जळगाव, प्रतिनिधी । रायसोनी समूहाद्वारे तीन दिवसीय उपक्रम “स्कुल ऑफ लीडरशिप” चे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा उद्देश रायसोनी समूहाला एका उन्नत व सकारात्मक दिशेकडे अग्रेसर करणे हा होता. या उपक्रमात रायसोनी समूहाचे शिक्षकवर्ग व कर्मचारी वर्गात नेतृत्व क्षमतेचा विकास व प्रशिक्षण सत्राच्या माध्यमातून सकारात्मक दृष्टिकोन उत्पन्न करते होता. उदघाटनाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुरेखा ठक्कर उपस्थित होत्या. रायसोनी समूहाचे अध्यक्ष सुनील रायसोनी व जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. सचिन उंटवालेनी उपस्थितांना संबोधित करताना उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. प्रशिक्षण शिबिराच्या प्रथम सत्रात रायसोनी समूहाचे विविध अधिष्ठाता, विभागप्रमुख, संयोजक व वरिष्ठ अध्यापकांनी सहभाग घेतला. या सत्रात त्यांना नेतृत्व…
Author: saimat team
भुसावळ प्रतिनिधी | चॉपर व पिस्तुलाचा धाक दाखवून ५ लाख रुपये खंडणी मागण्याच्या प्रकरणातील दाखल गुन्ह्यातील दोन संशयितांना तालुका पोलीस स्थानकाच्या पथकाने अटक करण्यात आली आहे. महामार्गावर असणार्या बर्हाटे पेट्रोल पंपाजवळ बंटी पथरोड यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेले बॅनर फाडल्याच्या आरोप करत मयूर मदन काळे (वय १९, रा.साकेगाव) याचे संशयितांनी चारचाकीतून अपहरण केले. चॉपर व पिस्तुलाचा धाक दाखवून ५ लाख रुपये खंडणी देण्याच्या अटीवर सोडून दिले होते. ७ व ८ सप्टेंबरला घडलेल्या या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. या घटनेप्रकरणी मयूर मदन काळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बंटी पथरोड, नितीन कोळी (अंजाळे, ता.यावल), हर्षल पाटील, गोलू जव्हेरीलाल कोटेचा (साकेगाव), ओम, सागन भगवान भोई…
नगर, वृत्तसंस्था । विजेचा धक्का बसून युवा खेळाडूचा मृत्यू झाल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी महावितरण कंपनीचा कनिष्ठ अभियंता, टीव्ही केबल चालक, पुरवठादार अशा एकूण सहा जणांविरुद्ध मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अजिंक्य सुरेश गायकवाड (३०, रा. साईनगर, बुरुडगाव रस्ता, नगर) या युवा खेळाडूचा ३१ ऑगस्ट रोजी विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. या संदर्भात त्याचे वडील माजी नगरसेवक सुरेश गायकवाड यांनी तक्रार केली होती. त्यानुसार कोतवाली पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. अधिक तपासानंतर सहा जणांविरुद्ध मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक आर. आर. शिंदे करत आहेत. श्रीगणेश केबल सर्विसच्या मालक वनिता अनिल बोरा या…
मुंबई, वृत्तसंस्था । देशभरात पेट्रोल आणि डिझलेच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी जाहीर केलेल्या दरांनुसार पेट्रोल 34 तर डिझेलच्य प्रतिलीटर दरात 37 पैशांनी वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर होते. त्यामुळे इंधनाच्या दरवाढीला लगाम बसेल, अशी आशा होती. मात्र, आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने सामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 110.75 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 101.40 रुपये मोजावे लागत आहेत. तर पॉवर पेट्रोलचा प्रतिलीटर दर 114.69 रुपये इतका आहे. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 104.78 आणि 93.54…
जळगाव प्रतिनिधी । २० हजार रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी रंगेहात पकडल्याची घटना आज घडली. याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस मुख्यालयातील महिला दक्षता विभागातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला २० हजाराची लाच घेतल्याप्रकरणी रंगेहात पकडल्याची घटना आज दुपारी घडली. या कारवाईमुळे पोलीस मुख्यालयात खळबळ उडाली आहे. संशयित आरोपी पोलीस उपनिरीक्षक मिलींद केदार असे अटक केलेल्याचे नाव आहे. जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या परिसरात असलेल्या महिला दक्षता समिती कार्यालयात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिलींद केदार यांनी एका प्रकरणात तक्रार यांच्याकडून २० हजाराची लाचेची मागणी केली होती. यासंदर्भात तक्रारदार यांनी जळगाव येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाने कारवाई करत…
जळगाव, प्रतिनिधी । जगात भारताचा महासत्ता म्हणून उदय होईलच. त्यासाठी शिक्षण प्रणालीतील विद्यार्थी घडविण्याच्या प्रक्रियेला अत्यंत महत्त्व आहे. विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टीकोनासोबत संवेदनशिलता, प्रामाणिकपणा शिकविणे गरजेचे आहे. ही मोठी जवाबदारी शिक्षकांवर आहे, असे प्रतिपादन साहित्यिक अ.फ.भालेराव यांनी केले. राजनंदिनी बहुउद्देशिय संस्था आणि श्री राजपूत करणी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांचा गौरव समारंभ दर्जी फाउंडेशनच्या सभागृहात झाला. यात संस्थेतर्फे शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी अ.फ.भालेराव बोलत होते. व्यासपीठावर श्री राजपूत करणी सेनेचे खान्देश विभाग कार्याध्यक्ष विलाससिंह पाटील, जिल्हा उपाध्यक्ष बी.एच.खंडाळकर, सिंगल वुमन फाउंडेशनच्या अध्यक्षा मीनाक्षी चव्हाण, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुरेश वाघ, लोककलावंत गणेश अमृतकर, कुणबी पाटील वधू-वर सूचक केंद्राचे…
जळगाव, प्रतिनिधी । येथील प्रसिद्ध सुवर्ण व्यापारी किशोर बाविस्कर (दापोरेकर) यांची मुलगी स्वाती किशोर बाविस्कर यांची केंद्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्लीच्या जिल्हासह सरचिटणीसपदी नियुक्ती झाली असून सदर नियुक्ती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण मिश्र यांनी केली आहे. स्वाती बाविस्कर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्याची नियुक्ती करण्यात येत असल्याचे मिश्र यांनी सांगितले. त्यांच्या या निवडी बद्दल त्यांच्यावर समाजाच्या सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
जळगाव, प्रतिनिधी । आज दि. १२ मंगळवार रोजी जी.एम. फाऊंडेशनच्या अनमोल सहकार्याने व भाजपा जिल्हाध्यक्ष आ. सुरेश दामू भोळे (राजूमामा), महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी, युवा मोर्चा महानगराध्यक्ष आनंद सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अक्षय जेजुरकर व युवा मोर्चा मंडल क्र.३ तर्फे आयोध्या नगर कासार मंगल कार्यालयात येथे भव्य कोव्हिड लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. नगरसेवक डॉ.विरण सूरेश खडके, श्री.प्रदिपजी रोटे, निखील सूर्यवंशी, भुषण भोळे, भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत जन्मू कश्मिर येथील रजौरी सेक्टर मध्ये येथे शहीद झालेल्या अमर जवानांना भावपुर्ण श्रद्धांजली देवून शिबिरस सुरुवात करण्यात आली. यावेळी परिसरातिल ६७८ नागरिकांनचे लसीकरण करण्यात आले.…
जळगाव, प्रतिनिधी । तांबापुर जळगाव येथील अभेद्या फाउंडेशनच्या 40 मुलांना व महिलांना वेलस्पन कंपनीच्या CSR विभागामार्फत आणि वेल्सपन एन्टरप्राईज लिमिटेड परिवाराकडून आज कपडे रेशन व मिठाई वाटप करण्यात आली. यावेळी वेल्सपम फाउंडेशनचे नम्रपाली गोंडाने, सीएसआर ऑफिसर व अभेद्य फाउंडेशनच्या संचालिका वैशाली झाल्टे, संतोष वंजारी, समाधानी शैएख, केशव चौधरी, राहुल मोरे, बिरांकर रॉय, रामकृष्णन बोटव, विवेक कुमार, सुजित कुमार, सुमित दास, रशीद शोएब अहमद आदी उपस्थित होते
जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पाळधी गावात १३ बुधवार रोजी दुपारी १२ वाजता कापूस भरण्यासाठी व्यापारी ट्रक वाहन क्रमांक MH 19 Z 0890 हे गावातील कापूस भरण्यासाठी नाचणखेडा रोड वरील परदेशी मंगल कार्यालयाजवळ आले असता ट्रकच्या टपावर बसलेले तीनजण ट्रकवरून खाली उतरत असताना त्यांना विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने विजेचा जबर शॉक लागला. यामधे माळपिंप्री येथील विशाल नाना श्रीखंडे वय 23 हा युवक जागीच मरण पावला असून त्याच्या सोबतचे ज्ञानेश्वर भोजने व ज्ञानेश्वर काळे या दोघांना देखील विजेचा शॉक लागला असून त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. सदरील घटनेची माहिती पहूर पोलिस स्टेशन मध्ये मिळताच पहूर पोलिस स्टेशनचे पोलिस…