Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी । महाबळमधील अनुराग स्टेट बँक काॅलनीतील वैशाली ज्ञानेश्वर बडगुजर यांनी आपल्या छंदाला आकार देत नवरात्राेत्सवानिमित्त घरातच ६ बाय ४ आकारात पाेट्रेट रांगाेळीतून दुर्गामाता रेखाटली आहे. ही रांगाेळी त्यांनी दरराेज ३ तास वेळ काढून ६ दिवसांत म्हणजे १८ तासात पूर्ण केली आहे. यासाठी ७ किलाे रांगाेळी लागली आहे. रांगाेळीत याेग्य रंग छटा दाखवण्यासाठी त्यांनी पांढऱ्या रांगाेळीत लेक रंगांचा वापर केला आहे. या कार्यासाठी त्यांना पती ज्ञानेश्वर बडगुजर व मुले विपुल व निखिल बडगुजर यांनी मदत केली आहे. पहिल्या प्रयत्नात रेखाटलेली आकर्षक रांगाेळी पाहण्यासाठी परिसरातील नागरिक येत आहे. वैशाली बडगुजर यांना चित्रकलेची आवड असून त्या घरकाम सांभाळून प्रत्येक सणांनुसार घरात…

Read More

जम्मू, वृत्तसंस्था । पाच दिवसांपासून पूँछ जिल्ह्यात अतिरेक्यांशी चकमक सुरू असून, त्यांना ठार मारण्यासाठी पॅरा कमांडो व लढाऊ हेलिकाॅप्टर्सची मदत घेतली जात आहे. भारतीय लष्कराने केलेल्या गोळीबारात दोन अतिरेकी मारले गेले आहेत. घनदाट जंगलात अतिरेकी लपल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात सैनिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. अतिरेक्यांवर उखळी तोफांचा मारा व रॉकेटस् डागले जात आहेत. पाच दिवसांत लष्कराचे ७ जवान शहीद झाले आहेत, तर गुरुवारी रात्री रायफलमॅन विक्रमसिंह नेगी (२६) आणि रायफलमॅन योगंबर सिंह (२७, दोघेही रा. उत्तराखंड) या दोघांना वीरमरण आले. सूत्रांनुसार जंगलांत अतिरेक्यांना शोधण्यासाठी लष्कराने आपले विशेष कमांडो व पॅरा कमांडो तैनात केले आहेत. अतिरेक्यांचे अस्तित्व पाहून लष्कराने राजौरी-पूँछ…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । ऑक्टोबर महिन्याच्या अगदी पहिल्या तारखेपासून सुरु झालेली पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीची मालिका काही केल्या थांबायला तयार नाही. देशभरात शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली. पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी जाहीर केलेल्या दरांनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या प्रतिलीटर दरात 35 पैशांची वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 111.44 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 102.13 रुपये मोजावे लागत आहेत. तर पॉवर पेट्रोलचा प्रतिलीटर दर 115.38 रुपये इतका आहे. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर…

Read More

उत्तरप्रदेश, वृत्तसंस्था । येथील १७ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. गेल्या पाच वर्षांपासून मुलीवर लैंगिक अत्याचार होत होते. पोलिसांनी याप्रकरणी सात आरोपींना अटक केली आहे. यामध्ये पीडित मुलीच्या वडिलांसहित समाजवादी आणि बहुजन समाज पक्षाच्या जिल्हा प्रमुखांचा समावेश आहे. अकरावीत शिकणाऱ्या या पीडित विद्यार्थिनीने आपल्यावर एकूण २८ जणांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपींमध्ये वडील, राजकीय नेत्यासोबत नातेवाईक आणि काही स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. पोलिसांनी मुलीची वैद्यकीय चाचणी केली आहे. तसंच दंडाधिकाऱ्यांसमोर तिचा जबाब नोंदवण्यात आला आहे. “आम्ही आतापर्यंत सात लोकांना अटक केली असून यामध्ये मुलीचे वडील आणि समाजवादी पक्ष तसंच बहुजन समाज पक्षाच्या जिल्हा प्रमुखांचा समावेश…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यातील रूग्णांना चांगल्या आरोग्य सेवेबरोबरच यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी रूग्णवाहिका महत्वपूर्ण असून जिल्ह्यास अजून रूग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. कोविडचा प्रतिकार करण्यासाठी रूग्णवाहिका हा सर्वात महत्वाचा घटक असल्याचे आपण सर्वानी अनुभवले आहेत. आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी जिल्ह्यास यापूर्वी पहिल्या टप्प्यात १३ तर दुसर्‍या टप्प्यात १२ रूग्णवाहिका मिळाल्या आहेत. यांच्या मदतीने आपण कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या प्रतिकारासाठी सज्ज आहोत. असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जिल्हा रूग्णालयाच्या आवारात आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणातंर्गत प्राप्त झालेल्या १२ रूग्णवाहिकांच्या लोकार्पणाप्रसंगी ते आज बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते रूग्णवाहिकांना चालकांना चावी देऊन या रूग्णवाहिका हस्तांतरीत करण्यात आल्यात. यावेळी पालकमंत्र्यांनी रूग्णवाहिका चालकांना किलोमीटरऐवजी फेरीनुसार वेतन देण्याची…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । राज्य शासनाने राज्यातील हजारो पोलीस हवालदारांसाठी एक महत्वाचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज यासंदर्भातील प्रस्तावास मान्यता दिली असून यामुळे राज्यातील अंमलदारांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. वर्षानुवर्षे सेवेनंतरही त्यांना पोलीस उपनिरीक्षक या अधिकारी पदावर पोहचता येत नव्हते पण पदोन्नतीच्या या निर्णयाचा थेट फायदा येत्या काही महिन्यात सुमारे 45 हजार हवालदार, सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांना होणार असून विजयादशमीच्या मुहूर्तावर या बातमीमुळे हजारो अंमलदारांच्या घरात आनंददायी वातावरण निर्माण होणार आहे. या निर्णयामुळे पोलीस शिपाई संवर्गातील अंमलदारास कमी कालावधीत पदोन्नतीच्या 3 संधी कमी मिळून अधिकारी पदावरून सेवानिवृत्त होता येईल. पोलीस उपनिरीक्षक…

Read More

जळगाव प्रतिनिधी । विवाहितेच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. शहरातील गुरूनानक नगरात दिनेश बदलू लोहाळेकर हे आपल्या पत्नी नंदा लोहाळेकर (वय-४०) यांच्यासह राहतात. नंदा लोहाळेकर खासगी नोकरीला आहे. ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास नंदा यांनी आणलेल्या पगारावरून त्यांचे पती दोन जेठ आणि दोन्ही जावा यांनी शिवीगाळ व मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर १३ ऑक्टोबर रोजी सकाळी पाचच्या सुमारास नंदा यांनी देवीच्या पूजेसाठी पती दिनेश यांच्याकडून ५० रुपये मागितले होते. याचा राग आल्याने पती दिनेश याने नंदा यांना शिवीगाळ केली. याला कंटाळून विवाहित नंदा लोहाळेकर यांनी सकाळी…

Read More

यावल, प्रतिनिधी । नेहरू युवा केंद्र जळगाव,जिल्हा प्रशासन व यावल किसान प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत यावल तालुक्यात दि.13ऑक्टोंबर 2021रोजी सकाळी7ते10 वाजेच्या दरम्यान15गावांतुन यावल तालुका प्रशासन व यावल फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या सहकार्याने नेहरू युवा केंद्र समन्वयक तेजस पाटील व यावल फार्मर प्रोड्युसर कंपनी संचालक योगेश चौधरी यांच्या नेतृत्वात संपूर्ण तालुक्यातील15गावांमध्ये एकाच वेळी स्वच्छ्ता अभियान कार्यक्रम राबविण्यात आला. संपूर्ण तालुक्यातून 3 टन कचरा गोळा करण्यात आला. या कार्यक्रमाला यावल तालुका तहसीलदार महेश पवार साहेब,यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी,यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, नेहरू युवा केंद्र जळगाव जिल्हा ऑफिसर नरेंद्र डागर,अकांटट अजिंक्य गवळी सर व यावल फार्मर…

Read More

यावल प्रतिनिधी । ४७ वर्षीय शेजमजूराची घरामध्ये दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १४ रोजी किनगाव येथे घडली. याप्रकरणी यावल पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. यावल तालुक्यातील किनगाव येथील शेतमजूर राजु रामसिंग कोळी (वय-४७) हे मोलमजूरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. आज गुरूवारी १४ ऑक्टोबर रोजी राजू कोळी यांची पत्नी शेतात कामाला गेल्या होत्या. घरात कुणीही नसल्याने घर बंद करून छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. मयताचा मोठा भाऊ अशोक कोळी यांच्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मागील तीन दिवसात किनगाव गावातील एकाच…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. मंदाकिनी खडसे यांना मंबई उच्च न्यायालयाने दिलासा देत त्यांचा अटकपूर्व जामीन अखेर मंजूर केला आहे. मंदाकिनी खडसेंना तुर्तास तरी अटक न करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. सत्र न्यायालयाने याआधी त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला होता. त्यामुळे त्यांना अटक होण्याची दाट शक्यताही वर्तवण्यात येत होती. यानंतर त्यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान घेत मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मंदाकिनी खडसेंच्या या प्रकरणावर आज न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाने मंदाकिनी खडसेंच्या अटकेला तुर्तास स्थगिती देत त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पण…

Read More