जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अण्णासाहेब डॉ. सतिष भास्करराव पाटील यांनी आज जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या 2021-2026 निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी अमळनेर विधानसभा मतदार संघाचे आ. अनिल भाईदास पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार साहेबराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य रोहन सतिषराव पाटील, जिल्हा बँकेचे संचालिका तिलोत्मा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष बाळु पाटील, पारोळा पंचायत समितीचे माजी सभापती मनोराज पाटील, जिल्हा सरचिटणीस डॉ. शांताराम पाटील, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र शिंदे, हरिष पाटील, शिवाजी पवार, युवक तालुका अध्यक्ष योगेश रोकडे, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष अंकूश भागवत, समता परिषद तालुका अध्यक्ष संतोष महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । सखी सुगरण कट्टा आणि तिवारी नगर महीला ग्रृप यांच्या संयुक्त विद्यमानेग नवरात्रीच्या निमित्ताने कन्या सन्मान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्व कन्या रत्नांना खाऊ, मुलींच्या लागणाऱ्या सर्व वस्तू देऊन कन्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सखी सुगरण कट्ट्याच्या अध्यक्षा शैला चौधरी, पुष्पा पाटील, रेखा कुलकर्णी, दिपाली कुलकर्णी, उज्वला पाटील, माधुरी जावळे, रुंदा पारखे, पल्लवी देसाई, उषा चौधरी, ऋतुजा संत, अबोली पाटील, स्मिता चौधरी, चंद्रभागा चोतमल आदी उपस्थित होत्या.
जळगाव, प्रतिनिधी । आज दिनांक 14 ऑक्टोंबर 2021 भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर तर्फे 65 वा धम्म प्रवर्तक दिन साजरा करण्यात आला आहे. इंडियन रेडक्रॉस समोर उद्यानात डॉ बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याला माल्यार्पण व पूजन पूज्य भिकखू संघरत्न थेरो जी यांच्या हस्ते व भाजपा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी जिल्हा प्रसिध्दी प्रमुख मनोज भांडारकर अनुसूचित जाती अध्यक्षा लताताई बाविसकर सामाजिक कार्यकर्ते अशफाक भाई, डॉ गौतम नन्रवरे ,गणेश सोनवणे संतोष बाविस्रकर नागेशदादा सोनवणे अजय देवगन पुरुषोत्तम बाविस्कर पराग ब्राह्मणकार आदी उपस्थित होते
जळगाव, प्रतिनिधी । झोपलेल्या नऊ वर्षीय अल्पवयीन गतीमंद मुलीस शेतात उचलुन घेऊन जात अत्याचार करणाऱ्या आरोपीस १४ वर्षे सक्तमजुरी व नऊ हजार रुपये दंडाची शिक्षा बुधवारी न्यायालयाने ठोठावली. अर्जुन अशोक पाटील असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. पाटील हा रिक्षाचालक आहे. २० फेब्रुवारी २०१४ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास अर्जुनने तालुक्यातील तुरखेडा येथे वीटभट्टीवर राहणाऱ्या नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीस घरातून उचलुन नेले. यानंतर शेतात घेऊन जात दमदाटी करुन तीच्यावर अत्याचार केले. ही मुलगी गतीमंद आहे. २१ रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर मुलीच्या अाईने दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिस ठाण्यात पोक्सो, अत्याचार व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. २१ राेजीच…
मुंबई, प्रतिनिधी । राज्यातील सर्व अकृषी , अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग २० ऑक्टोबरपासून सुरू करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत बुधवारी केली. सामंत म्हणाले की, ज्यांनी कोविड-१९ च्या लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत ते विद्यार्थी विद्यापीठ व महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील. ज्यांनी लस घेतलेली नाही त्यांच्याकरिता विद्यापीठाने संबंधित संस्थांचे प्रमुख, महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्या मदतीने स्थानिक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवून लसीकरण प्राधान्याने पूर्ण करून घ्यावे. तसेच विद्यापीठ/महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेदेखील लसीकरण प्राधान्याने व्हायला हवे. वर्ग पूर्णपणे की ५० टक्के…
मुंबई, वृत्तसंस्था । राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (जि. पुणे) यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित झाली आहे. याबाबत गुरुवारी घोषणा होण्याची शक्यता आहे.दीड वर्षांपासून हे पद रिक्त आहे. महिला अत्याचाराच्या घटना राज्यामध्ये वाढत असताना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महामंडळांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या होत्या. शिवसेना-भाजप युती सरकार काळात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती केली होती.
भडगाव, प्रतिनिधी । सततच्या पावसामुळे आलेल्या पुरात भडगाव तालुक्यातील गुढे येथील रहिवासी भीमा रामा माळी या इसमाचा येथील मुतऱ्या नाल्यात वाहुन गेल्याने दि.२८ सप्टेंबर रोजी दुर्दवी मृत्यू झाला होता दरम्यान त्यांच्या कुटुंबाला शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन निधी अंतर्गत चार लाखांचा धनादेशाचे वाटप आ.किशोर अप्पा पाटील यांचे हस्ते करण्यात आले. मयताची पत्नी भागाबाई भीमा माळी यांना त्यांचे गुढे येथील घरी जात आमदारांनी या मदतीचा धनादेश सुपूर्द केला. अवघ्या पंधरा दिवसात मयताच्या वारसांना शासकीय मदत मिळाल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी तहसीलदार मुकेश हिवाळे,माजी जि प सदस्य विकास पंडीत पाटील, जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील (भुरा आप्पा ),शिवसेना तालूका प्रमुख ,डॉ विलास…
जळगाव, प्रतिनिधी । रायसोनी समूहाद्वारे तीन दिवसीय उपक्रम “स्कुल ऑफ लीडरशिप” चे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा उद्देश रायसोनी समूहाला एका उन्नत व सकारात्मक दिशेकडे अग्रेसर करणे हा होता. या उपक्रमात रायसोनी समूहाचे शिक्षकवर्ग व कर्मचारी वर्गात नेतृत्व क्षमतेचा विकास व प्रशिक्षण सत्राच्या माध्यमातून सकारात्मक दृष्टिकोन उत्पन्न करते होता. उदघाटनाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुरेखा ठक्कर उपस्थित होत्या. रायसोनी समूहाचे अध्यक्ष सुनील रायसोनी व जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. सचिन उंटवालेनी उपस्थितांना संबोधित करताना उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. प्रशिक्षण शिबिराच्या प्रथम सत्रात रायसोनी समूहाचे विविध अधिष्ठाता, विभागप्रमुख, संयोजक व वरिष्ठ अध्यापकांनी सहभाग घेतला. या सत्रात त्यांना नेतृत्व…
भुसावळ प्रतिनिधी | चॉपर व पिस्तुलाचा धाक दाखवून ५ लाख रुपये खंडणी मागण्याच्या प्रकरणातील दाखल गुन्ह्यातील दोन संशयितांना तालुका पोलीस स्थानकाच्या पथकाने अटक करण्यात आली आहे. महामार्गावर असणार्या बर्हाटे पेट्रोल पंपाजवळ बंटी पथरोड यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेले बॅनर फाडल्याच्या आरोप करत मयूर मदन काळे (वय १९, रा.साकेगाव) याचे संशयितांनी चारचाकीतून अपहरण केले. चॉपर व पिस्तुलाचा धाक दाखवून ५ लाख रुपये खंडणी देण्याच्या अटीवर सोडून दिले होते. ७ व ८ सप्टेंबरला घडलेल्या या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. या घटनेप्रकरणी मयूर मदन काळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बंटी पथरोड, नितीन कोळी (अंजाळे, ता.यावल), हर्षल पाटील, गोलू जव्हेरीलाल कोटेचा (साकेगाव), ओम, सागन भगवान भोई…
नगर, वृत्तसंस्था । विजेचा धक्का बसून युवा खेळाडूचा मृत्यू झाल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी महावितरण कंपनीचा कनिष्ठ अभियंता, टीव्ही केबल चालक, पुरवठादार अशा एकूण सहा जणांविरुद्ध मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अजिंक्य सुरेश गायकवाड (३०, रा. साईनगर, बुरुडगाव रस्ता, नगर) या युवा खेळाडूचा ३१ ऑगस्ट रोजी विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. या संदर्भात त्याचे वडील माजी नगरसेवक सुरेश गायकवाड यांनी तक्रार केली होती. त्यानुसार कोतवाली पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. अधिक तपासानंतर सहा जणांविरुद्ध मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक आर. आर. शिंदे करत आहेत. श्रीगणेश केबल सर्विसच्या मालक वनिता अनिल बोरा या…