वलित दिवा श्री रेणुका देवी मंदिरात नेव-आण करीत असतात.तर संध्याकाळी7:45 वाजता सुद्धा यावल शहरातील अनेक…